ढिंपांग टिपांग- शोषणाच्या नानाची टांग!

सकाळ' या आमच्या अतिप्रिय दैनिकात आमचे परमप्रिय लेखक प्रवीण टोकेकर उर्फ ब्रिटिश नंदी यांचे 'ढिंग टाक' हे पुन्यांदा सुरु झालेले सदर अंमळ मचूळच असल्याचे 'सकाळ' चे सखोल वाचक आणि कठोर टीकाकार मा. रमतारामजीसो (इथे खरे तर 'स' ला दोन काने आणि त्यावर एक मात्रा हवा. 'कोल्लापुरी मराठीत 'साहेब' चा हा शॉर्टफॉर्म आहे.) यांचे मत आहे. (मटा आणि इतरही सर्व मराठी वर्तमानपत्रांबाबतही त्यांचे हेच मत आहे असे ऐकतो. असो. आता कंस पुरेत. इतके कंस संपवायला एखाद्या कृष्णालाच अवतार घ्यावा लागेल. कशी आहे कोटी, नंदन?) तरीही 'सकाळ'ची ओसरणारी लोकप्रियता सावरण्याचे काम 'ढिंग टाक' करेल असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (आणि लौकरच काँग्रेस, भाजप, शिवसेना किंवा मनसे यापैकी एखाद्या पक्षात दाखल होण्याच्या विचारात असलेल्या) एका कार्यकर्त्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर मा. रमतारामजीसो यांना सांगितल्याचे कळते. याच धर्तीवर 'ऐसी अक्षरे' मध्ये एक अनियमित सदर सुरु करावे हा प्रस्ताव आम्ही 'ऐसी अक्षरे' चे कर्तेधर्ते ऋषीकेश यांच्याकडे घेऊन गेलो. एकतर 'सकाळ' सारखे मार्केट गमावण्याचे 'ऐसी अक्षरे' ला भय नाही आणि आमचे लिखाण मुळातच मचूळ असल्याने 'ढिंग टाक' प्रमाणे लोकांच्या अपेक्षाभंगाचे भय आम्हाला नाही!
ऋषीकेश हे खाली मान घालून प्रत्येक लेखाला, चर्चाप्रस्तावाला, कवितेला, अगदी प्रतिसादालाही +१, हेच म्हणतो, सहमत आहे असे प्रतिसाद लिहिण्यात मग्न होते. आम्ही मोंडपणाने ते कामात असल्याचे दिसत असूनही हा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला. एखाद्या सरकारी कर्मचार्‍यालाही लाजवेल अशा थंडपणाने ऋषीकेश यांनी नकारार्थी मान हलवली.
'शिप ऑफ थिसिअस..' ते म्हणाले.
'त्याचं काय?' आम्ही विचारले.
'शिप ऑफ थिसिअसवर लिहा. मद्रास कॅफे वर लिहा. काहीतरी गंभीर लिहा. विनोदी लिहायला तुम्हाला 'ऐसी अक्षरे' म्हणजे काय म्हणजे काय मिसळपाव वाटले की फेसबुक? असले थिल्लर लेखनाचे प्रस्ताव माझ्यासमोर आणू नका..' त्यांनी मान पुन्हा खाली घातली आणि कुठेतरी 'हेच म्हणतो' डकवू लागले. वस्तुतः 'ढिंग टाक' हे आम्ही फक्त उदाहरण म्हणून म्हणत होतो. आम्हाला जमले असते 'ये तो होनाही था' सारखेही लिहू शकलो असतो. आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. पण हे सगळे आता ऋषीकेशला कोण सांगणार? खरे तर 'ये तो होनाही था'ने शंभर प्रतिसादांचा टप्पा ओलांडला तेंव्हा आम्हाला 'चेन्नई एक्सप्रेस' ने पहिल्या आठवड्यात शंभर कोटीचा गल्ला जमवला तेंव्हा झाला नाही इतका आनंद झाला होता. आधी 'ये तो होनाही था' हे गोडमिट्ट शीर्षक वाचून आम्हाला ऋषी कपूर आणि नीतूसिंगचे अजरामर गाणे आठवले होते. आणि नीतू सिंग आठवली म्हणजे पुढे कायकाय आठवले हे सांगायला नकोच.(यातील दिशादिग्दर्शक शब्दावर श्लेष साधू पहाणार्‍याला साधुवाण्याचा शाप लाभेल!) पण नीतू सिंगाबाबत हे वाक्य लिहून होताच आम्हाला 'ऐसी अक्षरे' वरील एकमेवाद्वितिय सकलवनिताकैवारिणी, नरातिरेकसंहारिणी, नरनारीसमतुल्यबळपुरस्कारिणी मा.अदितीदेवीजी यांचे स्मरण झाले आणि कापरे सुटले. सदर आसुरमर्दिनींनी हल्ली आपली तोफ स्त्रियांचे पीडन आणि शोषण करणारी जळ्ळी मेली ती पुरुषजात या नव्या (किंवा खरे तर जुन्याच) टार्गेटकडे वळवल्याचे आम्ही ऐकून आहोत. समग्र पुरुषांच्या पुरुषी अहंकाराचे आणि बेगडी वर्चस्वाचे पानिपत झाल्याशिवाय महाराष्ट्रात पुरोगामी विचार पुढे जाणार नाही असे जळजळीत प्रतिपादन त्यांनी (अमेरिकेतून) केल्याचे नुकतेच आमच्या कानावर आले आहे. या शिरकाणात अदितीदेवींनी हिंदी चित्रपटांनाही सोडले नाही म्हणे. 'कहीं तो मिलेगी' या सुरम्य गाण्याच्या आधी मीनाकुमारी दीपक उर्फ नटसम्राट प्रदीपकुमार यांना 'चलो,मुझे घर पहुंचा दो' असे म्हणते. या संवादावर अदितीदेवींनी आबजेक्षण घेतले आहे म्हणे. कोण कुठला तो छडमाड पदू आणि त्याने का म्हणून मीनाकुमारीला घरी सोडायचे. हेच, हेच ते स्त्रियांचे पीडन आणि शोषण रांडिच्यानो! या संवादाऐवजी पदूने 'चलो, मै तुम्हें घर पहुंचा देता हूं' असे म्हणावे आणि त्यावर मीनाताईंनी तात्काळ पदर खोचून 'मला घरी सोडणारा तू रे कोण भाड्या? मला अबला समजून माझे शोषण करतोस काय?' असे म्हणून खाडकन पदूच्या एक कानफटात ठेऊन द्यावी असा बदल अदितीदेवींनी सुचवल्याचे समजते. यावर पदूने गयावया करत 'माफ करा मीनाताई, कायतर मिसअंडरष्ट्यांडिंग झालंय ताई तुमचं. तुम्ही मला मोठ्या भैणीसारख्या. वाटल्यास पुढच्या राखी पौर्णिमेला ओवाळून घ्यायला येतो तुमच्याकडनं...' असे म्हणावे आणि मीनाताईंनी पदर आणखीन घट्ट करत 'माझं रक्षण करणारा तू रे कोण बांडगुळा? मला अबला समजून माझे शोषण करतोस काय?' असे म्हणून पदूच्या दुसर्‍या गालावर एक कानफटात द्यावी असेही अदितीदेवींनी सुचवल्याचे कळते. आता कायमस्वरुपी स्वतःचेच शोषण होत असल्यासारखा दिसणारा पदू मीनाकुमारीचे काय शोषण करणार कुणास ठाऊक, पण कानावर आले ते असे.
'आंधी' मधील 'तेरे बिना जिंदगी से' या गाण्याआधी संजीवकुमार थंडीने काकडत असलेल्या सुचित्रा सेनला 'तुम नही बदलोगी....लो...' असे म्हणून आपल्या अंगातला कोट काढून देतो. सदर सीनमध्ये पुरुषी वर्चस्वाचे आणि स्त्रीच्या शोषणाचे चित्रण असल्याचे अदितीदेवींनी या चित्रपटाचे दिग्दर्शक गुलजार यांच्या निदर्शनास आणून दिले आहे म्हणे. याऐवजी संजीवकुमारने कोट काढण्यासाठी खांदा वाकडा करताच सुचित्रा सेनने' तुला थंडी सोसते तर मला सोसंना व्हय रे भाड्या? घे, ही माझी साडीच शाल म्हणून पांघर शोषणकर्त्या!' असे तेजस्वी उदगार काढावेत आणि फराफरा आपली साडी सोडून ती संपूर्ण बुचकळ्यात पडलेल्या संजीवकुमारच्या तोंदावर फेकावी असा डिजिटल बदल करावा असेही अदितीदेवींनी गुलजार यांना सुचवले आहे म्हणे. अन्यथा स्त्रीचे अबला म्हणून चित्रण केल्याबद्दल तुम्हाला (आंतरराष्ट्रीय) न्यायालयात खेचू असा दम गुलजार यांना अदितीदेवी यांनी दिल्याचे कळते!
आता यातले काही लिहावे म्हणून परमिशन मागायला आम्ही ऋषीकेशकडे गेलो तर ते आम्हाला गंभीर लिहा म्हणतात. शेवटी तेही पुरुषच हो!

field_vote: 
4.2
Your rating: None Average: 4.2 (5 votes)

प्रतिक्रिया

ROFL मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुचित्रा सेनने फराफरा साडी सोडल्यावर, संजीवकुमार तिच्याकडे कशा खास ' नजरेने' बघेल , त्याची कल्पना करुन बघितली.
आम्ही तर नीतू सिंगला, पडद्यावर पहाण्याच्या अगोदर 'डेबोनेर' मधे बघितले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमची परवानगी न घेता आमच्या नावाचा (अर्ध्या का होईना) वापर शीर्षकात केल्याचा जाहीर णिशेढ!

बाय द वे , (रच्याकने असे लिहून सन्जोप रावांना उचकवणार होतो, पण जाऊ दे! ;))
तर, जाताजाता एक सहज शंका, 'अबला समजून शोषण करणे' हा प्रकार काय आहे ते काही समजले नाही. जे सबल असतात त्यांचे शोषण कसे होईल? (आणि ज्यांचे शोषण होते त्यांना बलहीन 'समजायचे' कशासाठी?) सन्जोप रावांनी (अथवा इतर जाणत्या कुणीही) या शंकेचे निरसन करून उपकृत करावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे अरे. नशिब तुम्ही सदरास नकार देणार्‍यास 'सलमान' नाही म्हणालात (का? आम्ही फालतु विनोद करु नयेत की काय?)

असो. तुम्ही आपले कलात्मक आणि आशयघन चित्रपटांवर लिहा. पहिले नांव मी सुचवितो - 'बोले सो निहाल.....'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रावसाहेब तुमच्या म्हशी पण गाभण काय हो? पण सुचित्रा सेन वाला पंच आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडलं.

मा. रमतारामजीसो (इथे खरे तर 'स' ला दोन काने आणि त्यावर एक मात्रा हवा. 'कोल्लापुरी मराठीत 'साहेब' चा हा शॉर्टफॉर्म आहे.)

इन्स्क्रिप्टमध्ये टाइप करताना मला एके काळी कधीतरी ते जमलेलं होतं. पुन्हा जमलं की इथे डकवतो.

कृष्णालाही दमन करता येणार नाहीत इतके कंस घालण्यात अक्षय पूर्णपात्रे ऊर्फ क्रेमर माहीर होते. एका कंसाच्या शोषणांनीच रडकुंडीला आलेल्या मथुरावासियांनी त्यांच्यावर आबजेक्षण घेतल्याचं ऐकिवात आहे.

ऋषिकेश यांचं वर्णन वाचून ठणठणपाळांनी श्री. पु. भागवतांच्या वेळोवेळी केलेलं वर्णन आठवलं. फक्त भागवत प्लस वन वगैरे म्हणण्याऐवजी 'कथेला टोक आलं नाही' वगैरे काहीतरी लिहायचे.

विनोदी लिहायला तुम्हाला 'ऐसी अक्षरे' म्हणजे काय म्हणजे काय मिसळपाव वाटले की फेसबुक?

रावसाहेब, इतका तिरकस विनोद कोणाला बापजन्मातही जमणार नाही. एका दगडात तीन पक्षी!

आता या नमनाच्या घडाभर तेलाबद्दल लिहिल्यावर मूळ मुद्द्याकडे वळू. शोषण.

अदितीअम्मांनी जी शोषणाविरुद्ध आघाडी उघडलेली आहे तिची शक्ती तुम्हाला जाणवलेली आहे हे उघडच आहे. पण त्यांनी टेक्सासात जी काय खळबळ माजवून ठेवली आहे तिची तुम्हाला कल्पना नाही. (टेक्सास हे पुरुषप्रधान म्हणजे शॉव्हेनिस्ट पिगांनी भरलेलं राज्य आहे.) एकदा त्या दुकानात शिरत असताना त्यांच्या पुढच्या पुरुषाने त्यांच्यासाठी दार उघडं ठेवून, एअर इंडियाच्या महाराजाप्रमाणे अदबीने झुकून 'आफ्टर यू मॅम' का 'लेडीज फर्स्ट' वगैरे काहीतरी म्हटलं. तेव्हा आपला टीशर्ट जीनमध्ये खोचत त्यांनी 'मुडद्या, माझ्यासाठी दार उघडतोस? तुला काय वाटलं, म्या फकिन अबलेला दार उघडता येत नाही? यो बिच!' आणि तोंड, डोळे आणि दार तसंच विस्फारून राहिलेल्या त्या गरीब बिचाऱ्या पुरषाकडे एक जालीम तिरस्करणीय कटाक्ष टाकून त्यांनी दुसऱ्या दारावर एकच लत्ताप्रहार करून ते फोडलं. मग त्या फुटलेल्या दारातून त्या तशाच आत जात्सात्या झाल्या. तेव्हापासून टेक्सन पुरुष आपल्या कोटाच्या खिशात त्यांच्या नेहमीच्या बंदुकीबरोबर एक बुरखाही बाळगतात असं ऐकून आहे. अदितीअम्मांचं दर्शन झालं की तो घालायचा. आणि प्रत्यक्ष दर्शन होण्याची गरज नाही, आसपास इतर कोणी पुरुष बुरखा घालताना दिसले की घालायचा. त्यामुळे एखाद्या कबुतरांच्या थव्यातल्या मधल्या कबुतराला दगड मारला की तो उडतो आणि त्याचबरोबर घाबरून सगळा थवाही उडतो तसंच अदितीअम्मा घराबाहेर पडल्या की त्या उभ्या असलेल्या केंद्रापासून सगळ्या पंचक्रोशीपर्यंत भराभरा बुरखे चढायला लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावरून मेडुसा आणि तिचे हास्य आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आणि हा प्रतिसाद !!!!!
हसता हसता ढेरीवरून ल्याप्तोप पडता पडता वाचला! .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डूप्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणतीही व्यक्ति स्त्रीवादी भूमिका मांडते तेव्हा तिच्याकडे (भूमिकेकडे) दुर्लक्ष करणे हे सर्वात मोठे पुरुषप्रधानतादर्शक अन्यायाचे लक्षण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ROFL ROFL ROFL

बाकी स्त्रीपुरुष असमानता भौतिकशास्त्रांतही पसरलेली आहेच.

ही लिंक बघणे.

http://www.youtube.com/watch?v=JNzLeZEZ9fU

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भारी!! ROFL ROFL
पण जाताजाता, मीनाकुमारीने (किंवा इतर कोणीही) नटसम्राट प्रदीपकुमार यांच्या कानशीलावर जोरदार प्रहार केलेला प्रसंग पडद्यावर पहायला आवडले असते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नारद कामातून मोकळा झाला काय, कळ काढायला सुरुवात झालीये म्हणून विचारलं. एकाच वेळी किती लोकांना चिमटे काढाल, आं?

रच्याकने ते सखोल, साक्षेपी वगैरे बद्दल धन्यवाद, पण आमचं पहिलं प्रेम 'मटा' (कुण्या संस्थळमालकाचं पहिलं प्रेम 'मनोगत' असतं तसंच काहीसं) , सकाळ - आमच्या पुण्याचा असला तरी - कोणत्याही प्रकारे मटा'ला काम्पिटिसनच नाय असे आमचे प्रदीर्घ अनुभवावरून नि सखोल अभ्यासाअंती झालेले ठाम मत आहे. (आमची सारीच मते तशी ठामच असतात म्हणा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

+१, हेच म्हणतो, सहमत आहे
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वाचेन, वाचेन म्हणून बाजूला ठेवलं आणि नेमकं दुपारी डोळे उघडे ठेवण्याची परा़काष्ठा करत असताना हा धागा उघडला. झोप साफ उडाली.

मीनाताईंनी तात्काळ पदर खोचून 'मला घरी सोडणारा तू रे कोण भाड्या? मला अबला समजून माझे शोषण करतोस काय?' असे म्हणून खाडकन पदूच्या एक कानफटात ठेऊन द्यावी असा बदल अदितीदेवींनी सुचवल्याचे समजते.

ड्वायलाक भारीय ... पण पदर खोचून! छ्या बुवा ... मीनाबाईंनी तत्काळ मोबाईल झोळीत टाकत ... असं चालेल. हं काय? त्या काळात मोबाईल नव्हते? मग सायफाय किंवा अनाक्रोनिक सिनेमा बनवूदेत म्हणावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारिच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हे काय हो संजोप राव, माझी अशी खिल्ली उडविणे शोभते काय तुम्हाला? मी कधी तरी असे केले आहे का? आणखीन मी कधी असे करणारही नाही. तुम्ही जरी माझी अशी खिल्ली उडविली आहे, तरी देखील मी तुम्हाला राव असेच म्हटले आहे आणखीन पुढे पण राव असेच म्हणेन. कोणी कसेही का वागत असले तरी आपण चांगलेच वागायचे हाच माझा नियम आहे. माझ्यावर संस्कार झाले आहेत, तसेच मी वागणार.

बरे तुम्ही जे काही लिहिले आहे, ते स्वत:चे तरी लिहायचे, असा माझा मुख्य मुद्दा आहे. माझ्याच विचारात थोडे थोडे बदल करून जसल्याचा तसला लेख तुम्ही येथे लिहून घेतला आहे. हे खरोखरच योग्य झालेले नाही, अशी माझी स्पष्ट भूमिका मी येथे मांडते. आणखीन खूप काही असे लिहिण्यासारखे आहेच. पण आता माझी लिहिण्याची इच्छा मरून गेली आहे. म्हणजे आपण काही लिहायला जावे, तर तुम्ही लोक असे काही तरी करून दुस-याला नाऊमेद करणार, मग लिहावे तरी का आणि कसे, याचे उत्तर मला आधी द्या.

आणखीन माझा शेवटचा प्रश्न आहे की, जर हे असेच होणार असेल, तर मी या स्थळावर लेख लिहू नये का?
किंवा मग मी माझी या स्थळावरची सदस्यता मागे काढून घ्यावी काय?

---

आणखीन एक मुद्दा राहिला आहे तो येथे मांडून ठेवते. म्हणजे मी जे काही लेख लिहिले आहेत ते काही स्वत:साठी लिहिलेले नाहीत. आज काल समाजामध्ये ज्या काही अपप्रवृत्ती पसरत चालल्या आहेत, त्या आपल्या सर्वांच्या नजरेत आणून द्यायला पाहिजे आहे, असे मला वाटले म्हणून मी हे सगळे केले. त्यामध्ये माझा किती वेळ पण गेला. आणखीन वर मला त्याचे असे फळ मिळणार असेल, तर माणसाने हे कशासाठी करीत राहावे?

-- परप्रकाशित प्रतिसादाबद्दल क्षमस्व

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आता माझी लिहिण्याची इच्छा मरून गेली आहे.

मी या स्थळावर लेख लिहू नये का?

मी माझी या स्थळावरची सदस्यता मागे काढून घ्यावी काय?

- परप्रकाशित शीर्षकाबद्दल क्षमस्व

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते स ला डब्बलकाना जमलं नाही अजून. तूर्तास सूा, सेा, सैा, र्सेाः, र्सूाः वगैरे गमतीदार अक्षरांनी समाधान मानून घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते नेमके स ला डबल काना असे नसून, सो ला अधिकचा एक काना असे आहे.

शक्य असावे की नाही कल्पना नाही (इन्स्क्रिप्ट कधी वापरलेले नाही), परंतु पहा जमल्यास पुन्हा एकदा प्रयत्न करून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोा
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(गोळ्यासहित, स्वतंत्र. आणि म्हणून एकंदरीत अक्षर चमत्कारिक दिसते. निदान गूगलक्रोमात तरी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोा

संदर्भः http://www.branah.com/devanagariinscript

(मिहिरच्या प्रतिसादातला शेवटचा काना फाफॉमधेही वेगळा दिसतो आहे. पण हा फॉण्टचा दोष असावा. आमच्याकडे कोल्लापुरी फॉण्ट नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(निदान गूगलक्रोमात तरी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय.

स ची मूळ उभी दांडी आणि ओकारातली दांडी यांच्यामधली जागा, ही दांडी आणि शेवटचा काना यांच्यातल्या जागेपेक्षा कमी आहे. त्यासाठी वेगळा फाँटच बनवावा लागेल.

साो हे थोडं कमी जोडकाम वाटतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझ्या उबंटूतल्या क्रोमवर नीट दिसतेय. मला पण कोणे एके काळी तुम्ही म्हणताय तसे गोल आणि काना वेगळे असे दिसत असे. जयदीप चिकलपट्टींच्या लिखाणातले स्वर वेगळे दिसायचे, ओ न दिसता 'अ'च्या पुढे गोल आणि त्याला काना, मात्रा असे दिसायचे. मध्येच काय झाले कुणास ठाऊक! नंतर नीट दिसू लागले. तुम्हांला अजून तसे दिसते का?
ओ आणि अो : ही दोन अक्षरे सारखीच दिसताहेत की वेगळी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक्स्.पी. त क्रोम आणि फायरफॉक्स् दोनही ठिकाणी 'ओ आणि अो'* ही अक्षरे सारख्याच प्रकारे वेगळी दिसत आहेत.
*तुमच्याच मजकुरातून इथे डकवली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सााााााे, सोा, सोोोोोोोोोोोोो सेुाुूीैाौैृ, सोुंेे, सोे े , सो वाॅट??

२१ व्या शतकात या जरा!! (आणि गोळे दिसत असतील तर, २१ व्या शतकातला ब्राऊझर वापरा!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

एक दांडी ती काय नि त्यावर एवढी चर्चा? निळ्याचं ठीक आहे पण इतरही तितकेच रिकामटेकडे आहेत की काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

+१०१००.

निळे "ब्यान"रजींच्या वेळमौकाट्याचा आम्हासही मनस्वी हेवा वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असं कसं? असं कसं?
एके काळी एका 'दांडी'वर यात्रा झाली आम्ही (फुकाची) चर्चाही करू नये? का? का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वेलकम टू द क्लब! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

'काना मागून आला आणि तिखट झाला' हे ररांना बोचणारे टिपिकल मिलाक्राशल्य त्यांच्या प्रतिसादातून स्पष्ट दिसून येते, असं रा.घा.आ.का.कु.आ.भा.झा.!

१. व्याप्तिनिर्देश - रावसाहेब
२. ह्या शब्दाचा 'जिम्मानकार' - अमुक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुबुंटूमधल्या फाफॉत एकसारखी आहेत. क्रोममधे दुसर्‍या ओकारात, दोन उभ्या दांड्यामधे जास्त जागा दिसते आहे.

फाफॉने मधे फॉण्ट सुधारले त्यामुळे लिनक्समधे र्‍य, र्‍ह, आणि त्र्य सुधारले. (टंकताना र्‍य आणि र्‍ह विचित्रच दिसतात.) मलासं वाटतं तीच गोष्ट मॅकमधून आलेल्या अ बद्दल आहे.

(असो. आता संजोप रावांनी आणखी टप्पल मारायच्या आत आवरते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धागा हायजॅक कसा केला जातो, हे येथे सोादाहरण स्पष्ट झाले असावे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या फर्मास "सोदा" गिरीबद्दल +१०१०० लाईक्स आमच्याकडून. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं