पांडुरंग सांगवीकर सम लैंगिक आहे का?

कलाकृति मधलि एखादि व्यक्तिरेखा आपली चौकट मोडुन वाचक अथवा प्रेक्षक यांच्या मनोव्यापाराचा हिस्सा बनते तेंव्हा ती कलाकृती यशस्वी होते असे म्हणायला हरकत नाही. शेरलॉक होम्स च बेकर स्ट्रीट वरील घर बघायला अनेक पर्यटक जायचे. मध्यंतरी हॅरी पॉटर या अती लोकप्रिय मालिकेमधले Dumbeldore हे पात्र कसे 'गे' आहे हे अहमहीकेने सांगणार्‍या लेखांचा वरवा पाडण्यात आला होता. उल्लेखनीय बाब अशी की दस्तुर्खुद लेखिका जे.के. रोलिंग बाई नि पण या थियरी ला दुजोरा देऊन एकच खळबळ उडवून दिली. या कपोकल्पित पात्राना मानवी गुणधर्म चिकटवने हा वाचकांचा / प्रेक्षकांचा अट्टहास असतो. मध्यंतरी विशाल भारद्वाज या दिग्दर्शकाचा 'कमिने' नावाचा एक अफलातून चित्रपट आला होता. त्यातले शाहीद कपूर ने रंगवलेले चार्ली नावाचे पात्र ( त्याच्या मित्रावर त्याचे मैत्री खात्यात खूप प्रेम असते) पण सम लैंगिक आहे का अशा अर्थाच्या चर्चा इंग्लीश मीडीया मधून झाडल्या होत्या.मराठी मनावर गारुड घालणारी एक कलाकृती म्हणजे 'कोसला' आणि प्रचंड लोकप्रिय पात्र म्हणजे पांडुरंग सांगवीकर. कोसला ला तुम्ही एक तर खूप शिव्या घालू शकता किंवा त्याचे प्रचंड गोडवे गाउ शकता. कोसला आणि पांडुरंग सांगवीकर कायम या द्वेष आणि प्रेमाच्या दोन ध्रुवानमध्ये वावरले. पांडुरंग सांगवीकर हा बंडखोर की अती सामान्य इसम, कोसला ही आयुष्याच्या निरर्थकतेची कहाणी की मनोरंजक कादांबरी या वर अनेक विवाद झाडले. यात मला माझा एक मुद्दा अजुन वाढवायचा आहे. पांडुरंग सांगवीकर हा सम लैंगिक आहे का?

पांडुरंग सांगवीकर ला मुलींची Allergy असते हे कोसला वाचताना वारंवार जाणवते. कॉलेज मध्ये असताना मुली दिसल्या की पांडुरंग आपला रस्ता बदलतो. सहली ला गेल्यावर मुली पासून दूर पळण्याला प्राधान्य देतो. प्रसंग कुठलाही असो आपण मूलीना शरण जात नाही असा सार्थ अभिमान त्याला असतो. नाही म्हणायला रमि नावाची एक मुलगी त्याच्या आयुष्यात येते. पण तिला असणार्‍या फुफ्फुस च्या विकारामुळे निव्वळ सहानुभूती पोटी पांडुरंग तिला बोलतो . एकूणच करमणूक म्हणून पण मुली वैतागच असे पांडुरंग चे मत.

जेंव्हा पांडुरंग सर्व सोडून कायमचा सांगवी ला येऊन राहतो तेंव्हा त्याचे लग्न ठरवण्याचे दांडगे प्रयत्न होतात. एक मुलगी तर त्यांच्या घरी पण येऊन राहते काही दिवस. पण पांडुरंग इथे पण मुलीनपासून दूर पळण्याचा आपला बाणा कायम ठेवतो. पण हे काही महत्वाच नाही. पांडुरंग आणि सुरेश तांबे यांच्यात जे काही आहे ते एकदमच थोर आहे. दोघांाही एकमेकाची सोबत जाम आवडते. दोघे ही एकत्र फिरायला जात असतात. सिंहगड, वेताळ टेकडी सगळीकडे. पांडू ला सुरेश तांबे बद्दल प्रचंड जिव्हाळा आहे. पण एक विचित्र खंत पण आहे. पांडुरंग च्याच शब्दात सांगायच तर : शेवटी दोघा पुरुषाना पाहिजे तितक जवळ जवळ येता येत नाही. एकमेकात शिरता येत नाही. शरिराण सगळी गोची करून ठेवली आहे.

ना राहावून तू मुलगी असतास तर मी तुला सोडल नसत अशी स्पष्ट कबूली पांडुरंग सुरेश तांबे ला देतो. पण सुरेश कधी पांडुरंग च्या भावना समजूनच घेत नाही. तो ही मैत्री आणि आकर्षण यातली सीमारेषा कायम पाळतो. पांडुरंग ला हे लागत. त्याच्याच शब्दात सांगायच तर : हेच. सुरेश च दुसर टोक. तो नेमक्यवेळी धो धो पाणी टाकून मोकळा. रिकामी स्थिती तो पुन्हा टाकतो. त्याला रिकामा अर्थ जेमतेम दुरून दिसला होता. काठावरून. बाकी स्वताहाला त्याने कधीच झोकून दिल नाही.

पांडुरंगाची ही सुरेश बद्दलची खंत बरेच काही सांगून जाते. पण नेमाडे यांच्या लिखाणात २ + २= ४ असे असेलच असे काही नाही. नेमाडे यांचे लिखाण ज्यानी वाचले आहे त्याना हे चांगलेच माहीत आहे.नेमाडे स्वताहा पुढे येऊन पांडुरंग च्या लैंगिकतेचा खुलासा करतील ही शक्यता सूतराम नाही. त्यामुळे पांडुरंग च्या लैंगिकतेची पण अनेक perceptions आणि versions तयार होतील. पण चर्चा होणे हे नेहमीच चांगले. शेवटी चर्चा केल्याशिवाय तरणोपाय नाही. मग काय वाटत तुम्हाला? पांडुरंग सांगवीकर सम लैंगिक आहे?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

चार्ली मलातरी गे वाटला नाही. मी ओरीअंटेशनच्या दृष्टीने पाहातदेखील नाही म्हणा.
यावरुन आठवलं 'द पिक्चर ऑफ डोरीयन ग्रे' ही मी वाचलेली पहीली कादंबरी. १२वीच्या सुट्टीत वाचलेली. आणि मला त्यातला गे अँगल कळलादेखील नव्हता. अँगल तर दुरच गे, बाय असं काही असतं हेच मला फार उशीरा कळालं. बहुतेक कल हो ना हो पाहिल्यावर. आणि त्यानंतर वाचुनदेखील शेरलॉक, गे असेल असं स्वतःहुन वाटलच नाही. गाय रिचीच्या चित्रपटांचा रिव्ह्यु वाचल्यावर मग आम्ही 'हम्म असेल असेल' Biggrin
असो. कोसला वाचली नाही. पण तुम्ही दिलेल्या वाक्यांवरुन पांडुरंग गे असू शकेल वाटतय.
रस्कीन बाँडच्या एका कादंबरीची (देल्ही इज नॉट फार???) आठवण झाली. त्यातला नायक गे/बाय नक्कीच होता. हे मात्र मला स्वतःहुन जाणवलेल Smile

कदाचीत अवांतर: काही दिवसांपुर्वीच 'अॅलीस इन वंडरलँडचा लेखक लुई केरॉल पिडोफाइल होता का' अशी एक चर्चा वाचलेली. मी जास्त खोलात न जाता माझ्यापुरती ती शक्यता डिस्कार्ड करुन टाकली...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजा असला किंवा नसला, त्याने माझ्या आयुष्यात नेमका काय फरक पडतो?

पांडुरंग सांगवीकरला मी जाणत नाही, यापुढील आयुष्यात जाणण्याची शक्यता नाही (आणि जाणून घेण्याची इच्छा तर नाहीच नाही), त्याच्याशी माझा कोणत्याही प्रकारे संबंध नाही आणि यापुढील आयुष्यात संबंध घडून येण्याची शक्यता (अथवा संबंध घडवून आणण्याची इच्छा) नाही. अशा परिस्थितीत, त्याच्या लैंगिकतेची चिकित्सा मी काय म्हणून करावी?

फॉर द्याट म्याटर, पांडुरंग सांगवीकर समलिंगी असला किंवा नसला, याने आपल्या (द्वितीयपुरुषी आदरार्थी अनेकवचनी) आयुष्यात नेमका काय फरक पडतो?

(अतिअवांतर: 'जाणण्या'च्या अनेक अर्थांपैकी काही पुरातन अर्थ अतिशय रोचक आहेत. उदाहरणादाखल, 'अमक्यातमक्याने आपल्या पत्नीस जाणले आणि तिच्यापासून त्यास पुत्रप्राप्ती झाली' अशा प्रकारचे उल्लेख बैबलात ठिकठिकाणी सापडतात. असो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लैंगिकतेच्या दृष्टिकोनातून साहित्याकडे पहाणं, जुन्या-नव्या साहित्याचं या बाजूने अर्थनिर्णयन करणं ही आता हळुहळू रुळत जात असलेली गोष्ट आहे असं दिसतं. हे उदाहरण पहा : http://english.artsci.wustl.edu/gender-and-sexuality-studies .

प्रस्तुत लेख या पठडीतला एक प्रयत्न आहे असं (ढोबळ मानाने) म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

नेमाडे स्वत(:) पुढे येऊन पांडुरंग च्या लैंगिकतेचा खुलासा करतील ही शक्यता सूतराम नाही. त्यामुळे पांडुरंग च्या लैंगिकतेची पण अनेक perceptions आणि versions तयार होतील. पण चर्चा होणे हे नेहमीच चांगले.

यावर एक उतारा म्हणजे फ्यान फिक्शन..

आपल्या मेघनातैनी शेरलॉकच्या एका ब्लॉगाचे रुपांतर येथे केले आहे..
तस्मात असे काही लिखाण झाल्यास यावर प्रकाश पडू शकेल..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंदी चित्रपटवाल्या बिनडोकांनी गे' व्यक्तिमत्त्वांचा विनोद निर्मितीसाठी उपयोग सुरू केल्यापासून (अपवाद ऋतुपर्णो घोषच्या 'मेमरीज इन मार्चचा', पण इथेही पिफ्फसारख्या ठिकाणी देखील प्रेक्षकांना अस्थानी हसताना पासून पूर्वग्रह हेच बलवान असतात याचा प्रत्यय आला, पण ते असो.) किंवा तथाकथित स्वातंत्र्यवाद्यांनी स्वातंत्र्याची सांगड 'होमोफिबिया'शी घातल्यापासून जिथे तिथे या गे असण्याचे/नसण्याचे मूल्यमापन सुरू झालेले दिसते. पांडुरंग 'गे' आहे की नाही याबाबत मत व्यक्त करायचे त्याने करावे पण इथे कार्यकारणभावाची जी भयंकर गल्लत होते आहे तेवढ्याच मुद्द्याबाबत मी बोलतोय.

<<कॉलेज मध्ये असताना मुली दिसल्या की पांडुरंग आपला रस्ता बदलतो. सहली ला गेल्यावर मुली पासून दूर पळण्याला प्राधान्य देतो. प्रसंग कुठलाही असो आपण मूलीना शरण जात नाही असा सार्थ अभिमान त्याला असतो. नाही म्हणायला रमि नावाची एक मुलगी त्याच्या आयुष्यात येते. पण तिला असणार्‍या फुफ्फुस च्या विकारामुळे निव्वळ सहानुभूती पोटी पांडुरंग तिला बोलतो . एकूणच करमणूक म्हणून पण मुली वैतागच असे पांडुरंग चे मत.>>
यातून फारतर पांडुरंगाला स्त्रीद्वेष्टा म्हणता येईल वा त्याला फीमेल-फोबिया आहे असे म्हणता येईल. भारतासारख्या लैंगिक-दमन-संस्कृती देशात असे हजारो पांडुरंग सापडतील. तेवढ्यावरून त्याचे 'गे' असणे सिद्ध होत नाही. (उरलेले सुरेशबाबतचे विवेचन अलाहिदा). 'गे' प्रवृत्ती निर्णायकरित्या सिद्ध करण्यासाठी समलैंगिक आकर्षण सिद्ध करावे लागेल (विरुद्धलिंगी तिरस्कार पुरेसा नाही!!!)

एरवी न'वी बाजू यांच्याशी सहमत. एखाद्या साहित्यिक कृतीने, चित्रपटाने, ध्वनिमुद्रिकेने मला/समाजाला/लेखकाला काय दिले, तिचा/त्याचा त्या त्या माध्यमात परिणाम वा स्थान याची चर्चा करणे समजू शकतो. एखादे पात्र समलैंगिक आहे की नाही याची चर्चा नक्की काय साध्य करते? कदाचित धागाकर्त्याने 'समजा तो समलैंगिक असेल तर त्या कादंबरीच्या आकलनात असा असा फरक पडतो, पारंपारिक/आजवरचे आकलन असे असे उघडे पडते वा बाधित होते' हे मांडून दाखवले असते तर काही उजेड पडला असता. अन्यथा हा धागा नुसतेच निरर्थक चर्चेचे गुर्‍हाळ चालू केल्यास कारणीभूत होईल नि लेखकाला फारतर प्रतिसाद मोजून आपले लेखन लैच प्रतिसादांचे धनी झाले म्हणून कॉलर वर करून हिंडायला सहाय्यभूत होईल इतकेच.

@अस्मि: डोरियन ग्रे ही कादंबरी माझ्या अतिशय आवडती आहे. केवळ लेखकाच्या नावावरून नि त्याच्याबद्दलच्या कथित प्रवादांवरून त्यात समलैंगिकता आहे असे म्हणावे हे थोडे अन्यायकारक आहे असा माझा समज आहे (तुम्ही तसे म्हटले नाही हे ठाऊक आहे, केवळ ऐकले आहे असे तुमच्या प्रतिसादावरून ध्वनित होते) समलैंगिकतेचा आरोप (आरोपण या अर्थी, गुन्हा या अर्थी नव्हे) फक्त बेसिलच्या डोरियनबद्दलच्या भावनांबाबत करता येऊ शकतो. पण तिथेही तो फक्त डोरियनच्या चित्राबद्दल (खुद्द डोरियनबद्दल नव्हे) बोलतो आहे. 'मी या चित्रात स्वतःला फारच जास्त ओतले आहे.' असे त्याचे वाक्य आहे. कदाचित हे एखाद्या गायकाला, कलाकाराला बेसिलची भावना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. एखादी कलाकृती जीव ओतून करावी नि प्रेक्षकांसमोर ठेवताच त्यांनी तिची निर्दयपणे चिकित्सा करावी हे अतिशय वेदनादायी असते. माझ्या मते केवळ याच भावनेतून बेसिलने डोरियनच्या चित्राला प्रदर्शनात ठेवण्यास नकार दिला आहे. या पलिकडे वैयक्तिक, भावनिक पातळीवर दोघांचे कोणतेही बंध निर्माण झालेले दिसत नाहीत. याउलट डॉ. हेन्री नि डोरियन यांच्यात एकप्रकारे मेंटॉर नि प्रोटेजी या स्वरूपाचे नाते दिसते, पण ते ही अ-भावनिक दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

धन्यवाद! ती कादंबरी, ऑस्कर वाईल्ड आणि लॉर्ड हेन्री यांनी मला फार झपाटलेले. अजुनही खूप प्रभाव आहे तिघांचा माझ्यावर.
बेसिल-डोरीयन, हेन्री-डोरीयन यांचे नाते कलाकार-म्युज, गुरु-शिष्य असेच मीदेखील पाहीले होते.
पण नंतर ऑस्करला झालेल्या तुरुंगवासाचे कारण, लॉर्ड डग्लस आणि रॉस वगैरे माहीत झाले. बेन बार्नेसचा डोरीयन ग्रे चित्रपट पाहिला. प्रकाशकांनी ती कादंबरी किती वेळा, कोणत्या कारणांसाठी परत पाठवलेली वगैरेदेखील वाचलं. आणि काही दिवसांपुर्वीच परत एकदा कादंबरी वाचली.
बेसिलची सुरुवातीची काही वाक्य आणि खून होण्याआधीची काही वाक्य यांत बराच सेक्शुअल अंडरटोन असू शकेल किँवा परत परत रिड्राफ्ट करुन ती वाक्य माईल्ड केली असतील असं वाटलं खरं.
त्यामुळे सध्यातरी ऑस्कर आणि बेसिल नक्कीच गे होते हे माझं मत (आरोप किँवा शंका म्हणणार नाही मी त्याला. एक्सेप्टंन्स म्हणु शकतो). आणि त्याकाळी गे असल्याने ऑस्करला जो त्रास झाला त्यासाठी Sad आणि त्याच्या थडग्यावर Kiss 2

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा संशय आम्हाला सुरेशचे प्रकरण वाचून आला होता. कादंबरी पुढे वाचावी की नको या विचारातच पुढील प्रकरणे वाचली व हा विचार मनातून निघून गेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

या दुव्यातला शेवटचा परिच्छेद अशा प्रकारच्या लैंगिकतेबद्दलच्या चर्चांविषयी वेगळा दृष्टिकोन देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पांडुरंग सांगवीकर ज्या काळात आणि ज्या वातावरणात वाढला त्यात वाढलेले अनेक पुरुष स्त्री-पुरुष संबंधांबाबत (म्हणजे निव्वळ लैंगिक संबंध नाहीत) काहीसे बावचळलेले आणि अवघडलेले दिसतात. मराठी वास्तववादी कथा-कादंबऱ्यांत असले अवघडलेले पुरुष पानोपानी सापडतील. तुमच्या निकषांनुसार मग अख्खं मराठी साहित्यविश्वच समलैंगिक पुरुषांनी बुजबुजलेलं आहे असं म्हणता येईल. तद्वत हा (पक्षी : सांगवीकराचे स्त्रियांसोबत वर्तन) मुद्दा ह्या संदर्भात गैरलागू आहे.

राहता राहिला सुरेश तांबेबरोबरचा प्रसंग. त्याला समलैंगिक आकर्षणाचा नमुना म्हणण्यापेक्षा खरं तर समलैंगिक नसण्याचीच कबुली म्हणता येईल. समानलिंगी व्यक्तींसोबत जिव्हाळ्याची मैत्री असणं ही तर आपल्यापैकी बहुतेकांच्या नित्य अनुभवातली बाब असते. ही मैत्री कितीही जिव्हाळ्याची झाली, तरी तिला शारीर स्वरूप देता येत नाही ह्याची खंत ही समलैंगिक आकर्षणातून येईल, की उलट समानलिंगी व्यक्तीविषयी हळव्या संवेदना बाळगणाऱ्या, पण समानलिंगी व्यक्तीशी संभोगरत व्हायला असमर्थ असणाऱ्या व्यक्तीकडून येईल? 'शरीरानं सगळी गोची करून ठेवली आहे' अशी (पक्षी : 'क्रियेवीण वाचाळ') प्रतिक्रिया देत बसण्याऐवजी आहे त्या शरीराचा जनहितार्थ इशारा चालू : पुढील दुवा NSFW असू शकतो (पक्षी : कार्यस्थळी तो उघडण्यामुळे काही धोके संभवतात) /इशारा संपला सुयोग्य रीतीनं उपयोग करण्याकडे समलिंगी व्यक्तीचा कल असावा.

जाताजाता : सूर्याखालच्या (किंवा इतरत्र), असलेल्या-नसलेल्या कोणत्याही विषयावर आपलं काय म्हणणं आहे हे कुणी विचारलेलं नसताना भरभरून मांडणारे मराठी संकेतस्थळावरचे सदस्य एखाद्या विषयात 'त्याने माझ्या आयुष्यात नेमका काय फरक पडतो?' असा प्रश्न विचारताना दिसले हे सांगवीकराच्या असलेल्या-नसलेल्या समलैंगिकतेचं नशीब फळफळल्याचं लक्षण मानावं की तिचं दुर्भाग्य मानावं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

(१) सूर्याखालील (अथवा इतरत्रेकडील), असलेल्या वा नसलेल्या ('घरातील वा घराबाहेरील' वगैरे इतर हिरण्यकश्यपू-छाप कंण्डिशना आपापल्या गरजेप्रमाणे येथे घालून घ्याव्यात.) कोणत्याही विषयावर आपले म्हणणे (भरभरून अथवा रिकाम(टेकडे)पणे, इ. इ.) मराठी संकेतस्थळावर मांडण्यापूर्वी इतर कोणी त्याबद्दल पृच्छा केलेली असणे आवश्यक आहे, आणि

(२) इतर कोणी अशाच काही (स्वगृहीत) अधिकाराखाली उपरोल्लेखितहिरण्यकश्यपूछापकण्डिशनालङ्कृत अशा कोणत्याही विषयावर आपले म्हणणे (भरभरून अथवा रिकाम(टेकडे)पणे, इ. इ.) मराठी संकेतस्थळावर मांडले असता, (अ) त्याच्या औचित्यासंदर्भात काही पृच्छा उपस्थित करण्यापूर्वी, अथवा (ब) त्याने आपल्या अथवा अन्य कोणाच्या आयुष्यावर नेमका काय फरक पडतो, याबाबत कुतूहल व्यक्त करण्यापूर्वी, संपादनमंडळाच्या किमान दोन-तृतीयांश सदस्यांची व्यक्तिशः आणि लेखी पूर्वानुमती घेणे आवश्यक आहे,

या दोन्ही पूर्वअटींच्या अस्तित्वाबाबत कल्पना नव्हती. यासंबंधित जो काही प्रोटोकॉल असेल, तो एकदा(चा) जाहीरपणे मांडल्यास आमच्यासारख्या प्रोटोकॉलात-अज्ञ मंडळींची फार मोठी सोय व्हावी. (तो पाळायचा, किंवा नाही, यावर नंतर पुन्हा कधीतरी सवडीने आणि निवांतपणे विचार करता येईल.)

असो. या सर्व बाबींचा सांगवीकराच्या असलेल्या-नसलेल्या समलैंगिकतेच्या नशीबाशी* अथवा त्या असलेल्या-नसलेल्या नशिबाच्या फळफळण्याशी वा वंध्या मरण्याशी संबंध (म्हणजे, असा काही संबंध असणे हे मुळात अपेक्षित असल्यास) बहुत विचाराअंतीदेखील समजू शकला नाही. 'या अफाट विश्वातील आपल्या आकलनशक्तीबाहेरील असंख्य गूढांपैकी आणखी एक' म्हणून तूर्तास सोडून देत आहे.


तळटीपा:
* समलैंगिकतेस नशीब असते, याबद्दल कल्पना नव्हती. नवीन माहितीबद्दल** आभारी आहे.
** यास 'अनुभवी व्यक्तीचे तज्ज्ञ मत' म्हणावे, की 'बालादपि सुभाषितं ग्राह्यम्', या गहनप्रश्नाचा अद्यपि छडा लागलेला नाही.
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राहता राहिला सुरेश तांबेबरोबरचा प्रसंग. त्याला समलैंगिक आकर्षणाचा नमुना म्हणण्यापेक्षा खरं तर समलैंगिक नसण्याचीच कबुली म्हणता येईल. समानलिंगी व्यक्तींसोबत जिव्हाळ्याची मैत्री असणं ही तर आपल्यापैकी बहुतेकांच्या नित्य अनुभवातली बाब असते. ही मैत्री कितीही जिव्हाळ्याची झाली, तरी तिला शारीर स्वरूप देता येत नाही ह्याची खंत ही समलैंगिक आकर्षणातून येईल, की उलट समानलिंगी व्यक्तीविषयी हळव्या संवेदना बाळगणाऱ्या, पण समानलिंगी व्यक्तीशी संभोगरत व्हायला असमर्थ असणाऱ्या व्यक्तीकडून येईल? '

सहमत आहे. यावरून आजच वाचलेल्या एका लेखातला हा मुद्दा आठवला -

Farahnaz Ispahani, an expert in Pakistani minorities at the Woodrow Wilson International Center for Scholars and a former member of Pakistan's parliament, says that homosexuality is a taboo subject throughout the country. In major cities such as Lahore and Karachi, gays can develop a network of allies outside their tribe or family, but in conservative Peshawar, gay identity is more complicated. Part of the popularity of gay porn could stem from the fact that even highly observant Muslim males often have physical relationships with men without considering themselves gay, she says.

"The real love they can have that most of us find with a partner, they find with men," Ispahani says. "They mostly see their wives as the mother of their children."

. . .

बाकी कोसलातलेच "उदाहरणार्थ काही झालं तरी हे आपल्याला खुंट्यावर आणून वगैरे बांधतीलच" हे वाक्य इथे उगाचच आठवून गेले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तरी तो गे नाही वाटला.
मुळात कोसला एका कोषात गुरफटलेल्या माणसाची कथा आहे. त्यामुळे पांडुरंग सांगवीकर मधे कुठेच कशातच पुर्णत्व नाही आहे. कोसल्यातील सुरवंटाचे कधीच फुलपाखरु झाले नाही. म्हणुन तो प्रत्येक बाबतीत अपूर्णच आहे. मग स्त्रिया असो किंवा आणखी काही.
पांडुरंगचा दृष्टीकोन प्रत्येक बाबतीत उपरोधीकच आहे. त्यामुळे मी स्त्रीयांना कसे दुर ठेवले, कॉलेज कसे सोडले, गावकडचे लोक कसे असतात, आमचे मित्र म्हणजे थोडे असलेच.असाच सूर सगळीकडे आहे. अतिसंवेदनाशील डोक्यात वादळे घेउन जगणारा आणी त्यामुळे काहिच न करणारा.
<<अनेक पुरुष स्त्री-पुरुष संबंधांबाबत (म्हणजे निव्वळ लैंगिक संबंध नाहीत) काहीसे बावचळलेले आणि अवघडलेले दिसतात>> यालाही अनुमोदन.

बाकि कोसला माझी खुप आवडती कादंबरी आहे. ही माझ्या मते एक अत्युच्च कलाकृती आहे. याने माझे आयुष्य समृद्ध केले आहे. कोसला हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. एखादी कलाकृती विविध लोकांना अनेक प्रकारे भावू शकते वेगळे अर्थ लागू शकतात. या वेगळ्या चर्चांमुळे एखादा वेगळाच दृष्टीकोन मिळु शकतो. यामुळे एक वेगळेच बौद्धीक खाद्य मिळते.
त्यामुळे या प्रश्नाने माझ्या आयुष्यात तरी फरक पडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घालावा आवर कसा वेगळाच सूर माझा
माझ्या तहानेच्यासाठी वेगळा पाऊस माझा.

कोण समलैंगिक? सांगवीकराचा पांडू काय?

होयसा वाटतो.. Smile

तुम्हाला म्हणून सांगतो.. या माणसाची नजर एकीकडें.. पावलें एकीकडें.. काय सांगू आता..

-गविनाना मलुष्टे.

(मधली आळी, रत्नांगिरी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोसला मुळातच बंडखोर, आपलेपणापासुन दुरावलेल्या, गोंधळलेल्या अशा अनेक मुद्द्यांना हाताळणारी कथा आहे,आणि हेच मुद्दे त्या कथेचा आत्मा आहेत. वाचक म्हणून कथानायकाच्या आयुष्यातील एका किंवा अनेक मुद्द्यांशी/विचारांशी ओळख पटणे कथेचे यश आहे, पांडुरंगच्या वयात असलेल्या अनेक युवकांना कोसला आवडण्यामागे हेच कारण असावे.

समानलिंगी व्यक्तींसोबत जिव्हाळ्याची मैत्री असणं ही तर आपल्यापैकी बहुतेकांच्या नित्य अनुभवातली बाब असते. ही मैत्री कितीही जिव्हाळ्याची झाली, तरी तिला शारीर स्वरूप देता येत नाही ह्याची खंत ही समलैंगिक आकर्षणातून येईल, की उलट समानलिंगी व्यक्तीविषयी हळव्या संवेदना बाळगणाऱ्या, पण समानलिंगी व्यक्तीशी संभोगरत व्हायला असमर्थ असणाऱ्या व्यक्तीकडून येईल?

मी चिंतातुर जंतूंच्या मताशी सहमत आहे, ही नक्कीच नित्य अनुभवातली बाब आहे.


कॅचर इन द राय च्या होल्डनच्या व्यक्तिरेखेविषयीही अशा अनेक चर्चा जालावर आहेत, पण 'कॅचर'इतका समलैंगिकतेचा उघड उल्लेख कोसलामधे आढळत नाही, पण तरिही होल्डनबद्दलही असे मत बनविणे सापेक्षच ठरावे.


असे असुनही असे निष्कर्ष काढणे कलाकृतीच्या अस्वादाचा एक भाग असावे, त्यामुळे त्यास सगळ्यांची सहमती मिळेलच ह्याची खात्री नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डोरीअन ग्रे मुव्ही पुस्तकावर बेतलेली आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो. पण पुस्तकात आणि स्क्रिनप्लेमधे बराच फरक आहे. दोन्हीचे प्लॉट विकीवर मिळतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा गोष्टी 'चव्हाट्या'वर आणू नयेत! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

यांना चव्हाट्यावरून काढण्याची वेळ आलेली दिसते आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

सर्वप्रथम उत्तर द्यायला उशीर केला याबद्दल क्षमस्व. कामाच्या रागाड्यामुळे ऑनलाइन यायला फारसा वेळ झाला नाही. मुलींचे आकर्षण नसणे ही एक फेज़ असु शकते हे पूर्ण मान्य. पण पांडुरंग च मला जाणवलेल सम्लैन्गिक्त्व हे शारीर नसून मानसिक पातळीवरच आहे. पांडुरंग हा एका घुसमटलेल्या काळाचा प्रतिनिधी आहे हे मान्य पण मुलींबाद्दल आकर्षण तर सोडाच पण त्यांच्यापासून चार हात दूर राहायला त्याला आवडते. मग ती रमि असो, त्याच्या आई ने त्याच्यासाठी बघितलेली मुलगी असो वा इतर कोणी. सुरेश बद्दल त्याला जे वाटते ते तर मी कोट केल आहेच. आश्चर्य म्हणजे सतीश तांबे यानी पण माझया अंदाजाला दुजोरा दिला आहे. त्यांची प्रतिक्रिया खाली कॉपी पेस्ट करत आहे.

मला हे वाचून २ लिखाणे आठवली .
१. साने गुरुजींच्या श्यामवर शांता गोखले ह्यांनी लिहिलेला समलिंगी-संशय घेणारा लेख.
२. करीना माझी वियाग्रा ही माझी कथा. जिच्या नायकाला उतारवयात आपण समलिंगी होतो की काय असा संशय येतो!
( ही कथा तुम्ही वाचली नसलीत आणि तुम्हाला वाचायची इच्छा असेल तर मैल ईद कळंवा .
मुद्दा असा आहे की समलिंगी आकर्षण हे सनातनी वातावरणात दाबून जाऊ शकते.
सांगवीकर हा मानसिक पातळीवर समलिंगी जाणवतोच !

तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आणि चर्चा पुढे न्यायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

>> पण पांडुरंग च मला जाणवलेल सम्लैन्गिक्त्व हे शारीर नसून मानसिक पातळीवरच आहे. <<

मानसिक पातळीवरची समलैंगिकता म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे? मी वर म्हटल्याप्रमाणे समानलिंगी व्यक्तींसोबत कमालीच्या जिव्हाळ्याची मैत्री असणं ही तर आपल्यापैकी बहुतेकांच्या नित्य अनुभवातली बाब असते. म्हणजे त्यात विशेष उल्लेखनीय काहीच नाही. हे तुमचं मानसिक पातळीवरचं समलैंगिकत्व त्यापेक्षा वेगळं कसं ते समजावून सांगा. त्यात तुम्ही पुढे जाऊन हे म्हणता -

>> मुद्दा असा आहे की समलिंगी आकर्षण हे सनातनी वातावरणात दाबून जाऊ शकते <<

आता हे जे तुमच्या मते दाबलं जातंय ते शारीर आकर्षण आहे की मानसिक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

फेसबुकवरला पांडुरंग सांगविकर उभयलिंगी आणि अनेकलिंगी(बर्‍याच व्यक्ति चालवत असलेला अकाऊंट) असावा का? :-B

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नावरे आवरीता!