मिथुन-धनु - "लिव्ह इन रिलेशनशिप"

ती पुस्तकांच्या जगात रमणारी, तर तो मोकळ्या आभाळाखाली मस्तमौला भटकणारा. ती किचकट गणिती प्रमेय सोडविण्यात जगाचे भान विसरणारी तर तो मानवी अंतरगाचा ठाव घेण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणारा. हिला विशिष्ठ शब्द त्या शब्दाचा ध्वनी , नाद भुरळ घालणारा तर त्याला निसर्गसहवासात पक्षांच्या बोलीचे संमोहन.
मिथुन लग्नाची ती अन धनु लग्नाचा तो एकत्र येण्याचे फारसे प्रयोजनही नव्हते ना संधी पण आला बुवा योग जुळून. भेटले ते एकदा अन मग परत मग परत.
मिथुन-धनु परिचयाचे मैत्रीत रूपांतर होण्यासाठी फारसे श्रम पडत नाहीत. यांना मैत्री सहज साधते. हळूहळू याचा मैत्रीची वीण घट्ट होऊ लागली. तिच्या फसलेल्या पाककलच्या प्रयोगावर याने टॅक्टलेस रिमार्क पास करुन खिदळणे काय किंवा त्याने घातलेल्या रंगीबेरंगी शर्टाची हिने पोट दुखे पर्यन्त हसून चेष्टा करणे काय, दोघांत खेळकरपणा व खोड़करपणा यात वरचढ कोण याचीच शर्यत असे. कधी सिनेमाला दोघे मिळून गेले अणि तिकीट नेमकी मिळाली नाहीत तरी ती संध्याकाळ वैतागून फुकट गेली असे या दोघांच्याबाबत कधीच होत नसे. दुप्पट मजा करुन दोघे परत घरी जात याचे मुख्य कारण बोलघेवड़ा स्वभाव. पहिल्याचे बोलणे होईपर्यंत दुसरा तार्किक, बिनतोड़ मुद्दा घेऊन हजर. दोघांच्याही मित्रांच्या भल्या थोरल्या फौजा. त्यांच्यासारख्याच टवाळ. दोघेही मित्रपरिवारात रमत.
पण हळूहळू एकमेकांच्या सहवासाची ओढ़ वाटू लागली. मित्रपरिवारात आवडे त्याहूनही जास्त एकमेकांबरोबर वेळ घालवायची इच्छा होऊ लागली.पण हे "दवणीय" एकमेकांना बोलून दाखवणार कोण? जरी अमाप मोकळेपणा असला तरी दुसरा या भावनांची चेष्टा करणार नाही याची खात्री नव्हती. एकमेकांचा "कमिटमेंट-फोबिया" दोघेही व्यवस्थित जाणून होते. मग मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? इथेच घोडं पेंड खात होते
पण तो आज तिला विचारणार आहे.नाही हो, लग्नाबद्दल नाही तर "लिव्ह इन रिलेशनशिप" बद्दल.ती खळखळून हसणारच नाही याची त्याला खात्री नाही पण आज तो हिय्या करणारच आहे.
त्यात काय? दोघं कमावतात, दोघं सज्ञान आहेत. दोघांना लग्नात अड्कायचे नाही पण आयुष्य समरसून जगायचे आहे. खरं तर हीच योग्य वेळ आहे, योग्य व्यक्ती आहे. तिला त्याचा उमदेपणा अन त्याला तिचा खेळकरपणा अतिशय आवडतो.
पहा ती आली बर का. आल्या आल्या त्याला लटका धपाटा घालून खरड़पट्टी काढू लागली इतक्यात तिच्या मरक्यूरिअन स्वभावानुसार काहीतरी आठवून तीच गंमत सांगू लागली. अरे हो हो मालगाड़ी मालगाड़ी रुक रुक रुक .... पण ही बाई थांबेल तर ना. पण हे काय नायकाने एकत्र रहाण्याबद्दल विचारलेच. अन हे काय आपली मिथुन नायिका झाली बर का speechless झाली. थबकली, डोळे लकाकून उठले अन क्षणात सावरून त्याला घट्ट मीठी मारत म्हणाली "नेकी और पूछ पूछ?"

हुर्रे!!! रहाणार हे दोघे एकत्र रहाणार अणि त्यांच्या स्वभावाबारहुकूम अतिशय आनंदी रहाणार. मग पुढे? पुढे तुम्हीच करा कल्पना, करा त्यांना चतुर्भुज किंवा कसेही Wink आता सगळे स्पून फीडिंग लेखकानेच करायचे होय?
__________________________

लवकरच एक छोटं पण दोघांना भरपूर मोकळं असं अपार्ट्मेन्ट शोधून त्यांचे कोहॅबिटेशन चालू झाले. मूळचा स्वभाव कुतूहलपूर्ण (क्युरीअस) असल्याने या अनुभवाचा थरार तिला विलक्षण वाटू लागला. म्हणजे कसे - आतापर्यंत दिवसातले २-४ तास दोघे भेटत असत पण आता फार काळ सान्नीध्य आले. अर्थात खोल्या वेगवेगळ्या होत्या पण हॉलमध्ये आले की गप्पा होत, एकत्र टी व्ही पहाणे होई. काही गोष्टी दोघांच्याही सारख्या होता - दोघांना भरपूर पर्सनल स्पेस लागे अन दोघेही स्व-कुटुंबियांपासून बर्‍यापैकी अलिप्त होते. कुटुंबाशी फार अ‍ॅटॅचमेन्ट दोघांचेही नव्हती. मित्रपरीवार चिक्कार असला तरी तो घरात जमवून बसण्याकडे दोघांचाही कल नसे.

काही गोष्टी भिन्न होत्या. -
तिच्या फुलपाखरी स्वभावानुसार तिने हिंदू-शीख-ख्रिश्चन-सूफी अशा बर्‍याच धर्मांबद्दल/पंथांबद्दल दांडगं वाचन तर केलं होतच पण "फ्लेव्हर ऑफ द टाइम" प्रमाणे तिच्या श्रद्धा कधी या पंथाकडे तर कधी त्या झुकत्.त्याचे तसे नव्हते. त्याचाही शोध चालू होता पण रोज १५-२० मिनीटे मेडीटेशनची त्याची सवय कधीच डळमळीत होत नसे, मोडत नसे.
त्याला न्हाणीघरातून टॉवेलवर बाहेर येण्यात विशेष काही वाटत नसे मग केसाळ पाय/पोटर्‍या दिसेनाका, डोळ्यांवर अत्याचार होईनाका Wink . याउलट ती सर्व जामनिमा करुनच न्हाणीघरात आत शिरे अन सर्व आटोपून, आवरुनच बाहेर पडे.
अतिशय हाय-स्ट्रंग स्वभावामुळे पाठ टेकताच ती झोपू शकत नसे. वेल, रेसींग माईंड!!मग गाणी लाव, वाच, तसन्तास टी व्ही पहा मग कधीतरी झोप असा तिचा निशाक्रम असे. याउलट हा एकदा खोलीत शिरला की सकाळीच बाहेर पडे.

"मैत्री" होय त्यांच्या नात्याचा गाभा. एकत्र रहाण्याने कशी फुलली किंवा विझली ही मैत्री? एकमेकांच्या सवयी जाणल्याने परस्परांवरचा विश्वास वाढला होता अन आदर दुणावला होता. खरं तर त्याला ती व तिला तो आता जास्त आणि आश्वासक रीतीने आवडू लागले होते. अशी खाशी मैत्री असणारे तरुण जोडपे सेक्सशिवाय
एकत्र राहू शकते का? दोघांनाही सेक्सची भावनिक अन शारीरीक गरज नक्कीच होती पण उथळ नव्हती. हाहाहा इथे फक्त लग्नघराचा विचार करुन कसे चालेल महाराज? अ‍ॅनॅलिसीसमध्ये शुक्र-मंगळ नको यायला? शेवटी ग्रह तरी काय प्रकाशमय दिवा हो, अन राशी म्हणजे विविध रंगांचे काचेचे स्फटीकदीप. जसा राशीचा रंग तसा शुक्राचा प्रकाश/अभिव्यक्ती फांकणार.
तिचा शुक्र वृश्चिकेचा न त्याचा मीनेचा. अमेझिंग निव्वळ अमेझिंग रॅपो. क्वचित तो क्षण येई जेव्हा त्याच्या डोळ्यांत बघताना काही एक जादू होई अन तिच्या शरीरातून रोमांच दौडत. तो क्षण काहीच कळत नसे पण पुन्हा सर्व पूर्ववत होई तिचा मेंदू एन्ड्लेस अ‍ॅनॅलिसीस करु लागे अन फक्त कवितेत तिला उत्तर कदाचित गवसल्यासारखे वाटे -

When you were a tadpole and I was a fish
In the Paleozoic time,
And side by side on the ebbing tide
We sprawled through the ooze and slime,
Or skittered with many a caudal flip
Through the depths of the Cambrian fen,
My heart was rife with the joy of life,
For I loved you even then.

.
.

अर्थात शरण जाईल तर ती कसली? शी वॉज अ टफ कुकी. पिरीअड! तिला त्याचा कसच पहायचा होता. त्याची इन्टेन्सिटी, कल अन अभिव्यक्ती सगळं तिला जाणायचं होतं. गिव्हन अ चॉइस तिला त्याच्या नजरेने जग पहायचं होतं इतकी त्याची ओळख हवी होती. येन केन सर्व प्रकाराने ती त्याला जोखणार होती. तिच्याकडे वेळ होता आणि तिच्या (वुड बी/मे बी) प्रियकराला जाणण्याची तीव्र , दुर्दम्य इच्छा.
__________________________

तो तिला ओळखून होता. तिचे सगळे चाळे, तिच्या सगळ्या ट्रीक्स त्याला कळत. कशा? कशा कळत त्याला? ह्म्म प्रश्न चांगला आहे. या "मीन" मीन राशीच्या लोकांपासून काही लपतं का? दे जस्ट गेट इट!! कळलं मीन पीपल जस्ट नो थिंग्स इव्हन यु मे नॉट नो अबाऊट योर्सेल्फ!!! पण तिच्या या ट्रीक्स पाहताना त्याला विलक्षण मजा येत असे. खूप! खूप!!! Smile
परवाचीच गोष्ट तो संध्याकाळी नुकताच ट्रेकवरुन परतला. खरं तर गुरुवार म्हणजे त्याने जेवण बनविण्याचा वार पण तिने जेवण बनवून ठेवले होते. शिवाय नेहमीच्या अवखळपणे तिने "यु ओ मी अ ट्रीट" असे ठासून सांगीतलेही नाही. अन हे सर्व लपवण्याचा कोण प्रयास. "मला भूक लागली म्हणून मी बनविले." असे म्हणत विषय टाळण्यासाठी पुस्तकात नाक खुपसलेले. अरेच्च्या रोज नाही लागत ७ वाजताच भूक आज कशी लागली? पण मॅडमना जास्त खोदून विचारण्यात अर्थही नव्हता कारण ते म्हणजे संकटाला आमंत्रण होते अन नायका ला सग्गळं माहीतही होतं. आज नाही फार पूर्वीपासून त्याला हे माहीत होतं. योग्य वेळ येणार होती. ला ला ला Smile Smile
_________________________

असेच दिवस जात होते, मजेत अन पटपट जात होते. एकमेकांचा लळा लागला होता.
त्या दिवशी रवीवारी आरामात ती कविता वाचत बसली होती. तो तिथेच काहीतरी खुडबूड करत काहीतरी दुरुस्त करत होता. न बोलताही एकमेकांचा सहवास आता "टेकन फॉर ग्रँटेडच" झाला होता म्हणा ना. मध्येच त्याने विचारले काय वाचतेयस इतकी शांत का झालीस? त्याला कसं कळतं तिचं स्तब्ध होणं, पेन्सिव्ह मूड मध्ये जाणं हे तिच्याकरता एक गोड कोडच होतं. बरोबर योग्य वेळेला त्याची हाक येते.
"ह्म्म ही सुंदर कविता वाचून, स्तब्ध स्तब्ध झालेय. सुंदर आहे, सत्य आहे, इन्टेन्स आहे. ऐकायचीय?" "Bring it On" एवढेच त्याचे फर्म शब्द ऐकले अन ती वाचू लागली "ऐक, कव्हअ‍ॅफी नावाच्या कवीची ही भाषंतरीत कविता आहे"-

Body, remember
not only how much you were loved,
not only the beds where you lay,
but also those desires for you,
shining clearly in eyes and trembling in a voice—
and some chance obstacle thwarted them.
Now when everything is the past,
it almost looks as if you gave yourself to those desires as well—
how they shone— remember—
in the eyes that looked at you,
how they trembled for you in the voice—remember, body.

"तुला काय वाटतं" -ती
"आहे सुंदर अन इन्टेन्स आहे नो डाऊट. मनासारख्या शरीराच्या गरजा , शरीरधर्म असतो त्याचे चित्र आहे. मन अन देह दोन पंखच की - एक जखमी किंवा दुर्लक्षिलेला असला तर अस्तित्व पांगळच होऊन बसेल. पांगळं आहे Smile " .... "आहे म्हणजे?" तिने चमकून विचारले.
.
.
.
.
परत तेच डोळे अन शांतता परत तीच जादू अन डीझी डीझीनेस ..... "शब्देवीण संवादु" का काय कुठेसे वाचलेले.....

.
.
.
याचा अंत कुठे-कधी. आता नाही तर मग कधी?
.
.
.
असो या नात्याची परिणीती सूत्रधाराच्या आवाक्याबाहेर जात चाललीये. इतके सिक्रेटीव्ह नायक-नायिका म्हणजे डोक्याला शॉट आहे राव!!! जरा ब्रेक घेऊ यात Wink
___________________________________________
खरं तर ती मूव्ह इन झाल्यापासूनच तिच्या आईनी अंथरुण काय धरलं, मौनव्रत काय स्वीकारलं, रुसव्या फुगव्यांनंतर हात काय टेकले. घरातील नाट्य काही विचारु नका. आपली मुलगी राजरोस लग्नाशिवाय मुलाबरोबर रहाते हे त्या काळातील लोकांसाठी नाही तरी धक्कादायकच होतं. मग किती का पुरोगामी कुंभ चंद्र रास असेना ;). ती जुमानत नाही हे पाहून गाडं परत मूळपदावर आलं खरं पण आईनी "लग्नाचं काय / लग्नाचं काय, अमकी उजली, तमकीचं ठरलं?" हे टुमणं लावलच होतं. वयानी फार नसली तरी आपली नायिका लग्नाळू वयाचीच होती. आईच्या मते वर्षा २ वर्षात बार उडाला नाही तर मुलगी निब्बर होऊन बसली असती. नायकाकडे ही थोड्या फार प्रमाणात हीच सीरीअल चालू होती.
आता हा ठोंब्या काही बोलत नाही पाहून, स्त्रीसुलभ दक्षतेतून तिनेच विषय काढायचे ठरविले. तिने संधी पाहून विषयाला हात घातला -
"मग तू पुढे काय करायचं ठरवलयस?" - ती
"पुढे म्हणजे" - तो
"पुढे म्हणजे हेच रे अपार्ट्मेन्ट की घर? की असाच ट्रेकींग करत बसणारेस :)" - ती
"हा हा ते म्हणतेस. माझा तर बुवा प्लॅन आहे की एखादी सोज्ज्वळ मुलगी पाहून लग्न करायचं" तो डोळा मारत म्हणाला.
चला विषय तर निघाला.
आता त्या अननोन व्हेरीएबल (मुलीच्या)जागी आपण स्वतः आहोत का याचा अ‍ॅनॅलिसीस तिच्या वेगाने दौड करणार्‍या डोक्यात सुरु झाला.
"सोज्ज्वळ ह्म्म? कश्शी रे कश्शी हवी तुला काकूबाई?" - ती
"हे बघ मला बर्‍यापैकी बोरींग मुली आवडतात म्हणजे अरे ला कारे न करता निमूटपणे ऐकणार्‍या, पतीव्रता, नवर्‍याला देव मानणार्‍या, अन मुख्य म्हणजे नीट स्वयंपाक करणार्‍या. नाही जाऊ दे तुला नाही कळायचं" - तो हसत म्हणाला
"कर हो कर अशीच काकूबाई कर. पण कंटाळलास की इंटुक किंवा धमाल गप्पा मारण्यासाठी मला फोन करु नकोस" ती फुग्गा करत म्हणाली.
"छे, तुला फोन करायला मी वेडा आहे की काय? तुझ्यासारख्या भटक्या गाईला मी फोन कशाला करेन?" - तो
आधीच जेरीला आलेली ती "भटकी गाय" या शब्दावर कमालीची ठेचकाळली. तोंड लपवत, डोळ्यातलं पाणी लपवत विचार करु लागली - लिव्ह इन ला तयार होणारी मुलगी = भटकी गाय? कोणी दिला त्याला परवाना तिला दुखावण्याचा? कदाचित तिनेच दिला. त्याला फार आत येऊ दिलं सुरक्षा परीघाच्या, इतकं की शेवटी डसला Sad डोळ्यात पाणी वाढत चाललं होतं.
अन त्याचे शब्द आले - "अगं वेडे फोनची गरजच काय आपण एकमेकांबरोबर असताना? घरी एकमेकांना फोन करतं का कोणी?"
यावर ती गर्र्कन वळली , रागाचा पोबारा तर झालाच होता पण साश्रू नयनांनी हसत हसत ती त्याला आता धपाटे घालू लागली. पळत, धपाटे चुकवत तो म्हणाला "भटकीच नाही तर मारकुटी गाय आहे रे बाबा!"
अन अरे हे काय नायिका मीठीत शिरली अन .... च च खिडकी लावली Sad
सिक्रेटीव्ह सिक्रेटीव्ह!!!! परत या सिक्रेटीव्ह राशींच्या फंदात पडायचं नाही. कानाला खडा. अन तुमी काय बगून र्हायले? झालाना शेवट गोड? निगा आता घरला निगा.

टाटा!!! बाय बाय!!! Smile Smile

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मला असे राशींचे उल्लेख आवडत नाही. अगदी ललित म्हणून सुद्धा.
बाकी लेखन मस्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सहमत आहे. स्वभाव काय राशीवारी वाटलेला असतो असे वाटत नाही- यद्यपि ज्योतिषांची दुकाने त्या मानण्यावर अवलंबून असली तरीही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile कथावस्तु छान आहे.
जरा टंकनश्रम घेऊन तुम्ही अधिक फुलवू शकाल याची खात्री आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Hi ऋषिकेश,

Is it advisable that I edit the same post if as & when I wish to append some more fun in this couple's life OR is it advisable that I accumulate those stories & write a new thread? I am asking because I am likely to write some more paragraphs. I am finding this couple interesting.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान. पण पटकन संपल...
राशीँचे उल्लेख न करताही फक्त तो आणि ती लिहील असत तरी चालल असत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी माझ्या भावनांशी प्रामाणिक राहून ही कथावस्तु फुलवली. त्यामुळे (राशींच्या उल्लेखामुळे ) काही जणांचा रसभंग झाला असण्याची शक्यता आहे. त्याबद्दल क्षमस्व. प्रतिसादकरत्यांचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्षमस्व. कशाला? आपले विचार भिन्न असू शकतात. आम्ही फक्त आमची रुचि दर्शवली आहे. त्याने ललित चूक होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अगं ते शिर्षक वाचुन हा लेख म्हणजे पत्रिकेच काही अनालिसीस आहे की काय अस वाटतय :-). म्हणजे मिथुन हे असल किँवा मिथुनेत ते पडल तर लिव इन होते लग्न नाही असं काहीतरी...
पण हे हलकंफुलकं कथानक आहे.
त्यामुळे तू त्या राशीँचे स्वभाव वापरले असते पण फक्त स्पेसीफीक उल्लेख टाळला असता तर चाललं असत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Thanks Asmi.

In my mind, the time I assigned them their signs, immediately many traits became so alive so vibrant. These 2 characters came to life. That is power of any conviction may it be ASTROLOGY or any other.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मानवी स्वभाव विश्लेषण, समाज, चालीरिती थोडक्यात सामाजिक निरिक्षणे मांडताना काही लोकांना त्यात राशींचा भाग दिसतो, मार्क्सिटांना वर्ग विग्रह दिसतो, काही त्यात हिंदु- मुस्लिम छटा शोधतात तर काही ब्राह्मण ब्राहमणेतर छटा शोधतात काही श्रद्धा -अंधश्रद्धांची भिंग लावून बघतात. असो! त्यात चूक बरोबर अस काही नसते. जो तो आपल्या पुरता बरोबरच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अगदी! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रोचक अन संतुलित विचार आहे. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवीन थोडे लिहीले आहे म्हणून धागा वर आणते आहे.
___________
हुश्श!!! संपली संपली!!! ढॅण टॅ डॅण!!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहेत नविन दोन भागपण. आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! आता कथा अधिक आवडली!
कथेच्या बाजाला पुरक कविता वापरणे वगैरे ग्रेटच!

अवांतरः 'रिझनेबल' प्रमाणात परिचय/मैत्री झाल्याशिवाय समोरच्या व्यक्तीबद्दल कामेच्छा जागृत न होणे या प्रकारच्या सेक्श्युअ‍ॅलिटीला डेमिसेक्श्युअल्स म्हणतात. ही कथा अशा कपलची वाटली. अत्यंत एकमेकांसाठी अत्यंत हळुहळु ओपन होत जाणारे कपल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद ऋषीकेश. पांढरट रंगाच्या फॉन्टमधली माहीतीही उत्तमच. हे माहीत नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझाच आहे त्यामुळे असेल पण परत वाचताना खूप मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

माझाच धागा वर काढते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0