रसग्रहणः रंजीश

गझल हा माझा वीक पॉइंट. मला विकून येइल कधी कधी इतका वीक.
अन रंजीश माझी एक आवडती गझल.
मेहदी हसन साहेबांनी गायीलेली.
मला क्लासिकल समजत नाही. रागदरी म्हणजे राग येतो तो दरीत नेऊन फेक इतपत ज्ञान.
पण,
उर्दू/फारसी थोडं येतं. तर, अर्थ समजावून 'गाणं' ऐकू यात

इथे ऐका:

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ ।

रंजिश=enmity,. यार, ठीकेय ना? भांडण आहे तुझं माझं? पण एकदा तर ये? भलेही मला दुखावण्याकरता ये? अरे यार.. कमीत कमी मला पुन्हा सोडून जाण्यासाठी तर ये?.. आ फिरसे मुझे छोडके जाने के लिए.. आ!

अब तक दिल-ए-ख़ुश’फ़हम हैं को तुझ से उम्मीदें
ये आख़िरी शम्में भी बुझाने के लिए आ ।

दिल-ए-ख़ुश’फ़हम=optimistic heart, शम्में=candles

अगं! माझ्या आशाळभूत हृदयाला तुझ्याकडून माझ्या अजूनही आशा आहेत..
कमीतकमी त्या आशांच्या शेवटल्या ज्योती विझविण्यासाठी तरी ये!!

एक उम्र से हूँ लज़्ज़त-ए-गिरिया से भी महरूम
ऐ राहत-ए-जाँ मुझ को रुलाने के लिए आ ।

लज़्ज़त-ए-गिरिया=taste of sadness/tears, महरूम=devoid of, राहत-ए-जाँ=peace of life
अगं! एक आयुष्य लोटलंय.. विसरून गेलोय की ते दु:खाचे;.. विरहाचे.. अश्रू कसे असतात... अगं! अगं माझ्या जीवाच्या जीवलगे.. मला विरहाच्या आठवणींनी रडवण्यासाठी तरी ये!... त्या अश्रूंची आठवण तरी दे! ये रडव मला..

कुछ तो मेरे पिन्दार-ए-मुहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिए आ ।

पिन्दार=pride पिन्दार ए मुहब्बत, Pride of love. च. नै.
तुझ्यावर प्रेम केलं त्याचा तरी थोडा मान ठेव? अगं! कधी तरी मला पण रुसु दे ना?.. अन त्या मी केलेल्या प्रेमाखातर, त्या प्रेमाचा मान(ठेवायचा) म्हणून (तरी) तूही कधी माझी समजूत घालायला ये ना?.. असं गं काय?
come on! ए, मी रुसलोय न? बघ तरी?

माना के मुहब्बत का छुपाना है मुहब्बत
चुपकेसे किसी रोज जतानेके लिए आ |

अगं हो गं! ते प्रेम लपवून ठेवावं लागतंय आपल्याला.. माहितेय.. पण कधीतरी येऊन ते प्रेम मला दाखवून तर जा? त्यासाठीतरी ये..

जैसे तुम्हें आते है न आने के बहाने..
वैसे ही किसी रोज न जाने के लिए आ...

शुद्ध हिंदी आहे. समजावून सांगूच का??
अगं जितके बहाणे न येण्यासाठी सांगतेस... येतात तुला बहाणे. तशीच कधी तरी कधीच न जाण्यासाठी ये.. आ फिरसे मुझे छोडके जानेके लिए आ..

गझलांत बर्‍यांचदा काही शेर गायचे राहिलेले असतात. कधी दुसर्‍या वेळी गायिलेले असतात. उरलेला एक पुढे देतो आहे.

पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रह-ए-दुनिया ही निभाने के लिए आ ।

मरासिम=agreements/relationships, रस्म-ओ-रह-ए-दुनिया=customs and traditions of the society
असं काय ठरलेलं नाहिये बरं का आपलं! की तू यायचं अन असं वागायचं वगैरे.. पण तरीही कधीतरी.. दुनियेचे रीतीरिवाज.. म्हणून तरी ये..

अन हा आणिक एकः

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से ख़फ़ा है तो ज़माने के लिए आ ।

सबब=reason, ख़फ़ा=angry
कुणाकुणाला सांगूयात की आपण का अन कसे दूर गेलो एकमेकांपासून?.. एय.. अग रागावली आहेस ना माझ्यावर? ठाउकेय मला.. पण दुनियेला दाखवण्यासाठी तर ये? की तुझं माझं जमतंय?

ये...
भांडण असू देत ना गं.. रंजीशही सही..
दिल ही दुखानेके लिए आ..
ये ना..
मला वाईट वाटावं यासाठी तरी ये??

गझल ऐकायला शिकताना एकच शिकायचं. तो गायक एकेका शब्दाचा अर्थ त्याच्या गाण्यातून सांगतो. रस्म ओ रहे दुनिया हा शब्द कसा बोलतो? अर्थ भले समजत नसेल. रस्म ओ राह ए.. दुनिया दुनियेच्या रस्त्यावर वाटचालीचे रीतिरिवाज. अर्थ ते ऐकून समजतो. मनापासून ऐका. आवडलं, तर पुढे जाऊ. नै तर जाऊ द्या ना! की फर्क पैन्दा? रसग्रहण म्हणा, की शब्दार्थ थोडेफार सांगितले म्हणा. ऐकून मजा आली तर ऐका, नसेल तर जाउ द्या, अन मला पुढची गझल समझऊन सांगा Blum 3

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

अत्यंत लोकप्रिय अशा या गझलेबद्दल काय वाटतं ते लिहिण्याचा प्रयत्न केला ते आवडलं. ( ही रचना उर्दू आहे. हिला "ग़जल" म्हणायचं की मराठीत त्याबद्दल बोलतो आहे म्हणून "गझल" म्हणायचं ? माहिती नाही. )

जे जे आपल्याला आवडले/वाटले/आकळले ते इतरांना सांगणे हा तर एकंदर आस्वादकीय लिखाणाचा हेतू आहे. प्रस्तुत रचना प्रचंड लोकप्रिय आहे. तिचा असा विश्लेषणाच्या अंगाने सांगितलेला अन्वयार्थ तर द्यावाच. परंतु कदाचित ही अशी रचना "समजावून" सांगायच्या वेळी , तिने आपल्याला कसा स्पर्श केला आहे त्याबद्दल बोलता आलं तर पहावं. अशा गोष्टींचे नाते बुद्धिगम्यतेपेक्षा जाणीवेशी अधिक , नाही काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

रंजिश चा अर्थ दु:ख आहे असे मला वाटते. पहिल्या ओळीचा अर्थ, "निदान दु:ख देण्यासाठी तरी माझे हृदय दुखवायला तू ये" असा मी ऐकला होता. जाणकार अधिक सांगू शकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गैरसमजातून झालेले भांडण. रंजीश. (शत्रुत्व/enmity ही एक अर्थछटा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सुंदर आहे गझल. आपला रसग्रहणाचा प्रयत्न आवडला. मुसु म्हणतात त्याप्रमाणे गणे ऐकतानाची तुमची अनुभूती ऐकायला आवडेल. ही गझल ऐकून मग कालची "शाम" अन्य गझला ऐकण्यातच व्यतीत झाली Smile त्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोन्त्या कोन्त्या ऐक्ल्या? :>
सांगा तरी ;;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

नव्या ऐकणार्‍याला शब्दांचे अर्थ नीट ठाऊक नसतात. त्यामुळे तो फक्त सुरावट ऐकून सोडून देतो. किंवा जुजबी ज्ञानावर अर्थ 'लावतो'. शब्दांचे अर्थ किमान बेसिक समजले, की ऐकून नंतर (इतर गझला ऐकून) कॉन्टेक्स्टने नीट 'उमजतात'. अन मग नंतर त्या गीतातलं 'काव्य' समजायला लागतं.

उदा. ते 'मरासिम' म्हंजे हो काय? मक्ता आहे की काय? मरासिम नावाचा शायर असेल.. असं म्हणून सोडून देऊ नका, किंवा चुकीच्या अर्थाने ऐकू नका. इतकंच म्हणायचं आहे. हे 'रसग्रहण' मुरब्बी/पहूँचेहुए लोकांकरता नाही. नव्याने गझल ऐकणार्‍यांसाठी आहे.

गझल (गजल म्हणा -नुक्ता कसा देतात?- की गझल, की घजल. काव्य तेच.) 'कही' जाती है. सांगीतली जाते. ऐकवणे हे अजून वेगळे. मुशायर्‍यात गझल ऐकणे वेगळे. अन मैफिलीतले वेगळे. अन ४ दोस्तांनी पेटी तबला घेऊन जमवलेल्या मैफिलीत ऐकणे/गाणे वेगळे. मग तिथे गाणार्‍याची एकेक शब्द त्याच्या कुवतीने गाऊन उलगडून दाखविण्याची धडपड. अन ऐकताना त्या शब्दांचा तुमच्याच मनात उमटलेला "तुमच्या कॉन्टेक्स्ट्स" चा अर्थ.. प्रत्येक वेळी अन प्रत्येक माणसासाठी वेगळे असतात.

मी मुद्दामच 'माझा' रंग देणं टाळलंय.
तरी आलंच आहे ते थोडंफार.
तुम्ही ऐका.
अनुभवा.

मी शिकलो रस घ्यायला. माझ्या खांद्यावर पाय ठेऊन तुम्हाला थोडं गझलेतलं आवडायला लागलं तर झालं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

'ऐसी अक्षरेत' अनेक भाषा एकत्रित नांदताना दिसतात ह्याचा आनंद वाटतो!

और 'रंजिश' के बारे में क्या कहें आडकित्ताजी ? फ़राज़ साहब की शायरी और कहनेवाले महेदी साहब.. बस हम बिलकूल ही लाजवाब हो जाते हैं .. जितकी लोकप्रिय तितकीच उमदा कलाकृती.. आणि रागदारीचा विषय छेडलात म्हणून सांगते.. 'रंजिश' ही यमन रागा मध्ये आहे..

माझे गुरु सतीश बहादूर गेल्या नंतर पुण्यात हिंदी / उर्दू कोणाचे ऐकावे हे उमगत नव्हते.. मग त्यांनीच सांगितलेली साईट ऐकू लागले.. फैझ, फराज आणि असे अनेक शायर सांगतात उर्दू शायरी विषयी सर्व काही येथे.. http://aligarians.com/

बाकी एखादी कलाकृती का व कशी लोकप्रिय होते हा गुंतागुंतीचा विषय पुन्हा केंव्हातरी घेऊयात चर्चेला..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

माहितीपूर्ण व सुंदर प्रतिसाद. अलिगढियन्सचा दुवा सुंदरच
धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मला गाण्यातले फारसे काही कळत नाही. त्यामुळे रागदारीबाबत तुम्ही जी छान छान माहिती देताय त्याबद्दल आभारी आहे. http://aligarians.com/ ही चांगली साइट आहे.

अवांतर:

फ़राज़ साहब की शायरी और कहनेवाले महेदी साहब

गुस्ताख़ी माफ़ हो लेकिन उर्दूमें ग़ज़ल या शेर कहे जाते हैं. ये ग़ज़ल फ़राज़ने कही है. इसे गाया मेहदी हसनने है.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाव वाचून खूपच उत्सुकतेने धागा उघडला पण थोडीशी निराशा झाली. तुम्ही खूपच पोस्टमॉर्टेम केलंत हो .( कृपया हलकेच घ्या Wink).
काही गोष्टींवर काहीही बोललं तरी ते शब्दबंबाळ ठरतं, ही रचनाही काहीशी अशीच.
फराज चे शब्द आणि मेहदी साहेबांचा आवाज ही निव्वळ अनुभवण्याची चीज आहे. वो दर्द, वो तडप, क्या केहेने! ही गझल ऐकाताना कितीतरी संदर्भ क्षणात डोळ्यासमोरून तरळून जातात हे तिचं वैशिष्ट्य!
असो. पण तुमच्या लेखामुळे कदाचित अर्थ समजून घेऊन ह्या गझलेच्या चाहत्यांमध्ये भर पडू शकते. त्यामुळे आनंदच होईल :).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रंजीश ही सही दिल ही दुखाने के लिए आ ...

कुणाचं असणं खरच इतकं अनिवार्य असू शकतं कि नाही माहित नाही पण

नेमके शब्द + मेहंदी हसन = अतिशय सुंदर गझल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

अप्रतिम गझल आहे. माझी अतिशय आवडती!

मात्र रसग्रहण जरा 'शब्दार्थ' प्रकारात झालंय.. भावार्थ उलगडला असतात तर अधिक मजा आली असती!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ही एक लोकप्रिय गझल आहे. वेगवेगळ्या कारणांनी अनेकांना आवडलेली.

शब्दार्थ समजणे, ही गझल समजण्याची महत्वाची प्राथमिक पायरी आहे असे मी मानते. त्यानंतर गायकाचा आवाज, सुरावट, ऐकणार्‍याची भावावस्था अशा अनेक कारणांनी ऐकणार्‍याला ती कमी-अधिक प्रमाणात भावते. गझलप्रेमींना शब्दार्थ समजावून पहिली पायरी ओलांडायला मदत केल्याबद्द्ल धन्यवाद.

दिलतितली यांनी दिलेल्या दुव्याबद्द्ल त्यांचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही आवडते ही गझल.

कदाचित बरेचसे शब्द कळतात म्हणून विशेष आवडते.

शमा म्हणजे ज्योत असा माझा गैरसमज होता. त्याचा अर्थ बत्ती आहे, असे कळले, - धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणून धागा वर काढलाय..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

शब्दांच्या अर्थाबद्दल धन्यवाद !
आवडती गज़ल आहे ही.
[>> -नुक्ता कसा देतात? >> shift k वापरून नुक्ता देता येतो]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही चर्चिलेली गज़ल आवडते. शब्दार्थाम्बद्दल धन्यवाद !

दुसरी एक गाजलेली 'पत्ता पत्ता बूटा बूटा' ही हसन साहेबाञ्ची मूळ गज़ल इथे मिळेल http://www.youtube.com/watch?v=A373M8P6S6o. ही देण्याचे कारण म्हणजे हरिहरननी त्यान्ना जशी उमजली, त्याप्रमाणे केलेला गज़लेचा सम्पूर्ण कायापालट इथे पहा - http://www.youtube.com/watch?v=c9D8IodazVI. यातच गज़लेचा इङ्ग्रजीतील अनुवाद ओळीनुसार दिला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याच गझलेचे शायर अहमद 'फराज' यांचेबद्दल मायबोलीवर हा लेख मिळाला. अन त्यात लेखकाने, "(आता सगळ्यात मोठ्ठी गंमत - ही गझल प्रेयसीवर नव्हे तर पाकिस्तानातून सतत नष्ट होणार्‍या लोकशाहीवर आहे)" अशी टिप्पणी केलेली आहे. ..इन्टरेस्टिंग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-