दखल

तुझा टोचतो अबोला,
माझे पारदर्शी दु:ख,
कसे आवरू स्वत:ला,
माझ्या आरपार बघ.

तुला लागला कसा हा,
कोरड्याचा भर वारा,
माझ्या नघट अंगाचा,
नाही उरायचा थांग.

तुझ्या पायाशी असेल,
कातळाचा चर मोठा,
जप हळू भेदणारा,
माझ्या जीवाचाही कोंभ.

जिथं असणं नसणं,
फक्त भास उरणारा,
तिथं तुझे देहमन,
माझा अवघा प्रसंग.

आधी अप्रुपाची माया,
श्वास होऊनिया गेली,
तुझ्या दखलेचा आता,
जीव होत जाई शब्द.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

भरदार आणि सशक्त शब्दयोजना.

(दखल नावाच्या इतक्या चांगल्या कवितेची दखलही घेतली गेली नाही याला काव्यमय अन्याय म्हणावं का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त कविता! आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भारीच! आवडली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी शब्दांचा जादूगार...

कविता वाचून मला काय वाटल याचा खराखुरा विस्तृत प्रतिसाद देतो.
कविता वाचली. स्क्रीनवरून भार्र्कारून डोळे फिरले. काहीच कळली नाही पहिल्या कडव्यानंतर ऑफ track गेलो.पण काहीतरी प्रेम कविता आहे हे कळाल. दुसर्यांदा वाचली. पहिल्या कडव्यात यमक जुळले आहे.पाहिलं कडव भेदक वैगेरे नसाल तरी वाचायला मस्त आहे.

तुला लागला कसा हा,
कोरड्याचा भर वारा,
माझ्या नघट अंगाचा,
नाही उरायचा थांग.

हे कडव कळाल नाही. अगदी कवितेमध्ये सगळच कळायला पाहिजे अस नाही पण मेंटल इमेज देखील तयार नाही झाली.

तुझ्या पायाशी असेल,
कातळाचा चर मोठा,
जप हळू भेदणारा,
माझ्या जीवाचाही कोंभ.

या कडव्यातून कवीला त्याची गर्लफ्रेड(किंवा ती व्यक्ती) तिच्याशी किती आर्ततेने प्रेम करतोय असा भाव कळला.
शेवट मस्त आहे. काहीतरी व्हिजुअल इमेज तयार होते डोक्यात. तिने दाखल घेतली आणि कवीचा जीव शब्द होऊनी या कवितेत उतरला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

बाबारे! शब्द योजनेला प्रणाम!
दोनदा वाचावी लागली पण जमुन गेलीये
"नघट" तर कित्येक दिवसांनी काय - वर्षांनी भेटला असेल.

येत राहु दे अजून असच सकस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इतकी जबरा कविता वाचताना माझ्यातला मुद्रितशोधक जागा व्हावा, ही दाद म्हणावी की दुर्दैव कळत नाही! पण मी हे बदल सुचवले असते -

जिथे असणे नसणे,
फक्त भास उरणारा,
तिथे तुझे देहमन,
माझा अवघा प्रसंग.

आधी अप्रूपाची माया,
श्वास होऊनिया गेली,
तुझ्या दखलेचा आता,
जीव होत जाई शब्द.

***

नघट म्हणजे नक्की काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मराठीचे प्रसिद्ध वैयाकरण कृष्ण श्री. अर्जुनवाडकर हेही त्यांच्या पुस्तकात करणे ऐवजी करणं असे वापरतात.

त्यामागचे कारण असे की शिष्टप्रयोग प्रमाण मानायचे तर सध्या शिष्टप्रयोगातच करणं, मरणं, इ. प्रयोग रूढ आहेत. ते मलाही पटते.

अमुक एका समितीचे नियम असे आम्ही मानत नाही. अहो ज्या मूर्खांना च, ज, झ चे प्रत्येकी दोन वेगळे उच्चार फक्त नुक्त्याने दाखवायची अक्कल नाही त्यांचे नियम प्रमाण मानून करायचेत काय?

कृपया प्रमाणलेखनास माझा विरोध आहे असे आजिबात समजू नये. पण दीर्घ अ-कार आणि वर सांगितलेले उच्चार ही मराठी उच्चारांची अगदी व्यवच्छेदक का कायशी लक्षणे असताना ती लेखनाद्वारे दाखवण्याची बुद्धी या समितीस नसावी याचे दु:ख होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

करणं किंवा करणे या दोन्ही रूपांना माझा आक्षेप नाही, प्रमाणलेखन ठरवणार्‍यांची भूमिका काहीही असो.

फक्त णे / णं यांपैकी कुठलंतरी एक रूप सातत्यानं वापरलं, तर वाचताना दाताखाली खडा आल्यासारखं होणार नाही असं वाटलं, म्हणून आगाऊपणे बदल सुचवला.

कवीचा शब्द अंतिम आणि प्रमाण - याबद्दल दुमत नाहीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

batman, तुमच्याशी अगदी सहमत आहे.
असे उच्चार बऱ्याचजणांना सवयीचे नसतील. त्यामुळे ते खटकणे साहजिक आहे.
परंतु खूप लोकांना हे उच्चार अतिशय परिचयाचे असतात आणि ते अजिबात विसंगत वाटत नाहीत. मला स्वत:ला ते अजिबात श्रवण-विसंगत वाटत नाहीत.
म्हणून ते आले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी अप्रूपाची माया.
पहिला उकार गाताना उच्चाराला बरोबर वाटते म्हणून ते तसेच ठेवले.
बाकी ण बद्दलही हेच कारण देता येईल. मला सवयीचे वाटते म्हणूनही कदाचित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही जी प्रतिक्रिया दिली, कवितेची दखल घेतल्याबद्दल तुमचे आभार . अशाच अर्थाची अजून एक प्रतिक्रिया मला खाजगीत आली. त्यांना मी जे उत्तर लिहिले तेच तुम्हाला पाठवत आहे.
आणि लवकर प्रतिसाद दिला नाही म्हणून सॉरी.

मुळात हे एक उस्फुर्त लिहिलेले गाणे आहे. प्रवासात असताना अश्या दोन धुनी डोक्यात होत्या. त्यापैकी एका धुनेवर ही कविता रचली आहे.ह्याच धुनेवर माझ्या मित्राने दुसरी कविता लिहिली आहे. व दुसऱ्या धुनेवर आम्ही दोघांनी मिळून एक कविता लिहिली. लिहिताना आशयाला महत्व देणे, यमक जुळले नाहीत तरी चालेल, आणि एक सबंध भाव मांडणे असे प्राथमिक हेतू होते. कदाचित इतरांना ती वाचताना एक इमेज उभी राहत नाही. पण मला स्वत:ला ती तशी उभी होते.
एखाद्या व्यक्तीचा आपल्यावर असलेला राग तिच्या अबोल्याने जाहीर होतो. त्याचा मला त्रास होतो(टोचतो) आणि मी विचल होतो, हे त्या व्यक्तीला स्पष्ट कळत असूनही (माझे पारदर्शी दु:ख) तिला हा silence तोडता येत नाही. तिला पाझर फुटत नाही. काही दिवसांपूर्वी मायेने ओली असणारी ती व्यक्ती खूप कोरडी झालेली असते.

मी भरकटतो.म्हणजे अक्षरश: भरकटतो. माझ्या घरामागे विस्तीर्ण माळ आहे(जत). वर्षभर सोsss कोरडा वारा असतो.मानसिक अस्थैर्यात एकांताच्या वेळा तिथे भटकण्यात एखाद्या दगडावर जाऊन शांत सूर्यास्ती बसणे हा एक माझा उपचार आहे.
म्हणून तुला लागला कसा हा कोरड्याचा वारा. "नघट" हा एका अर्थापोटी तयार केलेला शब्द आहे. घट्ट नसलेले अश्या अर्थाने. त्या वाऱ्यात माझ्या अस्थिर, नाजूक अंगाचा कसा निभाव लागेल असं मी विचारतो. नघट हा शब्द आहे ह्याबद्दल मला ठाऊक नव्हते. त्याचा अर्थ जाणून घेणे निश्चितच आवडेल.
त्या वेळेस असं जाणवतं की कदाचित पुढच्या व्यक्तीला माझ्या ह्या अवस्थेबद्दल फार आस्था नसेल. तिलादेखील ह्या अबोल्याचा त्रास होत असेल का असं आपण स्वत:लाच विचारणं साहजिक आहे. ती व्यक्ती कदाचित मनाने खूप घट्ट अशी स्थिर असेल. पायाखाली कातळाचा चर असणे म्हणजे तिच्या पायी सॉलिड बेस असणे. त्या इतक्या घट्ट कातळालाही एखादा कोंभ भेदतो. तो तिने जपावा अशी अपेक्षा.
असणं नसणं म्हणजे आपलं अस्तित्व आपल्याला भास वाटू लागतो कारण आपण मनाने सर्वस्वी गुंतलेलो असतो. पुढच्या व्यक्तीच्या देहाशी मनाशी आपण थोड्या काळा पुरते एकरूप झालेलो असतो.ते सतत स्मरत राहते. आपण त्या विचारातून बाहेर पडत नाही. मला प्रसंग शब्द वापरताना तो तिथे वापरावा की नको असे वाटत होते. प्रसंगचा रूढ अर्थ आहे घटना. पण ह्या शब्दाला काळाचे भान आहे. काळाचा छोटासा तुकडा ह्या अर्थाने मी इथे हा शब्द वापरला आहे.
एकंदरीत ही कविता 'असं का?' हे पुढच्या व्यक्तीला विचारत आहे. मला हे मूकपण नको आहे. तिचा एखादा शब्द कानावर पडावा असे खूप आर्ततेने वाटतंय.
पूर्वी ह्या प्रेमाचे अप्रूप काहीसे होते ते बघता बघता श्वास झाले. (श्वास हा प्रेमकवितांमधला खूप लाडाचा शब्द. ह्या शब्दाशिवाय मराठी प्रेमकविता किंवा गाणे पूर्ण होणार नाही. पण मला हा शब्द योजावा लागला कारण तो "बोलण्याच्या" प्रक्रियेशी संबधित आहे. तसेच "ऐकणे" देखील) दखलेचा शब्द जीव होणे हे कानात प्राण आणून वाट पाहणे ह्याला समांतर जावा असे वाटले. आणि ते तसे ठेवायचे कारण, तुम्ही बरोबर ओळखलेले प्रत्येक कडव्याशेवटीचं वजन.
तुमचे परत आभार.
[ माझ्या मित्राची ह्याच धुनेवरची कविता :

तुजे साजिरे गं रूप,
त्याला लाविले काजळ,
तुज्या भोवळ्या अंगाचा,
होता गं थरकाप.

अशी आहे. ]

सांगायचे हेच आहे, कविता लिहिणे आणि ती उमजणे ह्या बऱ्याच प्रमाणात खाजगी(वैयक्तिक) अनुभवाच्या आधारे असते/ किंवा तो एक स्वतंत्र अनुभवच असतो. मला जे अभिप्रेत आहे ते जसंच्या तसं इतरांना कळावं हा आग्रह मी धरु शकत नाही याची तर तुम्हाला स्पष्ट जाणीव आहे. पण तुकड्यात का होईना तुम्हापर्यंत काही तरी पोचतं, आणि तुम्ही त्याला प्रतिसाद देता याबद्दल तुमचे आभार आणि तुम्हाला कविता वाचताना सलग अनुभव येऊ शकला नाही ती माझी मर्यादा.
हे रचताना पुढेमागे त्याला चित्रित करावं ह्या सुप्त जाणीवेने मी लिहिले होते. अजून एक गोड धून होती. मी व माझा मित्र बदामी भागातून बसमधून जात असता खिडकीतून एकदम वारा आला. तेव्हा खिडकी बंद करताना "काय साय्य्यदिशि वारा येतोय" असं म्हणालो. शिवाय तो प्रवास माझ्या जिवलग मित्राच्या भेटीचा एक भाग होता. ती उत्सुकता, प्रेम, अधीरता यांना पूरक म्हणून की काय नंतर ढग दाटून आले. ढग दाटून येणे, पावसापूर्वीचा वारा हे अतिशय दुर्मिळ असलेला तो भूभाग. तेव्हा ह्या भेटीची उत्सुकता जास्त intense होती. त्यातच ती गोड धून नुसतीच आम्हा दोघांमध्ये रेंगाळत होती. शेवटी त्यावर शब्द रचताना आहे ते रचायचं ठरलं. पुन्हा शब्द कसेही मराठीतल्या बोलीभाषांतून randomly घ्यायचे असेही. ती कविता अशी :
साsय सुटलाव रे साsय सुट्लाव,
साsय सुटलाव रे साsय सुट्लाव.
तुजे मिळचे आता धाय सुटलाव.

तुले घेऊन गेला वारा,
मज सांगून गेल्या धारा,
तू रे येचील कुटल्या दारा,
हितं गोंदून गेल्या गारा.

माज्या जिगरी माती भिजली,
तुज्या अंगाचो ये वास,
माझे अंगा थरथर बिजली,
तुजे बाहूत जाया उजळी.

साsय सुटलाव रे साsय सुट्लाव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी कुठे वाचलाय आठवत नाही पण तेव्हा नघट = न घडलेल्या, परिपूर्णतेस न पोचलेल्या, अश्या काहिशा अर्थी तो शब्द आला होता. नघट हे विशेषण त्या लेखनात कोणाच्यातरी वक्षस्थळाला वापरले होते असे पुसटसे स्मरते आहे.

मलाही हा शब्द खरोखरच आहे का माहिती नाही पण तेव्हा वाचल्याने व आज पुन्हा बघितल्याने तो असावा असे वाटले.(दाते-कर्वे शब्दकोशात हा शब्द दिसला नाही)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!