आम्ही पुरुष माणसे

लहान मोठी, जाड बारीक, उंच बुटकी
आम्ही माणसे विविध रंगाची आणि ढंगाची.
वेगवेगळ्या शब्दांची आणि प्रतिक्रियांची.
आम्ही सभ्य, सुसंस्कृत. आम्ही पंडित.
रूढी परंपरेच्या पडद्याआडून बोलणारे आम्ही दांभिक.

आम्ही उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे,
लवचिक मणक्यांचे, रंग बदलणारे सरडे.
आम्ही ताठ, आम्ही मानी, आम्ही बाणेदार,
गरजेसाठी लाज आणि मानही कापून देणारे तालेवार.

आम्ही सावध, आम्ही शिकारी,
आम्ही दयनीय, स्त्री देहाचे पुजारी.
आम्ही जॉय राईड मध्ये दबा धरून बसलेले पारधी,
द्रोपदीचे वस्त्रहरण करणारे दुशा:सन.
आम्ही सुप्रसिद्ध, आम्ही कुप्रसिद्ध.
दुबळ्यांवर वर्चस्व गाजवणारे आम्ही पुरुष सिद्ध.

आम्ही षड्रीपुच्या घाणीत लोळणारे किडे,
विहिरीतलं बेडूक, विश्वातला धुळीचा कण.
आम्ही शीला कि जवानीचे भक्त,
बदनाम मुन्नीवर आरोप करणारे संभावित.

आम्ही शूर, आम्ही वीर
आम्ही रेपिस्ट, आम्ही सेक्सीस्ट
कोवळ्या मुलींचा शरीर भंग करणारे आम्ही सेडीस्ट
आम्ही बघे, आम्ही सुदैवी, आम्ही प्रेक्षक
सद्सदविवेकबुद्धीला पोखरून काढणारे आम्ही तक्षक

आम्ही सनातनी, आम्ही पुरोगामी
आम्ही फॅशीस्ट, आम्ही रेसीस्ट
आम्ही बहुरूपी आणि बुरखेदार,
रेप होतानाचे चित्रण करणारे आम्ही पत्रकार.

आम्ही टणक, पोलादी, गेंड्याच्या कातडीसारखे
आम्ही रक्षक, आम्ही दक्षक
आम्ही स्त्रीवादी आणि स्त्री भक्षक.
आम्ही तात्त्विक, आम्ही तार्किक, आम्ही सात्विक
स्त्रीला बुरख्याआड लपविणारे आम्ही धार्मिक.

आम्ही तेजस्वी, आम्ही स्वयंभू
'आम्ही कोण?' हा प्रश्न स्वत:ला कधीही न पडणारे
आम्ही सर्वज्ञात, आम्ही सर्वश्रेष्ठ, आम्ही सर्वेश्वर
आम्ही पुरुष माणसे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

या सगळ्या गोष्टी पुरुष करतात हे ठीक. पण या पलिकडे फुले, आंबेडकर, रधों, आगरकर वगैरे, आणि या दोन्ही टोकांच्या अधलेमधले कोणी नसतातच का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद विक्षिप्त अदिति. तुमच बरोबर अहे. तसे लोक असतातच. पण आम्हाला हिट्लरवरच कविता करायची असल्यास?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अदितीतै, ते कुणी दारू प्याल्यावर म्हणतात ना, 'जान् देव.पियेला है.' तसं तुम्हाला सांगतो 'जान् देव इसकू. ये हिटलरपे कविता कर रेली है'

रूपाली, हलकेच घ्या !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आधी सांगायचं ना! किती जोरात घाबरले मी! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कविता अस्वस्थ करते. पुरषांचे "नीच" (डेबिलिटेटेड) रुप दाखविण्यात कविता यशस्वी झाली आहे.

शेवटचे कडवे विशेष आवडले = पटले.

मग विचार आला, सखोल भीती आणी न्यूनगंड लपविण्यासाठी "आम्ही सर्वज्ञात, आम्ही सर्वश्रेष्ठ, आम्ही सर्वेश्वर" हा केवळ फसाड (देखावा) देखील असू शकेल. पुरषांकडून सर्वज्ञात/सर्वश्रेष्ठ असण्याची अपेक्षा करण्यात (= मुलांनी रडूबाईसारखं रडायचं नाही, पालीला, झुरळाला घाबरायचं नाही, कमवायचेच वगैरे ) आख्ख्या समाजाचा वाटा असूही शकतो/असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता रोचक वाटली. तिच्यात लिंगसापेक्ष असमानतेवर आणि दांभिकतेवर प्रहार केल्याचं जाणवतं आहे.

मात्र असं लिखाण काहीसं प्रचारकी ठरण्याचा धोका उद्भवतो. "पुरुषजात मुर्दाबाद" म्हणताना या कवितेत निर्देश केलेल्या किती गोष्टी निव्वळ पुरुषांचीच मक्तेदारी आहे याचा विचार करावा असं मी सुचवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

प्रतिसादाशी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही कोण?' हा प्रश्न स्वत:ला कधीही न पडणारे
ह्यं ह्यं ह्यम.. आम्हाला तर बुवा सदासर्वकाळ आम्ही कोण? हाच प्रश्न पडून र्‍हायलेला आहे. आणि आम्ही पुरुष आहोत असा आमचा समज आहे.
कविता झाडा, पुसा, कचरा जाळून टाका, रंगसफेदी करा अशा म्युनशिपालटी छापाची वाटली. काळे हे आणि पांढरे हे अशा लष्करी धोरणाची. बरेचसे पुरुष हे करड्या रंगातच कुठेतरी घुटमळत असल्याने कवितेला 'वैश्विक परिमाण' येत नाही. येतो तो फक्त विडंबनकारांच्या हाती कच्चा माल.. ह्यं ह्य ह्यम...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

आम्ही पुरुष माणसे असे म्हणून त्यांना शेवटी माणूस म्हटल्याबद्दल आभार! Wink

बाकी कविता जरा लांबली असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविता एकांगी झाली आहे असे काही प्रतिसाद आले आहेत, ते पटले नाहीत. एखाद्या व्यंगचित्रकाराला 'चित्र ठीक आहे, पण त्या माणसाचं नाक एवढं मोठं का काढलंय बरं?' अशी प्रतिक्रिया देण्यासारखं हे वाटलं. सगळंच बरोब्बर प्रपोर्शनमध्ये काढलं तर ते व्यंगचित्र न रहाता तंतोतंत रेखाचित्र होईल. प्रत्येक कवितेत विषयाच्या सर्व बाजू मांडल्या तर तो वैचारिक लेख नाही का होणार?

कवितेवर सर्वांगीण विचार करण्याची, बॅलन्स्ड असण्याची जबाबदारी नाही. ती फक्त प्रभावी असण्याची जबाबदारी असते. काही जण यापेक्षा कमी जबाबदारी टाकताना दिसतात - अ पोएम शुड नॉट मीन, बट बी - असंही कोणी म्हटलेलं आहे. या कवितेबाबत ती किंचित लांबली असं वाटलं.

काही गोष्टी जाणवतात, उदाहरणार्थ

आम्ही उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे,
लवचिक मणक्यांचे, रंग बदलणारे सरडे.
आम्ही ताठ, आम्ही मानी, आम्ही बाणेदार,
गरजेसाठी लाज आणि मानही कापून देणारे तालेवार.

या कडव्यात सर्व मनुष्याच्या शरीराविषयीच्या उपमा आहेत नमस्कार, मणके, ताठ, मान, बाणेदार.... त्यामुळे एक एकसंधता येते. हा भाग आवडला. मात्र त्यात मध्येच रंग आणि सरडा या काहीशा या संचाबाहेरच्या वाटणाऱ्या उपमा येतात. ते किंचित खटकतं. हेच किंवा असंच

आम्ही षड्रीपुच्या घाणीत लोळणारे किडे,
विहिरीतलं बेडूक, विश्वातला धुळीचा कण.

याविषयीही म्हणता येतं. कृमीकीटकांच्या उपमांनी सुरूवात होते, आणि मग धुळीच्या कणाचा उल्लेख होतो. जर उपमांची जातकुळी सारखी राहिली तर अधिक परिणामकारक होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता एकांगी झाली आहे असे काही प्रतिसाद आले आहेत, ते पटले नाहीत.
हा प्रतिसाद एकांगी वाटला. असो, आता पुरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

एक जुना विनोद (थोडा बदलून)

वक्ता १: मी अमुकअमुकचा सरसकट निषेध करतो.
अध्यक्ष : तुमचं विधान एकांगी आहे.
वक्ता २: मी अमुकअमुकची बाजू सरसकट बरोबर आहे असं ठासून सांगतो.
अध्यक्ष : तुमचं विधान एकांगी आहे.
प्रेक्षक : अहो पण तुम्ही प्रत्येकालाच एकांगी म्हणताय् !
अध्यक्ष : तुमचंही विधान एकांगी आहे !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हाहाहा खूप छान जोक आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुक्तसुनीत, हा जोकही एकांगी आहे. हा!हा!हा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादासाठी सगळ्यांना धन्यवाद.
कविता जशी स्फुरली तशी लिहिली. त्यात अर्थातच त्रुटी आहेत, ती परफेक्ट नाही हे मान्य. पण तसा विचार केला तर 'परफेक्ट कविता' हि कल्पनाच कवितेच्या साच्याला हानिकारक नाही का?
कविता एकांगी झाली आहे या आरोपाला घासकडवींनी चांगले उत्तर दिले आहे. ती वैश्विक बनवण्याचा काही हेतू नव्हता. ती सगळ्याच पुरुषांना उद्देशून नाही. त्यात काही भाग स्त्रियांनाही लागू होतील असे आहेत. पण तेच भाग काही पुरुषांनाही नक्की लागू होतात तेव्हा ते काढायची गरज वाटली नाहि.
काही दिवसांपूर्वी कविता महाजन यांची एडस विषयावरची 'भिन्न' हि कादंबरी वाचण्यात आली. त्यानंतर क्लीव्हलंड किडनपिंग बद्दल कळले. भारतातही स्त्रियांवर होणारे रेप, अत्याचार आपण वाचत असतोच. या सगळ्या प्रसंगातून मनात उठलेली पुरुष जातीबद्दलची घृणा या कवितेत उमटली आहे. पण ती या कवितेपुरतीच आणि फक्त 'तसल्याच' पुरुषांपुरती मर्यादित आहे, याची कृपया बाकीच्या पुरुषांनी नोंद घ्यावी ;).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0