एक उदास संध्याकाळ

कुठली अनामिक ओढ ही
रेंगाळणाऱ्या सांजेला
दूर क्षितीजी पिवळी गुणगुण
हुरहुर लावी मनाला

शहारत्या पाठी कुरणांच्या
तिरप्या नजरा रविकिरणांच्या
शब्द न पुरवी गीताला
तळ्यातल्या रांगा बदकांच्या

दुर्लक्षित थवे पक्ष्यांचे
अन किणकिण घंटा गायींच्या
उलगडता न उलगडणाऱ्या
घड्या हाता-पायांच्या

माळावरची जलद सावली
नकळे भरभर कुठे चालली
अकस्मात ही निसर्गचित्रे
पापण्यांच्या कडांत बुडाली

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

उदासिनता दाखवणारं मला तरी काही कवितेत दिसलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.