विश्वरत्न महात्मा गांधी ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली


दे दि हमे आझादी बीना खड्ग बीना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल..


अशी व्यक्ती ह्या भूलोकावर होवून गेली ह्यावर पुढील पिढीचा विश्वासहीबसणारनाही.-आइनस्टाइन.

महात्मा गांधी आज ह्या महात्म्याच्या निर्घुण खुनाला ६६ वर्ष होवून गेली. ७९वर्षाच्या वृद्ध व्यक्तीवर क्रूरपणे गोळ्या झाडून एका माथेफिरूने त्यांच्या जीवनाची अखेरकेली. परंतु तो एक विसरला कि गांधीना मारले म्हणजे फक्त त्यांचे शरीर नष्ट झाले त्यांचे विचार जे जगभरात अमर झालेत त्यांचा नाश कोणीही करू शकणार नाही.

जग भारताला गौतम बुद्धांचा नि महात्मा गांधीजींचा देश म्हणूनआज ओळखते. गांधीजींचा खून होवून ६६ वर्षे झालीत पण त्यांची विचारधारा मात्र अमर आहे. गांधीजी सारखे व्यक्तिमत्व भारतात जन्माला आले हे आपल्या देशाचे भाग्यच.

नेल्सन मंडेला ह्यांनी गांधीजींच्या विचारापासून प्रेरणा घेतली होती.शक्तिशाली अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा गांधीजींना गुरुस्थानी मानतो, चीनच्या शालेय अभ्यासक्रमातही गांधी शिकवला जातो. ह्यातच गांधीजींची थोरवीदिसून येते.

साऱ्या जगावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना भारतात ह्या महात्म्याने आपल्या निशस्त्र चळवळीने सळो कि पळो करून सोडले होते. इंग्रजांना जर पराजित करायचे असेल तर सशस्त्र लढा हा कामाचा नाही हे वास्तव गांधीजींनी ओळखलेहोते. इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी निशस्त्र आंदोलनाचा असा मार्ग शोधून काढला कि सारे जग अचंबित झाले .

रवींद्रनाथ टागोर ह्यांनी गांधीजींचा उल्लेख सर्वप्रथम महात्मा म्हणून केला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.

महात्मा गांधीमुळे स्वातंत्र्याचा लढा हे जनआंदोलन बनले.जनता गांधीजींच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेवू लागली हे त्यांच्या चळवळीचे मोठेच यश होते.

गांधीजींना नोबेल पारितोषिक मिळाले नाही जर ते मिळाले असते तरनक्कीच तो त्या पुरस्काराचा सन्मान झाला असता गांधीजींचा नाही.कारण गांधीजीं सारखे व्यक्तिमत्व हे हजारो वर्षातून एकदा जन्म घेते.गांधीजींच्या विचारातच अशी काही जादू आहे कि आजच्या पिढीलाही त्यांचे विचार रुचतात .कालातीत असे ह्या महात्म्याचे विचार आहेत.

स्वातंत्रासाठी जो महासंग्राम लढला गेला त्याचे नेतृत्व ह्या महात्म्याने केले अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिशांना केलेला प्रतिकार हा ह्या लढयातील सर्वोच्च बिंदू ठरला नि साऱ्या भारताने गांधीजींना राष्ट्रपिता मानले.

गांधीजी हे धार्मिक होते पण धर्मांध नव्हते आज जगात पसरत चाललेला हिंसाचार, बोकाळलेलाभ्रष्टाचार, धार्मिक दहशतवाद ह्यांना उत्तर फक्त गांधीजी नि बुद्धांच्या विचारात मिळू शकते.

आज गांधीजींच्या खुनाला ६६ वर्षे झालीत त्यांच्या कार्याला,विचारांना सादर प्रणाम.

विश्वरत्न महात्मा गांधी ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रतिक्रिया

जग भारताला गौतम बुद्धांचा नि महात्मा गांधीजींचा देश म्हणूनआज ओळखते

हे वाक्य "आपण आणी सानेगुरुजी माझे आदर्श लेखक आहात" यासारखे वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्यातर्फे एक मार्मिक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धागा काढलाच आहेत तर आज पाहिलेलं एक कार्टून इथे जोडून देते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गांधीजी हे धार्मिक होते पण धर्मांध नव्हते आज जगात पसरत चाललेला हिंसाचार, बोकाळलेलाभ्रष्टाचार, धार्मिक दहशतवाद ह्यांना उत्तर फक्त गांधीजी नि बुद्धांच्या विचारात मिळू शकते.

गांधींचा किंवा गौतम बुद्धांचा नेमका कोणता विचार असा आहे जो -

१) सरकारने आचरणात आणला तर धार्मिक दहशतवाद कमी होऊ शकतो ? संपू शकतो ? सरकारने नेमकी कोणती कृती केली म्हंजे धार्मिक दहशतवाद कमी होईल ?
२) गेल्या दहा वर्षात सरकारने ही कृती केली का ? केली असल्यास मी व्हेरिफाय कशी करू की खरोखर ही कृति सरकारने केली ? मोजदाद करता येण्याजोगी कृती आहे का ही ?
३) व तिचा परिणाम काय झाला ?
४) हा परिणाम पुरेसा आहे का ?

----

खालील उत्तरे अपेक्षित नाहीत - (ही उत्तरे का अपेक्षित नाहीत ते लिहु का ?)

१) सरकारने गांधींच्या विचारांवर आधारित कृती केली नसती तर धार्मिक दहशतवाद आणखी झाला असता. सरकारने ही कृती (जी काही कृती केली ती) गुप्तपणे केली म्हणून दहशतवाद आटोक्यात आहे. व सरकार ही कृती काय व कशी केली ते गुप्त राखते. त्यामुळे ते व्हेरिफाय करता येत नाही.
२) भाजपा कडे कोणता कार्यक्रम आहे धार्मिक दहशतवाद कमी/नाहीसा करण्याचा ?
३) गांधींच्या विचारांना विरोध करण्याची फॅशन झालेली आहे.
४) गब्बर हे हिंदुत्ववादी दिसतात
५) गांधी व बुद्ध यांच्या विचारांमधे फरक नाहियेच मुळी.
६) गांधींचे विचार आपण सर्वांनी आचरणात आणण्याचे आहेत. फक्त सरकारने नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता तुम्ही विचारताय म्हणून

१) सरकारने आचरणात आणला तर धार्मिक दहशतवाद कमी होऊ शकतो ? संपू शकतो ? सरकारने नेमकी कोणती कृती केली म्हंजे धार्मिक दहशतवाद कमी होईल ?

माझा एक मित्र म्हणतो सरकारने गांधीजींच्या मताप्रमाणेव काँग्रेस बरखास्त केली तर देशातले बहुतांश प्रश्न सुटतील. ये धार्मिक दहशतवाद तो किस झाड की पत्ती

२) गेल्या दहा वर्षात सरकारने ही कृती केली का ? केली असल्यास मी व्हेरिफाय कशी करू की खरोखर ही कृति सरकारने केली ? मोजदाद करता येण्याजोगी कृती आहे का ही ?

नाही ना. अजूनही काँग्रेस बरखास्त झालेली नाही. त्यामुळेच तर प्रॉब्लेम्स चालु आहेत. Blum 3

३) व तिचा परिणाम काय झाला?
४) हा परिणाम पुरेसा आहे का

सरकारने क्रिया केलेलीच नाहिये त्यामुळे प्रश्न गैरलागू Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Gandhi: Naked Ambition हे पुस्तक वाचा. गांधींच्या सत्याच्या "प्रयोगां"बाबत छान माहिती आहे.

Gandhi Naked Ambition: The Truth about Gandhi’s Sex Life, Thrill of the Chaste

Gandhi: Naked Ambition’ written by famous historian Jad Adams will cause a
lot of swirl in the public and media. It is unbelievable to learn that Gandhi slept
and bathed with young girls.

Gandhi’s Sex Life Examined naked with naked nubile women to test his
chastity, the pre-independence prime minister of the Indian state of
Travancore called him, “a most dangerous, semi-repressed sex maniac”?
Much of this material was known during his lifetime, but was distorted or
suppressed after his death during the process of elevating Gandhi into the
“Father of the Nation” Was the Mahatma.

Gandhi Slept and Bathed With Young Girls
With religious chastity under scrutiny, a new book throws light on Gandhi’s
practice of sleeping next to naked girls. In fact, he was sex-mad, writes
biographer Jad Adams.

Gandhi was born in the Indian state of Gujarat and married at 13 in 1883; his wife Kasturba was 14, not early by the standards of Gujarat at that time. The young couple had a normal sex life, sharing a bed in a separate room in his family home, and Kasturba was soon pregnant.

However, Gandhi and Kasturba’s last child wasn’t born until fifteen years later, in 1900.
But was there something more complex than a pious plea for chastity at play in Gandhi’s beliefs, preaching has and evens his unusual personal practices (which included, alongside his famed chastity, sleeping naked next to nubile, naked women to test his restraint)? In the course of researching my new book on Gandhi, going through a hundred volumes of his complete works and many tomes of eye-witness material, details became apparent which add up to a more bizarre sexual history.

It was no secret that Mohandas Gandhi had an unusual sex life. He spoke constantly of sex and gave detailed, often provocative, instructions to his followers as to how to they might best observe chastity. In fact, Gandhi did not develop his censorious attitude to sex (and certainly not to marital sex) until he was in his 30s, while a volunteer in the ambulance corps, assisting the British Empire in its wars in Southern Africa.

On long marches in sparsely populated land in the Boer War and the Zulu uprisings, Gandhi considered how he could best “give service” to humanity and decided it must be by embracing poverty and chastity. At the age of 38, in 1906, he took a vow of brahmacharya, which meant living a spiritual life but is normally referred to as chastity, without which Hindus deem such a life impossible. Mohandas (not Mahatma) Gandhi’s Failed Leadership in Politics and Gandhi’s Domestic Violence and weird Sexual Perversion in his private life. If Gandhi was alive today, he would be arrested for sexual abuse and put away for life as a sexual offender.

“We know from his autobiography how shamefully he treated his wife. He was transparently honest and he had much less to hide from anyone else. Nothing can be found if other public figures are to be scrutinized because things have been carefully hidden and suppressed.” - Gandhi, the family man. Gandhi’s Grandson.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गांधीच्या "ह्या" प्रयोगांबद्दल इतरांनी काय लिहिले आहे (काहीतरी नवा शोध लावल्यागत) ते वाचण्याची गरज नसावी कारण स्वतः गांधींनीच त्याबद्दल लिहून ठेवले आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते ही अत्यंत त्रोटक आणि फार काही न कळेल असे. ह्या पुस्तकात मात्र साद्यंत वर्णन आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ठीके. पण त्या माणसात प्रामाणिकपणा होता, लपवा-छपवी नव्हती, हेच सांगायचे होते.

तुमचे चालू द्या!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या माणसात प्रामाणिकपणा होता, लपवा-छपवी नव्हती>>
मी तेच म्हणतोय. आत्मचरित्रात व्यवस्थित लपवाछपवी केली आहे. टोटली डिजगस्टिंग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बोचरे सत्य सांगितले तर भडकाऊ श्रेणी. गंमतच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मो.क.गांधी यांना श्रद्धांजली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सामाजिक संकेतांच्या बाहेर जाऊन (आज असे) म्हटल्यासारखे होईल पण गांधीजी मला आवडत नाहीत. ते फक्त समाज सुधारक म्हणून जगले मेले असते तर माझी काय प्रतिक्रिया राहिली असती माहिती नाही, पण राजकारणात तरी या माणसामुळे देशाचा तोटा झाला. गांधीजी स्वतः अप्रामाणिक होते वा स्वतःशी अप्रामाणिक होते असे नाही मानले तरी त्यांची शैली, निर्णय मला चीड आणणारे वाटतात.

गांधीजी आणि त्यांच्या काळात त्यांना मानणारे लोक यांना कदाचित मी इतकं महत्त्व दिलं नसतं. पण आजही या माणसाची इतकी व्यक्तिपूजा होते ते पाहून चीड येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>राजकारणात तरी या माणसामुळे देशाचा तोटा झाला.

यावर अधिक खुलासा झाला तर आवडेल. म्हणजे नेमक्या कोणत्या बाबीत तोटा झाला असे तुम्हाला वाटते ते कळण्याची इच्छा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

१. काँग्रेस बर्‍याच नेत्यांनी बर्‍याचदा सोडली. बर्‍याच नेत्यांनी कायमची सोडली. देशाचे प्रतिनिधित्व करणार्‍या पक्षाचे आपल्या एककल्ली वागण्याने नुकसान केले.
२. भारताची फाळणी झाली. गांधीजींना मुसलमानांचे नेतृत्व करता आले नाही.
३. हिंदी भारताची राष्ट्रभाषा झाली नाही. आज सगळा देश इंग्रजीत चालतो.
४. योग्य वेळी दलितांना आरक्षण मिळाले नाही.
५. सत्ता विकेंद्रित ठेवली नाही. गांधी म्हणजे काँग्रेस. आजही हीच सवय आहे.
६. असहकार, अहिंसा यांचा आज भारताला काहीच उपयोग नाही. (इतरही देशांनाही नाही, कुठे अहिंसेने दुसरा देश स्वतंत्र झाल्याचे ऐकवत नाही) तेव्हा झाला असे म्हणावे तर ज्यांच्याकडे गांधीवाद नव्हता असे सारे देश त्यांच्याशिवाय स्वतंत्र झाले. मग गांधींना नेता मानण्याचा देशाला नक्की फायदा झाला (स्वातंत्र्य मिळण्यासाठी) का हे कळत नाही.
७. फाळणीची हाताळणी गाढवी पद्धतीने झाली. किमान भारत आणि पाकिस्तानात (इतके) वैर आणि भांडायचे मुद्दे नसायला हवे होते.
८. स्वातंत्र्य अनियोजनबद्ध पद्धतीने राबवले गेले. देश मिळाल्यावर तो कसा खावा याची फारशी चर्चा झाली नाही.
८.१ राज्यपद्धतीचे चयन
८.२ सरकारची कर्तव्ये, प्राधान्ये
८.३ सरकारी संस्था
८.४ सरकारची कर्त्यव्यांची अंमलबजावणी
९. गाधीजींची (आणि नेहरुंची ही) आर्थिक विचारसरणी विचित्र होती. त्याचा प्रचंड तोटा देशाला आज होतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१. गांधीच्या हयातीत काँग्रेस किती मुख्य नेत्यांनी सोडली? सुभाष बोस आणि जीना. असे वाटते. या दोघांनी काँग्रेस सोडली होती याबाबत खात्री नाही) .बाकी १९४८ नंतर काँग्रेस सोडणार्‍या नेत्यांबद्दल गांधींना जवाबदार धरावे का? ज्यांनी काँग्रेस सोडली त्याबद्दल गांधींना दोषी धरावे का?

२. याबद्दल दुमत आहे.

३. याचा गांधींशी काय संबंध?

४. कदाचित व्हॅलिड आहे.

५. ही वॉज ऑल फॉर विकेंद्रिकरण- ग्रामस्वराज्य अ‍ॅण्ड ऑल. गांधी म्हणजे काँग्रेस यातले गांधीज वेगळे आहेत.

६. जसे (केवळ) अहिंसेने कोणाला स्वातंत्र्य मिळाले नाही तसेच (बाह्य मदतीशिवाय) सशस्त्र लढा करून (अलिकडे) कोणाला स्वातंत्र्य मिळाल्याचे ज्ञात नाही.

७. यातही गांधींचा काही संबंध वाटत नाही.

८. (उपकलमांसह) स्वातंत्र्य मिळाल्यावर पाच महिन्यांनी गांधींचा मृत्यू झाला. घटना आणखी अडीच वर्षांनी तयार झाली. घटना समितीची बहुतांश डेलिबरेशन्स झाली असतील तेव्हा गांधी हयात नव्हते.

९. गांधींच्या आर्थिक विचारसरणीतलं (खादी ग्रामोद्योग ग्रामस्वराज्य) काहीच देशाने स्वीकारलं/अंमलात आणलं नाही. नेहरूंच्या आर्थिक विचारसरणीची* चर्चा इथे नको.

*नेहरूंच्या विचारसरणीवर टीका करतानाच तत्कालीन देशी उद्योजकांची कल्पना काय होती ते पाहणे रोचक ठरेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला गाधीजींचा केजरीवाल करायची इच्छा नाही म्हणून रजा घेतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२. भारताची फाळणी झाली. गांधीजींना मुसलमानांचे नेतृत्व करता आले नाही.

सहमत.

मागे, संजय दत्त वर खटला चालू असताना ते सरकारी वकील म्हणाले होते की "संजय दत्त ने जर मनात आणले असते तर तो मुंबईतील बॉम्बस्फोट रोखू शकला असता.".

त्याच धर्तीवर बोलतो - गांधींनी जर मनात आणले असते तर त्यांना कदाचित फाळणी टाळता आली असती. इंग्रजांशी लढताना अहिंसातत्व यशस्वी ठरले असेलही. पण फाळणीच्या दरम्यान अहिंसा तत्वाची जी पायमल्ली झाली ती रोखता यायला हवी होती.

संभाव्य आक्षेप -
१) गब्बर unwittingly, संजय दत्त व गांधींची तुलना करतोय.
२) गब्बर सारख्या खलपुरुषाने गांधींच्या चुका काढाव्यात ??? काय दिवस आलेत ???
३) अहिंसा समजलीच नाही, गब्बरला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संभाव्य आक्षेप -
१) गब्बर unwittingly, संजय दत्त व गांधींची तुलना करतोय.
२) गब्बर सारख्या खलपुरुषाने गांधींच्या चुका काढाव्यात ??? काय दिवस आलेत ???
३) अहिंसा समजलीच नाही, गब्बरला.>>>>>>>>>>>>

सहमत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सचिनभाऊ, तुमचा हा प्रतिसाद समजला नाही.

तुम्ही सहमत नेमके कशाशी आहात ? तुम्हास नेमके काय म्हणायचे आहे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला एक प्रश्न बरेच दिवस आहे.
फाळणी होताच झालेल्या दंगली वगळता झाल्याने नक्की काय वाईट झाले?
मुळात फाळणी का रोखायला हवी होती? त्याने काय फरक पडला असता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

देशाची अखंडिता अबाधित राखणे याच उद्देशाने रोखायला हवी होती (कोणत्याही देशाचे रॅण्डमली तुकडे का होऊ नयेत अशा जनरल प्रश्नाचे जे उत्तर असेल तेच). हिंदू व मुस्लिम असे दोन स्वतंत्र देश असायची गरज नाही असे काँग्रेसचे मत होते (म्हणून विरोध). याबाबतीत खरे तर उलटा प्रश्न विचारायला हवा, की फाळणी करायला का हवी होती, त्याने काय फायदा झाला, कारण स्टेटस को स्थिती म्हणजे अखंड भारत होता. फाळणीनंतर पाक मधे जे झाले आहे त्याने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र सुद्धा एकत्र राहू शकत नाही हे सिद्ध झाले (बांगलादेश हे मोठे प्रूफ. वायव्य सरहद्द मधला भाग, बलुचिस्तान मधले फुटीर हे आणखी एक ***). तसेच तेथील मुस्लिम लोक भारतात राहिले असते तर आता जास्त चांगल्या अवस्थेत असले असते (स्वातंत्र्य, मूलभूत हक्क, एकूण संधी).
अखंड भारताच्या दृष्टीने एक कायमचा डोक्याला ताप राहिला नसता.

*** भारतातही फुटीरवादी चळवळी आहेत असा याला विरोधी मुद्दा निघू शकतो. पण भारत मुळातच अठरापगड गोष्टींचे गाठोडे असून हे जास्त काळ एकत्र टिकणार नाही अशा वल्गना १९४७ पासून होत होत्या, त्यादृष्टीने भारताने "डूमसेयर्स" ना बर्‍याच प्रमाणात खोटे ठरवले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिप्रश्न म्हणजे उत्तर नव्हे! पण आता प्रतिप्रश्न हे उत्तर म्हणून तुम्हाला मान्य आहे तर...
मुळात अखंड भारत म्हणजे काय? त्याच्या तुम्हाला अपेक्षित आहेत त्याच सीमा का?
इराण, ब्रह्मदेश झालेच तर कंबोडीया, लाओ, इंडोनेशिया त्यात का येत नाही?

तुम्ही वरच्याचे उत्तर दिल्यावर आगामी प्रश्नः
जमीन एकत्रित असणे म्हणजे देश 'अखंड' झाला का? मने जुळणे किती महत्त्वाचे आहे?
सध्या भारतीय संघराज्य तरी एकत्र - अखंड आहे का? काश्मिर खोर्‍याचा काही भाग, काही पुर्वोत्तर राज्ये, काही नक्षलवादग्रस्त जंगले/गावे या जमिनी भारताच्या अखत्यारीत आहेत, मात्र तेथील व्यक्ती भारताला आपले मानतात का? (व व्हायसे वर्सा?) नसल्यास भारताच्या अंमलाखाली केवळ जमिन अखंड ठेऊन काय मिळाले असते? का पाकीस्तान-बांग्लादेश प्रमाणे सो-कॉल्ड-अखंड भारताचेही कधी ना कधी विभाजन अटळ होते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरे पण पोस्ट मधे फक्त प्रतिप्रश्न नव्हता, त्याआधी उत्तरही दिले होते की. ते पटण्यासारखे नसेल तर समजू शकतो. पण केवळ प्रतिप्रश्न नाही हे तर मान्य आहे ना?

देशाची अखंडिता अबाधित राखणे याच उद्देशाने रोखायला हवी होती (कोणत्याही देशाचे रॅण्डमली तुकडे का होऊ नयेत अशा जनरल प्रश्नाचे जे उत्तर असेल तेच). हिंदू व मुस्लिम असे दोन स्वतंत्र देश असायची गरज नाही असे काँग्रेसचे मत होते (म्हणून विरोध). >>> हे उत्तर होते. ते अपूर्ण किंवा न पटण्यासारखे असू शकेल, त्याबद्दल काही वाद नाही.

आता 'अखंड भारत' चा अर्थ या संदर्भात असा - की स्वातंत्र्य मिळवण्याकरिता जे प्रयत्न चालू होते त्यात सर्वांचा आपल्याला जी भूमी मिळणार होती त्याच्या ज्या सीमा होत्या त्या अर्थाने. त्यामुळे इंडोनेशिया, कंबोडिया ई. त्यात येत नाहीत. किंवा उलट अर्थाने भारत+पश्चिम पाक्+पूर्व पाक या अर्थाने (सिक्कीम,गोवा ई त्यात नसेल तेव्हा कदाचित).

अजून एक आधीच्या पोस्ट मधे लिहायचे राहिले - ज्या कुटुंबांना आपले घर, जमीन सोडून दुसरीकडे जावे लागले त्यांच्या दृष्टीने तात्कालिक दंगलीचे परिणाम भीषण तर होतेच पण पुढचे आयुष्यही पुन्हा नव्याने सुरू करायचे होते. त्या कुटुंबांवर ही वेळ आली नसती, जर फाळणी झाली नसती.

'आगामी' प्रश्नाबद्दल स्वतंत्र उत्तर देतो. मात्र फाळणीबाबत - पाक मधे गेलेल्या सर्वांना मुळात भारतात राहायचे नव्हते असे मला वाटत नाही. त्या भूभागात जे मुस्लिम होते ते तेथेच राहिले (त्यांना पाक मधे जाण्यासाठी विशेष काही करावे लागले नाही व फाळणीची झळही बहुधा लागली नसावी). बाकी भारतातून बरेच मुस्लिम गेले त्यात स्वतःहून गेलेले व दंगलींमुळे गेलेले असे दोन्ही प्रकार असतील. फाळणी हा एक राजकीय बदल होता (धार्मिक नव्हे) असे म्हणतात ते मला पटते. बाकी आता भारतात राहून भारताला स्वतःचा देश न मानणारे असतील तरी त्यांची जमीन भारतातच ठेवणे हे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे (ते लोक देश सोडून गेले तरी त्यांना कोणी रोखणार नाही). असे छोटे मोठे स्वतंत्र देश आतल्या आत होउ लागले तर जो धोका निर्माण होईल त्यावर भारताचे नियंत्रण राहणार नाही. त्यापेक्षा अशा फुटीर शक्तींशी "अंतर्गत मामला" म्हणून लढणे जास्त सोपे आहे. या कारणासाठी तुकडे होऊ न देणे महत्त्वाचे.
कदाचित यापेक्षा महत्त्वाचे काही कारण असेल, मला आत्ता जे सुचले ते लिहीले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

की स्वातंत्र्य मिळवण्याकरिता जे प्रयत्न चालू होते त्यात सर्वांचा आपल्याला जी भूमी मिळणार होती त्याच्या ज्या सीमा होत्या त्या अर्थाने.

ओक्के. हे तुमचे मत असावे. कारण मला प्रत्येकाच्या अखंड भारताचे चित्र वेग-वेगळे आहे.
काही नमुने:

इतकेच नाही तर भाजपासकट अनेकपक्षांच्या मते तर भारत सध्याचाच 'अखंड' आहे (आणि त्या अखंड भारताचे निर्माते सरदार पटेल आहेत). नक्की अखंड भारत कोणता व कशास म्हणावे ते एकदा ठरवा बॉ मग तो न झाल्याबद्द्ल गांधीजींना दोष द्यावा का ते बघु!

सिक्कीम,गोवा ई त्यात नसेल तेव्हा कदाचित

हम्म मग हे प्रदेश (तथाकथित) अखंड भारतात नसूनही नंतर भारतात समाविष्ट करून घेणे तुमच्यामते योग्य का अयोग्य?

ज्या कुटुंबांना आपले घर, जमीन सोडून दुसरीकडे जावे लागले त्यांच्या दृष्टीने तात्कालिक दंगलीचे परिणाम भीषण तर होतेच पण पुढचे आयुष्यही पुन्हा नव्याने सुरू करायचे होते. त्या कुटुंबांवर ही वेळ आली नसती, जर फाळणी झाली नसती

हे मान्य आहेच आणि हे पहिल्याच/मुळ प्रतिसादात स्पष्ट केले आहे.

अशा फुटीर शक्तींशी "अंतर्गत मामला" म्हणून लढणे जास्त सोपे आहे. या कारणासाठी तुकडे होऊ न देणे महत्त्वाचे.

माझे मत याच्या विपरीत आहे, बाहेरचा/समोरासमोर लढणार्‍या शत्रुशी कसे लढावे हे एक तंत्रशुद्ध शास्त्र झाले आहे, माणूस कित्येक वर्षे असे लढत आला आहे. "अंतर्गत मामला"च सोडवणे कठीण आहे.

या कारणासाठी तुकडे होऊ न देणे महत्त्वाचे

समजा तुकडे झाले नसते तर आपल्यावर बाह्य आक्रमण झालेच नसते याची इतकी खात्री कशी काय? याला आधार काय?

माझे मतः
फाळणी ही एक अपरिहार्य राजकीय गरज होती. ही घटना थांबवणे जर कधी शक्य होते तर त्याची बीजे १८५७ नंतर व टिळकांच्या उदयापूर्वीच्या काळातच रुजायला हवी होती, तेव्हा तसे काहीच झाले नाही! उलट गांधींजींच्या राजकारणात इतक्या वर येण्याने हा प्रश्न शक्य तितका लांबला, जमावाला धार्मिक कारणाने भडकवणे त्या त्या नेत्यांना कठीण होऊन बसले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

न च शक्नोमि अवस्थातुम भ्रमतिव च मे मनः

(म्हंजे असं की ..... मनोबा कुठे भ्रमंति करतोय कोण जाणे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुरुंदकरांच्या म्हणण्याप्रमाणे खिलाफत पासून पुढचा सर्व काळ गांधींची + काँग्रेसची पॉलिसी मुस्लिमांना धर्माधारित काहीही न देण्याची होती. टिळकांबरोबर झालेला राखीव मतदारसंघांचा करार हा काँग्रेसतर्फे मुस्लिमांना शेवटचा देकार होता.

काँग्रेस + गांधी लखनौ कराराच्या पुढे जायला तयार नाहीत म्हणून फाळणी झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आणि इफ आयॅम नॉट राँग, शेषराव मोरेही थोड्याफार फरकाने असेच म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे मत मलाही बर्‍यापैकी पटते. (अर्थात माझ्या पटण्याला कुरूंदकरांइतके सोडाच जराही कोणी विचारत नाही ही बाब अलाहिदा) Wink
अर्थात धर्माधिष्ठित काही देण्याचे काम टिळकांच्या काळात झाले त्यामुळे या अपेक्षांचे बीजही रोवले गेलेच (म्हणूनच त्या आधीचा काळ महत्त्वाचा म्हटला आहे). त्यामुळे फाळणीला मुळात कोणा एकाला जबाबदार धरता येईल (किंवा काहींच्या दृष्टीने श्रेय देता येईल) असे वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

(माहिती एकत्र ठेवण्यासाठी म्हणून हा प्रतिसाद.)

सदानंद मोरे यांचंही मत हेच आहे. त्यांच्या 'लोकमान्य ते महात्मा' या खंडांमधे हे मत अनेक ठिकाणी दिसतं, आणि त्यांनी त्यासाठी काही तत्कालिन लेखन, पुरावेही दिलेले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जमेल तसे एकेका प्रश्नाचे उत्तर देतो.
अखंड भारत - याच्या इतर वाख्यांच्या संदर्भात मी उल्लेख केलेला नाही. माझ्या पोस्टच्या संदर्भात फक्त "फाळणीपूर्व भारत" किंवा फाळणी झाली नसती तर जसा भारत असला असता तसा, अशा अर्थाने घ्यावा.
नक्की अखंड भारत कोणता व कशास म्हणावे ते एकदा ठरवा बॉ मग तो न झाल्याबद्द्ल गांधीजींना दोष द्यावा का ते बघु!>>> मी गांधींबद्दल काहीच अजून लिहीलेले नाही. फक्त फाळणीबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करत होतो. यातून माझे याबद्दल काही मत मी लिहीले असावे असे ध्वनित होत आहे.

माझे मत याच्या विपरीत आहे, बाहेरचा/समोरासमोर लढणार्‍या शत्रुशी कसे लढावे हे एक तंत्रशुद्ध शास्त्र झाले आहे,>>> शक्य आहे, पण तरीही माझ्या मते पण त्यामुळे तसे लढणे सोपे होत नाही. एका स्वतंत्र देशाला अनेक पर्याय उभे राहतात, जे अंतर्गत लोकांना नसतात. तुझे मत उलट आहे हे कळले, अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री.

फाळणी ही एक अपरिहार्य राजकीय गरज होती. ही घटना थांबवणे जर कधी शक्य होते तर त्याची बीजे १८५७ नंतर व टिळकांच्या उदयापूर्वीच्या काळातच रुजायला हवी होती, तेव्हा तसे काहीच झाले नाही! उलट गांधींजींच्या राजकारणात इतक्या वर येण्याने हा प्रश्न शक्य तितका लांबला, जमावाला धार्मिक कारणाने भडकवणे त्या त्या नेत्यांना कठीण होऊन बसले. >>> सहमत नाही. साधारण १९३५ पर्यंत भारतात फाळणीला फारशी सहमती नव्हती. मुस्लिम बहुसंख्य प्रांतही काँग्रेसबरोबरच होते. हे नंतरचे भूत आहे.

नोटः माझी पोस्ट फक्त फाळणी बद्दल होती. त्याचा दोष गांधी किंवा इतर कोणाकडे जातो की नाही याबद्दल मी अजून काहीच म्हंटलेले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>मात्र तेथील व्यक्ती भारताला आपले मानतात का? (व व्हायसे वर्सा?) नसल्यास भारताच्या अंमलाखाली केवळ जमिन अखंड ठेऊन काय मिळाले असते?

याविषयी शंकाच आहे. म्हणजे अरुणाचल हा "आमचा" प्रदेश आहे. त्यात चीनने घुसखोरी केली तर आम्हाला राग येणारच. बाकी अरुणाचलमधल्या (किंवा इतर सीमावर्ती राज्यातील) लोकांशी आम्हाला तसे काही घेणे देणे नाही. अशी एकूण भारतीयांची भावना आहे/असावी असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हेच म्हणतोय मी. म्हणण्यात काही चुकलेय का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चुकले नाही.

मी तोच मुद्दा वेगळ्या प्रकारे (एक्झॅक्टली भारतीय लोक कसा विचार करत असतील अशा प्रकारे) मांडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हा दुवा "ही बातमी समजली का?" मध्ये टाकणार होतो. पण वाटते, इथे अधिक चपखल बसेल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारत पाकची तीन चार युद्धे विसरलात वाटतं. अजूनही दोन देश एकमेकांवर अणूबॉम्ब टाकायची शक्यता शून्य नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमच्या कल्पनेतील (रम्य वैग्रे) अखंड भारताचे आपल्या कोणत्याही शेजार्‍याशी युद्ध झाले नसते असा तुमचा दावा आहे की काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दोन कंपन्या मर्ज कराव्यात असा प्रस्ताव मी बोर्डातला एक डायरेक्टर म्हणून मांडला असताना 'मर्ज करून तुम्ही तिसर्‍या कंपनीकडून स्पर्धा होणार नाही याची शाश्वती देता काय' असा विरोध करणारे आपण दुसरे एक डायरेक्टर वाटता.

मी एक प्रकारचे लोक पाहतो. त्यांना हिंदू धर्मच मान्य नाही. मान्य नाही म्हणजे त्याचं काही राजकीय महत्त्वच नाही असं मानणं. म्हणून त्यांना भारत हा राजकीय आधार नसलेले कडबोळे वाटते. अशा लोकांना फाळणीपूर्वीचा पंजाब, फाळणीपूर्वीचा बंगाल, आजची त्यांची स्वतःचे सोडून भारताची इतर राज्ये यांच्याबद्दल (तिघांबद्दल) समान प्रेम असते. कारण पंजाबची फाळणी झाली काय आणि केरळची झाली काय, त्यांची आर्ग्युमेंट चपलख बसते.

समजा महाराष्ट्र पाकिस्तानात असता, हिंदू ॠषिकेश मराठी असते आणि तिथे राहणारे आणि मुस्लिम म्हणून कन्व्हर्ट झालेले असते, तिथे राहणारे आणि हिंदू म्हणून जगणारे असते आणि इतर भारतात विस्थापित झालेले असते तर त्यांची या तिन्ही केस मधे फाळणीबद्दल त्यांचे काय मत राहिले असते? जर काहिच फरक पडला नसता तर आज बेंबीच्या देठापासून पाकिस्तानात जायला मागणार्‍या बहुतांश कश्मिरच्या लोकांना जाऊ दिले पाहिजे, काश्मिर पाकला दिला पाहिजे असे त्यांचे मत आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माझ्या आयुष्यातील प्रत्येक घटना जशी घडली तशी घडली नसती तर मी सध्या आहे तसा नसतो. त्यामुळे मी पाकिस्तानात वगैरे जन्मलो असतो तर वगैरे हायपोथेटिकल प्रश्न झाले त्याचे उत्तर मी तरी द्यायला असमर्थ आहे अर्थात त्याबद्दल तुम्ही काहीही मत बनवायला मोकळे आहात.

काश्मिरखोर्‍याबद्दल माझे मत पुरेसे स्पष्ट आहे. व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी न करता जर तो प्रदेश आपल्या कह्यात ठेवणे शक्य असेल तर तसे करावे, अन्यथा तिथुन दोन्ही देशांनी सैन्य हटवून सार्वमत घ्यावे. (पाक व भारतव्याप्त अशा दोन्ही भागांत ते घ्यावे व भारतात जायचे आहे, पाकिस्तानात जायचे आहे वा स्वतंत्र व्हायचे आहे हे तीनही पर्याय ठेवावेत). जम्मु व भारतव्याप्त लडाख या भागातील नागरीकांचा भारताचा भाग असण्याबद्दल तक्रार नसावी असा कयास आहे त्यामुळे त्या भागांना मी भारताचा भागच समजतो.

बाकी अजुनही तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्यामुळे मी पाकिस्तानात वगैरे जन्मलो असतो तर वगैरे हायपोथेटिकल प्रश्न झाले त्याचे उत्तर मी तरी द्यायला असमर्थ आहे

अशी उत्तरे टाळण्यास माया पातळ असणे म्हणतात.

आणि मी तुम्ही पाकिस्तानात जन्मला असतात तर असा प्रश्न विचारला नाही. महाराष्ट्र पाकिस्तान असता तर असा विचारला आहे.

फाळणीचा मी का विरोध करतो? कारण नेहरूंसारखे, गांधींसारखे अजून चार षंढ असते तर मी आज पाकिस्तानी असतो. निजामाला हैद्राबाद संस्थान दक्षिण पाकिस्तान बनवायचे होते. आमचे (लातूर आणि) उस्मानाबाद जिल्हे निजामाखाली होते. माझ्या आईचे आजोबा रजाकारांची गोळी लागून मेले. त्या भावंडांनी संस्थानाविरुद्ध भारत सरकारला साथ दिली.
म्हणून
१. दक्षिण पाकिस्तानात मुसलमान म्हणून धर्मांतरीत होणे आणि राहणे
२. दक्षिण पाकिस्तानात पिडित हिंदू मायनॉरिटी म्हणून राहणे.
३. इतर भारतात विस्थापित म्हणून राहणे

हे तिन्ही पर्याय आज मागे वळून पाहताना मला अतिशय अपमानजन्य वाटतात. त्याच न्यायाने मी बलोच, सिंध, पंजाब, बंगालच्या विस्थापित हिंदूंकडे आणि आजच्या भारतातून जबरदस्तीने पाकिस्तानात पाठवलेल्या नागरीकांकडे पाहतो. गांधीजी मुसलमानांचे नेतृत्व करू शकले नाहीत हा त्यांचा सर्वात मोठा अवगुण/ अपयश आहे.

तिथुन दोन्ही देशांनी सैन्य हटवून सार्वमत घ्यावे

काश्मीरात सार्वमत घ्यायची गरज नाही. मानसिकरित्या तो आलरडी पाकिस्तानात आहे. पण आपल्या मताचा आदर आहे.

सगळ्या भारताचेच रेफरंडम घ्यावा असाही विचार मनात येऊन गेला. लोकसभेत इतक्या रिजनल पार्टीजच सीटा मिळवतात कि प्रामाणिकपणे प्रत्येक राज्याच्या लोकांना बाबांनो, तुम्हाला वेगळे राहायला (स्वातंत्र्य) दिले तर आवडेल का? असे विचारून यावे. तत्क्षणी नक्षल बेल्ट, संपूर्ण पूर्वोत्तर, आणि उत्तरेतले लोक आमच्यावर राज्य करतात असे मानणारे तामिळ नाडू, आंध्र, केरळ, कर्नाटक हे थोड्या वेळाने जातील्.बहुतेक मी ही वेगळा मराठवाडा मागेन. शीखांना स्वतंत्र पंजाब पाहिजेच असेल. सुपरिणाम, दुष्परिणाम नंतर बघू.

बाकी अजुनही तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही

एका रोगावर इलाज व्हायला पाहिजे होता असे मी म्हणतो. तुम्ही म्हणता, इलाज केला असता तर दुसरा रोग होऊन तो माणूस मरायची शक्यता नव्हती का? काय वाईट केले इलाज न करून? अर्थातच मी अशी हमी देऊ शकत नाही. आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची पात्रता नाही, सामर्थ्य नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मुळात गांधीजींनी मी मुसलमानांचे नेतृत्त्व करत आहे म्हटलेले नाही हे एक. दुसरे असे की गांधीजी स्वतःला जाहिरपणे हिंदु मानत व तसेच वागत.
तुमचे मत अजूनही स्पष्ट नाही. गांधीजींनी काय करायला हवे होते? त्यांनी लखनौ कराराच्याही पुढे जाऊन (अर्थात मुसलमानांचे नेतृत्त्व करत त्यांना अधिकचे लाभ मिळवून देऊन) फाळणी रोखायला हवी होती असे तुमचे मत आहे काय?
तसे असल्यास अखंड भारतात बहुसंख्य हिंदुंना दुय्यम नागरीक म्हणून रहावे लागले असते अशी साधार भिती व्यक्त करतो. मी जन्माने (व बर्‍यापैकी कर्मानेही) हिंदु आहे, त्यामुळे मला निव्वळ जन्मामुळे असे दुय्यम नागरीक म्हणून रहायला आवडले नसते. फाळणी झाल्याने तसे होण्यापासून वाचलो आहे असे म्हणणे चुक ठरू नये.

सगळ्या भारताचेच रेफरंडम घ्यावा असाही विचार मनात येऊन गेला.

ही प्रक्रीया बर्‍याच भागात आधीच झाली आहे. काही प्रदेश आपणहून विलीन झाले. काही प्रदेशात हा रेफरेंडम भागात आधीच घेतला गेला आहे उदा. जुनागड, पाँडेचेरी,, करीकल (ऑक्टो-५४), काही प्रदेशांमध्ये अंतर्गत उठाव झाला (गोवा), काही प्रदेशांनी आधी स्वायत्तता अनुभवली नी मग भारताशी रितसर करार केला (सिक्कीम), तर काही प्रदेशांवर भारताने आक्रमण करून कब्जा मिळवला (हैद्राबाद). पैकी शेवटच्या भागात लष्करी कारवाई झाली आहे हे मान्य मात्र तिथे कोणताही 'सिवीलीयन' विरोध भारतील सैन्याला झाला नाही. व आता तिथे लष्करी कारभार नसून जनता आपले प्रतिनिधी संसदेत पाठवत आहे.

भारतव्याप्त काश्मिर खोरे व एक/दोन इशान्येकडील राज्ये वगळता, अन्य प्रदेशाच्या मालकी हक्काविषयी कोणतेही मोठे वाद नाहीत त्यामुळे तिथे असा रेफरेंडम घ्यायची गरज नाही. त्या इशान्येकडील राज्यांवरही अन्य देशांचा दावा नाही त्यामुळे तिथेही रेफरेंडमची गरज नाही. राहता राहिला प्रश्न अरुणाचल व अक्साई चीन् चा. तिथे भारत व चीन या दोघांचीही पोझिशन त्यांच्या दृष्टीकोनातून योग्य आहे. तरी सध्याची "अ‍ॅक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोल (वजा) चीनने युद्धात जिंकलेला काही हिमाचल, लडाख मधील भाग" याला आंतरराष्ट्रीय सीमेत परीवर्तित करायच्या दृष्टीने पावले उचलायला हवीत (आणि ती प्रक्रीया चालुही आहे.)

एका रोगावर इलाज व्हायला पाहिजे होता असे मी म्हणतो. तुम्ही म्हणता, इलाज केला असता तर दुसरा रोग होऊन तो माणूस मरायची शक्यता नव्हती का?

तसे नाही. उलट झालेल्या उपायामुळे अधिक मोठा रोग होण्यापासून आपण वाचलोच शिवाय मुळ रोगही हळुहळू कमी होत गेला.

आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची पात्रता नाही, सामर्थ्य नाही.

आता याला काय पातळ करणे म्हणावे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

. त्या इशान्येकडील राज्यांवरही अन्य देशांचा दावा नाही त्यामुळे तिथेही रेफरेंडमची गरज नाही.
अन्य देशांचा दावा असेल तरच रेफरेंडम घेतले जावे असे काही नाही. तिथल्यांना भारतापासून स्वतंत्र व्हायचे आहे का अशी विचारणा करणेही रेफरेंडमच होइल.
तर तो तसा करावा का ?
पंजाब व लगतच्या भागात "खलिस्तान हवा का " असा रेफरेंडम का घेतला जाउ नये?
रेफरेंडम दुसर्‍या देशाचा दावा असल्यावरच घेता येउ शकतो असे काही नाही.
सद्य स्थितीतील परिस्थितीत कोणताही मोथा बदल जनतेच्या इच्छेने करायचा असेल, तर रेफरेंडम घेतला जाउ शकतो.
काश्मीरमध्ये रेफरेंडं घ्यायचे म्हटल्यावर ; इशान्य भारतात जर काही संघटना स्वात्म्त्र्याची मागणी करत असतील तर त्यासाठी रेफरेंडम घेणे हे तर्कसंगत वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काश्मीरमध्ये रेफरेंडं घ्यायचे म्हटल्यावर ; इशान्य भारतात जर काही संघटना स्वात्म्त्र्याची मागणी करत असतील तर त्यासाठी रेफरेंडम घेणे हे तर्कसंगत वाटते.

मुळात काश्मिरमध्ये काही संघटना स्वातंत्र्याची मागणी करत आहेत म्हणून रेफरेंडम घ्यावा असे म्हटलेले नाही. रेफरेंडम यासाठी घ्यावा कारण तो दोन देशांमधील सीमाप्रश्न आहे व त्याचा विशिष्ठ असा इतिहास आहे. काश्मिर खोर्‍याचा काही भाग पाकिस्तानकडे, अतिशय छोटा भाग चीन कडे व काही भाग भारताच्या ताब्यात आहे. मात्र तेथील बर्‍यापैकी मोठा व्यक्तीसमुह स्वतंत्र होण्याच्या बाजुने असण्याची शक्यता आहे. (माझा वैयक्तिक अंदाज असा आहे की या भागातील व्यक्तीच काय पाकव्याप्त भागातील व्यक्तीसुद्धा पाकिस्तानला हा भाग द्यावा असे मतदान करणार नाहीत. खोरे स्वतंत्र हवे की ३७० कलमासकट भारताच्या ताब्यात यावर कट-टू-कट फाईट असेल)

पुर्वोत्तर राज्यांत अश्या रेफरेंडमची गरज वाटत नाही कारण तो आपला पूर्णपणे अंतर्गत मामला आहे.

समांतरः अर्थात तिथे (व जम्मु आणि काश्मिर राज्यातही) पूर्णवेळ सद्य स्थितीतील 'AFSPA' लावायच्या मी विरोधात आहेच. गरज पडेल तसा 'मर्यादित' काळासाठी अश्या कायद्यांचा वापर तोही संसदेच्या ३/४ मताधिक्याने करण्याच्या मताचा मी आहे.

=====
आता माझ्या वरच्या भुमिकेतील मेख स्पष्ट करतो
त्यातील "दोन्ही देशांनी सैन्य मागे घेऊन" मग रेफरेंडम घ्यावा असे माझे मत आहे. आणि हे शक्य होणे अतिशय कठीण आहे. किंबहुना भारताने तिथे रेफरेंडमला तयारी दाखवली आहे/होती मात्र भारताची रेफरेंडमविषयी अधिकृत भुमिका माझ्या भुमिकेच्या जवळ जाणारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रेफरेंडम यासाठी घ्यावा कारण तो दोन देशांमधील सीमाप्रश्न आहे व त्याचा विशिष्ठ असा इतिहास आहे.

१. म्हणजे अर्थातच अरुणाचल मधे सार्वमत घ्यावे.
२. उद्या एल सॅल्वेडोरने ओरिसावर दावा केला कि तिथे सार्वमत घ्यावे
३. बेळगावमधे सार्वमत घ्यावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माझा वैयक्तिक अंदाज असा आहे की या भागातील व्यक्तीच काय पाकव्याप्त भागातील व्यक्तीसुद्धा पाकिस्तानला हा भाग द्यावा असे मतदान करणार नाहीत.

माझा वैयक्तिक अंदाज आहे तिथले लोक पाकिस्तानात जातील. People wont like to be landlocked nation, that too in the midst of three dangerous enemies.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सध्या काश्मिरप्रश्नी काही विशिष्ट हेतूने वाचन चालू आहे. त्यावरून असे वाटते की, काश्मिरी जनतेला खरे तर स्वतंत्रच व्हायचे आहे. आजच नव्हे, आधीपासूनच. पण, सध्या सार्वमत घेतलेच तर दहशतवाद्यांच्या भितीमुळे परिणाम पाकिस्तानच्या बाजूने जायची शक्यता अधिक आहे. तुम्ही म्हणता तसे लँडलॉक्ड व्हायची भिती वगैरे सामान्य नागरिकांना नसते. त्यांच्या ते गावीही फारसे नसते. 'उद्या आमचं काहीही झालं तरी चालेल, पण ते आमचं आम्ही केलेलं असेल, आधी तुम्ही येथून चालते व्हा!', अशा भावनेच्या लोंढ्यात असते जनता अशा आंदोलनांमधे. (गांधी चित्रपटातही, गांधीजी इंग्रजांना, अगदी याच भाषेत सुनावताना दाखवले आहेत.)

तसेच, अशा कोणत्याही सार्वमतात, भारत की पाकिस्तान असे दोनच पर्याय असू शकतात. मूळात ब्रिटिशांनी सर्व संस्थानांसमोर असे दोनच पर्याय ठेवले होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावानुसारही (बहुधा) हेच दोन पर्याय असण्याची तरतूद आहे. त्यामुळे, य दोन व्यतिरिक्त कोणतेही पर्याय असले तर त्या सार्वमताला पाकिस्तानची (पक्षी : दहशतवाद्यांची) मान्यता असणार नाही.

काश्मिरी इस्लाम हा पाकिस्तानमधे सध्या जो कट्टरपंथी जहाल इस्लाम बोकाळतोय, त्याला पूर्णपणे छेद देऊन जातो. किंबहुना, काश्मिरी इस्लाम आणि भारतिय उपखंडातील इतर ठिकाणी असलेले इस्लामचे आविष्कार यांच्यातच जमिन आस्मानाचा फरक आहे. त्यामुळे, काश्मिरींना ना पाकिस्तान नको ना भारत.

अर्थात, जमिनी राजकारण (Realpolitik) हा सर्वस्वी वेगळाच प्रकार असतो. त्यामुळे, कितीही झाले तरी भारत असल्या सार्वमताबिताच्या भानगडीत पडणार नाहीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

कितीही झाले तरी भारत असल्या सार्वमताबिताच्या भानगडीत पडणार नाहीच.

सहमत आहेच.'फक्त भारत तसे थेट न म्हणता सार्वमतासाठी काही कंडिशन्स घालत बसला आहे, जे सद्यस्थितीत योग्यच आहे.
मी सुद्धा असेच म्हणतोय की सार्वमताआधी पाकिस्ताननेही सैन्य मागे घेतले पाहिजे. जे होणे अगदीच कठीण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्यांनी लखनौ कराराच्याही पुढे जाऊन (अर्थात मुसलमानांचे नेतृत्त्व करत त्यांना अधिकचे लाभ मिळवून देऊन) फाळणी रोखायला हवी होती असे तुमचे मत आहे काय?
तसे असल्यास अखंड भारतात बहुसंख्य हिंदुंना दुय्यम नागरीक म्हणून रहावे लागले असते अशी साधार भिती व्यक्त करतो.

काय बोलावे काही कळेना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

करा करा विचार करा! पण मत नक्की सांगा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

१. लखनौ कराराने २०१४ चा हिंदू रिषिकेश भारतात दुय्यम नागरीक कसा होईल?
२. काय बोलावे ते कळेना यासाठी म्हणालो कि आज काँग्रेसच्या नेत्यांना (मुसलमानांचे नेतृत्व करणे) भारतात जे शक्य आहे ते 'विश्वपिता' गांधीजींना का जमू नये? मुसलमानांचे नेतृत्व करण्यासाठी आजचे नेते असे कोणते लांगुनचालन करतात ज्याने हिंदूवर मुसीबतों का पहाड येऊन पडतो? नेता कोणत्या धर्माचा आहे याचा इतका का फरक पडावा? दलितांना, मुसलमानांना राखीव मतदारसंघ दिले तर काय बिघडले असते? आणि आजपावेतो घटने आढारे, इ त्यात बदल करता आला नसता का? जाऊ द्या, सेक्यूलर अखडं भारताचा संभाव्य मुसलमान पंतप्रधान हा हिंदूप्रती हरामखोर राहिला असता असे का वाटते? याच्या उलटे का वाटते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लखनौ कराराने २०१४ चा हिंदू रिषिकेश भारतात दुय्यम नागरीक कसा होईल?

निव्वळ लखनौ कराराने काही होणार नाही. तितके द्यायला गांधीजी तयार होते.
त्याहून अधिक देण्याने ही शक्यता बरीच मोठी आहे.
या करारातील एक कलम रोचक आहे 'Muslims should be given 1/3 representation in Central Govt.' म्हणजे १२-१३% लोकसंख्या असलेल्या गटाला ३३% आरक्षण देण्यास ते तयार झाले होते.

फाळणी न होण्यासाठी मुस्लिमांना भारतीय 'सरकारमध्ये' (जागांमध्ये नव्हे) बरोब्बर निम्मा वाटा हवा होता. अर्थात एखादी व्यक्ती मुसलमान आहे हे क्वालिफिकेशन त्याला त्या ५०% एक्सिक्युटिव्ह जागेवर जायला पुरेसे होते. मात्र उर्वरीत सर्व धर्मियांना मिळून केवळ ५०% जागा 'सरकार'मध्ये मिळणार होत्या. अर्थात अश्या सरकारचे निर्णय हे एका विशिष्ट धर्मियांसाठी प्रेरीत असण्याची शक्यता खूप जास्त होती. अर्थातच इतर धर्मिय आपोआप दुय्यम झाले असते.

फाळणी होणार हे नक्की झाल्यावर गांधी-नेहरूंनी काय केलं? तर धार्मिक आरक्षण रद्द केलं. ते लखनौ कराराच्याही मागे आले. आता आपली निर्णय प्रक्रीया ही कोणत्याही धर्माच्या प्रभावाखाली होत नाही. आपले निवडलेले प्रतिनिधी घटनात्मक चौकटीतच निर्णय घेऊ शकतात. कोणत्याही धार्मिक ग्रंथाची, मान्यतांची चौकट आपल्यावर लादली जाऊ शकत नाही. माझ्या मते गांधीजींच्या मुत्सद्देगिरीचे याहून मोठे उदाहरण मिळणे कठीण आहे.

काय बोलावे ते कळेना यासाठी म्हणालो कि आज काँग्रेसच्या नेत्यांना (मुसलमानांचे नेतृत्व करणे) भारतात जे शक्य आहे ते 'विश्वपिता' गांधीजींना का जमू नये?

तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. कारण ते विश्वपिता आहेत. एका धर्माचे लहानसे नेते नव्हेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अर्थात अश्या सरकारचे निर्णय हे एका विशिष्ट धर्मियांसाठी प्रेरीत असण्याची शक्यता खूप जास्त होती. अर्थातच इतर धर्मिय आपोआप दुय्यम झाले असते.

आज दलितांना आणि स्त्रीयांना सरकारमधे प्रचंड आरक्षण आहे. ते लोक सवर्णविरोधी आणि पुरुषविरोधी निर्णय घेतात का? मुसलमानांची इतकी भिती का? मुस्लिम राज्यकर्ते न्याय्य असू शकत नाहीत असा शोध तुम्ही कसा काय लावू शकता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उलट्या पद्धतीने पहाता हिंदू किंवा लोकशाही बहुमतातून आलेले राज्यकर्ते न्याय्य असू शकत नाहीत असाच अर्थ होइल ना ??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हिंदु किंवा कोणत्याही धार्मिक गटातील राज्यकर्त्यांना त्या त्या धर्मियांचे म्हणून आरक्षण नाही हे एक आणि सध्याच्या चौकटीत धर्माधिष्टीत निर्णय घेता येणे घटनेला मान्य नाही.
जर धर्मावर आधारीत निर्णय घेणे भारतात मंजूर असते तर हिंदु बहुसंख्यांनी अल्पसंख्यांवर अन्याय केला असता याबद्द्ल माझ्या मनात दुमत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आज दलितांना आणि स्त्रीयांना सरकारमधे प्रचंड आरक्षण आहे.

माहिती चुकीची आहे. सरकारमध्ये (अर्थात कॅबिनेटमध्ये) कोणाला घ्यावे हे पूर्णपणे पंतप्रधान/मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असते. बाकीच्या खासदारांना एक्सिक्युटिव्ह पॉवर्स नसतात.
दुसरे असे की कोणालाही ५०% आरक्षण नाही. कोणताही एक गट सारे निर्णय घेऊ शकत नाही. नेहमी अनेक गटांची त्याला मान्यता लागते.

इथे मोठा फरक असा आहे की लखनौ कराराच्या पुङ्हे गेले असता एकट्या मुसलमानांना ५०% आरक्षण मिळाले असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माहिती चुकीची आहे. सरकारमध्ये (अर्थात कॅबिनेटमध्ये) कोणाला घ्यावे हे पूर्णपणे पंतप्रधान/मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असते. बाकीच्या खासदारांना एक्सिक्युटिव्ह पॉवर्स नसतात.

अहो, पण पंतप्रधान कोण हे सगळे ठरवतात. त्याला सगळे मिळून कधीही पाडू शकतात. तेव्हा राजकीय शक्ती दलितांच्या आणि स्त्रीयांच्या हाती नाही म्हणणे चूक आहे. कॅबिनेट पंतप्रधानाखाली असते, पण पंतप्रधान संसदेखाली असतो आणि म्हणून निअवडून आलेले प्रतिनिधी तो/ती कोण असावी याची शक्ती बाळगून असतात.
आणि केवळ executive body चा मुख्य असणे म्हणजे सरकार चालवणे हा कुठला जावईशोध आहे? कायदे बनवण्याच्या शक्तीला राजकीय शक्ती म्हणायचे नाही? न्याय संस्थेच्या शक्तीला नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काय संबंध? मी काय बोलतोय तुम्ही कुठे जाताय?.
मुळ विषयावर बोलतो: मागणी अशी होती की सरकारमध्ये ५०% आरक्षण मुसलमानांना हवे. हे आरक्षण देऊन भारत अखंड असवा असे तुमचे मत आहे असे दिसते. तसे असेल तर ठिक. पण तुम्ही त्यावर मतच देत नाहीत. मुसलमानांना सरकारात ५०% आरक्षण देऊन भारत (सो-कॉल्ड) अखंड ठेवायला हवा होता का यावर आधी बोला मग/तर पुढील चर्चा करू?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

यकदम पावरफुल पोईंट. सध्या पाकिस्तान, अफगाणिस्तान वा बांगलादेश ह्यांची परिस्थिती पाहता जे झाले ते चांगलेच झाले असे म्हणावे लागेल. नपेक्षा आहेट त्यापेक्षा जास्त फुटीरतावादी चळवळी होत राहिल्या असत्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विश्वरत्न ऐवजी विश्वपिता अशी दुरुस्ती करावी काय हो सचीनशेट?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

विश्वरुप गांधिंजींना आदरांजली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

राष्ट्रपिता ही उपाधी

सुभाषचंद्र बोस यांनी महात्या गांधी यांना पहिल्यांदा राष्ट्रपिता संबोधले, असा उल्लेख या लेखात आला आहे. हे विधान अनैतिहासिक आहे. गांधीजींना राष्ट्रपिता हे संबोधन बोस यांनी नव्हे तर सरोजिनी नायडू यांनी दिलेले आहे. पं. नेहरू यांचे स्वीय सचिव एम. ओ. मथाई यांच्या रिमिनिसेन्सेस ऑफ नेहरू एज या पुस्तकात यासंबंधीचा संपूर्ण तपशील आला आहे. १९४७ साली २८ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत नवी दिल्लीत आशियाई परिषद भरली होती. या परिषदेच्या उद्घाटन समारंभासाठी गांधीजी येत असताना "हे पाहा आमचे राष्ट्रपिता आले", असे उत्स्फूर्त उद्गार सरोजिनी नायडू यांनी काढले होते.

आपल्याकडे इतिहासाकडे अत्यंत मोघमपणे पाहिले जाते. त्यातून चुकीच्या गोष्टी रुढ होतात. असे होऊ नये, यासाठी इतिहासाविषयी लिहिताना शक्यतो योग्य पडताळा घेऊनच ठोस विधान करावे, असे या निमित्ताने सूचवावेसे वाटते.

महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही उपाधी कशी मिळाली, या विषयी मी लिहिलेला वृत्तांत मी २०१२ साली लोकमतमध्ये प्रसिद्ध झाला होता. हे वृत्त माझ्या ब्लॉगवर आहे. जिज्ञासूंनी ते अवश्य पाहावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उपयुक्त माहिती, धन्यवाद सर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणीतरी काशी का बनारसचा महंत होता, त्यानं फार आधीच गांधींना महात्मा म्हटलं होतं, असा उल्लेख आहे.
लगे रहो मुन्नाभाई (मुन्नाभाई mbbs २ ) मध्ये त्या महंताचं नाव दिलय. आता पिच्चर निव्वळ गल्लाभरु किम्वा कमर्शिअय्ल असला तरी त्या क्वीझच्या प्रसंगातील इतर उत्तरे अचूक असल्याने ह्या उत्तराअतही तथ्य असण्याचा संभव आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कोणीतरी काशी का बनारसचा महंत होता, त्यानं फार आधीच गांधींना महात्मा म्हटलं होतं, असा उल्लेख आहे.

मुद्दा महात्मा या उपाधीचा नव्हे, तर राष्ट्रपिता या उपाधीचा आहे. कृपया नीट समजून घ्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओके

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

CNN-IBN's Deepa Balakrishnan met up with Mahatma's great grandson Shrikrishna Kulkarni, who is also an Aam Aadmi Party member, like his uncle Rajmohan Gandhi, who is the AAP candidate from East Delhi.

Mahatma's great grandson asks Rahul not to use Gandhi's name in polls

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0