ऋतुचक्र - संधीकाळ

आमच्या अपार्टमेंट कॉंप्लेक्सच्या मागच्या बाजूला काही सुंदर घरं आहेत. त्यातल्या मला आवडलेल्या एका घराचे काढलेले हे दोन फोटो. पहिला फोटो सुमारे दोन महिन्यांपूर्वी काढला होता. समर आणि फॉलच्या संधीकाळातला. पानगळती अजून सुरू झाली नव्हती. असाच एका सकाळी बाहेर फिरायला गेलो. धुक्याने आसमंत वेढलं गेलं होतं. सकाळची गुलाबी थंडी उतरली नव्हती. अशा वेळी ही रेखीव, प्रशस्त घरं त्यांच्या आसपासच्या मॅनिक्यूअर्ड हिरवळीत फारच देखणी दिसत होती. फोटो काढल्यानंतर धुक्यामुळे तो थोडा रंगांच्या बाबतीत एकसुरी वाटत होता. त्यामुळे प्रोसेसिंग करताना सॅच्युरेशन वाढवलं. पिकासामध्ये वॉर्मिफाय नावाचं फंक्शन आहे. त्यामुळे एक गुलबट छटा आली.

त्याच घराचा पुन्हा एकदा फोटो काढायची इच्छा झाली ती सुमारे पंधरा दिवसांपूर्वी. संधीरेषा ओलांडून फॉल सुरू झाला असला तरी नक्की कुठचा महिना चालू आहे याची हवामानाला कसलीच फिकीर नव्हती. नोव्हेंबर सुरूही झाला नाही तर एके रात्री चांगला दोनेक इंच बर्फ पडला. आदल्या दिवशी दोनेक इंच पडून वितळून गेला असल्यामुळे हा रात्रभर टिकून राहिला. सकाळचं कोवळं पण लख्ख उन, पांढरं शुभ्र ताजं हिम, आणि निळंशार आकाश यामुळे हवेत थंडी असली तरी बाहेर पडायला आणि फोटो काढायला छान वाटत होतं. आता हे दोन फोटो एकाशेजारी एक ठेवून बघताना त्याच घराची दोन रूपं किती वेगळी दिसतात याचंच आश्चर्य वाटतं.

पुढचे दोन फोटोही याच दिवशी काढले आहेत. अशा वेळी हिम पडणं झाडांना अपेक्षित नव्हतंच. ती आपली अजून वसंतकाळच्या आठवणी जपत, आणि नुकत्याच सुरू झालेल्या हेमंताच्या खुणा मिरवत होती. पण ग्रीष्माची चाहूल इतक्या लवकर लागल्याने काहीशी भांबावून गेली होती. तारुण्य सुटल्याची मनाला खात्री न पटलेल्या मध्यमवयीनाला अचानक हार्ट ऍटॅक यावा तशी. या तिन्ही ऋतूंचा संगम या झगझगीत सकाळी फारच सुंदर दिसत होता.

कॅमेरा - कॅनन पॉवरशॉट एस९५. एक्स्पोजर व फोकससाठी काही विशेष प्रयत्न केलेले नाहीत. शक्यतो सर्व फोटो ८० आयएसओ वर काढण्याचा प्रयत्न केलेला होता. पहिला फोटो सोडला, तर तिन्ही फोटोंत त्यासाठी काही विशेष करावं लागलं नाही. पहिल्या फोटोच्या प्रोसेसिंगविषयी लिहिलेलं आहेच. इतर तीन फोटोंत कॉंट्रास्ट आणि सॅच्युरेशन वाढवलेलं आहे. शार्पनिंगही केलेलं आहे. त्यामुळे रंग थोडे जास्त झगझगीत दिसत आहेत.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

शेवटचे दोन फोटो विशेष आवडले. 'रसलंपट मी, तरी मज अवचित गोसावीपण भेटे'ची काहीशी आठवण करून देणारे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिला फोटो विशेष- पोएटीक वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटचा फोटो क्लास आलाय
'कोणती पुण्ये अशी येती फळाला.. जोधळयाला चांदणे लगडून जावे' (-ना धों महानोर) असे वाटले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मस्त फोटो आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिले चित्र सर्वात जास्त आवडले. सगळ्याच चित्रांत सॅच्युरेशन वाढवले नसते तरी चालले असते - पहिल्यात धुकं, आणि तिसर्‍यात रंगीत पानं आणि बर्फाचा अर्धनारीश्वर मस्त दिसतोय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्या फोटोतिल वातावरण लंडंनची अठवण करुन देणारे आहे (शेरलॉक होम्सच्या कथेतिल)(ओरिजिनल फोटो थोडा अजून गुढ वाटत असावा).

दुसर्‍या फोटोतिल - लख्ख उन, पांढरं शुभ्र ताजं हिम, आणि निळंशार आकाश - घरातून बाहेर बघताना बाहेर कितिही उन दिसो, बाहेर गेल्यावर त्या उन्हातिल फोलपणा लगेच जाणवतो, आकाश मात्र झकास निळं दिसतं.

तिसरा आणि चौथा फोटो त्रासदायक - आता ही बोचरी थंडी सुरु होणार ह्याची जाणिव करुन देणारं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिसरा फोटो आवडला. चौथाही तसाच संपूर्ण काढला आहे का? वर्षातले चार वेगवेगळ्या फेजमधले फोटो काढून (बहराची वेळ, निष्पर्ण, बर्फाच्छादित आणि फॉल रंग) त्याचा एक कोलाज छान बनतो.

एक उदाहरणः

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

फोटो आवडले. मला बर्फाच्छादित (२ रा) सर्वात आवडला. आकाशात गेलेली, ताठ मानेची सुरुची झाडे आणि त्यावरील हिम.

ऋषिकेश आणि नंदन यांच्या प्रतिक्रिया तर जीवघेण्या आहेत. कुठून इतक्या छान ओळी सुचतात (आठवतात)?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्या अमेरिका वारीत घरात बसून अशीच घरे आणि झाडे बघायची मी.. धूसर दिसायचे सगळे.. एकटी असायची दिवस भर.. कार्यक्रम फक्त शनिवार रविवार.. वाचनाची फार गोडी नाही.. टीवी बघणे आवडायचे नाही.. रियाझ कितीक वेळ करणार? घरची आठवण व्याकूळ करायची.. मग वरांड्यात बसून झाडांचे रंग बघत एखादे गाणे गुणगुणत बसणे हा उद्योगच झाला होता दोन महिने.. हे फोटो बघून त्या आठवणी जाग्या झाल्या... वाटते कलावंत हा नेहमीच एखाद्या संधीकाळात असतो का? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!