बेंका: माझे अनुभव आणि मते.....

परिसर मुलाखतीत ( campus recruitment) मध्ये निवड झाली आणि डिग्री मिळताच सातेक वर्षापूर्वी तातडीने आय्टी कंपनीत लागलो. तेव्हा पगारी खात्याच्या निमित्ताने आयुष्यात प्रथमच बॅंकेत खाते उघडले. IDBI हा एकमेव पर्याय तेव्हा त्या कंपनीने आम्हाला दिलेला.
IDBIही bank owned by govt of India असे लिहून मिरवते. पकिइतके असूनही काही जण त्याला खाजगी बँकच का समजायचे ते कळले नाही.
पुढील वर्षभर तसा कारभार ठीक होता.(कामच काय होते म्हणा, ATM मध्ये जाउन शे पाचशे काढणे ह्याउप्पर सुरुवातीस काहिच केले नाही.)
पण नंतर काही कारणाने ATM कार्ड वापरता येइनासे झाले आणि नवीन मागवण्याची गरज पडली.
बँकेस दुसरे कार्ड मागण्यास गेलेलो असताना त्यांनी अर्ज करण्यास सांगितला; तो केला. एक दोन आठवडे होउनही कार्ड मिळाले नाही. "तुमचा पत्ता सापडत नाही" असे अचाट उत्तर मिळाले. वस्तुतः अत्य्म्त साधा सोपा, पौड रोडवर मेन हायवेअलगतचा असा तो पत्ता होता. इतरवेळी ह्याच बँकेची बँक स्टेटमेंट वगैरेही ह्याच पत्त्यावर येत. एकदा कुठल्याशा कारणाने पन्नासेक रुपयांचा दंड आकारनीए करण्यात आल्याचे कळवणारे पत्रही ह्याच बँकेचे ह्याच पत्त्यावर आले. पण फक्त atm कार्ड येइना. atm PIN सुद्धा आली, पण कार्ड नाही. हे वारंवार झाले. शेवटी त्यांना "घर साप्डत नसेल तर बँकेत मगवा, मी इथूनच घेउन जाइन" अशी विनंती केल्यावर तीसुद्धा आधी नाकरण्यात आली. नंतर बर्‍याच वेळ लकडा लावल्यावर ते मनय केले गेले. शेवटी झाले काय? बँकेच्या शाखेतही कार्ड मिळालेच नाही!
कारण? तुम्ही "अर्ज केलेलाच नाही" असे ऐकवण्यात आले. त्यावेळी प्रथमच "आपण कुठेही कार्यालयात अर्ज केल्यावर त्याची पोचपावती मागायची असते" ही अक्कल आली. नवीन अर्ज त्यांना दिल्यावर पोचपावती मागितली. "पोचपावती मिळणार नाही" असे बाणेदार उत्तर समोरुन आले. मिलणार नाही? का मिळणार नाही? ह्याचे उत्तर एवढेच की "आम्ही देत नाही" आता मात्र वैतागलो. म्हटले चुलीत जा. मी म्यानेजरशी बोलतो. त्यादिवशी तोही व्यस्त असल्याने आणि मलाही तातडीचे काही काम निघाल्याने झट्कन जावे लागले. विषय पुन्हा मागेच पडला.
तोवर माझ्या कंपनीने कोटक महिंद्रा ब्यांकेतही पगारी खाते उघडण्याची मुभा देणे सुरु केले होते. मी ह्यांना वैतागून तिकडे खाते उघडले. व नियमित पगार तिकडे घेणे सुरु केले. कोटक सर्व्हिस वगैरे बाबत उत्तम वाटली. नियमित पत्त्यवर योग्य पत्रे येत. व्यवहार झलयावर sms येत. नेट बँकिंगही अगदि सोयीस्कर होती. अडचण एकचः- किमान दहा का वीस हजार तुमचा सरासरी तिमाही शिल्लक खात्यात हवी(avg quarterly balance).
.
नंतर फुरसत मिळताच पुन्हा आयडीबीआय कडे मोर्चा वळवला; तिथले पगारी खाते आता निव्वळ बचत खाते झाले होते. नव्याने अर्ज करुन पिन मागितली. पोचपावती बद्दल अपेक्षित नकार आलाच. शांतपणे तक्रार करण्यासाठी म्यानेजरकडे गेलो. त्याने तेवध्यापुरते थातुरमातुर उत्तर दिले "देतो ना पोचपावती. नाही कोण म्हणतय वगैरे वगैरे" पण पाच मिनिटे द्या म्हणून ते महाशयही गायब झाले. नंतर ब्रँच बंद होत आली, तरी ह्यांचा पत्ताच नाही. दुसरे दिवशी आंतरजालावरून fc road branch बद्दल तक्रार केली. दोन्-तीन दिवसात चुअकशीचे नि सांत्वनाचे कॉल आले. मला ते नको होते, फक्त atm pin व त्यासाठी पोचपावती हवी होती. "तुमचा गैरसमज झाला असेल. आम्ही पोचपावती देत नाही असे होउच शकत नाही" असे दिव्य उत्तर रिजनल म्यानेजर म्हणवणार्‍या महाशयांनी फोनवरुन दिले; आंतरजालीय तक्रारीची दखल म्हणून. "कृपा करुन अजून एक तक्रार देउन पहा शाखेत. ह्यावेळेस नक्की काम होइल" असे सांगितले गेले. तसे ते झालेही.पोचपवती मिलाली, कार्ड, पिन वगैरे मिळाले, पण ते शेवटी शाखेतच. घरच्या पत्त्यवर नाहिच.
idbi भिकारडी बँक आहे असे म्ह्णत बसलो मी; पण नक्की मी काय करायला हवे हे अजून समजले नाही. मी banking ombudusman गाठला असता तर काम सोपे झाले असते का, असे वाटून गेले.
.
पुढे काही दिवसातच कंपनी बदलली. तिथे hdfc,standdard chartered, icici,citi bank असे काही पर्याय होते, "सर्व खाजगी बँका चोर असतात.त्यातल्या त्यात hdfc कमी चोर आहे. " असे लहानपणापासूनच पढवले गेले असल्यामुळे तिथे खाते उघडले. सेवेच्या नावाने बरीचशी idbi सारखी बोंब होती.पण थोडीफार सुसह्य सेवा होती(पन्नासाव्या चकरेत तरी काम व्हायचे.) पण चालून गेले.
.
काही दिवसात गृह कर्ज घेतले. हे lic housing finance ह्या कंपनीकडून घेतले. ह्यांच्याकडूनच मी का घेतले ते मला स्वतःला जूनही समजले नाहई. ह्यांनी ८.९% तीन वर्षे फिक्स्ड दराने कर्ज दिले. जवळपास असेच पण ह्यापेक्षा थोड्या कमी दराने hdfc सुद्धा देत होती, iciciसुद्धा होती, पण मी घेतले नाही; का कुणास ठाउक.
तिथे सतीश बामणे हे महाशय भेटले. लोन प्रोसेसिंग वगैरे झाले. शक्यतो lic hfl च्या शाखेत जायची गरज पडत नसे; ह्याच महाशयांच्या हाती मी कागदपत्रे सुपूर्त करीत असे. पण नंतर disbursement होण्याच्या काळात साहेब येउन अधूनमधून चिरीमिरी मागू लागले. बिनापावतीचे पैसे!
तक्रार करण्यासाठी म्हणून थेट lic housing finance च्या शाखेत गेलो तेव्हा "नुकतेच ह्या प्रकारच्या गैरव्यवहारांमुळे त्यांना काढण्यात आले आहे. कोर्टात कुठलीशी आर्थिक गैरव्यवहाराची केसही सुरु आहे."असे कळ्वले गेले. सुदैवाने माझे सर्व काम चोख होते,. त्यात कुठे काही गडबड नव्हती.
lic housing finance कडून कर्ज घेतल्याला आज तीन वर्षे होताहेत. त्यांचे व्याजचे दर काही सर्वोत्तम आहेत असे नव्हे. ते सर्वोत्तम eligibility देतात; अधिक रकमेची कर्जे देतात असेही नव्हे. सेवाही यथातथाच आहे. थोडक्यात इथूनच कर्ज घ्यावे असा कोणताही incetive तुम्हाल नाही; ना व्याजदर, ना एखादी स्किम, ना अधिकची eligibility ना सर्व्हिस.
.
लोन ट्रान्सफर करण्यासाठी बरीच शोधाशोध केली. त्यावेळी जाणवलेल्या गोष्टी:-
१.sbi अत्य्म्त कमी व्याज दराने कर्ज देइल. पण एकूणातच पारंपरिक दृष्टीने ते वागत असल्याने तुमची eligibility तिथे नेहमी कमीच येणार.
शिवाय सर्व्हिसच्या नावाने बोंब.max gain ही स्किम म्हणून खरेच सुरेख आहे. विशेषतः तुमच्या बचतीच्या सवयी चांगल्या असतील; महिन्याचा खर्च बरोबर तुम्ही उत्पन्नाच्या हिशेबाने राखत असाल तर. पण सर्विस मागू नये. खेटरे झिजवायची तयारी हवी.
२.iciciसुद्धा खजगी मानली जात असले तरी फार काही मोठी एलिजिबिलिटी हल्ली देत नाहिये. sbi पेक्षा पाच्-सात टक्केच जास्त रक्कम ते देउ करतात. सर्विस चांगली. 1% emi परत करण्याची स्किम आहे; पण ती अजून अभ्यासू शकलेलो नाही; त्यामुळे त्याबद्दल नक्की मत देता येणार नाही. शिवाय रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी करताच, तुम्ही ह्यांना संपर्क साधून एका बाँड पेपरवर कुठलासा करार केलात की लागलिच ते व्याजदरही दोनेक दिवसात कमी करतात. असे करणार्‍या खाजगी बँका कमी. अळमटळम करणार्‍याच अधिक.
३.axis, idbi हे तुम्हाला सर्वाधिक रकमेचे कर्ज देउ शकतात. idbiची सेवेच्या नावाने बोंब आहेच. पण.....
असो.
४. पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक वगैरे sbi इतक्याच रकमेचे कर्ज मंजूर करताना दिसले. सहकारी बँका सढळ हस्ते कर्ज देउ शकतात; हा गैरसमजच म्हणायचा मग.
.
असो. उर्वरित थोड्यावेळाने परतून लिहितो.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

'कोटकच्या पगार अकाउंट मधे देखील मिनीमम बेलन्स ठेवावा लागतो' हे ऐकुन आश्चर्य वाटलं. शक्यतो शुन्य बेलन्स चालतो.
बाकी माझा icici च्या बाबतीत दुसर्या गावी चेक एनकेशमेँटचा प्रॉब झालेला. इकडच्या अकाउंट मधुन तर पैसे २ दिवसात काढुन घेतले पण तिकडे डिपॉझीट केलेच नाहीत. का तर म्हणे २१ दिवसांनी करणार तशी पॉलीसी आहे. मग तक्रारीच पत्र दिल्यावर केले १० दिवसांनी.
hdfc ची ऑनलाइन कस्टमर केअर भंकस आहे. icici ची बेस्ट.
sbi लोन च्या वेळेस इंटरेस्ट रेट चा प्रॉब आलेला. सेँक्शन झालेल्या वेळी जो होता त्यापेक्षा ०.५% जास्त रेटने लोन घ्याव लागलं Sad नंतर ही एकदा फिक्सड रेट असूनही फ्लोटिँग करुन ज्यादा पैसे कापले. पण ते नंतर करेक्ट करुन रिटर्न केले. नंतर एकदा मी अशीच बँकेत गेले तर माझ्या घरी रिकव्हरी एजंट पाठवायची तयारी चालु होती Blum 3 का तर यांच्या येडछाप सिस्टीम ने १४ वर्षाँऐवजी ५ वर्षाँच टेन्युअर दाखवायला चालु केलं आणि वर 'आम्ही तुम्हाला किती फोन केले लागलेच नाहीत'. नंबर बघीतला तर तो कोणता तरी वेगळाच.. हाहा.
बाकी एक कळत नाही icici ने ब्लेकलिस्ट केलेल्या बिल्डरच्या ग्राहकांना hdfc stan chart लोन कसं काय देत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला ICICI, SBI, IOB आणि Kotak Mahindra या भारतीय ब्यांकांचे वैयक्तीक अनुभव आहेत. या व्यतिरिक्त काहि ब्यांकांमध्ये होम लोनच्या वेळी गेलो होतो.

यापैकी (कोणी कितीही शिव्या घालो, पण) ICICI मध्ये अजून तरी मला नावे ठेवण्यासारखे फारसे काहि दिसलेले /अनुभवास आलेले नाही.
(शिवाय परदेशात त्याचा उच्चार अनेकदा "इकी इकी बँक" केला जातो ही करमणूक बोनस)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पगारी खात्याला किमान रकमेची अट नसते असे वाटते.
आयसीआयसीआयचा अजून तरी काही फार वाईट अनुभव आलेला नाही. एचडीएफसीने मात्र भलत्याच खात्यात चेक जमा करून मोठा फटका बसायची वेळ आणली होती.
एसबीआयमध्ये डिपॉझिट उघडायला गेलो असता कारकून बाई एखाद्या खातेदाराकडून रेफरन्स आणा म्हणून अडून बसल्या होत्या. शेवटी मॅनेजरकडे गेलो असता त्याने "आपल्याकडे पैसे ठेवायला आलेल्या लोकांकडे कसले रेफरन्स मागताय?" असं झाडल्यावर कुरकुरत काम केले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजा आपल्याला लोन-बिन नको आहे, पगार-बिगार येत नाही.

फक्त मुदत ठेव --> व त्याचे व्याज सेव्हिंग मधे जमा करणे -->व जमतील तितकी बिले भरता येणे. (जमल्यास एका मुदत ठेवीवर एक क्रेडीट कार्ड देणे) हे सर्व शक्य तितक्या वेळा ऑनलाईन करता येणे या निकषावर कोणती बँक सुचवू शकाल?

इथे आयसी आयसी आय ला दोन मते पडलेली दिसत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझं मत पण इकीकी ला च आहे.. एक चेकचा वाईट अनुभव आला म्हणुन काय झालं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही सर्वसाधारण कामे आहेत. कुठल्याही राष्ट्रियीकृत ब्यांकेत किंवा खाजगी ब्यांकेत ही कामे होउ शकतात.
त्यातल्या त्यातः-
तुम्ही बचत खात्यात किती शिल्लक सातत्याने मेंटेन* करु शकाल त्यावर ते ठरेल.
माझा कोटक आणि iciciचा अनुभव बिले वगैरे भरण्यासाठी खूपच चांगला आहे. कोटक हे पगारी खात्यापासून बचत खाते बनले. तेव्हापासून किमान पंधरा वीस हजार शिल्लक त्या खात्यात असावी असे बँकवाले म्हणतात.
हे चालत असेल तर icici इतकीच चांगली सर्व्हिस कोटकनेही दिली.
.
*मराठी गंडलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

(मेंटेन.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त मुदत ठेव --> व त्याचे व्याज सेव्हिंग मधे जमा करणे -->व जमतील तितकी बिले भरता येणे.

माझा खाते नंबर पाठवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

पासवर्ड, एटीम कार्ड व पिन सकट अन्यथा स्वीकारण्यात येणार नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एस बी आय मधल्या खात्यासाठी इंटरनेट बँकींग सुविधा घेतली तेव्हा पहिल्या वेळी दिलेल्या युझरनेम-पासवर्डनी एका दुसर्याच माणसाचे खाते उघडले !....लगेच बँकेत जाऊन ही तक्रार केली. त्यांना त्यात काहीच फारसं घडल्यासारखं वाटलं नाही. लिफाफा वर खाली झाला असेल तुमचा असे काहीतरी म्हणाले आणि पुन्हा नवीन युझरनेम-पासवर्ड साठी अर्ज करायला सांगितला. तेव्हा पासून इंटरनेट बँकींगकडे संशयानेच पाहात्ये...न जाणो माझं खातं कुणी उघडलं असेल !

एकदा अकाउंट ट्रान्सफर करायचं होतं -एका शहरातून दुसर्या शहरात...अनेक महिने (८+) हे काम रखडवलं..तेव्हा शेवटी ओंबुड्समनचा इंगा दाखवला. मग सुतासारखे सरळ झाले कामे लवकर करण्याच्या बाबत आणि एकूणच आदबीने वागू लागले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एस बी आय मधल्या खात्यासाठी इंटरनेट
बँकींग
सुविधा घेतली तेव्हा पहिल्या वेळी
दिलेल्या युझरनेम-
पासवर्डनी एका दुसर्याच माणसाचे खाते
उघडले !....>>>
इकीकीच्या मोबाइल बँकीँग अॅप ने स्वतःचा युजरनेम पासवर्ड वापरुन देखील दुसर्याच कोणाच अकाउंट ओपन झाल्याचा अनुभव ऐकला आहे.
आणि AXIS बँकेने काही दिवसांपुर्वी मला अकाउंट स्टेटमेँट इमेल केलेल्या, माझे त्या बँकेत अकाउंटदेखील नसताना Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठाण्याची गोखले रोडवरची महाराष्ट्र बँक ही महाभिकार बँक आहे असं मत साधारण दहा वर्षांपूर्वी त्या भागातल्या ठाणेकरांमधे पापिलवार होतं. ओळखीतले महाराष्ट्र बँकेत नोकरी करणारे लोकही त्या ब्रँचच्या नावाने खडे फोडायचे. नेमकं माझं फॅमिली पेन्शन खातं त्याच बँकेत होतं. पेन्शन खात्याला म्हणे चेकबुक मिळत नाही. मी लगेचच बॅगेतून वही काढली, एक अर्ज लिहीला आणि पुढे केला. लेखी नकार मागितल्याचा लगेच परिणाम झाला. ५०० रूपये खात्यात नेहेमी ठेवण्याचं वचन घेऊन चेकबुक मिळालं.

बँकेत जाऊन त्या खात्यातून पैसे काढताना नेहेमी "पेन्शनर कुठे आहे?" अशी चौकशी व्हायची. विशीतली मुलगी सहसा पेन्शनर नसते हे मान्य आहे, पण किती वेळा असा प्रश्न विचारणार? शिवाय पेन्शनराचा फोटो पासबुकच्या मागे डकवलेला असतो. तो पहा ना एकदा! सुरूवातीला सरळ उत्तरं दिली, तरीही काऊंटरमागचे लोकं भयंकर शंकेखोर नजरेने बघायचे. नंतर थंड चेहेर्‍याने भयंकर कडवट उत्तरं द्यायला लागले. "पासबुकावरचा फोटो बघायला बंदी नाहीये" किंवा "तो फोटो पाहिलात तर हाफ डे नाही लागणार" किंवा काहीही. काही वेळा कडूशार डोस दिल्यानंतर हा प्रकार बंद झाला. चेकबुक आणि अन्य बँक अकाऊंटचं असणारं एटीएम यांच्यामुळेही सोय झाली होती.

सगळ्यात महान प्रकार होता तो म्हणजे हयात असण्याच्या दाखल्याबाबत. दरवर्षी डिसेंबरमधे पेन्शनर लोकांना आपण हयात असल्याचा फॉर्म भरावा लागतो. पहिली दोन वर्ष काहीच अडचण आली नाही. तिसर्‍या वर्षी बँकेत गेले. कुठल्या काऊंटरवर फॉर्म मिळतो, त्याच्या फॉरमॅलिटीज काय सगळं माहित होतं. फॉर्म मागितला. "माझ्याकडे नाही तो. त्या मॅडमकडून घ्या." नक्की कोणता काऊंटर नंबर ते विचारून त्या बाईंसमोर रांगेत उभी राहिले. माझा नंबर आला तेव्हा त्या बाई म्हणाल्या, "माझ्याकडे नाही तो फॉर्म. परांजप्यांकडून घ्या. परांजप्यांचं टेबल ते." मला पुन्हा त्याच काऊंटरवर परत पाठवलं. मी पुन्हा थंड चेहेर्‍याने परांजप्यांसमोर. परांजप्यांनी तीच टेप वाजवली. मग पुन्हा वही काढली. शांतपणे एक पत्र लिहीलं आणि बँक मॅनेजरच्या दरवाजाशी गेले. मॅनेजर केबिनमधे नव्हते. काही मिनीटांत ते आले, त्यांनी चौकशी केली. माझ्या वयाचे फार लोकं तिथे नव्हतेच. त्यांच्या हातात ते तक्रार-पत्र दिलं. तोंडाने हा टेनिसचा खेळ सुरू आहे हे पण सांगितलं. मॅनेजरने मला तिथेच बसायला सांगितलं आणि लगेचच हातात तो फॉर्म घेऊन आले. तिथेच मी तो भरला, परांजप्यांनी तिथे येऊन भरलेला फॉर्म माझ्याकडून घेतला, पावती दिली. आणि वर "खूप टेन्शन आहे हो. होतात अशा चुका." असं काहीतरी म्हटलं.

पुढच्या डिसेंबरमधे हयात असण्याचा फॉर्म भरण्याची वेळ आली तेव्हा मी शिक्षणासाठी परदेशात गेले होते. त्यापुढे तीनच महिने पेन्शन मिळणार होतं. तेवढ्या पैशांसाठी विमानप्रवास करणं म्हणजे नालेसाठी घोडा विकत घेणं झालं असतं. शेवटचं पेन्शन झालेलं असेल याची खात्री झाली तेव्हा भावाने पासबुक भरून घेतलं. मी आधीच सही केलेला चेक त्याच्याकडे दिलेला होता. त्याने अकाऊंटमधले सगळे पैसे, सगळे रूपये काढून घेतले. दुसर्‍या बँकेच्या माझ्या खात्यात पैसे टाकले. पुन्हा कधी त्या महाराष्ट्र बँकेच्या आत पाऊल टाकलं नाही.

---

आणखी काही काम युनायटेड वेस्टर्न किंवा आयडीबीआय (युनायटेड वेस्टर्नला आयडीबीआयने विकत घेतलं.) बँकेत होतं. पासबुक भरून घ्यायचं किंवा असंच काही किरकोळ. मी गेले तेव्हा बँकेत फार गर्दी नाही, गडबड नाही. उन्हातून एसीत आत गेल्यानंतर मस्त वाटलं. माझं काम लगेचच झालं. पण आता मी फॉरीन रिटर्ण्ड असल्यामुळे काऊंटरमागच्या माणसाला हसून 'थ्यँक्स' म्हटलं. तो मध्यमवयीन काका मनुष्य जो काही गडबडला त्याचं नक्की वर्णन करता येणं कठीण आहे. आपण चोरी करतो आहोत अशी भीती, मुलगी लाईन मारते आहे असं वाटल्यामुळे झालेला आनंद, गिर्‍हाईकाने काही बोलल्यावर आपण उत्तर द्यावं का नाही याचा संभ्रम अशा काही संमिश्र भावना त्याच्या चेहेर्‍यावर उमटल्या. "भारतात भारतीयासारखंच रहा" अशी ट्यूशन नंतर मिळालीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"पहिले तीन चार परिच्छेद वाचून नेट ब्यांकिंग वापरुन हवे तेव्हा पैसे हवे तिथे ट्रान्सफर का नाही करत" असं विचारावं म्हणत होतो.पाहिजे कशाला दरवेळी चेकबुक्,पासबुक.
पण नेमकं ह्याच धाग्यातले आधीचे भलतेच अकाउंट उघडले जाण्याचे किस्से वाचले; आणि म्हटलं असो.
.
शेवटचा idbi, थँक यू वाला किस्सा भारिच. मी फ्रेशर असताना माझा एक म्यानेजर दहाएक वर्षे बाहेर राहून आलेला. तो गाडी चालवताना तिथल्या सवयीनुसार इथेही पादचार्‍यांसाठी थांबे. पण तसे करण्याने पादचारी गोंधळून जात्.कारण त्यांना इतका आदर मिळण्याची सवयच मुळी नव्हती. इकडे त्याच्या गाडित बसलेले आम्ही वैतागून जात. कोथरुड ते हिंजवडी प्रवासाला साहेब काहीही गर्दी नसताना दीडेक तास घेत. लोकांसाथी थांबून थांबून!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

२००१-२००४ या काळात महा बँकेत इंटरनेट बँकिंग असतं तर मग काय हवं होतं? त्या काळात घरी सुरूवातीला डायल-अप नेटवर्क होतं; २००३ च्या शेवटी घरी केबलनेट आलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण आता मी फॉरीन रिटर्ण्ड असल्यामुळे काऊंटरमागच्या माणसाला हसून 'थ्यँक्स' म्हटलं. तो मध्यमवयीन काका मनुष्य जो काही गडबडला त्याचं नक्की वर्णन करता येणं कठीण आहे. आपण चोरी करतो आहोत अशी भीती, मुलगी लाईन मारते आहे असं वाटल्यामुळे झालेला आनंद, गिर्‍हाईकाने काही बोलल्यावर आपण उत्तर द्यावं का नाही याचा संभ्रम अशा काही संमिश्र भावना त्याच्या चेहेर्‍यावर उमटल्या.

मस्त वर्णन. फारच मस्त फेसरिडिंग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हो, हे फारच आवडलं.
मलाही परदेशात राहायचा योग आल्याने अशा वाईट सवयी लागल्या होत्या. शिवाय इकडे "थँक्यूऽऽऽ" असं लांबवून म्हणायची पद्धत आहे. तसे भारतात म्हटल्यास दुकानातल्या काही कन्यकांनी "लोचट मेला" असा कटाक्ष टाकला होता की काय असे आता वाटायला लागले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्साच अनुभव, पण दुसर्‍या बाजूने.

भारतात पहिल्यांदा 'परत' आले तेव्हा मुंबई-दिल्ली विमानप्रवास करायचा होता. मुंबईला विमानात बसले. शेजरच्या सीटवरचा माणूस बराच उशीरा आला. तो आला तेव्हा मी त्यालाही हसून 'हॅलो' म्हटलं. शरीरयष्टी आणि चेहेर्‍याने साधारण राजपाल यादवचा डुप्लिकेट दिसणारा तो मनुष्य पार ढेपाळला. "या मुंबईच्या मुली फार आगाऊ असतात. आधीच एकतर विमानातून जायचं म्हणजे केवढं टेन्शन आहे. त्यात हिने बलात्कार करायचा प्रयत्न केला तर मी स्वतःचा बचावही करू शकणार नाही" असा त्याचा चेहेरा दिसला. त्याने हसण्याचा क्षीण प्रयत्न केला आणि सरळ हनुमान चालिसा पुटपुटायला सुरुवात केली. दोनेक तासांच्या प्रवासात तो माणूस माझ्यामुळे घाबरला होता का विमानप्रवासाची त्याला भीती होती कोण जाणे! माझ्या चेहेर्‍यावर तसा फार पाशवीपणा नाहीये हो!!

'सॉरी' आणि 'थ्यँक्यू'मुळे भाऊ, बॉयफ्रेंड, शेजारी-पाजारी फार वैतागायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

+११११११११.

फेसरीडिंग लैच भारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

महाराष्ट्र बँक ही महाभिकार बँक

ही द्विरुक्ती झाली आहे असे नम्रपणे सुचवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रुपी ब्यांकेत माझ्या बायकोचे करंट अकाउंट व एफडी आहे. ती ब्यांक फापलल्या मुळे सारस्वत ब्यांकेत असलेल्या एफडीं कडे ती आता संशयाने पाहू लागली आहे. या सहकारी व खाजगी ब्यांका कधी फापलतील याच नेम नाही त्या पेक्षा सरकारी ब्यांका बर्‍या असा विचार तिच्या मनात बळावू लागला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मनराव IDBI कंपल्सरी सात वर्षापूर्वी म्हणजे शारदा सेंटर मध्ये काम करत होता का Wink

अदिती 'थ्यँक्स' चा किस्सा सगळ्यात बेष्ट..
एकूणात एक बँक नाही तर बहुधा ब्रँच वैताग असतात असा अनुभव आहे. ICICI पूर्वी विनासूचना धबाधब चार्जेस लावत असे किंवा वाढवत असे म्हणून राग यायचा. पण आजवर तरी फार वाईट अनुभव नाही गेल्या दहा वर्षात..
त्यांचे कस्टमर केअर इतरांपेक्षा बरे आहे असे ऐकले आहे. नुकताच एका कामासाठी फोन केला होता. अतिशय उत्तम अनुभव होता.

पण परंपरागत बँका कस्टमर सर्व्हिस मध्ये वाईट मार खातात. कॉसमॉस मध्ये माझं पहिलं खातं होतं. नंतर आयटी च्या सॅलरी अकाऊंट साठी ICICI आलं.
अनेक वर्ष कॉसमॉसचं अकाऊंट पहिल्या पगाराच्या आठवणीसाठी ठेवल्यावर अखेर बंद करायचं ठरवलं.
ते बंद करताना जो उदास अनुभव आला तो पाहिल्यावर मला खातं बंद करण्याचं जे काही थोडं फार वाईट वाटत होतं ते कुठच्या कुठे हरवलं.
ही कॉसमॉस लक्ष्मी रोड विशेष सेवा कक्ष शाखा वामा शेजारी वळणावर.
बसायला एकूण चार जागा. कुठल्याही स्वरुपाचा फॉर्म / स्लिप लिहायला काहीही जागा नाही. क्लिअरिंग व इतर कामांसाठी एकूण तीन लोक त्यात एक
प्रशि़क्षणार्थी.. आधी कोणी मला तो फॉर्म द्यायला तयार नव्हतं. मग मॅनेजर सदृश कोणीतरी एका स्वतंत्र टेबलावर होते त्यांच्याकडे गार्‍हाणे नेल्यावर त्यांनी एका बाईंना फॉर्म द्यायला सांगितले. तो चक्क कॉमन फॉर्म होता. त्यात अकाऊंट क्लोज फक्त एक पर्याय होता आणि त्याला फक्त एक टिकमार्क होता.
तो भरल्यावर मला मॅनेजर साहेब म्हणाले की अर्धा तास लागेल.
जेव्हा तो एका जरा वयस्कर कारकूनाकडे दिला तेव्हा ते वस्सकन अंगावर आले की आज नाही होणार. मग डिटेल्स पहायला त्यांनी बराच वेळ घेतला. खूप टाळाटाळ केल्यावर मग मॅनेजर जागेवरूनच जरा ठेवणीतल्या आवाजात बोलले. तेव्हा गाडी पुढे गेली.
त्यांनी मी अकाउंट बंद केल्याची मला काहीही पावती दिली नाही. अखेर त्या लोकांवर विश्वास ठेवून मी फॉर्म देऊन घरी गेलो.
दोन तीन दिवसांनी मी चौकशीला गेल्यावर सर्व लोकांनी माझ्यावर अनेक उपकार करत असल्याचं मला दाखवून दिलं. पण दुर्दैवाने त्यांना दोन तीन दिवसांपूर्वी कोणी अकाउंट बंद केल्याचा फॉर्म दिल्याचं लक्षात नव्हतं जणू रोज दहा लोक खाते बंद करत असतात..
अखेर मॅनेजर पुन्हा मध्ये आले. त्यांनी जागेवरूनच सर्व सांगितलं जरा मोठ्या आवाजात. मग दोन लोकांनी ती बँक ऑर्डर शोधली काही वेळ. रजिस्टर मध्ये रेकॉर्ड सापडलं अखेर. मग लक्षात आलं की तो बँक ऑर्डर चेक सापडत नाहीये. प्रशि़क्षणार्थीने निरागस पणे सांगितले की त्या रजिस्टर मध्येच ठेवला होता!
मग समजलं की तो पाने उलटताना पडला. माझ्या सुदैवाने शिपायाला मिळाला.
मग त्यांना हे माहीत नव्हतं की माझी सही कुठे घ्यायची. मीच कॉलम्स पाहून अंदाजाने केली सही आणि मॅनेजरांचे आभार मानले. पायरी उतरलो ते आता या सहकारी बँकांच्या नादी न लागण्याचं पक्कं ठरवूनच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनराव IDBI कंपल्सरी सात वर्षापूर्वी म्हणजे शारदा सेंटर मध्ये काम करत होता का
यप्स.
कॉस्मॉसचा अनुभव भारीच. तो कुठेही येउ शकतो. माझे वडील सार्वजनिक क्षेत्रातील मराठवाड्यातील नामांकित बँकेत आहेत; तिथे ह्याहून भन्नाट किस्से होतात, राष्ट्रियीकृत बँक असूनही.
माझे एक अतिरिक्त खाते बंद करताना idbi मध्ये मला तुमच्या कॉस्मॉससारखाच त्रास झाला. अर्थात त्यावेळी मी पोचपावती मागणे, म्यानेजरला पकडाणे ह्याबाबींत पटाइत झालो होतो.सराइताप्रमाणे काम करुन घेतले मग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नव्या परदेशातील किंवा शिकारीची वर्णने ऐकताना जसा थरार जाणवतो ना तसे तुम्हा लोकांचे अनुभव वाचुन होतेय.
सुदैवाने मला असा एकही अनुभव आलेला नाही अर्थात मी इकीकी सोडल्यास इतर ब्यांकांमध्ये सेविंग खातेच ठेवलेले नाही म्हणून असेल Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

महाबैन्केचे खाते बन्द करताना असाच मनस्ताप झालेला.
इकीकी वर सध्या बरे चालले आहे...बैन्केत जायची सहसा वेळ येत नाही..सगळे व्यवहार ओन्लाइन होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परदेशात वास्तव्यास असणारी किंवा वास्तव्य केलेली बरीच मंडळी इथे असावीत. तिकडच्या बँकांचे किस्से पण सांगा........

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमची 'ही' एका राष्ट्रीयकृत बँकेत आहे त्यामुळे मला त्यांच्या कुठल्याही ब्रँचमधे 'रॉबर्ट वडरा' सारखी ट्रीटमेंट मिळते. त्यामुळे दुसर्‍या कुठल्या बँकेत जाण्याचा प्रसंग आला नाहीये नशीबाने!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठल्याही ब्रँचमधे 'रॉबर्ट वडरा' सारखी ट्रीटमेंट मिळते
हे हे.
.
आमचे तीर्थरुप एका राष्ट्रियीकृत ब्यांकेत आहेत.पण सालं तिथे मला कुणी राहुल गांधीसारखी ट्रीटमेंट देत नाय.
लोन मागायला गेलो तर हरिलाल* गांधींसारखी ट्रीटमेंट मिळाली.
.
*हरीलाल हे गांधीजींचे चिरंजीव. "गांधी वि. गांधी" ह्या नाटकाच्या शीर्षकातील एक गांधी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मनोबा आणि अदिती - ब्यांकिंग मधे फक्त मलाच वाईट अनुभव येतात असं मला वाटायचं … हा गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद.

थोड्याफार फरकाने खाजगी आणि राष्टीर्यीकृत ब्यांका सारख्याच वाईट असतात …

अनुभव १ -
hdfc वाल्यांनी मला एकदा लोन फोरेक्लोजर साठी ठाण्यावरून चेंबूरच्या ब्रांचमध्ये पाठवल होतं तिथेही आमच्या तीर्थरूपांच्या वयाचे गृहस्थ निवांतपणे आज सिस्टीम स्लो आहे आज काम होणार नाही वगैरे सांगत होते. अनेक वेळा विनंती करून, मी संध्याकाळपर्यंत (सकाळी ११ वाजल्यापासून ) थांबायला तयार आहे अस सांगूनही काम करायला नकारच मिळत होता … शेवटी हेड ऑफिस मधील एका ओळखीच्या VP ला फोन केला आणि वरून फोन आल्यावर (सरकारी कारभाराप्रमाणे) अंदाजे दहा मिनिटात सर्व काम करून पोचपावती मिळाली. आज सिस्टीम स्लो आहे की माणसे स्लो आहेत या प्रश्नाला मात्र अपेक्षेप्रमाणे HO ला फोन कशाला करायचा आम्ही इथे काम करायलाच बसलोय वगैरे उत्तरं मिळाली.

अनुभव २ -

ब्यांक ऑफ इंडिया मधे एकदा माझ्या बाळपणी उघडलेल्या मायनर अकौंट ला केलेली सही आठवत नाही त्यामुळे नवीन सही रेकॉर्डमध्ये नोंदवून घ्यावी असा अर्ज घेऊन गेल्यावर "तुमची अर्जावरची सही आमच्या रेकॉर्डमधील सहीशी म्याच होत नाहीये" असं अचाट उत्तर मिळालं होतं … तेव्हापासून ब्यांकेत गेल्यावर काहीही ऐकायची मानसिक तयारी झालीये माझी …

बाकी atm पिन पोचलाय पण कार्ड पोचतच नाही, पोचपावती देत नाही, वगैरे अडचणी नित्याच्याच …
कोटक ब्यांक अजून तरी बेश्ट सर्विस देतेय … आणि नेटब्याकिंग सुविधा चालू झाल्यापासून ब्यांकेत जायची फार वेळा गरज पडत नाही हीच काय ती समाधानाची बाब …

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

इथे महाभिकार बँक अशी द्विरुक्ती दिसली आणी तसा नवा अनुभव आठवला..
एज्युकेशन लोन साठी मजबूत ओळख वगैरे काढून (महाबँकेत पूर्ण हयात घालवलेल्या पन्नाशीच्या काकू आणि त्यांचे अनेक काँटॅक्ट्स)
महाबँकेत गेलो. तर इतकं मोठं एज्युकेशन लोनच देत नाही म्हणून सांगितलं.
मग म्हणे पूर्ण रकमेचं स्थावर मालमत्तेचं तारण हवंय .. तेही उभं केलं तर शेवटी सांगितलं की त्यावर एचडीएफसी चं पहिलं लोन आहे.
आमच्या लोनचं तारण दोन वेळा पूर्ण होईल इतका व्हॅल्युअरचा भाव असला तरी आम्ही एचडीएफसी च्या प्रॉपर्टीवर सेकंड चार्ज करत नाही!
म्हणजे थोडक्यात यांना लोन द्यायचं नाहीये..
आता गोष्ट अशी की शिक्षण खर्चाच्या कर्जावर वैयक्तिक कर्जानंतर सर्वाधिक व्याजदर असतो. त्यावर अतिशय सुरक्षित पूर्ण मालमत्तेचं तारण.
उत्तम लोन पेमेंट इतिहास आणि क्रेडिट इतिहास. उत्तम शिक्षण संस्था.
पण कर्ज द्यायचंच नाही म्हटल्यावर काय करा...
मला शेवट पर्यंत समजलं नाही की त्यांना त्या लोन प्रोसेसिंगची यातायात करायची नव्हती का सुरक्षितता इतकी उघड असून पटली नाही का अजून काही अलिखित नियम.. आणि इतकी ओळख असताना ही परिस्थिती.. त्या ओळख असलेल्या काकूंनी स्वतःच सांगितलं की काम होणार नाही. वेळ वाया घालवू नकोस.. तोवर दुसर्‍या ठिकाणी काम होईल..
शेवटी खाजगीकृत संस्थेतून जास्त व्याजाने पण सुलभ प्रोसेसने लोन मिळाले ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही दिवसात गृह कर्ज घेतले. हे lic housing finance ह्या कंपनीकडून घेतले. ह्यांच्याकडूनच मी का घेतले ते मला स्वतःला जूनही समजले नाहई. ह्यांनी ८.९% तीन वर्षे फिक्स्ड दराने कर्ज दिले. जवळपास असेच पण ह्यापेक्षा थोड्या कमी दराने hdfc सुद्धा देत होती, iciciसुद्धा होती, पण मी घेतले नाही; का कुणास ठाउक.
तिथे सतीश बामणे हे महाशय भेटले. लोन प्रोसेसिंग वगैरे झाले. शक्यतो lic hfl च्या शाखेत जायची गरज पडत नसे; ह्याच महाशयांच्या हाती मी कागदपत्रे सुपूर्त करीत असे. पण नंतर disbursement होण्याच्या काळात साहेब येउन अधूनमधून चिरीमिरी मागू लागले. बिनापावतीचे पैसे!
तक्रार करण्यासाठी म्हणून थेट lic housing finance च्या शाखेत गेलो तेव्हा "नुकतेच ह्या प्रकारच्या गैरव्यवहारांमुळे त्यांना काढण्यात आले आहे. कोर्टात कुठलीशी आर्थिक गैरव्यवहाराची केसही सुरु आहे."असे कळ्वले गेले. सुदैवाने माझे सर्व काम चोख होते,. त्यात कुठे काही गडबड नव्हती.
lic housing finance कडून कर्ज घेतल्याला आज तीन वर्षे होताहेत. त्यांचे व्याजचे दर काही सर्वोत्तम आहेत असे नव्हे. ते सर्वोत्तम eligibility देतात; अधिक रकमेची कर्जे देतात असेही नव्हे. सेवाही यथातथाच आहे. थोडक्यात इथूनच कर्ज घ्यावे असा कोणताही incetive तुम्हाल नाही; ना व्याजदर, ना एखादी स्किम, ना अधिकची eligibility ना सर्व्हिस.

माझे पहिले होम लोन आय icici चे होते. आणि त्या बाबतीत ती बँक महाचोर आहे असा निष्कर्ष मी काढ्ला. तथाकथित फ्लोटींग इंटरेस्ट रेट मार्केट प्रमाणे कमी कधीच होत नाही. वाढायच्या वेळी मात्र बरोबर वाढतो. कारण त्यांची फ्लोटींग इंटरेस्ट रेट पक्का करायची फसवी पद्धत! पार्ट पेमेंट, फोर क्लोजर, लोन ट्रान्स्फर सगळीकडे इतकी छुपी कलमे आहेत ना तुमच्या कदून पेनल्टी वसूल करायची, परत आयुष्यात icici कडून कुठलेही लोन घेणार नाही हे पक्के!
त्यामुळे दुसर्‍या वेळी एस बी आय, एल आय सी होम फायनान्स अशा दोन पर्यायांचा विचार केला.
एस बी आय - १ वर्ष ८.००%, पुढील २ वर्षे ८.५% , घराच्या किमतीच्या ८०% लोन, किचकट, वेळखाऊ कार्यपद्धती.
एल आय सी होम लोन - ३ वर्षे ८.९%, घराच्या किमतीच्या ८५% लोन, त्यामानाने सोपी कार्यपद्धती.

यातून मी एल आय सी होम लोन निवडले आणि माझा तरी अनुभव चांगला आहे... मला अजिबात पश्चाताप नाही हा पर्याय निवडल्याबद्दल. शिवाय कुठलेही कमिशन न घेता त्यांच्या एका कर्मचार्‍याने मला अगदी डोअर स्टेप सर्विस दिली, मला त्यांच्या ऑफिस चे तोंड पण न पाहता १ महिन्या च्या आत लोन मिळाले. अर्थात आमची कागदपत्रे अगदी स्वच्च होती. आणि आमच्या लोन क्षमते पेक्षा फक्त ६०% आम्ही घेत होतो वगैरे वगैरे पण घटक असतील त्यात माहीत नाही.

" ह्यापेक्षा थोड्या कमी दराने hdfc सुद्धा देत होती" . - लोन च्या पहिल्या अनुभवातून जाणार्‍या माझ्या नवर्‍याने मला अगदीच हाच निरागस प्रश्न विचारला. ८.७५% ने hdfc लोन देत असताना आपण LIC कडून ८.९% ने का घेतोय? - त्याच्या ऑफिस मध्यल्या एकाने HDFC कडून ८.७५% ने घेतले एक दोन महिन्याच्या अंतराने!
या मार्च मध्ये आम्ची पहिली ३ वर्षे पूर्ण झाली. HDFC वाल्या मित्राचा व्याजदर साधारण वर्षभराने वाढला. सध्या तो १०.५ ने भरत आहे. सरळ आहे कारण मेख "FIxed for So n so Years" व्याजदर ठरवण्यात होती. LIC,SBI हे दोन च "abosolutely fixed (regardlessof market conditions and PLR)" व्याजदर देत होते. बाकी सर्वजण PLR (or thir own FRR based on PLR) - fixed amount % () for so n so years असे डिल देतात. अर्थात रिजर्व बँकेने PLR बदलल्यावर त्या सगळ्यांचे व्याजदर वाढले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

" ह्यापेक्षा थोड्या कमी दराने hdfc सुद्धा देत होती" . - लोन च्या पहिल्या अनुभवातून जाणार्‍या माझ्या नवर्‍याने मला अगदीच हाच निरागस प्रश्न विचारला. ८.७५% ने hdfc लोन देत असताना आपण LIC कडून ८.९% ने का घेतोय? - त्याच्या ऑफिस मध्यल्या एकाने HDFC कडून ८.७५% ने घेतले एक दोन महिन्याच्या अंतराने!
या मार्च मध्ये आम्ची पहिली ३ वर्षे पूर्ण झाली. HDFC वाल्या मित्राचा व्याजदर साधारण वर्षभराने वाढला. सध्या तो १०.५ ने भरत आहे. सरळ आहे कारण मेख "FIxed for So n so Years" व्याजदर ठरवण्यात होती. LIC,SBI हे दोन च "abosolutely fixed (regardlessof market conditions and PLR)" व्याजदर देत होते. बाकी सर्वजण PLR (or thir own FRR based on PLR) - fixed amount % () for so n so years असे डिल देतात. अर्थात रिजर्व बँकेने PLR बदलल्यावर त्या सगळ्यांचे व्याजदर वाढले.

याचा निष्कर्ष एवढाच निघतो की मित्राने नीट माहिती वाचली नाही किंवा विचारून घेतली नाही. अथवा पुढे व्याजदर विशेष वाढणार नाहीत अशा विश्वासाने निवांत राहिला. HDFC व्यवस्थित माहिती देते. सहसा ब्रँच मॅनेजर शेवटी लोन पास करतात आणि त्या वेळी कर्जदाराला भेटतात सुद्धा. वरच्या वाक्यांचा अर्थ HDFC ने पहिली काही वर्षेच फिक्स दर आहे हे त्याला सांगितलेच नाही किंवा फाईन प्रिंटमध्ये दडवून ठेवले असा होतो. असे सहसा होत नाही.. HDFC मध्ये तर असे पुण्यात ऐकलेले नाही.

माझे स्वतःचे HDFC चे २००४-५ चे फिक्स्ड दराचे लोन आहे. ते त्यांनी आरबीआय PLR / रेपो रेट वाढूनही एकदाही अजून वाढवलेले नाही कारण क्लॉजप्रमाणे फिक्स्ड दर आहे. नंतर रेट वाढत गेले तेव्हा फिक्स दर देणे बंद झाले कारण दरातल्या फरकाने ते परवडेनासे झाले. इतके जुने रेट त्यानंतर परत कधीही आले नाहीत आणि बरीच होम लोन ही दीर्घ मुदतीची असतात. थोडक्यात त्यात बँकेचा काही प्रमाणात तोटा होतो किंवा नफा कमी होतो.. लोनच्या मुदती पर्यंत..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

SBI ने फ्लोटिग रेट मध्येच - पहिले काही वर्षे फिक्स रेट मग त्यानंतर चालू फलोटींग रेट अशी स्किम काढल्यानंतर २००८-२००९ च्या दरम्यान सर्वच बँक अशा प्रकारे आकर्षक व्याजदर देत होत्या. तो रिअल एस्टेट चा जरा मंदी चा काळ होता, लोक घरे घेत नव्हते, असलेले बुकिंग रद्द करत होते. HDFC चा फलोटींग रेट PLR वर आधारित आहे. नेहमीच असतो. त्या बाबतीत त्यांची पार्दर्शकता नेहमीच होती. प्रश्न "त्यावेळी बेस्ट डील कोणते होते आणि का?" हा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

या २००८-२००९ च्या दरम्यान मी एचडीएफसीचे लोन घेतले आहे. ३ वर्षे फिक्स्ड रेट नंतर मार्च २०१२ पासून त्यांचा फ्लोटिंग रेट सुरु झाला आहे. मात्र रिझर्व बँकेने इंटरेस्ट रेट वाढवले की लगोलग इंटरेस्ट रेट वाढवणारी ही कंपनी रिझर्व बँकेने दर कमी केल्यावर इंटरेस्ट रेट कमी करत नाही असे आतापर्यंत तरी दिसले आहे.

एवढा एक भाग वगळता गेल्या दहाबारा वर्षात आयसीआयसीआय, ऐक्सिस आणि एचडीएफसी या बँकांचे अनुभव चांगले आले आहेत. एसबीआयचा अनुभव तितकासा समाधानकारक नाही. एसबीआयची इंटरनेट बँकिंग सुविधा सुरु होण्यासाठी किमान ४५ दिवस (काही हेलपाटे वगैरे) लागले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

किस्सा मस्तय. बहुतेकांचा कार्यालयीन अनुभव असतो receving end ला असताना; तसाच आहे.
'पब्लीकला साला असाच ठेचून काढला पाहिजे' ह्यासारखी वाक्ये धमाल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

रावसाहेब. __/\__.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

LIC Housing finance ह्यांच्याकडून कर्ज घेतल्याला आज तीनेक वर्षं होउन गेली. कर्ज घेतलं ते ऐन जागतिक स्लोडाउनच्या शेवटच्या कालात. म्हणजे, साधारणतः २०१०च्या मध्यावर लोनचा पहिला हप्ता सुरु झाला.
तेव्हा विविध वित्तस्म्स्था teaser scheme/offer देत. नंतर ह्यावर RBIने बंधने आणली, मर्यादा घातल्या. teaser scheme म्हणजे पहिली तीन वर्षे फिक्स्ड इंटरेस्ट रेट ८.९% किंवा पाच वर्षे फिक्स्ड इंटरेस्ट रेट ९.५% वगैरे लावणार. नंतर फ्लोटिंग होणार.
जूनमध्ये त्यांची तीन वर्षे संपली आणि लागलिच पुढील महिन्यात इंटरेस्ट रेट किती लागावा? ११.६५% !!!
ही हैट आहे. आख्ख्या मार्केट मध्ये इतका फ्लोटिंग रेट अगदि खाजगी वित पुरवठादार* सोडले तर कुणीही लावत नाहित.
खुद्द एल आय सी सध्या येणार्‍या नवीन ग्राहकांना १०% नी कर्ज देते आहे.
तस्मात, मलाही व्यवस्थित विचर करुन दर लावावा हे सांगण्यासाठी मी ऑफिसमध्ये गेलो. "मला मार्केटपेक्षा स्वस्तच दर लावा" असा काही माझा सूर नाही, नव्हता.
मार्केट रेट जो काही आहे, त्या हिशेबाने लावा; अगदि अतिरेकी जास्त वाटेल इतपत लावू नका इतकेच माझे म्हणणे होते.
ब्रँच मॅनेजरांनी म्हणणे व्यवस्थित ऐकून घेतले पण घंटा काहीही होउ शकत नाही हे स्वच्छ सांगितले. "आम्ही असाच दर लावणार (काय वाटेल ते करा.)" हे त्यांचे म्हणणे.
मी म्हटलं इतर ब्यांका सध्या १०-१०.२५ टक्क्यानं कर्ज देण्यास तयार आहेत. तिकडे जाणे भाग पडेल.
ह्यावर मला विश्वासात घेउन त्यांनी एक फार मोठी , मोलाची माहिती पुरवली.
"इतर ब्यांकाही मला हाच दर लावणार आहेत. खरेतर एल आय सी सर्वात कमी(११.६५!!) दर लावत आहे. इतर ब्यांका, अगदि सरकारी - PSUब्यांकासुद्धा फारतर
एक महिन्यात १५-१६टक्के दर माझ्यावर लादणार आहेत. सर्व ब्यांकांचे मनोबांविरुद्ध षडयंत्र सुरु आहे. फक्त एल आय सी हीच काय ती मला वाचवण्यासाठी आसुसलेली
असून ११.६५ सारख्या नाममात्र दराने कर्ज देत आहे."
गृहकर्ज आठ-दहा फार फार तर अकरा टक्के दराने घ्यायची वस्तू आहे. पर्सनल लोन हे तेरा-चौदा टक्क्यापासून सुरु होत सोळा ते अठरा टक्क्यवर हमखास मिळते
हे माझे ज्ञान हमखास चुकीचे आहे ह्याचा मला साक्षात्कार झाला. मला असे कर्ज घेणयचा काहिच अनुभव नसून बहुतेक मी अशी इतर कर्जे घेतल्याचा मला भास झाला
असेल अशी माझी मी समजूत घातली.
त्यांचे बोलणे ऐकून मी सद्गदित झालो. माझे डोळे पाणावले. अत्यंत भावनिक झाल्याने मला माझे तीर्थरुप आठवले.
धुरकट डोळ्यांनी माझे वडील मागील पंचवीसेक वर्षे PSU ब्यांकेतच असल्याचे सांगितल्यावर सदर ब्रँच म्यानेजर का चपापले ते ठाउक नाही.
"नै पण... पण आम्हाला ते जमत नाही." असे म्हणत त्यांनी विषय गुंडाळला.
मज्जाय नै!
(सोळा टक्के? होम लोन? २०१३मध्ये?? कुणाला चुत्या मारुन राहिलास बे....)
.
खाजगी वित्तपुरवथादार म्हणजे खाजगी ब्यांका नव्हे. आय्सी आयसी आय, एच डी एफ सी, अ‍ॅक्सिस ह्या खाजगी ब्यांकांचे दर बरेच कॉम्पितिटिव्ह आहेत.
खाजगी पुरवठादार म्हणजे आधुनिक सावकार. चोलामंडल्म डीबी एस किम्वा इंडियाबुल्स फायनान्स वगैरे वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बापरे! ११.६५%!!!!!!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऐला सही आहे. ११.६५ टक्क्यात कर्ज मिळते. Wink [आम्ही १० वर्षे नंतर जलमलो असतो तर १६-१७ टक्क्यांनी कर्ज घ्यायला लागलं नसतं].

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सध्याही जाउन घेउ शक्ताच की!
१५-१६टक्के हा दर कोणे एकेकाळी असेलही. प्[अण सध्या कुठल्याही आघाडीच्या ब्यांकेचा तेवढा दर त्या ब्रँच म्यानेजर दाकह्वून द्यावा इतकेच म्हणणे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>>सध्याही जाउन घेउ शक्ताच की!

आता काय उपेग? तेव्हा लोनचा दर इतका भारी होता म्हणून टप्प्याटप्प्याने घरे घेतली. सुरुवात १ रूम किचन (दोन खोल्या) मग १ बीएच्के वगैरे....... तेव्हा कमी दर असता ८-९% तर यकदम तिसाव्या वर्षीच २ बीएचके घेता आलं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे म्हंजे मनमोहन सिंग सरकारच्या काळातील आर्थिक स्थितीची तुलना करताना "म्हाराजांच्या टायमाला किती स्वस्ताई- आण्याला चार शेर दूध - म्हस दारात पिळून" झालं की वो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बरोबर उलटा प्रकार झाला, नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

idbi ने लै वैताग आणला होता. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवल्यानं बराच मनस्ताप झाला.
दुर्दैव हेच की सारेच व्यवहार १००% लेखी नसतात. कुठे ना कुठे शब्दास महत्व द्यावेच लागते.
सध्या झालेला त्रास पूर्णतः भरुन येणे शक्य नाही.पण अंशतः दिलासा मिळतो आहे.
घर घेताना बिल्डरला दोघांकडून पैसे मिळतात. एक स्वतः खरेदीदार व दुसरे म्हणजे कर्जपुरवठादार.
बहुतांश कर्जपुरवठादार "आधी तू तुझा पूर्ण हिस्सा बिल्डरला दे; मगच आम्ही आमची रक्कम disburse करु" अशी भूमिका घेतात.
(निदान मला तरी पाचेक बँकांचा हाच अनुभव आला, तुमचे अनुभव वेगळे असू शकतात.
तुमचं ब्यांकेच्या मनातली तुमची प्रतिमा (रेप्युटॅशन), तुमची आर्थिक स्थिती ह्यानुसार ते बदलू शकतात.
)
idbi च्या अधिकार्‍यांनी आधी दिलेला शब्द न पाळल्याने मला बराच ताण आला.
ह्याबद्दल मी जाउन तपशीलवार idbi च्या अधिकार्‍यांशी बोललो.
मात्र, तोवर लेखी प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने आता निर्णय फिरवता येणे शक्य नसल्याचे,निदान त्यांच्या अखत्यारित नसल्याचे त्यांनी सांगितले.
मी म्हटलं निर्णय फिरवणं तुमच्या अखत्यारित नसेलही, पण समस्या निर्माण होण्यात महत्वाची गोष्ट माझा तुमच्या शब्दावरचा विश्वास हे आहे; आता तुम्हीच काय ते सांगा.
त्यांनी त्यांच्या अखत्यारित मला एक सूट दिली. मी तत्काळ माझा पूर्ण हिस्सा/contribution दिलं नाही तरी चालेल, बँक त्यांना demand letter आल्यावर disbursement करत राहिल.
ह्यामुळे मला बहुमूल्य असा वेळ मिळाला. पाच सात महिने मला आवश्यक रकमेतील मोठा भाग उभा करण्यास पुरेसे ठरले.
.
.
.
मला जाणवलेल्या काही गोष्टी :-
(अर्थात ह्या अगदि प्रथमिक , सर्वांनाच माहित असणार्या आहेत,; पण कधीकधी साधयसाध्या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात, महत्वाच्या ठरतात, तसं झालं.)
१.ब्यांकेसोबत तुमचं रेप्युटेशन महत्वाचं आहे.तुमची जुनी खाती असतील तर तुम्हाला बराच favor मिळू शकतो.
२.icici,kotak ह्यांच्या निम्माही पतपुरवठा करण्यास सरकारी,nationalised बँका तयार होणार नाहित, हे myth/गैरसमज आहे. त्यात फार तर उन्नीस बीस चा फरक असेल.
काही सरकारी ब्यांका भरपूर पतपुरवठा करु शकतात. तसच काही ब्यांका खाजगी असूनही eligibility कमी देतात. कुणाचे काय फॉर्म्युले कोनत्या वेळी असतील हे खुद्द त्या
ब्यांकेतील अधिकार्‍यांनाही सांगता येणार नाही.
३.कुठलाही मोठा ब्यांक व्यवहार करताना निदान पाच्-सात ब्यांका फिरा, विविध योजनांची माहिती करुन घ्या. कुठल्या स्किमची कुठली बारिकशी फट तुम्हाला मोठिच सोयीची
ठरेल हे आधीच सांगता येणं कठीण आहे. प्रत्येकाच्या अर्थगरजा व प्रायॉरिटी वेगळ्या असतात. अमक्यानं इथुन घेतलय, मीही तिथूनच घेतो; असं करु नका.
आधी चार ठिकाणं हिंडा. कुणाला तत्काळ क्लर्ज हवं असतं; कुणाला re closure च्या नियमांबाबत उत्सुकता असते. कुणाला eligibility अधिकाधिक हवी असते.
कुणाला ह्या सगळ्याचं एवढं काहिच वाटत नाही, त्याला सर्व्हिस चांगली हवी असते, डोक्याला त्रास कमी हवा असतो.(ऑफिस शेड्युल खूपच व्यस्त असलं, सुतिच्या दिवशीही
काम करावं लागत असलं की हासुद्धा एक निकष ठरतो. )
तुमचे निकष आधी निदान तुम्हाला स्वतःला माहित हवेत.
४.तुमची cibil history चांगली ठेवा. मला ह्याचा लै फायदा झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बँकखाते डॉर्मँट झाले असेल तरी त्याच्याशी संलग्न विमे चालुच राहतात ना?
काही दिवसांपुर्वी SBI च्या खातेधारकांसाठी १००रुपयात त २लाख आणि २००रुपयात ४लाख चा अपघात विमा अशी काहीतरी जाहिरात पाहिलेली. जर मी हा विमा घेतला आणि ते खाते डॉर्मँट झाले तरी तो विमा चालुच राहील ना? या स्किमबद्दल कोणाला अधीक माहिती आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुधा राहील चालूच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.