लेखकु

कविता माझी वाच, कथा माझी वाच
लेख नक्की वाच, लेखकु म्हणे

आपुली जी रिक्षा, दुसर्‍याची ती भिक्षा
जनतेस का शिक्षा, या संकेतस्थळी

ध्यान असता सुंदर, लेखनास मान निरंतर
टीका वाटे जंतरमंतर, लेखकासि

आव पिडीताचा, सात्विक संतापाचा
वळवी ओघ सहानुभूतीचा, लेखकु तो

वाढुनी ठेवता ताट, स्तुती करतो भाट
इतरांची लावू वाट, दिसता क्षणी

ओलावले डोळे, भारावले मन
शब्द की ग्लिसरीन, वाचकु म्हणे

दर तेरावा प्रतिसाद, देई धन्यवाद
वर आणण्याचा नाद, लेखनाला

इकडेतिकडे देतो कान, पाहुनी इतरांचा सन्मान
काढी फेसबुकी पान, स्वत:चे

नित्य गुळ लावित, झाला अखेर प्रस्थापित
सदैव तरी दिवाभीत, लेखकु हा ||

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रतिक्रिया

प्रचंड आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आपुली जी रिक्षा, दुसर्‍याची ती भिक्षा

रिक्षा ... भिक्षा अन्वयार्थ नकळे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक कविता सध्या ज्या सदस्याचा आयडी 'कृृपया सदस्यत्व उडवावे' असा आहे त्या आयडीने प्रसिद्ध केलेली होती. या आयडीचं मूळ नाव काय होतं लक्षात नाही. पण त्या आयडीने आपलं सगळं लेखन पुसून टाकलेलं आहे. दुर्दैवाने त्यामुळे इतर सदस्यांनी जी गंभीरपणे उत्तरं दिली त्या सगळ्या चर्चांवर पाणी फिरलेलं आहे. तेव्हा त्या आयडीची विश्वासार्हता रसातळाला गेली. आता त्यांच्याबरोबर पुन्हा चर्चा करण्याच्या फंदात कोण पडणार? त्यांनी काही लिहिलं आणि आपण गंभीरपणे वाद घातला आणि पुढे यांनी लेखनच काढून घेतलं तर? असा प्रश्न साहजिकच पडतो. आता जर तेच नमो म्हणून आले असले तर आयडी वेगळा, व्यक्ती तीच - तेव्हा पुन्हा तोच न्याय लागू होतो.

माझ्या मते असा इतिहास असणाऱ्या लेखकांच्या लिखाणावर प्रतिसाद देण्यापूर्वी सर्वांनी 'आपलं लिखाण फुकट जाईल' या शक्यतेचा विचार करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविताच टाकलीय ना ? बार्र !!! टाकू द्या टाकू द्या !!!!!
कुणीतरी हाणलेला जीव दिसतोय. टेक केअर.

@ घासकडवी, नशीब चांगलं म्हणून असा, डँबीस, भारतीय, माणुस, शायर पैलवान, इ. इ. आयडी आले नाहीत अजून. हे आले कि गंमत येईल. म्हणजे एक आयडी तुमच्याशी दोस्ती करेल आणि दुसरा तुमचे लचके तोडण्यास तयार राहील. ही कविता कुणी टाकलीय वगैरे माहीत नाही.

बाकि मी तर जाहीरपणे सांगितलंच आहे कि त्या किरकोळ बाजारपेठेच्या धाग्यावर माझ्या आयडींबद्दल. ते मौजमजा म्हणून काढलेले आणि नंतर जाहीर करून टाकलेले. बाबूराव तर सांगूनच काढला होता. विशेष म्हणजे संस्थळाच्या अ‍ॅडमिनला पहिल्या सेकंदापासून नंबर ऑफ आयडीज माहीत असतात हे पण सीक्रेट नाहीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

अर्धवटराव, टिंबक टू, वीरू, मैत्रेयी भागवत, वगैरे वगैरे वगैरे Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"डुप्लिकेट आयडीं"ची तशी महाराष्ट्रात जुनी परंपरा आहे, कुसुमाग्रज आणि वि. वा. शिरवाडकर या दोन नावांनी लेखन करणारा माणूस एकच होता. कुसुमाग्रज आयडीने केलेलं लिखाण मागे घेतलं आणि पुन्हा शिरवाडकर आयडीने तेच टाकलं असे प्रकार हास्यास्पद बनतात. शिरवाडकरांनी असं काही केलं नाही; जे कोणी असं काही करत नाही त्यांच्याबद्दल आक्षेप घेण्याचं कारण नाही. दोन का, तीनशेचौदा आयडी काढा आणि सगळ्या आयड्यांनी लेखनही करा. पण "भावना दुखावल्या" हे कारण देऊन तेच तेच लिखाण परत टाकण्याचे किंवा तत्सम हास्यास्पद प्रकार केले नाही म्हणजे झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अ‍ॅडमिनपैकी कुणी अशा प्रकारचा हिणकस प्रतिसाद टाकू नये.
ह्या स्थळावर धार्मिक भावना दुखावल्या गेल्या म्हणून आधीच्या आयडीने सर्व लेखन उडवले होते.
नशीब धार्मिक भावना दुखावल्या म्हणून पोलीसात तक्रार केली नाही.
बहुतेक आता असे सर्व लेखन शोधून ती करावी लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भावनांचं हे एक बरं असतं. दुखावल्या म्हणजे दुखावल्या. पुरावा द्यायला नको की अजून काही नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अशा प्रकारचे लेखन हाच पुरावा असतो. जरा अभ्यास वाढवा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बर्रं! प्रयत्न करून बघते. भावना हॅण्डी असतात शेवटी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आणखी एक.
प्रत्येक लिखाणावर असल्या Statutory Warning प्रकारच्या आणि विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणार्‍या पोष्टी टाकल्या जाणार असतील, तर दोन्ही आयडी उडवावे आणि आयपी सुद्धा ब्लॉक करावा. म्हणजे तुम्हालाही त्रास नको नैका?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर कोणी आपल्या कृत्यांनी लोकांचा विश्वास गमवलेला असला तर त्या व्यक्तीने तो परत कसा मिळवावा याची काळजी करणं चांगलं. असे प्रयत्न न करता भलत्यासलत्या तक्रारी करत राहणं याने आणखीनच विश्वास कमी होतो.

स्टॅच्युटरी वॉर्निंगबाबत - सरकार सिगरेट कंपन्यांनी पाकिटांवर स्टॅच्युटरी वॉर्निंग छापण्याचे नियम घालतं. सिगरेट कंपन्यांना अर्थातच ती वॉर्निंग टाळण्यासाठी मुळात सिगरेटीच न बनवण्याचं स्वातंत्र्य असतं. त्या कंपन्यांनी सरकारकडेच 'आमच्यावर बंदीच घाला की' अशी मागणी करणं फारच विनोदी ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0