बुरखा

बुरख्याची माझी पहिली ओळख माझ्या पुण्यातल्या वास्तव्यात झाली. तोवर त्याकडे फारसं लक्ष गेलंच नव्हतं. माझ्या पोस्ट ग्रॅजुएट डिग्रीच्या वर्गातली ही गोष्ट, म्हणजे १०-१२ वर्षापुर्वीची. वर्ग भरायला अवकाश होता. मी आणि काही मैत्रिणी कंपु करून गप्पा मारत बसलो होतो. वर्गात आमच्या समोरच्या बाकावर नखशिखांत काळ्या बुरख्यातली मुलगी आली. मला जरा नवलच वाटलं. माझ्या कोल्हापुरातल्या मुस्लीम मैत्रिणी मुनीरा बागवान, सबीना शेख, वाहिदा, झोया वगैरे कितीतरी डोळ्यांसमोर तरळुन गेल्या. त्या बुरख्याचा वापर करत नसत. क्षणभर वाटुन गेले, इथले लोक परंपरावादी दिसतात कदाचित!

कालांतराने तिची माझी चांगली ओळख झाली. एकदा न राहवून मी तिला विचारले, अगं बुरखा का घालतेस? ती म्हणाली 'हमारे मज़हब में नुमाईश की इज़ाजत नहीं!' अरे बाप रे! म्हणजे बाहेरच्या या बुरख्यावर एक धर्माचा बुरखा आहेच की! साहजीकच मला तिचं म्हणणं पटलं नाही. मी म्हटलं 'कोई भी मज़हब नुमाईश को सही नहीं मानता..' पण शिकल्यासवरल्यांनी असंच वागायचं का?

हे बोलणं ऐकत असलेली तिची दुसरी मैत्रीण म्हणाली, ऐसे देखो, हमारी लडकियों पर अ‍ॅसिड नहीं फेकता कोई, न ही रास्ते में छेडछाड सहनी पडती है! आज की तारिख़ में तो मै कहुंगी आप भी बुरखा पहनना शुरू कर दिजिये! मी अवाकच झाले, विषय तिथेच थांबवला.

पण आज मलाही दोन मुली आहेत. रोज पेपर वाचते आणि मन सुन्न होते. मनात पुन्हा पुन्हा बुरख्याचा विचार येतो. हा उपाय केला तर चाललेलं सगळं अभद्र थांबेल का? पण तसं असतं तर सदैव गोषात राहाणार्‍या पद्मिनीला जोहार का बरं करावा लागला! चार भिंतींच्या आतले अत्याचार कसा काय थांबवेल हा बुरखा? उलट-सुलट विचार माझ्या मनातुन जात नव्हते. पुरोगामी महाराष्ट्रात तरी अशी वेळ यायला नको. गुंडापुंडांच्या भीतीनं मुली घरात बसुन रहायला नकोत. गरज आहे ती मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची आणि दांभिकतेचा बुरखा सर्वांनी मिळुन फाडण्याची.

तुम्हाला काय वाटतं?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

चर्चाप्रस्ताव आणि मांडणी आवडली.

चार भिंतींच्या आतले अत्याचार कसा काय थांबवेल हा बुरखा?

चार भिंतींच्या आतल्या अत्याचारांवर त्या चार भिंतींचाच बुरखा होतो. ही दलदल आत झाकून ठेवली की मग घर सुधारा म्हणून छेडछाड करायला इतर कोणी येत नाहीत.

गुंडापुंडांच्या भीतीनं मुली घरात बसुन रहायला नकोत.

जग धोकादायक आहे म्हणून काळकोठडीत लपून रहायचं हा उपाय नाही. काळकोठडीत धोके खूप कमी असतात, पण त्या आयुष्याला काय अर्थ आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विषय १ - बुरखा

१. जगातल्या सर्व व्यक्तिंना प्रशिक्षण देऊन सभ्य बनवणे किंवा
२. सर्व स्त्रीयांना त्यांच्याशी संबंधात येऊ शकणार्‍या संभाव्य पुरुषांना त्या पुरून उरतील असे आत्मसंरक्षणासाठी मजबूत करणे.

हे कोणी करायचे, कसे करायचे, त्याचा खर्च कोण देणार, किती वेळ करत राहायचे हे प्रश्न सवते सोडवावे लागतील.

अजून, मुस्लिम स्त्रीचा बुरखा हा फार conspicuous आहे. हिंदू स्त्रीयांचे कूंकू पण त्याचाच एक प्रकार आहे. स्त्रीयांचे पुरुषांशी असलेल्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष नात्याचे प्रत्येक प्रतीक हे जुन्या रुढीवादी बुरसटलेल्या विचारांचे प्रतिक आहे. या करिता स्त्रीयांचे संपूर्ण जीवनविषय (वस्त्रे, अन्न, केशभूषा, इ इ इ ) नव्याने डिजाइन करावेत. त्याने त्यांच्या अस्मितेला हात लागणार नाही. शिवाय ते असे असतील कि पुरुषांचे अन्याय, अत्याचार कमी होतील.
सार्‍या पशूंमधे पुरुष सुंदर असताना केवळ माणसामधे स्त्री सुंदर आहे असा थोडा नवल वाटणारा विचारही या स्वार्थी लोकांनी पसरावला असण्याची शक्यता आहे.

विषय २- अ‍ॅसिड
डिसेंबर मधल्या दिल्लीतील घटनेनंतर अ‍ॅसिड फेकण्यासाठी, इ इ कठोर कायदे होणे अपेक्षित होते. मला तो सर्वात क्रूर मूलगा चक्क फूकट सूटत आहे. स़ज्ञानतेचे वय कमी करावे किंवा किमान या एकट्या माणसाला धडा मिळेल अशी शिक्षा व्हावी या मागण्या फेटाळण्यात आल्या. असे झाले तर गुन्हे कसे थांबणार? त्यामुळे कोणत्याही मूलीच्या पालकांस वाटणारी भिती रास्त आहे. गुन्ह्यानंतरची लांबलचक कायदेप्रक्रिया अजूनही भयावह आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बुरख्याआडचे वास्तव जितके बाहेर येईल तितके त्यात बदल घडणे सुकर ह्वावे. मग तो बुरखा विवक्षित धर्मियांपुरताच मर्यादित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"गावची गुरं वळली असती, असल्या इंगळ्या डसल्या नसत्या" असं दया पवारांनी एका कवितेत म्हटलेलं आहे. स्वातंत्र्याच्या जोडीने येणारी जबाबदारी घेण्यासाठी अर्थातच आत्मविश्वासाची आवश्यकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ती कविता कुठली? ओळ ओळखीची वाटतेय, पण स्पेसटाईम कोऑर्डिनेट्स विसरलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गूगलशेठ झिंदाबाद... कवितेची ओळ सांगितली की त्यांना लगेच आठवते सगळी.

कोंडवाडा

आज विषाद वाटतो, कशा वागविल्या मणामणाच्या बेड्या
गाळात हत्तींचा कळप रुतावा तशा, ध्येय-आकांक्षा रुतलेल्या
शिळेखाली हात होता, तरी नाही फोडला हंबरडा
किती जन्मांची कैद, कुणी निर्मिला हा कोंडवाडा
कैद्यासारखी ताटवाटी आपणच आपली लखलखीत करावी
नेहमीचा आपला परित्यक्त कोपरा, वर तलवार टांगलेली
पुढे सरकावे तर एकाच गहजब, याने स्वयंपाक खोली बाटवली
आतल्या आत घुस्मटायचे --- आपण कोण? काय आपला गुन्हा?
आलो कुठून? अश्मयुगाच्या घनदाट काळोखात बघावे पुन्हा पुन्हा
खरंच, कशाला झाली पुस्तकांशी ओळख? बरा ओह्ळाचा गोठा
गावची गुरं वळली असती, असल्या इंगळ्या डसल्या नसत्या.

- दया पवार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा बहुत धन्यवाद घासूगुर्जी!! लै दिवसांनी पाहिली कविता पुन्हा एकदा. लै जबराट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं