समर जर्नीज - जेजुरी

अरुण कोलटकरांच्या १९७६ साली प्रसिद्ध झालेल्या कवितांवरचा कार्यक्रम एबीसी रेडियोने प्रसारीत केला. कोलटकरांच्या कविता हा एक वेगळाच चर्चा विषय आहे. त्यात उभे राहणारे शब्दचित्र हे काहीवेळा अंगावर येते. तरी त्यांची कविता आजच्या काळातही तेव्हढीच रिलेव्हंट वाटते. पण त्याही पलिकडे जाउन हा कार्यक्रम ज्या पद्धतीने 'रचला' आहे ते निराळे वाटले. संगीत आणि शब्द यांचे एक कोलाज बनवले आहे. प्रामुख्याने त्यातील संगीताचे मिश्रण आणि निवडलेल्या कविता. अरविंद मेहरोत्रा यांची यात मुलाखत सदृष निवेदन आहे. त्यात कोलटकरांविषयी ते बोलतात. मते पटलीच पाहिजेत असे नाहीच पण ज्या पद्धतीने ती मांडली जातात ते रोचक आहे.
अर्थातच कवितांचे वाचन सुंदर आहे.

त्याचा पॉडकास्ट उपलब्ध आहे.
दुवा: http://www.abc.net.au/radionational/programs/poetica/jejuri/4809574

पुस्तकाविषयी:
http://www.nybooks.com/books/imprints/classics/jejuri/

कोलटकरांचे विकिपानः
https://mr.wikipedia.org/wiki/अरुण_कोलटकर

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

दुव्याबद्दल धन्यवाद. ऐकते आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0