राख आणि रक्षण...

तो श्रीमंत होता. तसा त्या नगरातील तो एकटाच, एकमेव श्रीमंत वगैरे नव्हता. पण इतरांच्या, विशेषतः चोर,गुंड ह्यांच्या डोळ्यांवर यावी इतकी संपत्ती तरी नक्केच बाळगून होता. तसंही संपत्ती बाळगून असायला काय जातय? ती त्यानं कमावलेली नव्हतीच. पडली होती आपली पिढीजात त्याच्याकडं. कधी योगायोगानं, कधी मेहनतीनं तर कधी चक्क पालथे,निंद्य उद्योग करुन त्याच्या पूर्वजांनी ती कमावली होती म्हणे.
श्रीमंतच तो. त्यातही जन्मजात पैशेवाला. त्याचे शौक काय कमी असणार ? एकदा त्याला आपल्याला झोपेत असताना सतत कुणीतरी संरक्षण पुरवावं असं वाटू लागलं. खर तर त्याला असं वाटावं हेच अलगद कुणीतरी योजलं होतं. तर इतरही शौकांप्रमाणं पुरेसे पैसे असले, की ते घालवायचे मार्गही आपोआप निघतात; ह्या समजुतीप्रमाणेच घडू लागलं. बर्‍यापैकी पैसा घेउन दोन अंगरक्षक हे काम करण्यास तयार झाले. शिवाय लगलच तर त्याचं मनोरंजनही ते करुन देत.
असेच काही दिवस गेले. ते त्याचं रंजन करत; त्याला गुंगी येइपर्यंत. गुंगीलाच झोप समजून तो झोपी जाइ. गुंगीबाहेर आला की त्याला फार त्रास होइ. पण ते पुन्हा त्याला गुंगीयेइपर्यंत जादुई कला सादर करीत. नंतर रक्षणासाठी उभे ठाकत.
.
एकदा बाहेरच्या आवाजाने तो गोंधळून उठला; दचकून अंथरुणात बसला. आसपास आग लागल्याचं त्याला तुटक्या खिडकितून दिसू लागलं. पण इतक्यात रक्षकांनी त्याला "असं काहीही होत नाहिये. बहुदा आपल्याला दु:स्वप्न पडले असावे. किंवा आता उठल्यावरही तोच भास होतोय." असं समजावलं. दुसर्‍या कुशीवर झोपायला सांगितलं. आणि काय गंमत! तो तसा दुसर्‍या कुशीवर झोपल्यावर आग कशी एकदम गायब झाली! समोर नुसतीच भिंत! काही चिंताच नाही. आगीच्या ज्वाळाही नाहित.
फक्त काही किंकाळ्यांचा वगैरे त्रास होत होता. तेवढ्यापुरता तो त्रास त्याने स्वतःपुरता मिटवला. कानात बोळे घालून!
.
आता कसं सारं शांत शांत होतं!कुठे आगही नाही आणि कुठे किंकाळ्याही नाहित. सारं कसं शांत शांत.
स्मशानशांततेकडे वाटचाल करणारं!

--मनोबा

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

सूक्ष्मकथेतले रूपक समजले नाही. क्षमस्व! ('झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेणार्‍याला नाही' असा एक वाक्प्रचार आहे. त्याच्याशी या कथेचा संबंध आहे का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...पण ही कथा 'माहिती' या क्याटेगरीत का वर्गीकृत केली, ते आधी बोला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@'न'वी बाजू
"माहिती " क्याटेगरीत चुकून गेली. टंकनदोष असतो, तसाच हा माच्या माउसचा क्लिकदोष समजावा.
.
@विसुनाना
सूक्ष्मकथेतले रूपक समजले नाही. क्षमस्व! ('झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेणार्‍याला नाही' असा एक वाक्प्रचार आहे. त्याच्याशी या कथेचा संबंध आहे का?)
हो. त्याच धर्तीवरचे आहे. काहिंना डोळ्यावर पट्टी ओढून सुखी रहायला आवडते. हे त्यांच्याचबद्दल.तर कुणाला आपण स्वत: किंवा इतर कुणी आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधत आहेत, हे ही ठाउक नसते.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ठिक.. अधीच्या रुपककथांइतकी आवडली नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!