पुरोगामी मराठा

आमच्या वस्तीतला धोन्नाना कायम म्हणायचा , खरं बामन परवडले पण मराठा नकू , आज पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या मराठा तरुणांची मते पाहून मला धोन्नानाच्या बोलण्यात तथ्य जाणवते. लाखावर उत्पन्न घेणारा उसलावा शेतकरी ज्याच्या घरीदारी टयाकटर बुलट दुध डेरी पंचायत समिती सक्रीय सहभाग इतियादी..! त्याच्या आंदोलनासाठी डोळ्यात पाणी आणणारे पुरोगामी मराठा तरुण लाखावर इनकम कमावणारा उसलाव्या रानात मजुरी करणाऱ्याला काय किती देतो याचा विचार करत नाहीत. त्यांची वास्तपुस्त करताना दिसत नाहीत . दलित जाती संदर्भात काही असले कि मात्र विशाल व्यापक दृष्टीकोन पाहिजे म्हणतात , जात मध्ये आणू नका म्हणतात , आणि बहिणीसाठी हळूच ९६ कुळीच पाहिजे म्हणतात ! तुम्ही शिवाजी महाराज माना पण मनापासून , आम्ही बाबासाहेब माणू ते राजकीय सोय म्हणून ! पुरोगामी पण कसे बदलत जातेय , वाहत जातेय याचं सर्वात भारी उदाहरण म्हणजे आजचा नवभगवा विचारजंत मराठा समाज ! (सन्माननीय अपवाद वगळून !) दलित अत्याचार घटनांबाबत यांच्या भूमिका जाम मजेच्या असतात. अजित दादाच्या मूत बाबत मुग गिळतील , शरद पवारांच्या लबाडीला , मुत्सद्दीपणा मानतील , आणि जातीय हत्याकांडाला वैयक्तिक रंग लावा म्हणतील .
एक निरीक्षण आहे सेट नेट च्या कचाट्यात अडकलेले बरेच बहाद्दर मराठा जातीचे आहेत कसे होतील ? आम्ही स्टाफरूम मध्ये चर्चा करतो तेंव्हा यांचे जिव्हाळ्याचे विषय म्हणजे इतका ऊस झाला , नव रान घेतलं ,शेट्टी असा बोलतो , पाईपलाईन टाकली . एवढा हुंडा दिला आणि नंतर पवार साहेब ग्रेट ! यांची शैक्षणिक जडण घडण तपासली तर ग्रामीण भागातून आलेला तिथे नादावलेल्या मस्तीत शिकलेला (?) तरूण वर्ग इथे येऊन जरा जातीबाहेरचे जग पाहतो दलित प्राध्यापकाकडून पण शिकतो (इलाज नसला तरी !) .गावातल्या दलित मास्तर ची हेळसांड तो इथे करू शकत नाही. इथे तो हर रंगाचा पुरोगामी टीळा लावतो आणि उच्चशिक्षित जातीय जहर ओकू लागतो ! यांचा हक्काचा वेठबिगार वर्ग आता शहरात जाऊन नोकरी धंदा करू लागल्याने यांचा जळफळाट जाम वाढलाय . आणि संधी मिळताच तो ते व्यक्त करत आहेत ! यांचा गावठी पाटीली पीळ काही केल्या जात नाही. गावाकडचे सोडा पण शहरात व विविध संपर्क स्थानांवर त्यांना एकाच जातीकडून ठोक्याला ठोका भेटत असल्याने ते केवळ त्या जाती संदर्भात(च) जरा जास्त दक्ष आहेत ! आणि ती जात देखील एक शत्रू कायम जिवंत राहावा तरच आपण कायम सजग राहू म्हणून अधिक दक्ष आहे ! पुरोगामीपण या दोन जातीत अद्याप रुजलेलं नाही आणि ते रुजण्याची अजिबातच शक्यता ही नाही , ज्या अपवादात ते रुजलेय ते निव्वळ हतबल आहेत , जातीसाठी माती या न्यायाने चिडीचूप आहेत. असो पुरोगामी महाराष्ट्र चिरायू होवो !

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

:steve:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre

त्याच्या आंदोलनासाठी डोळ्यात पाणी आणणारे पुरोगामी मराठा तरुण लाखावर इनकम कमावणारा उसलाव्या रानात मजुरी करणाऱ्याला काय किती देतो याचा विचार करत नाहीत.

हा मुद्दा पटला. मी प्राईस कंट्रोल च्या दृष्टीकोनातून बोल्तोय. सरकारने ऊसाला दर बांधून द्यावा - या मताचा मी कधीही नव्हतो. प्राईस कंट्रोल हे नेहमीच समस्याजनक असतात. पण सरकारने कायदा केलेलाच आहे तर .... जर साखर कारखान्यांनी ऊस खरेदी करताना ठराविक किंमतीचा (प्रतिटन) मोबदला ऊसशेतकर्‍यास द्यायचा असा कायदा असेल तर ऊसाच्या रानात मजूरी करणार्‍या कामगारासही जो मोबदला (प्रतिघंटा) ऊसशेतकर्‍याकडून मिळतो तो सरकारने काही ठरावीक ठरवून द्यायला हवा व तो राबवायला हवा.

--------

आणि बहिणीसाठी हळूच ९६ कुळीच पाहिजे म्हणतात

इथे मात्र प्रचंड असहमत.

तुम्ही विवाहाबाबत बोलत आहात. You are implying that त्या बहिणीसाठी वर शोधताना तो ९६ कुळी असावा असा आग्रह धरू नये.

विवाहाचा संबंध प्रेमाशी मुख्यत्वे असतो. व प्रेम हे भेदभावाच्याच पायावर आधारित असते. भेदभाव केल्याशिवाय व्यक्ती प्रेम व विवाह करूच शकत नाही. (अगदी बहुपतित्व /बहुपत्नित्व कायद्याने संमत असले तरी). प्रेमाच्या बाबतीत प्रेम करणार्‍या व्यक्तीचा क्रायटेरिया महत्वाचा असतो. व तो कोणता असावा याचे व्यक्तीस पूर्ण स्वातंत्र्य असते. व ते स्वातंत्र्य जवळपास अमर्याद असते. म्हंजे क्रायटेरिया असावा की नसावा, असल्यास रॅशनल असावा की नसावा, जात्/धर्म हा क्रायटेरिया असावा की नसावा, आदर-ड्रिव्हन-प्रेम (पैसा/मालमत्त्ता/शिक्षण/ कर्तृत्व यावर आधारलेला) की ट्रस्ट-ड्रिव्हन-प्रेम($$$) असा असावा की नसावा, प्लुटॉनिक लव्ह असावा की नसावा (म्हंजे केवळ "जुळल्या सुरेल तारा" म्हणून विवाह केला), कितपत असावा वगैरे.

याचे मुख्य कारण हे की विवाहाचे जे परिणाम होतात (चांगले / वाईट) ते व्यक्तीस स्वता:स सर्वात जास्त भोगावे लागतात. अर्थात इतरांना सुद्धा भोगावे लागतात पण इतरांना भोगावे लागणारे परिणाम रिलेटिव्हली कमी असतात.

-----

सुमारे एक वर्षापूर्वी लक्ष्मण माने यांनी - तुमच्या मुली आम्हास (आमच्या मुलांना) द्या व आमच्या मुली तुम्हास (तुमच्या मुलांना) देतो - म्हंजे जातीयवाद मिटेल - अशा आशयाचे विधान केले होते. तो विषय इथे उपस्थित करणे संयुक्तिक नाही असे कोणीही म्हणणार नाही.

ते विधान ही तुमच्या वरील विधानास साजेसे होते.

समस्या ३ आहेत.

१) पहिली म्हंजे मुलगी ही वस्तू नसते. व्यक्ती असते. तिला देणे व घेणे हा विचार तिला गुलाम समजणारा आहे. निषेधार्ह आहे. (खरंतर It should be the other way round. MAN owes his existence more to the WOMAN. WOMAN contributes more to the child's birth than man.) पण आपण तरीही हा मुद्दा काही वेळ बाजूला ठेवूया कारण I am sounding pontifical.

२) वर म्हंटल्याप्रमाणे विवाहाचा संबंध प्रेमाशी आहे. तिथे इतरांचा क्रायटेरिया महत्वाचा नसतो. किंवा कधीकधी क्रायटेरियाच नसतो. व भावाचा क्रायटेरिया कितपत जुमानावा हा प्रश्न बहिणीचा असतो किंवा आईवडिलांचा.

३) तिसरी म्हंजे - तुमच्या मुली आम्हास (आमच्या मुलांना) द्या व आमच्या मुली तुम्हास (तुमच्या मुलांना) देतो - हे तत्व तुम्ही प्रथम आचरणात आणा बरं !!! आधी छत्तीसगड मधल्या आदीवासींच्या मुली करून आणा बरं? विंध्य पर्वतातल्या भिल्ल मुलांना आपल्या मुली द्या बरं ? ते लोक स्वतः अत्यंत मागासलेले आहेत (महाराष्ट्रातल्या दलितांच्या तुलनेत). इथे "मागासलेले" म्हंजे सामाजिक दृष्ट्या. आर्थिक दृष्ट्या असतीलही (पण तो मुद्दा/दृष्टिकोन नाही).

---------

पुरोगामीपण या दोन जातीत अद्याप रुजलेलं नाही आणि ते रुजण्याची अजिबातच शक्यता ही नाही , ज्या अपवादात ते रुजलेय ते निव्वळ हतबल आहेत

तुम्ही व्यक्तीसमूहाचे विश्लेषण करताहात. (म्हंजे एखाद्या विशिष्ठ जातीचे लोक व त्यांचे एक "जात" म्हणून विश्लेषण.). पण विश्लेषणाची ही पद्धत अत्यंत flawed आहे.

methodological individualism कडे तुमचे लक्ष वेधू इच्छितो. एका व्यक्तीस एक मत हे कलम methodological individualism वरच आधारलेले आहे.

------

संभाव्य आक्षेपः -

१) माझ्या प्रतिसादाचा प्रतिवाद करताना प्रतिवादी - मराठा समाजात (&&&) विवाहाच्या वेळी दिल्या जाणार्‍या प्रचंड हुंड्याची बात करणार व ही बात प्रेम दर्शक आहे का? असे pontificate करणार - हे anticipate करूनच वर आदर-ड्रिव्हन-प्रेम ची बाब उपस्थित केलेली आहे.

२) गब्बर यांचा नकारात्मक मानसिकतेतून आलेला प्रतिसाद. विरोध करायचा म्हणून विरोध करू नका, गब्बर.

३) गब्बर यांचा नवजातीयवाद.

४) गब्बर यांचे पुस्तकी प्रतिसाद. गब्बर प्रॅक्टिकल बोला प्रॅक्टिकल. तुमच्या आयव्होरी टॉवर मधून खाली येऊन ग्रासरूट लेव्हल वर काय चाललेय याचा विचार करून बोला, गब्बर. (नेहमीचाच घिसापिटा).

५) गब्बर हे विषमतेचे समर्थक आहेत.

६) गब्बर तुम्ही प्राईस कंट्रोल बद्दल बोलताहात. पण आर्थिक निकष हे दलित चळवळीचे मुद्दे खरेतर नव्हतेच. दलित चळवळीचे मुद्दे सामाजिक समानतेचे होते.

७) गब्बर, प्रेमात प्रकार नसतात. प्रेम हे फक्त प्रेम असते. वगैरे वगैरे.

८) मूळ लेख १० ओळींचा व गब्बर चा प्रतिवाद १०० ओळींचा.

-------------------------

$$$ - one example - Individual's belief that a person belonging to a certain caste has certain institutional knowledge, ( माझ्या मते however retrograde), which helps individual to quickly assimilate into the new family. अर्थात हे फक्त एक उदाहरण आहे.

&&& - हुंडा फक्त त्या एकाच समाजात दिला जातो असे मला म्हणायचे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संभाव्य आक्षेपांच्या यादीत फारसे लॉजिकल आक्षेप दिसले नाहीत यावरून गब्बरजी ऐसीच्या वाचकांना फारच सामान्य बुद्धीचे मानतात असा माझा आक्षेप आहे. Wink

'९६ कुळीच्या निकषाबाबत तक्रार नको कारण लग्न ही प्रेमाची बाब आहे आणि भेदाभेदाशिवाय प्रेम असूच शकत नाही.' हा युक्तिवाद तोकडा आहे. एकतर पदर तपासून होणारी लग्न हा वर-वधूंच्या प्रेमाशी संबंधित नसतात. तो कम्युनल डिसिजन असतो, इंडिव्हिज्युअल नाही (तुम्हाला आवडेल असा युक्तिवाद आहे की नाही?) लेखकानेच 'माझ्या बहिणीसाठी (मी) ९६ कुळीच निवडणार' हे स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे एक समाज, आपल्या मुलीचं लग्न समाजांतर्गतच झालं पाहिजे असा नियम करतो, आणि तो सगळेजण सामुदायिकपणे पाळतात. 'माझ्या बहिणीसाठी....' वालं वाक्य व्यक्तीमुखातून समाज बोलतो. आतले आणि बाहेरचे यांना वेगळी वागणूक दिली जाते. हा भेदभाव आहे. आणि तो व्यक्ती पाळत नसून समाज पाळतो. हे आक्षेपार्ह आहे.

तुमच्या त्या मेथडॉलॉजिकल इंडिव्हिज्युअलिझमची पारंपारिक अर्थशास्त्रापलिकडे व्याप्ती आहे का? तेसुद्धा इंडिव्हज्युअलच्या आवडीनिवडी कशा तयार होतात याबद्दल समाजशास्त्रज्ञ, मनोवैैज्ञानिकांकडे बोट दाखवून काखा वर करत नाहीत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या त्या मेथडॉलॉजिकल इंडिव्हिज्युअलिझमची पारंपारिक अर्थशास्त्रापलिकडे व्याप्ती आहे का? तेसुद्धा इंडिव्हज्युअलच्या आवडीनिवडी कशा तयार होतात याबद्दल समाजशास्त्रज्ञ, मनोवैैज्ञानिकांकडे बोट दाखवून काखा वर करत नाहीत का?

चिंतजनक प्रश्न.

उदा. इंडिव्हिज्युअलिझम बद्दल अनेक मॉडेल्स व anti-models आहेत. व व्यक्ती मॉडेल्स प्रमाणे वागत नाही अशा धर्तीवरही अनेक पेपर्स आहेत.

प्रश्न चिंताजनक एवढ्यासाठी की जे काम अर्थशास्त्र्यांनी खरोखर करायला हवे व जे करणे खरोखर उचित आहे - त्यास तुम्ही काखा वर करणे असे म्हणत आहात. An economist (or for that matter any researcher) should actually draw on the insights derived from other fields. Shouldn't he/she ?

उदा. transaction cost economics. हे bounded rationality वर आधारलेले आहे. bounded rationality ही संकल्पना हर्बर्ट सायमन (पॉलिटिकल सायंटिस्ट कम एकॉनॉमिस्ट कम मानसशास्त्रज्ञ कम काँप्युटर सायंटिस्ट) यांनी मांडली व डॅनियल काह्नेमन (मानसशास्त्रज्ञ) यांनी उचलून धरली.) व या दोघांनाही अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले.

रॅशनॅलिटी वर प्रचंड संशोधन करणारे लोक (व्हॉन न्युमन, रॉबर्ट ऑमन) हे गणिततज्ञ ही आहेत. (इथे मात्र माझा अज्ञानापोटी आलेला नम्र प्रणाम.).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

An economist (or for that matter any researcher) should actually draw on the insights derived from other fields. Shouldn't he/she ?

बरोबरच. पण माझा मुद्दा असा होता, की ज्या तत्त्वाबाबत इकॉनॉमिस्ट म्हणतात की समाजशास्त्रज्ञांनी याची कारणमीमांसा द्यावी, ते तत्त्व वापरून तुम्ही समाजशास्त्रीय प्रश्न सोडवायला कसे जाऊ शकता? एक उदाहरण देतो. तापमानानुसार वायूचं आकारमान आणि दाब कसा बदलतो याची सोपी समीकरणं लिहिता येतात. हे आयडियल गॅसचं इक्वेशन बहुतेक वायू बऱ्याच चांगल्या रीतीने पाळतात. पण हे तापमान, आणि दाब आणि आकारमान नक्की कुठनं येतात, असं विचारलं तर त्यासाठी बोट स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्सकडे दाखवावं लागतं. आता जर कोणी म्हटलं की स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्समध्ये ज्या अणूंचं वर्णन आहे, त्या प्रत्येकाने या आयडियल गॅसचं इक्वेशन पाळलं पाहिजे तर ते कसं चालेल?

थोडक्यात, चाललेली चर्चा ही मेथडॉलॉजिकल इंडिव्हिज्युअलीजमच्या पेग्रेडच्या वरची आहे. असो. इथे ही चर्चा फारच पेडॅंटिक होते आहे. तुम्ही या विषयावर स्वतंत्र लेख का लिहीत नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्राईस कंट्रोल हे नेहमीच समस्याजनक असतात.
- ह्या विधानामागे कुठला आधार आहे ? हा प्राईस कंट्रोलला विरोध हा थेरोटिकल आहे की प्रत्यक्षात आणताना त्यात तोटाच होतो ह्या अर्थी आहे ?
कारण थेरोटिकल प्राईस कंट्रोल ही समाजासाठी फायद्याची ठरू शकते असे नक्कीच दाखवता येईल.

आणि बहिणीसाठी हळूच ९६ कुळीच पाहिजे म्हणतात
इथे मात्र प्रचंड असहमत.

आपली इथे गल्लत झालेली दिसते. निर्णय घेताना जातीचा विचार करणे वेगळे आणि '९६ कुळीच पाहिजे' म्हणणे वेगळे. खुपदा इतर गोष्टींपेक्षा हाच महत्वाचा निकष ठरतो. जातीद्वारे मिळणाऱ्या ' institutional information ' पेक्षा 'social restriction ' म्हणून हे जास्त कार्य करते. पुष्कळ ठिकाणी ह्या एका कारणामुळे बाकीचे सर्व निकष हे दुय्यम ठरतात .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes

प्राईस कंट्रोल हे नेहमीच समस्याजनक असतात.
- ह्या विधानामागे कुठला आधार आहे ? हा प्राईस कंट्रोलला विरोध हा थेरोटिकल आहे की प्रत्यक्षात आणताना त्यात तोटाच होतो ह्या अर्थी आहे ?
कारण थेरोटिकल प्राईस कंट्रोल ही समाजासाठी फायद्याची ठरू शकते असे नक्कीच दाखवता येईल.

मी पांढरे निशाण फडकवतो. कारण ह्यावर खूप चर्चा मी केलेली आहे. व बहुतेकवेळा ... बात आकर रुकती है ... मिनिमम वेज वर. I have lost my steam to debate this topic.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेशजी व अर्थ, तुम्हास दोघांस मिळून एक उत्तर देतो. ९६ कुळी च्या बाबतीत.

$$$ मधे मी ते मांडलेले आहे. पण मला जे म्हणायचेय ते आणखी थेट, वेगळ्या शब्दात व पुन्हा एकदा मांडतो.

एखाद्या व्यक्तीने विवाहाचा जोडीदार कसा/कोण निवडावा याचा निर्णय संपूर्णपणे वैयक्तीक असतो व असायला हवा. पण जातीतील प्रथांनुसार त्यांची पायमल्ली होते हे ही मला माहीती आहे. 'माझ्या बहिणीसाठी....' वालं वाक्य व्यक्तीमुखातून समाज बोलतो. ह्या वाक्याप्रमाणे व्यवहार घडतो हे ही मला माहीती आहे.

माझे म्हणणे असे आहे की - हे आक्षेपार्ह असलेच तर त्यावर आक्षेप घेण्याचा locus standi - त्या बहिणीचा, तिच्या भावाचा, तिच्या कुटुंबाचा असू शकतो. व तो ही तिच्या (implicit/explicit) रजामंदीने.

In other words, a bride/groom has every right (and should have every right) to reject a potential spouse based on any criteria whatsoever. The bride/groom is not even required to disclose the criteria. S/he can ACTUALLY discriminate on any basis whatsoever - including caste, creed, ethnicity, religion, gender, nationality, political orientation, age, height, weight, education, wealth-status, social status, inclination towards arts, nationality ...... literally anything.

I know - This is tautology. पण ती काही वेळा व्यक्त करावी लागते.

-----

आतले आणि बाहेरचे यांना वेगळी वागणूक दिली जाते. हा भेदभाव आहे. आणि तो व्यक्ती पाळत नसून समाज पाळतो. हे आक्षेपार्ह आहे.

एक सिच्युएशन - कोणतीही एक जात घ्या - त्यातील सर्व १८+ व विवाहेच्छुक तरुण तरूणींनी एकत्र येऊन एकमुखी व voluntarily (कोणत्याही बलप्रयोगाशिवाय) निर्णय घेतला की - आम्ही आमच्या जातीतच लग्न करणार, आमच्या जातीबाहेर लग्न करणार नाही.

(हे असे घडणे अवघड आहे हे मला ही माहीती आहे.)

मी माझा प्रश्न थेट विचारतो - हा निर्णय आक्षेपार्ह आहे का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Why only potential spouse? There should be right to anyone and everyone to reject anyone and anything on any basis or without any. मग सगळे गप्प बसा. कोणाला काहीही करू द्या. कुणाच्या कशाबद्दल कोणाला काहीच बोलायचा हक्क नाही so long as it does not directly bother them. साधं तत्त्वज्ञान आहे. नोबेल प्राईज मिळवणारांची उदाहरणे देण्याची गरज नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्यातील सर्व १८+ व विवाहेच्छुक तरुण तरूणींनी एकत्र येऊन एकमुखी व voluntarily (कोणत्याही बलप्रयोगाशिवाय) निर्णय घेतला

एकाच वेळी व्यक्ती आणि समाज अशा दोन्ही डगरींवर पाय ठेवण्याचा गोंधळ टाळण्यासाठी मी 'एकत्र येऊन एकमुखी' वगैरे काढून टाकतो. जर असा निर्णय प्रत्येकाकडून वैयक्तिकरीत्या घेतला जात असेल तर तो प्रत्येक निर्णय आक्षेपार्ह नाहीच. मात्र जर त्या जमातीतली प्रत्येक १८+ व्यक्ती जातीबद्दल तडजोड करत नसेल तर या ब्रॅंड लॉयल्टीमागचं कारण काय हा प्रश्न पडेलच. म्हणजे त्यांच्या जडणघडणीत असं काय आहे ज्यापायी हा भेदभाव पक्का रुजला आहे? याची कारणं शोधावीच लागतील. विशिष्ट वर्गातल्या सगळ्याच चायनीज मुली जर पाच इंच लांबीपेक्षा जास्त लांबीच्या चपला घालत नसतील तर आईबाप जन्मापासून त्यांचे पाय लाकडी खोक्यात बांधून ठेवतात का? हे तपासून पहावं लागेलच, तसंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओके. यु मेड माय डे.

मी दुसरा प्रश्न विचारतो.

जर कोणत्याही एखाद्या जातीतील सर्व १८+ व विवाहेच्छुक तरुण तरूणींनी voluntarily (कोणत्याही बलप्रयोगाशिवाय) निर्णय घेतला की - आम्ही फक्त आमच्या जातीबाहेरच लग्न करू.

हा निर्णय आक्षेपार्ह आहे का ?

(माझा आडाखा असा आहे की - तुम्ही म्हणाल की आक्षेपार्ह नाही. व जर तसे असेल तर यु मेड माय डे अगेन व माझा मुद्दा संपतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याही प्रश्नाचं उत्तर वरीलप्रमाणेच आहे. पण त्याने तुमचा मुद्दा संपतो म्हणजे काय ते नक्की कळलं नाही. थॉट एक्स्परिमेंट करून झाल्यावर तरी त्यातून नक्की काय सांगायचं आहे हे त्या एक्स्परिमेंटमध्ये भाग घेणाराला समजावून सांगावं.

माझा युक्तिवाद पुढीलप्रमाणे आहे. तुम्ही एखादं नाणं उडवलं, त्यावर छापा दिसला तर त्याबाबत काही विचार करण्याची गरज पडत नाही. तसंच एखादा वैयक्तिक निर्णय 'जातीमधला' असा आला तर त्याबाबत विचार करण्याची गरज पडत नाही. पण जर तुम्ही शंभर नाणी उडवली आणि त्या सर्वांवर छापा आलेला दिसला, तर नाणी बायस्ड आहेत असंच म्हणावं लागतं. हाच तुमचा मुद्दा असेल तर सोन्याहून पिवळं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओके.

माझा मुद्दा संपतो म्हंजे असे की मला काय म्हणायचे आहे ते विशद करून सांगायची प्रक्रिया संपते. मुद्दा हा आहे की - व्यक्तीच्या स्वयंस्फूर्त चयनावर आक्षेप घेणे हेच आक्षेपार्ह आहे. जर व्यक्ती बायस्ड असेल तर त्याचे परिणाम (चांगले/वाईट दोन्ही) व्यक्तीचे आहेत - जोपर्यंत व्यक्ती इतरांवर डायरेक्ट जबरदस्ती करत नाही तोपर्यंत. अर्थात बहिणीच्या चयनावर भाऊ, आईवडील, व इतर जातबंधु भगिनि हे जर दबाव टाकून ते बदलू पाहत असतील तर ते आक्षेपार्ह आहेच.

म्हंजे ... दुसर्‍या शब्दात - आणि बहिणीसाठी हळूच ९६ कुळीच पाहिजे म्हणतात

या वाक्यात ....

वाघमारे सायबांनी जो इंप्लिसिट आक्षेप घेतलेला आहे तो आक्षेप आक्षेपार्ह आहे.

समाप्त.

अर्थात प्रश्न असल्यास उत्तर देईनच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जोपर्यंत व्यक्ती इतरांवर डायरेक्ट जबरदस्ती करत नाही तोपर्यंत.

डायरेक्ट जबरदस्ती हा फारच सोयीस्कर शब्दप्रयोग वापरता हो तुम्ही. म्हणूनच चायनीज मुलींच्या पायांचं उदाहरण दिलं होतं. तो दबाव जर लहानपणापासून टाकलेला असेल, किंवा भविष्यात वाळीत पडू या भीतीने निर्णय होत असेल तर 'तरुण तरुणींनी मुक्तपणे घेतलेला निर्णय' हे गृहितक नष्ट होतं.

तुम्ही कायद्याने सज्ञान (१८+) आणि सुजाण/मुक्त यात गोंधळ करत आहात असं राहून राहून वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही कायद्याने सज्ञान (१८+) आणि सुजाण/मुक्त यात गोंधळ करत आहात असं राहून राहून वाटतं.

असहमत.

१८+, कायद्याने सज्ञान, सुजाण व मुक्त ह्या चार भिन्न गोष्टी आहेत.

१८+ व्यक्ती ही कायद्याने सज्ञान असेलच असे नाही. मतिमंद १८+ व्यक्ती हे उदाहरण.

सुजाण व्यक्ती ही मुक्त विचार करणारी असेलच असे नाही.

-------

म्हणूनच चायनीज मुलींच्या पायांचं उदाहरण दिलं होतं. तो दबाव जर लहानपणापासून टाकलेला असेल, किंवा भविष्यात वाळीत पडू या भीतीने निर्णय होत असेल तर 'तरुण तरुणींनी मुक्तपणे घेतलेला निर्णय' हे गृहितक नष्ट होतं.

प्रचंड असहमत.

याबद्दल लिहायचे तर ते खरोखर पेडँटिक होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात जाती (किंवा कुठल्याही आधारावर केलेली) सरसकटि करण हि कितपत खरी मानावीत ? वैयक्तिक sample survey हा प्रमाणभूत कसा मानला जाऊ शकतो ? मग बहुसंख्य मराठा पुरोगामी / प्रतिगामी अशी compartments कुठल्या आधारावर केली आहेत ? वाघमारे साहेब उत्तर देतील हि अपेक्षा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

मराठा ही जात कागदोपत्री असणारे लोक महाराष्ट्राच्या नकाशात वेगवेगळ्या ठिकाणी साचलेले दिसतात. असे विविध 'मराठा' लोक एकजिनसी आहेत/नाहीत हे ठरवणे, हे आपल्या वास्तवाच्या पलिकडे असलेल्या परिसराची जुजबी ओळख ठेवणार्‍या प्रत्येकाला करता यावे. ही ओळख प्रस्तुत स्फूटात अनुपस्थित आहे. जात्यंतर्गत उतरंडीवर मोठ्या संख्येने लोक (विशेषतः स्त्रिया) तळाशी असतात. त्यांचे वास्तव कदाचित या स्फूटात पूर्णपणे नाकारलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोण्या जातीचे लोक एका विशिष्ट पॅटर्नने वागतात, त्यातल्या त्यात एका विशिष्ट जातीचे लोक असे जास्त करतात असे लेखकाचे म्हणणे सत्कृतदर्शनी अयोग्य वाटते. समाजाची चिंता सर्व जातीच्या लोकांना समान असते/नसते.

मराठ्यांत आपले राजकीय वर्चस्व आणि पारंपारिक मोठेपणा टिकवून ठेवायची एक वेगळी स्पर्धा लागली आहे. ती जात जवळ आणत आहे पण तिचे कारण बिघडावत आहे.

जातीयतेच्या विळख्यातून बाहेर यायला वेळ लागतो. आपली जातीहिनता आपल्याच समाजाला पटवायलाही वेळ लागतो. तितका वेळ मराठा समाजाला दिला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.