दिवस माझे हे फुगायचे .. (विडंबन)

'
(चाल- दिवस तुझे हे फुलायचे )

दिवस माझे हे फुगायचे
तिकिटावाचून रुसायचे ...

तुरुंगात आनंदी राहणे
तिथेच भेटती पाहुणे
पाहुण्यात रंगत रहायचे ..

पाजावी देशीची बाटली
करावी गळ्याशी ओली
नेत्याचे स्वप्न ते पहायचे ..

थरार मिळाले जर
आनंदे तिकिटाचा भार
इतरांनी द्वेषच करायचे ..

माझ्या या तुरुंगापाशी
थांबली गाडी दाराशी
पक्षात स्वागत व्हावयाचे ..
.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

फुगायचे दिवस म्हटल्यावर वेगळंच चित्र डोळ्यासमोर आलं.

दिवस माझे हे फुगायचे, चालता चालता झुलायचे

साखर तूप नि लोणी, चढवी मेदाच्या गोणी
अंगाला बाळसे धरायचे

मोजावा पोटाचा घेर, पुरेना पट्ट्याचा फेर
पॅंटीत दोंद हे भरायचे

थरारे जमीन दार, जिन्याला सोसेना भार
पायाने धरणी कंपायचे

माझिया घराच्या पाशी, थांबवा गड्यांनो टॅक्शी
चौघांनी मिळून भरायचे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी माझ्याही मनात हेच आले होते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

राजेशजी,
विडंबनाचे विडंबन फारच आवडले. मूळ शीर्षक वाचल्यावर जाडेपणासंबंधी असेल असेच, मलाही वाटले होते. ती अपेक्षा तुम्ही पुरी केलीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा वा राजेशराव,
आपले विडंबन तर आणखी छान !
आवडले .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0