बचेंगे तो और भी सिनेमा देखेंगे!

बचेंगे तो और भी सिनेमा देखेंगे!

भारतीय फिल्म उद्योगाची शंभरी भरली म्हणून महाराष्ट्र शासन ठिकठिकाणी क्लासिक मराठी व हिंदी चित्रपट महोत्सवांचे आयोजन करत सुटले आहे. स्थानिक चित्रपटगृहात नुकतेच त्याचे आयोजन झाले. सुप्रसिद्ध नाटककारांचा सत्कार उद्घाटनाच्या दिवशी करण्यात येणार होता. जंपिंग ज्याक जितेंद्र, अवधूत गुप्ते, फुटकळ तारका आणि मंत्रीगण दिवे लावून (!) महोत्सवाचे उद्घाटन करणार होते. साडे अकरा वाजेपर्यंत माननीय नाटककार वगळता एकही मान्यवर(!) चिटपाखरु फिरकले नाही. फिल्मी कलावंत व्हर्सेस मंत्रीगण यांच्यामध्ये उशिरा कोण पोचणार अशी कांटे की टक्कर चुरशीने सुरु असल्याचे लक्षात येताच नाटककार महोदयांनी सत्काराला फाट्यावर मारून प्रस्थान केले. बारा वाजता तुकाराम सिनेमा दाखविण्याची योजना वेळापत्रकात विकट हसत होती. स्पर्धेत यशस्वी होऊन जितेंद्र ठीक साडेबाराला उगवला. सत्काराला माननीय नाटककार उपलब्ध नसल्याने आयोजकांनी नगाला नग म्हणून चक्क थिएटर मालकाचा सत्कार उरकून घेतला. हा हन्त हन्त! ना खेद ना खंत!! एका मंत्र्याने लघुपट स्पर्धेची घोषणा करताना प्रथम पारितोषिक एक लाख आणि द्वितीय पारितोषिक रुपये पन्नास लाख फक्त, असे जाहीर करताच प्रेक्षकांनी हसून थिएटर डोक्यावर घेतले. मंत्र्यांना स्थूल, सूक्ष्म भेद कळत नसल्याने त्यांना "प्रतिसादु अवघा एकू गोविंदू रे" झाले.

फिल्मोत्सव नसून हा डीवीड्योत्सव असल्याचे लक्षात येताच जाणकार रसिकांनी काढता पाय घेतला. आम्ही जाणीवेच्या पातळीवर चाचपडत असल्याने तब्बल तीन सिनेमे पाहून वेळ, श्रम व पेट्रोलचे पैसे वाया घालवले. 'गाइड' सिनेमात देवानंदचा चेहेरा दिसेना म्हणून एक पत्रकार प्रोजेक्शन रूममध्ये डोकावला तर त्याला डीवीडीचे ४९ रुपये मात्रचे कव्हर वाकुल्या दाखवत होते. प्रोजेक्शनचा दर्जा पहाता आधुनिक तंत्रज्ञानाचा कडेलोट होऊन पार रसातळाला गेल्याचे आढळले. प्रत्येक फिल्मचे सबटायटल पडद्याखालच्या ओट्यावरून लांब झटकून वाळत टाकले होते. त्यातली अक्षरे अर्थासकट ओघळून चालली होती. ते वाचून दाखवणार्‍याला अमिताभ बच्चनप्रमाणे पंचकोटी महामनी जाहीर करायला हरकत नव्हती कारण द्यायची आवश्यकता पडली नसती.

बचेंगे तो और भी सिनेमा देखेंगे!
…………… ……………………….

'द्वंद्व' या शीर्षकाचा स्थानिक कलावंत अभिनीत (?) असा एक भयाण सिनेमा होता. ९० मिनिटांची कानाला, डोळ्याला अन डोक्याला असह्य ताप देणारी "कल्ला"कृती पाहून त्या सगळ्या चमूला प्रथम चाबकाने झोडपून मग खलबत्त्यात कुटून काढायची तीव्र इच्छा आहे. एका बर्‍यापैकी सिनेमा होऊ शकणार्‍या कथेचा बट्ट्याबोळ केला आहे. कर्णकटू पार्श्वसंगीत, अर्थहीन कोलाजचे तुकडे, निर्बुद्ध चित्रीकरण, भिक्कार, मुजोर संतापजनक संवाद त्यामुळे सहनशक्तीचा अंत झाला. हा प्रकार पाहूनही आम्ही जिवंत आहोत म्हणजे ईश्वराची लीला अगाध आहे हेच खरे!

बचेंगे तो और भी सिनेमा देखेंगे!
……………….

आम्ही दोघी मैत्रिणी कडाक्याच्या थंडीत कुडकुडत फिल्म क्लबमध्ये एका रशियन सिनेमाला गेलो. 'मॉस्को डझ नॉट बिलीव्ह इन टीअर्स'. त्यात मॉस्कोचे गोठवणारे बर्फगार वातावरण असेल की काय अशी शंका होती. पण छान उबदार सिनेमा होता. अन सीडीलाच थंडी बाधली. ती सारखी गोठत होती. शेवटी पहिली सीडी डीप-फ्रीजमध्ये टाकून इंटर्वलनंतरचा भाग सुरु केला. त्यात इतकेदा खंड पडला की हसून आमच्या पोटाचे खंड झाल्यासारखे वाटले. आम्ही तब्बल १२ प्रेक्षक चिकाटीने सिनेमा बघत होतो. त्यात मी अन चंपा दोघीच जणी हसणार. इतर लोक "हा हा ही ही" करायला हास्यक्लबमध्ये आले होते की काय ? सीडीची स्पीड दुप्पट ते सोळापट करूनही तिच्यावर ढिम्म परिणाम होईना. शेवटी काहीजण उठून जाऊ लागले. म्हटले शेवटी आयोजक, ऑपरेटर अन् आम्ही दोघीच शिल्लक रहाणार की काय? जर्रा कुठे अनावृत्त स्तन वगैरे दिसून पुरुष प्रेक्षकांना आल्यासरशी नयनसुख मिळण्याची अन् सार्थक झाल्याची संधी येताच सीडी हमखास अडकायची. त्यामुळे आमच्या आसुरी आनंदाचा अगदी कडेलोट!
"अलेकझान्द्राऽऽऽ" असे सांद्र मधुर, मखमली, मुलायम स्वर सर्वांगावर मोरपीस फिरवत होते. ३ मैत्रिणींची छान रंजक कथा होती. प्रिंट छान होती. रंग संगती नेत्रसुखद होती. शिवाय इंग्रजीत डब केलेला सिनेमा होता. पण ...

सीडीचे थिजले भाग असुनिया गाणी
कोमजले कोवळे क्षण, असुनी नशापाणी
--- इति उषा मंगशीटचकर

बचेंगे तो और भी सिनेमा देखेंगे! (असे बाणेदार प्रेक्षक त्यांना शोधून सापडणार नाहीत.)

......

दुसर्या दिवशी गरम दृश्ये तपशिलात असलेला एक जर्मन सिनेमा होता. सबटायटलवाले विदेशी सिनेमे पाह्यला नेहेमीप्रमाणे तब्बल पंधरा लोकांचा प्रचंड जनसमुदाय लोटला होता. त्यातली उत्तेजक दृश्ये पाहून शहरातल्या दोन तीन नामवंत महिलांनी काढता पाय घेतलेला दिसताच मला आणि मैत्रिणीला प्रचंड हसू येऊ लागले. न जाणो सिनेमा पाहून मास इरेक्शन होऊन आपल्यावर बलात्कार होतील अशी भीती त्यांना वाटली असावी. अशा दोन अंकी प्रचंड जनसमुदायात गरीब बिचारे, निरुपद्रवी , जाणकार रसिक असतात हे आम्हाला ठाऊक असल्याने आम्ही
बिनधास्त सगळा सिनेमा पाहून मगच प्रस्थान केले. कारण पुन्हा तेच … ब. तो. औ. भी. सि. दे.!

फिल्म फेस्टिव्हलला पूर्वघोषित 'गाभ्रीचा पाऊस'ऐवजी सुभाष घईचा एक रद्दड हिंदी चित्रपट दाखवू लागले. आम्ही चौघीजणी मनोरंजनासाठी त्यावर यथेच्छ शेरेबाजी करून फिदीफिदी हसू लागलो. समोर बसलेला रसिक दर्शक वारंवार मागे वळून क्रुद्ध कटाक्ष टाकू लागला. त्याला दोन-तीनदा सांगितले की "बाबारे सिनेमा समोर पडद्यावर सुरू आहे." शेवटी एकदाचा सिनेमा संपला. नंतर लगेच 'गाभ्रीचा पाऊस' दाखवणार होते. तो मला म्हणाला हा सिनेमा तरी बघू देणार आहात काय? म्हटले "हो अर्थातच! आम्ही हाच सिनेमा बघायला आलो आहोत." तो म्हणे, "मग आता बडबड करू नका, नाहीतर दुसरीकडे जाऊन बसा." मी म्हटले, "आम्ही इथेच कम्फ़र्टेबल आहोत, तुम्हीच दुसरीकडे बसा. अर्धे थिएटर रिकामेच आहे." पण तो किनै आमची हवीहवीशी कंपनी सोडुन गेलाच नाही गडे!

तो ही बहुदा "बचेंगे तो और भी सिनेमा देखेंगे!" म्हणत असावा.

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

Smile
काही वाक्य उसंतरावांनी लिहिल्यासारखी वाटली..
असो.

'सखु टच' दिसतो पण तुमच्याच आधिच्या लेखनाइतका हसलो नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख आवडला! काहिसा असाच अनुभव या वेळच्या पिफमधे आला होता.
मायकलएन्जेलो अन्टोनियोनीच्या 'द अड्वेन्चर' बघायला गेलो होतो. हा सुरु झाल्यापासुनच एकदम हळु (०.५x) वेगाने सुरु होता. २० मिनिटे काहितरी कलात्मक असेल म्हणुन बसलो. नन्तर चित्रपट योग्य वेगाने सुरु झाला पण मग सबटायटल्स निघुन गेल्या. शेवटी नाद सोडुन दिला. इथे पण डिव्हिडोत्सवच होता Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घालावा आवर कसा वेगळाच सूर माझा
माझ्या तहानेच्यासाठी वेगळा पाऊस माझा.

सध्या वरवर चाललाय.
चहाचे घुटके घेत घेत फुरसतीत पुन्हा वचीन म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

'द्वंद्व' या शीर्षकाचा स्थानिक कलावंत अभिनीत (?) असा एक भयाण सिनेमा होता. ९० मिनिटांची कानाला, डोळ्याला अन डोक्याला असह्य ताप देणारी "कल्ला"कृती पाहून त्या सगळ्या चमूला प्रथम चाबकाने झोडपून मग खलबत्त्यात कुटून काढायची तीव्र इच्छा आहे. एका बर्‍यापैकी सिनेमा होऊ शकणार्‍या कथेचा बट्ट्याबोळ केला आहे. कर्णकटू पार्श्वसंगीत, अर्थहीन कोलाजचे तुकडे, निर्बुद्ध चित्रीकरण, भिक्कार, मुजोर संतापजनक संवाद त्यामुळे सहनशक्तीचा अंत झाला. हा प्रकार पाहूनही आम्ही जिवंत आहोत म्हणजे ईश्वराची लीला अगाध आहे हेच खरे!

रविंद्रनाथांच्या एका चांगल्या कथेवरील 'कश्मकश' नावाचा एक सिनेमा पाहिला होता, त्यातले कलाकार २+- तासांत जेवढं बोलले असतील तेवढं एक बंगाली २ मिनिटात बोलतो, एका सीनमधे एकजण बोलल्यावर मी पॉपकॉर्न वगैरे घेऊन आलो तर दुसरा बोलायला अजून बराच वेळ होता, एकूण माझं काही बुड्लं नाही, पण एकूणात बरचं बूडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो आर्ट फिल्म्स पाहताना असं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हदेविझ हा असाच फ्रेंच सिनेमा आहे . एक अनंताकडून अनंताकडे सिनेमा . :O
एकदा थिएटरात घुसले की मग कयामत तक फुरसत !! Fool
थीओलोजीची स्टुडंट नायिका मीरेसारखी येशूच्या प्रेमात वगैरे स्वतःला सावकाश छळून घेत असते .येशूसाठी ती तळमळत
असते म्हणून तिला बॉयफ्रेंड आणि सेक्स नको असते .तिच्या उपास तापास, पावसात ओले होत रहाणे , थंडी सहन करत रहाणे अश्या
अतिरेकामुळे तिला चर्चमधून हाकलून लावतात . त्यामुळे फुरसतीत कसलीच कमतरता म्हणून रहात नाही .
नायिका जिना चढत असेल तर प्रत्येक पायरी चढून ती शांतपणे जाते . डोअर बेल वाजवते मग तो मनुष्य शीटायला गेला असेल समजा
अन त्याला सोनेपे सुहागा ( पिवळा ड्याम्बीस कुठचा !)असा बुद्धकोष्ठाचा त्रास असेल तर तो सावकाश कुंथून मग ढुंगण स्वच्छ धुवूनच
उप्स पुसूनच बाहेर येईल की नाही ? कम्मालच करता तुम्ही !
नायिकेला चहा हवाय का असे तो विचारतो . ती अर्थातच हो म्हणते अहो काहीतरी घडायला नको का ?
मग तो दुष्ट मनुष्य चक्क किटलीतला तयार चहा तिला देतो .अरे पाजी माणसा ताजा चहा करून पाज की मेल्या ...
कुठे फेडशील हे पाप ? असे आम्ही मनात आक्रंदत बसलो .
आता या वाचवलेल्या वेळेच करायचं काय ?? लोणचं ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आर्ट चित्रपट समिक्षणाचं हे एक नविनच महारोचक 'अंग' मुख्य प्रवाहात दिसत नाही, तिथे सगळेच गंभीर(एरंडेल घेतल्यासारखे) चेहरे करुन कशाखाली काय दडलं आहे हे सांगायचा अतिशय खोल प्रयत्न करत असतात. तुम्ही आर्टच्या बरोबर मेन्स्ट्रिम सिनेमा बद्दल पण थोर वगैरे लिहावं असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

( पिवळा ड्याम्बीस कुठचा !)

हा कंस कळला नाही. याचा यांच्याशी काही संबंध आहे का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या नावने इथे कुणी आहे याची कल्पना नव्हती Biggrin .
पु. ल. मुळे पोपुलर झालेला पिवळा ड्याम्बिस माहित आहे . Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिच्या उपास तापास, पावसात ओले होत रहाणे , थंडी सहन करत रहाणे अश्या अतिरेकामुळे तिला चर्चमधून हाकलून लावतात .

आँ! मला तर वाटायचे चर्चवाल्यांना असल्याच गोष्टींचे जाम कौतुक असते म्हणून.

नायिका जिना चढत असेल तर प्रत्येक पायरी चढून ती शांतपणे जाते .

पाय मुडपला, मुरगळला असेल. मग करावे लागते. जरा समजून घ्याना! (बीन देअर, डन द्याट.)

अन त्याला सोनेपे सुहागा ( पिवळा ड्याम्बीस कुठचा !)

अगागागागागागागा!

याची आठवण झाली.

(अवांतर: कम्युनिस्ट वगैरे होता काय?)

तो मनुष्य शीटायला गेला असेल समजा अन त्याला सोनेपे सुहागा ( पिवळा ड्याम्बीस कुठचा !)असा बुद्धकोष्ठाचा त्रास असेल तर तो सावकाश कुंथून मग ढुंगण स्वच्छ धुवूनच उप्स पुसूनच बाहेर येईल की नाही ? कम्मालच करता तुम्ही !

तुमच्या वर्णनशैलीत प्रसंग डोळ्यांसमोर हुबेहूब, जिवंत साकारण्याची ताकद आहे. (अंमळ जपूनच!)

अरे पाजी माणसा ताजा चहा करून पाज की मेल्या ...

घरातली पूड, गेला बाजार टी ब्यागा संपल्या असतील, समजून घ्याना. (तुम्ही पण ना!)

(अतिअवांतर:

हदेविझ हा असाच फ्रेंच सिनेमा आहे .

स्पेलिंग कसे करतात हो?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हदेविझ हा शब्द घ्यायचा . त्याच्याशी मिळती जुळती रोमन अल्फाबेटस घ्यायची आणि
त्यात चौदावे किन्वा पन्धरावे उइ, लुइ नायतर टिल्डा , माटिल्डा कैच्या कै लावुन द्यावे
की झाले स्पेलिन्ग तयार . हाय काय अन नाय काय !ज्याला जो वाट्टेल तसा उच्चार करत बसेल .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाच तो महान शिनोमा दिसतोय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"'ऐसीअक्षरे'चा ट्र्याकर" हा???

(लिंक गंडलीय.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा तो...(विनोदी श्रेणी का मिळाली ते आत्ता कळले. Lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटचा प्रसंग सोडून बाकी लेखन आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असंच म्हणतो. सुभाष घईचा सिनेमा पाहणार्‍या आणि नंतरचा सिनेमासुद्धा पाहणार्‍या "त्या" प्रेक्षकाची दया आणि तुमच्या ग्रुपबद्दलची चीड एकदम दाटून आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

काय राव बोलता तुम्ही ?आम्ही पैसे खर्च करून सुभाष घईचे सिनेमे ते सुद्धा
फिल्म फेस्टिव्हल मध्ये का सहन करू ? त्या रसिक प्रेक्षकाला त्रास होत
होता तर त्याने जागा का नाही बदलली ? थिएटर अर्धे रिकामेच होते . पण त्याने
सिनेमासोबत आमच्या कॉमेंट्स नक्कीच एन्जॉय केल्या होत्या असे दिसते .
अन्यथा जागा बदलण्याची संधी त्याने का सोडली बरे ? ;;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांना "प्रतिसादु अवघा एकू गोविंदू रे" झाले.

सीडीचे थिजले भाग असुनिया गाणी

न जाणो सिनेमा पाहून मास इरेक्शन होऊन आपल्यावर बलात्कार होतील अशी भीती त्यांना वाटली असावी.

वगैरे वाक्यं मनाला भिडली. तुम्हाला वेळोवेळी असेच त्रासदायक अनुभव येवोत ही महास्फोट करणाराकडे प्रार्थना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा नवरा हिला सुविचार सुचावेत म्हणुन प्रार्थना करतोय Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढच्या वेळेस तुमच्याबरोबर सुभाष घई किंवा करण जोहरचे सिनेमे पाहिले पाहिजेत. सतत काय "सापाला मुंग्या लागण्याचा प्रसंग कसा हृदयद्रावक आहे" यावर विनोद करत बसायचं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"सापाला मुंग्या लागण्याचा प्रसंग कसा हृदयद्रावक आहे" यावर विनोद

ही काय भानगड आहे बुवा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिखाण वेगळेच आहे. आवडले.
हदेविझ हा असाच फ्रेंच सिनेमा आहे . एक अनंताकडून अनंताकडे सिनेमा
सांभाळून. फ्रेंच सिनेमावर लिहिण्याचे कॉपीराईट्स आहेत का तुमच्याकडे?
बाकी एक स्त्री आणि एक पुरुष एकमेकाला थप्पड मारत आहेत असा एकच प्रसंग असणारी एक फिल्म एका प्रदर्शनात बघितली आणि स्वतःच थप्पड खाल्ल्यासारखा चेहरा करुन बाहेर पडलो. पण पर्वा इल्ले. यातूनही अर्थ काढणारे समीक्षक आहेत तोवर पर्वा इल्ले. पुढल्या आठवड्यापासून शब्दकोडं सुरु करतोय आपण, रिसबूड. हरकत नाही, त्यातही कलात्मकता आणता येईलच की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा