ब्रोकोली सॅलॅड

पिझ्झासोबत आणि पास्त्यामध्येही खाताना ब्रोकोली मला प्रचंड आवडली. पण सॅलॅडमध्ये कच्चीच खायची तर अगदी कसंसंच झालं. आधीच ब्रोकोलीचा उग्र वास आणि मग त्यासोबत काय काय एकत्र जाईल ही एक शंका होतीच. थोड्या ट्रायल-एरर नंतर ही पाककृती सध्या बरी वाटतेय.

सर्वसाधारण स्वयंपाकात सतत तंतोतंत मापं असू शकत नाहीत. जिथे शक्य आहेत, तिथं दिली आहेत. नाहीत तिथं मात्र आपल्या आपल्या मगदुराप्रमाणं किती-काय-कसं हे थोडंसं आपलं आपणच उमजून घ्यावं हे उत्तम.

लागणारा वेळ
जास्तीत जास्त २० मिनिटे, भाज्या कापून तयार असल्यास पाच मिनिटांहूनही कमी.

साहित्य:-

  1. तर एक लहानसा ब्रोकोलीचा गड्डा. दुकानात मिळतो साधारण तेवढा एक. 
  2. एक ते दीड वाटी उभा चिरलेला कोबी
  3. एक वाटी ताज्या पनीरचे साधारण एक सेमीXएक सेमी आकाराचे तुकडे
  4. एक ते दीड वाटी गाजराचेही एक सेमीXएक सेमी आकाराचे तुकडे
  5. मूठभर पार्सली
  6. हवे असल्यास कोवळी पालकाची पाच-सहा पाने 
  7. दोन-तीन बदाम
  8. एक  बारीक कापलेली हिरवी मिरची
  9. पाच-सहा खजूरांचे उभे कापलेले तुकडे
  10. अर्धा चमचा तेल (शक्यतो ऑलिव्ह ऑईल)
  11. आठ-दहा मधोमध कापलेली काळी द्राक्षे/ मनुका (वैकल्पिक)

ड्रेसिंग

  1. एक वाटीभर टांगलेलं दही. (यासाठी रात्रभर टांगायचीही गरज नाही. स्वयंपाकास सुरूवात करण्याआधी एका चहाच्या गाळणीत दही ठेवून ते गाळणं एका वाटीभर ठेवून द्या. अतिरिक्त पाणी खाली वाटीत जमा होईल.)
  2. काळं मीठ
  3. अर्धा-पाऊण चहाचा चमचा साखर
  4. काळी मिरी
  5. मस्टर्ड सॉस

कृती-

  1.  ब्रोकोली सोडून इतर भाज्या, मिरची व खजूरचे तुकडे कापून तयार ठेवले.
  2. ब्रोकोली अशीच खायला चांगली लागत नाही. त्यामुळे मी सहसा ब्रोकोलीचे तुरे मायक्रोवेव्हमध्ये एक मिनिटभर ठेवून खायला घेते. या वेळेस अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये गॅस हायफ्लेम वरती ठेवून दीडेक मिनिट चटचट भाजून घेतली व थंड होण्यासाठी बाजूला ठेवली.
  3. एका लहान कुंड्यात/बोलमध्ये पाणी काढलेले दही फेटून घेतले
  4. दह्यात मीठ+साखर+मस्टर्ड सॉस घातले*. त्यातच काळी मिरीची पावडर पेपर मिलमधून अगदी ताजी ताजी घातली. सर्व मिश्रण पुन्हा एकदा फेटून घेतले.
  5. थंड झालेली ब्रोकोली, पार्सली व इतर भाज्या+खजूर इ.वर हे ड्रेसिंग ओतले
  6. हलक्या हाताने भाज्या वरखाली करून सर्व ठिकाणी हे ड्रेसिंग नीट लागेल हे पाहिले.
  7. सलाद तयार.

     

 

टीप:-

  1. *दह्यात थोडीशी पुदीन्याची पाने देखील चुरून घालता येतील.
  2. द्राक्षे घातल्याने चव आणखीच वाढते. दाताखाली खजूर किंवा द्राक्ष आलं की मस्त वाटतं.
  3. फ्रीजध्ये साधारण एक तासभर ठेवल्यास सलाद चांगले मुरते व दही ड्रेसिंग+मिरचीची चव छान जमून येते.
  4. गॅस किंवा स्टोव्हशिवाय स्वयंपाक करायचा असल्यास हा प्रकार अगदी उत्तम. 
  5. दही आणि पनीरमधून  मिळणारे बी१२ हा या पाककृतीचा मुख्य घटक मानला जाऊ शकेल.
  6. शक्यतो ताजी मिरीपावडर वापरावी, चवीत नक्कीच फरक पडतो. त्यसाठी हे उपकरण उपयुक्त ठरावं.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

सॅलड छान दिसतंय. निरनिराळे रंग, चव आणि पोत असणारे पदार्थ मिळून आलेत.
(गोट चीज हाही पनीरला एक उत्तम पर्याय ठरावा, असं वाटतं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॅलड दिसतंय तर चांगलं ... उन्हाळ्यात खायला चांगला प्रकार आहे. उष्णतेच्या स्रोतासमोर उभं राहण्यापेक्षा असे काही पदार्थ खायला, त्या हवेत जास्तच सोयीचे वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उन्हाळ्यात संपूर्ण जेवण होऊ शकेल असं सॅलड! काही सुचवण्या -
आजकाल आपल्याकडे तयार क्रूताँ (croûton) मिळतात. ते ह्यात घालून पाहा.
नंदनच्या सुचवणीशी सहमती - गोट चीज किंवा फेटा चीज चांगलं लागेल.
खजूर-मनुका वगैरे गोड मेवा आवडत असेल तर सफरचंद-अक्रोड घालून वॉलडॉर्फच्या जवळही जाऊन पाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मस्त दिसतय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या संध्याकाळचं खाणं म्हणून तीनेक आठवड्यांपासून सॅलड खातेय. त्यामुळे वेगवेगळे प्रयोग चालले आहेत. एकदोनदा चीज/अक्रोड घालून प्रयोग केले आहेत. तयार क्रूताँ हा पर्याय आवडला. एक शंका- ही ब्रेड असल्याने पाच-सहा तास रेफ्रिजरेट केल्यास चवीत फरक पडेल का? (पोत बदलेल)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

क्रूताँ आयत्या वेळीच टाका. अन्यथा द्रव शोषून घेऊन त्यांचा कुरकुरीतपणा निघून जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कोबीसारखीच दिसणारी ब्रोकोली खूपच आवडते.
पण भारतात बाजारामध्ये,मंडईत वगैरे ब्रोकोली कुठे असते ?
मला ब्रोकोली खायची असेल तर sub way वगैरे सँडविच - सॅलड ह्यांचा आश्रय घ्यावा लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आमच्याकडे छोटेखानी लोकल सुपरमार्केटात मिळते. अगदी चेंबूरमधल्या भाजी बाजारात देखील आव्हाकॅडो/किवी/ब्रोकोली/रंगीत भोपळ्या मिरच्या हे सगळंच मिळतं.

जंतू-क्रूताँ बद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

कोबीसारखीच दिसणारी ब्रोकोली
............यावर 'न'वी बाजूंच्या शेर्‍यांची वाट पाहत आहे. Smile
(हलकेच घ्या हो मनोबा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पानकोबी (इंग्रजीत कॅबेज), फूलकोबी (इंग्रजीत कॉलीफ्लावर), नवलकोल/गाठगोभी (इंग्रजीत कोलराबी) ब्रोकोली (इंग्रजीत ब्रॉकोली), हाक-पालेभाजी (इंग्रजीत कॉलर्डग्रीन्स), करमसाग (इंग्रजीत केल),आणि ब्रसेल्स स्प्राउट्स) या सर्व भाज्या एकमेकांच्या जवळच्या नात्यातल्या आहेत. या सर्व भाज्यांना एकच "स्पीशीज् नाव" आहे : Brassica oleracea. या वनस्पती एकमेकांसह सुफळ अपत्ये प्रसवू शकतात. या सर्व बागायती उपप्रजातींची मातृप्रजाती एकच.

यातील बहुतेक भाज्यांमध्ये पाने, किंवा पानांचे घट्ट गड्डे भाजी म्हणून वापरतात. अपवाद फूलकोबी, ब्रोकोली, आणि नवलकोल. ब्रोकोली म्हणजे फुलांच्या कळ्यांचा गुच्छ. फूलकोबी म्हणजे ज्यातून कळ्या उत्पन्न होऊ शकतील असे बुंध्याचे टोक (या प्रजातीत हे टोक खूपच सुजते/वाढते). नवलकोलाचा गड्डा म्हणजे सुजलेला/वाढलेला बुंधा. नवलकोलाची पानेसुद्धा पालेभाजी म्हणून छानच लागतात.

पाककृतीसाठी ही माहिती अवांतर आहे. पण उगाच "माहितीपूर्ण" शेरे गोळा करण्यासाठी हा प्रतिसाद दिलेला आहे. परंतु हा प्रतिसाद देण्याचे निमित्त (कुरापत), म्हणून बीजदोष सदस्य मन यांचा आहे. त्यांनी "ब्रोकोली कोबीसारखीच दिसते" म्हटले नसते, तर हा फाटा फोडायला अवसरच नव्हता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणखी थोडे कूल पॉईंट्स मिळवण्यासाठी कोलराबी (नवलकोलच, पण आपण भारतात राहत नाही याची जाहिरात नको करायला!) च्या पाकृ लिहाव्यात अशी विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एवढं चांगलं सॅलड दिसत असताना नवलकोल खायची अवदसा का आठवावी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा हा हा @ अवदसा

पण मलाही नवलकोल च्या रेसपीज हव्या आहेत. मी रोज ऑफिसहून येताना हायवे वर एक जण सगळ्या पालेभाज्या आणि कंदमुळं (बीट, सुरण) विकत बसलेला असतो, त्याच्याकडे अगदी ताजे नवलकोल भरपुर प्रमाणात असतात - घ्यायचा मोह होतो पण नवलकोल कधीच खाल्लं नसल्याने आणि त्याची पाकृ माहित नसल्याने घ्यावं वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. मला अवदसा सोडून दुसरं काय आठवणार?
२. बाजारात मिळतं म्हणून.
३. विचारलं, ते ही धनंजयला कूल पॉईंट्स मिळवण्याची संधी मिळावी म्हणून. खाणार असं वचन थोडीच दिलंय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. मला अवदसा सोडून दुसरं काय आठवणार?

असं कसं? तुम्हाला स्त्रीवाद पण आठवतो की कधी कधी. आता तुम्हाला अवदसा सोडून बाकी काही आठवत नाही आणि तुम्हाला स्त्रीवाद आठवतो. याचं '२+२' केल्यास जे कंक्लूजन निघतं त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? Wink

२. बाजारात मिळतं म्हणून.

बाजारात गवत पण मिळतं.

३. विचारलं, ते ही धनंजयला कूल पॉईंट्स मिळवण्याची संधी मिळावी म्हणून. खाणार असं वचन थोडीच दिलंय!

धनंजयरावांना अजून कूल पॉईट्स मिळवायची गरज आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

१. अर्थातच. स्त्रीवाद्यांची तीच तर प्रतिमा बनवली गेली आहे. नसेल तर अजूनही प्रयत्न होतो. (उदाहरणं इथे नकोत. धुणी धुवायची तर घाटावर जाऊ या.) Smile

२. कोणी माहिती देणार असेल गवताचाही विषय काढता येईल. (नवलकोल टाईप कोणी सोपी पाकृ देणार असेल गवतही खाईन म्हणते.)अ, आ ते खाऊन माझं वजन वाढलं नाही की झालं.

३. पैसे किती पुरणार हे सांगता येतं का? तसं अगदी धनंजय असेल तरीही, कूल पॉईंट्स किती पुरतील ते सांगता येतं का? (इथे अगदीच फाल्तू फिल्मी वाक्य सुचलं होतं. पण ते फारच फालतू असल्यामुळे राहूदेत.)

---

अ. त्यावरून आठवलं. पुण्याच्या आमच्या हाफिसात अधूनमधून शेपूची भाजी करायचे. बाकी कोणतीही पाकृ कितीही बिघडवली तरी शेपूची भाजी बिघडवणं फारच कठीण. (ती मलाही जमते.) तिथेही चांगली असायची. पण शेपू न आवडणाऱ्या काही (#$%^&*) मित्रांचा सिद्धांत असा होता की आवारातलं गवत कापलं की दुसऱ्या दिवशी दुपारी शेपूची भाजी कँटीनमध्ये असते. सुरूवातीला मी उडवून लावलं. पण त्यानंतर त्यांनी दोन विदाबिंदू दाखवल्यावर, मी पण एखाद्या अनुभवी खगोलाभ्यासकाप्रमाणे हा सिद्धांत मान्य केला. आता ना राहिलं कँटीन, ना राहिलं गवत. (म्हणजे मीच 'छोड आये वो गलियां'.) तर आता सरळ शेपूच्या जुड्या विकत आणते आणि खाते. निदान मनाची खात्री पटते की हे इमारतीसमोरचं कापलेलं गवत नाही.

आ. गाजराचा पाला खरोखर तसाच लागतो. बेचव आणि गवती. तो पण मी खाल्ला आहे. त्यापेक्षा वाईट म्हणजे रंगीत स्विस शार्डचा पाला. त्यातल्या एका जातीला ऱ्हूबार्ब समजून मी त्याचा क्रंबल केला होता आणि वर इथे ट्यँवट्यँव करत पाकृही लिहीली होती.

---

अतिअवांतर - मस्त कलंदर, सॉरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अ! आ!

'न'वि क्षिप्त अदिती चा प्रतिसाद वाचतोयसं वाटलं! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१
Biggrin तळटिपा देऊन आपण 'न'वा पक्षमधे सामिल होत असल्याच अदितीने जाहीर केलं आहे. आणि ऐसीभारत ज्या दोन पक्षात होणार होते ते दोन्ही पक्ष फुटले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस्स्स्स्स्स्स्स्स्स!!!!!!!!!!

नेव्हर अंडरएष्टिमेट द पावर ऑफ 'न'वी आघाडी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(सर्व मापे अंदाजाप्रमाणे)
१. मुगाची किंवा चण्याची डाळ भिजायला टाकावी (मुगाची २०-एक मिनिटे, चण्याची ~१ तास)
२.अ नवलकोलाचा गड्डा कोवळा असेल, तर (हवा असल्यास) सोलून) ~१-इंच (~२.५ सेमी) आकाराचे चौकोनी/घनचौरस तुकडे करावेत.
२.आ गड्डा जून असेल, तर सोलून किसून घ्यावा. किसल्या नाही जात अशा शिरा मग टाकून देता येतात.
३. तेलात मोहरी, हळद, हिंग, (आवडत असल्यास कढिलिंब) यांची फोडणी करावी. लाल तिखट घालावे, भिजलेली-निथळलेली डाळ टाकावी, आणि मग फोडी/कीस परतायला टाकावा.
४. फोडी असल्यास रस हवा त्या मानाने पाणी घालावे, कीस असल्यास खाली लागू नये इतपत थोडेसे पाणी घालावे. उकळी/वाफ आल्यावर पाणी असलेले झाकण ठेवून १० मिनिटे मंद आचेवर भाजी शिजू द्यावी.
५. भाजी शिजत आल्यावर (आवडत असल्यास गूळ आणि) चवीनुसार मीठ घालावे.
६. आचेवरून उतरवल्यावर (आवडत असल्यास खोवलेले खोबरे आणि) चिरलेली कोथिंबीर घालावी.

पाने कोवळी असल्यास अख्खी पाने (किंवा शिरा काढून जितपत कोवळा भाग आहे, तेवढा ठेवून) अशीच वापरता येतात. पानांच्या भाजीत लाल तिखटाऐवजी हिरव्या मिरच्या चांगल्या लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाककृतीसाठी धन्यवाद. पण कांदा-लसूण अजिबात नाही ?
साधारणतः फोडणीच्या पालेभाज्यांत लसूण आणि/किंवा कांदा (बरेचदा इतर उग्र वास कमी करण्यासाठी) असतात म्हणून विचारतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वास थोडा उग्र असतो, खरे. पण हा उग्र वास मला आवडतो.
----
या प्रतिसादाला अवांतर, मूळ पककृतीकरिता पुरवण्या :
१. नवलकोलाचा कीस न करता ते खोवताही येते.
२. नवलकोलाच्या किसाची भाजी असेल, तर फोडणीत डाळ टाकण्याऐवजी नंतर चण्याच्या डाळीचे पीठ पेरता येते. पीठ पेरलेली भाजी भरपूर तेल पीते.
---
(पुन्हा लसूण)
ऑलिव्ह ऑईल, लसूण मंद परतून, त्यात नवलकोल पाने व कीस कीस घालून, मग शिजल्यावर मिरपूड, मीठ, व्हिनिगर घालूनही भाजी चांगली लागेलसे वाटते. नवलकोलाच्या पानांची अशी भाजी मी केलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साधारण अशीच रेसिपी वापरुन (पाणी न वापरता केवळ वाफेवर व हिरव्या मिरच्यांची फोडणी) अरुगुला, केल, स्विस चार्ड वगैरेंच्याही पालेभाज्या केल्या आहेत. मेथी-शेपूऐवजी चवबदल म्हणून चांगल्या वाटल्या. प्रयोग यशस्वी झाल्यावर अनेकदा आवडीने केल्या आहेत. जिज्ञासूंनी स्वतःच्या हिमतीवर करुन पाहाव्यात. स्विसचार्ड व अरुगुला या भाज्या शिजवल्यावर मेथी/पालकाप्रमाणे आकसून जातात. केलचे आकारमान साधारण तेवढेच राहते त्यानुसार कितपत भाजी शिजवायची याचा अंदाज घेता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला माझ्या धाग्यावर काही श्रेणी देता येत नाहीय. खरंच माहितीपूर्ण!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

@मनोबा - तुला ब्रोकोली हवी असेल तर मॉल मधल्याभाजी बाजारत तर मिळेलच पण नाहीतर त्या मारवाडी लोकांच्या टिपीकल सुपरमार्केट किराणा दुकानांमधेही मिळेल (आय होप मकी ने तेच सुचवलं आहे बाय सेइंग छोटेखानी सुपरमार्केट). त्यांच्या कडे ब्रोकोली, बेबीकॉर्न, त्या रंगीबेरंगी सिमला मिरच्या, मशरुम, टोफू असं बरंच काही मिळतं. पण बर्‍याचदा त्यांच्याकडे फ्रेश नसतं असा अनुभव आहे. त्यामूळे मॉल मधल्या भाजीबाजारातून आणण्याला प्राधान्य देतो, ओशन मधे छान मिळतात भाज्या. मंडई किंवा तत्सम भाजीबाजारात ही हमखास मिळतं.
(अता एवढं सांगतिलं आणि टाइपलं आहे तुझ्यासाठी तर एक ब्रोकोलीची रेसेपी येऊ दे मनोबा तुझ्याकडुन ;))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नैतर ग्रीन टोकरी कडून मागव हे सगळं हमखास फ्रेश असतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सॅलड छान दिसतंय. पण ब्रोकोलीविषयी फार प्रेम नसल्यामुळे हे सॅलड ब्रोकोलीशिवाय केलं तर? असा प्रश्न मनात आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"अंडे न घालता ही पाककृती करता येईल का?" या शाश्वत यक्षप्रश्नाची या निमित्ताने आठवण झाली Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डीहायड्रेटेड वॉटर ("जस्ट अ‍ॅड वॉटर!") चे पेटंट घेण्याचा विचार केलाहेत का हो कधी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टुक्सेडो या इंग्रजी सिनेमात असंच काहीतरी दाखवलंय! म्हणजे कसले तरी जंतु मिश्रित पाणी प्यायलं की सगळ्या शरीराचंच डिहायड्रेशन होतं म्हणे! आपला जॅकी चॅन वाला हो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला तिर्शिङ्ग्राव, टक्सीडो हा कुठल्या जमान्यातला पिच्चर तुम्हांस अजून आठवतो म्हंजे कमालच आहे! आम्हांस तर त्यातील क्याथरीनतै झीटा जोन्सच तेवढ्या अजून आठवताहेत. बाकी स्मरण गेले कुठल्या कुठे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्यामधे कॅथरीन नव्हे जेनिफर लौ हेविट बाई होत्या, अमळ जुना असल्याने विस्मृती झाली असावी किंवा आय सिज व्हॉट माइंड वॉन्ट्स टू सी असे असावे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्र हो की. चूक झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त!! करुन बघणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! इतकं रंगीबेरंगी सलाडं करून कुणी घातली तर मी हा हा म्हणता बारीक होईन! पण - असो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मस्त कलंदरला दत्तक जाऊन पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उपोषण नावाची पाकृ बारीक होण्यासाठी उपयुक्त होय.
शिवाय काही न बनवणे, आणि काही न खाणे हीच त्या पाकृ ची महत्वाची अंगे असल्याने करण्यासही सोपी!
स्वतःच्या जबाबदारीवर निदान काही महिने तरी करुन पहावी Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ज ब र द स त ! ! !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अवांतरः आता इथे पाककृतींची चर्चा चाललीच आहे तर मीही वाहत्या गंगेत हात धुऊन घेते. रविवारी एका मैत्रीणीने एक सुकेळी आणली होती आणि तिचं काय करायचं असतं हे तिलाही ठाऊक नव्हतं. तर तिच्या आणि माझ्या भल्यासाठी सुकेळीचं नक्की काय करतात, नुसतीच खातात की तिची वेगळी पाकृ असते हे सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

म्हणजे दुसरं काही करत असतील लोकं पण आम्ही तरी नुसतंच खातो. तुकडे करून 'टूटी-फ्रूटी' सारखे आईसक्रीममधे किंवा सॅलड मधे घालता येतील कदाचित.

"एक सुकेळी आणली होती" यामुळे तू दुसरं काही म्हणतेयस का काय अशी शंका वाटत्येय. सुकेळं = वाळवलेलं राजेळी केळं. एका पॅकात निदान सहा असतात.

अवांतरः "या सुकेळ्यांपेक्षा मला त्यांचं ते प्याकिंगच अधिक आवडतं" - पु.ल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

मी वरचा प्रतिसाद लिहिल्यानंतर ते पॅकिंग उघडलं. एक सुकेळी म्हणजे एक पॅक होता आणि आकारावरून आत एक मोठं केळच असेल असं वाटलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

मीही बर्‍याचदा नुसतीच खाल्ली आहेत. वसईला एका मित्राकडे तुपावर परतून किंचित कॅरॅमलाईज्ड् केलेला पदार्थ खाल्लेला आठवतो, पण ती बहुधा राजेळी होती - सुकेळी नव्हेत.

एक निराळी रेसिपी सापडली इथे - http://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle/food/articleshow/411496...? (तांदूळ बहुधा 'उसंडु'न आलेत या पाकृत).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे ती तर भरली केळी. मी वर्षभर फोटो जपून ठेवलेत पा.कॄ. टाकायला! एकदा जमवतोच आता.

त्या लिंकवरची रेसिपी पाहिली. मका आणि सुकेळ्याची मिरची/कोथिंबीर घालून खिचडी??? 'ब्लू-मंडे' ला केल्येय का काय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....