मला जमेल हे?

कितीही धावपळ-दगदग-तणाव असोत, वेळात वेळ काढून, पुस्तकं विकत घेणं - वाचत रहाणं सुरूच असल्याने असेल कदाचित,

ह्या लेखातील बाकी फारसं काही समजलं नाही, पण खालील परिच्छेद चटकन को-रिलेट करता आला---

"रोज संध्याकाळी पुरणपोळीसोबत- केळ्याची शिकरण टाइपच्या दूरचित्रवाणी मालिका बघा, मग लोणच्यासारखं लावायला एखादा विनोदी कार्यक्रम बघा. शिवाय व्हॉट्स-अॅपवर आलेलं एखादं ग्राफिक, फोटो किंवा व्हिडियो बघा-ऐका. मग जमलंच तर फेसबुकवर शेकडो-हजारो लोकांसमोरची आपली प्रतिमा धडधाकट आहे ना ते बघत राहा, वाटल्यास आणखी दुसऱ्यांच्या प्रतिमा बघा. मग अधूनमधून सामाजिक-राजकीय भान वाढवायला वृत्तवाहिन्यांवरचे बेभान चर्चांचे चिकन खाल्ल्यासारखे झणझणीत कार्यक्रम बघा. शिवाय घराबाहेर जाऊन थेटरात-मल्टिप्लेक्सात एखादा चित्रपट बघता येईल. किंवा अगदीच चोखंदळ रसिकबिसिक असाल तर नाटक बघा. शिवाय सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पुन्हा पोटापाण्यासाठी रोजचं काम बघायचं असतंच." --- तरुण कादंबरीकार अवधूत डोंगरे.

सध्या फेसबुकवर जो काही वेळ देतेय किंवा whatsappवर नजर फिरवतेय, किंवा वेळेवर घरी येऊ शकले तर जेवता-आवरताना एकीकडे जितपत टी.व्ही. नजरेसमोरून हलतोय तो बघितला जातोय... हे सगळे तात्पुरते बंद केले तरच जमवलेली पुस्तके वाचण्यासाठी वेळ देता येऊ शकेल.

मला जमेल हे?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मला जमेल हे?

चित्रा प्रश्न हा आहे की इतका वेळ टीव्हीत बुडणारा वर्ग मराठी संस्थळावर यायची तरी तसदी घेतो का? नसेल तर मग हा प्रश्न त्या वर्गापर्यंत पोचणारच नाही. निव्वळ अरण्यरुदनच ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जमेल हो जमेल..
स्वानुभव आहे. कष्टपूर्वक दोन आठवडे टिव्ही बघायचे सोडून द्या, मग सवयीने टिव्हीचा कंटाळा येऊ लागेल Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जमवायचंच म्हटल्यावर काहीही जमतं; पण जमवलेली पुस्तके वाचून करायचं काय ते समजलं नाही.
म्हणजे वर दिलेल्या यादीतल्या गोष्टी करणे आणि जमवलेली पुस्तके वाचणे यात नेमका काय फरक आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"रोज संध्याकाळी पुरणपोळीसोबत- केळ्याची शिकरण टाइपच्या दूरचित्रवाणी मालिका बघा, मग लोणच्यासारखं लावायला एखादा विनोदी कार्यक्रम बघा. शिवाय व्हॉट्स-अॅपवर आलेलं एखादं ग्राफिक, फोटो किंवा व्हिडियो बघा-ऐका. मग जमलंच तर फेसबुकवर शेकडो-हजारो लोकांसमोरची आपली प्रतिमा धडधाकट आहे ना ते बघत राहा, वाटल्यास आणखी दुसऱ्यांच्या प्रतिमा बघा. मग अधूनमधून सामाजिक-राजकीय भान वाढवायला वृत्तवाहिन्यांवरचे बेभान चर्चांचे चिकन खाल्ल्यासारखे झणझणीत कार्यक्रम बघा. शिवाय घराबाहेर जाऊन थेटरात-मल्टिप्लेक्सात एखादा चित्रपट बघता येईल. किंवा अगदीच चोखंदळ रसिकबिसिक असाल तर नाटक बघा. शिवाय सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पुन्हा पोटापाण्यासाठी रोजचं काम बघायचं असतंच."

उगीच वाक्यावाक्याला उपरोध, उपहास किंवा वक्रोक्ती करुन जे आहे त्याबद्दल गिल्टी, असमाधानी वगैरे राहून जे आपण सध्या करत नाही ते करण्यासाठी कायकाय सोडावे लागेल किंवा हे सोडून ते करण्याने कसले फायदे मिळतील की जे सध्या आपण गमावतोय.. अशा प्रकारे कशाला विचारमंथन करायचे?

टीव्ही, सिनेमा किंवा तत्सम माध्यमांचा पगडा वाढल्याने "बघे" तयार होत असतील तर पुस्तकाचा पगडा वाढल्याने "वाचे" किंवा "पढिक" तयार होतील काय ?

अमुक प्रकारची करमणूक तमुकपेक्षा श्रेष्ठ किंवा उच्च असं कसं ठरवायचं? आवडीने जे करतोय ते टाळून न केल्या जाणार्‍या गोष्टीसाठी वेळ कशाला तयार करायचा?

बिलीव्ह मी, जो बातम्यातल्या चर्चा बघून असमाधानी असतो, जो व्हॉट्सअ‍ॅप करताना असंतुष्ट असतो, जो मल्टिप्लेक्समधे सुखी नसतो तो कादंबरी वाचूनही असमाधानीच राहणार.

कारण आपल्या हातातून काहीतरी निसटतंय असं फीलिंग सर्वत्र येणं यावर काही उपाय नाही.

सध्या फेसबुकवर जो काही वेळ देतेय किंवा whatsappवर नजर फिरवतेय, किंवा वेळेवर घरी येऊ शकले तर जेवता-आवरताना एकीकडे जितपत टी.व्ही. नजरेसमोरून हलतोय तो बघितला जातोय...

टीव्हीसुद्धा तुम्ही मजेने बघत नाही, नजरेसमोरुन जाताजाता जितपत हलतोय तितका पाहता आणि तोही टाळण्याचा विचार करता.. पुस्तकाबाबत काय वेगळे होणार ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> टीव्ही, सिनेमा किंवा तत्सम माध्यमांचा पगडा वाढल्याने "बघे" तयार होत असतील तर पुस्तकाचा पगडा वाढल्याने "वाचे" किंवा "पढिक" तयार होतील काय ?
अमुक प्रकारची करमणूक तमुकपेक्षा श्रेष्ठ किंवा उच्च असं कसं ठरवायचं? आवडीने जे करतोय ते टाळून न केल्या जाणार्‍या गोष्टीसाठी वेळ कशाला तयार करायचा? <<

'कादंबरीवाचन हे इतर उपरोल्लेखित गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे' असं इथे लेखकाला अभिप्रेत नसावं. बहुसंख्य मराठी लोक आपला वेळ नक्की कशा प्रकारच्या गोष्टींमध्ये घालवतात, आणि आपण अंतर्मुख व्हावं असं त्या आपल्या वर्तनात काही आहे का, ह्याविषयी (त्या लोकांपैकीच एक व्यक्ती असलेल्या) वाचकानं स्वतःला प्रश्न विचारणं अभिप्रेत असावं. धागालेखिकेला हा प्रश्न पडलेला आहे. इतरांनादेखील अशा प्रकारचे प्रश्न पडत आहेत हेदेखील दिसतं आहे. त्यामुळे ह्या म्हणण्यात तथ्य असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अवधूतचा लेख वाचनाबद्दल उदासीन मराठी लोकांबद्दलच थोडाफार का होईना पण उपहासानेच लिहिलेला आहे...

बहुसंख्य मराठी लोक आपला वेळ नक्की कशा प्रकारच्या गोष्टींमध्ये घालवतात, आणि आपण अंतर्मुख व्हावं असं त्या आपल्या वर्तनात काही आहे का,

हे कदाचीत शक्य असेल पण हे असले तुच्छतादर्शक लेख त्यांच्या पुस्तकांचा खप वाढवण्यास फारसा हातभार लावणार नाहीत हे नक्की, पण ते त्यांना अपेक्षितही नसावे, त्यांना फक्त सद्य समाजपरिस्थितीवर एक भाष्य करायचे असणार, आणि ते भाष्य आम्ही(त्यातल्या त्यात वाचणारे) इतर बेचव फॉरवर्ड वाचताना चवीला म्हणून लोणच्याप्रमाणे वाचुन ढेकर देणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण हे असले तुच्छतादर्शक लेख त्यांच्या पुस्तकांचा खप वाढवण्यास फारसा हातभार लावणार नाहीत हे नक्की, पण ते त्यांना अपेक्षितही नसावे,

खप वाढणे अपेक्षित नसते, तर त्या 'शिकरणीबरोबर पुरणपोळी'च्या दिलखेचक (परंतु तितक्याच निरर्थक) क्लीशेवजा रूपकाचे काहीच प्रयोजन नसते. उलटपक्षी, ते रूपक एका विशिष्ट प्रकारच्या वाचकवर्गाची वाहवा मिळविण्याच्या दृष्टीने टार्गेटेड असल्याची शंका वाटते. आणि त्याही प्रयत्नांत ओव्हरबोर्ड जाऊन उगाच ते 'झणझणीत चिकन'चे झापडबंद नि ष्टीरियोटिपिकल रूपक योजून प्रकरण निव्वळ हास्यास्पद बनवून घेतलेले आहे.

('चिकन' बोले तो फक्त 'झणझणीत'? ऑ, कमॉन! 'चिकन' म्हटल्यावर फक्त 'झणझणीत' एवढे एकच विशेषण जर डोळ्यांसमोर चटकन उभे राहत असेल, तर मर्यादांचे केविलवाणेपण ताबडतोब लक्षात येते. बोले तो, आमच्याही मर्यादा फार विस्तृत असल्याचा दावा नाहीच म्हणा, कारण शेवटी, पु.लं.नी म्हटल्याप्रमाणे, आम्हीही शेवटी इ.इ., परंतु तरीही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिलीव्ह मी, जो बातम्यातल्या चर्चा बघून असमाधानी असतो, जो व्हॉट्सअ‍ॅप करताना असंतुष्ट असतो, जो मल्टिप्लेक्समधे सुखी नसतो तो कादंबरी वाचूनही असमाधानीच राहणार.
कारण आपल्या हातातून काहीतरी निसटतंय असं फीलिंग सर्वत्र येणं यावर काही उपाय नाही.

विचार करावा लागेल. फेसबूक, पिक्चर, पुस्तक, मोबाईल, ऑफिसातले रियल इस्टेटवर्(च) गप्पा मारणारे सहकारी यांत असताना मला असमाधान वाटते. एकंदर नेटवर असे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे असले काहीतरी (बोले तो, उद्धृत परिच्छेदासारखे) वाचणे (आणि, लिहिणार्‍याच्या बाबतीत, लिहिणे) जर कटाप केले, तर त्यातून मोकळा होणारा वेळ कदाचित आपल्याला हवा तसा सत्कारणी लावता येईल, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

आय मीन, कमॉन! पुरणपोळीसोबत केळ्याची शिकरण कोण खातो? काहीही! हाय कंबख्त, तूने शिकरणदेखील खायीही नहीं!

(बादवे, 'डोंगरे' म्हणजे नेमके कोण? भटांच्या खाण्यापिण्याच्या सवयी ह्याबिच्युअली ओढूनताणून विनाकारण ज्यातत्यात आणून त्यांना नाके मुरडणार्‍या - किंवा, इतर कोणी मुरडल्यास गुदगुल्या होणार्‍या - जातींपैकी, की ह्याबिच्युअली विनाकारण सेल्फ-लोदिंग भटांपैकी?)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

सन्माननीय अपवाद (असल्यास) वगळून.१अ

१अ ही असली काहीतरी डिस्क्लेमरे पॉलिटिकली करेक्ट राहण्याकरिता टाकणे इष्ट असते.

या क्याटेगरीस अपवाद हवे तेवढे सापडावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डोंगरे - कोब्रा असावेत.
मामीच्या बहीणीचे सासरचे नाव डोंगरे होते. मामी कोब्रा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग अधूनमधून सामाजिक-राजकीय भान वाढवायला वृत्तवाहिन्यांवरचे बेभान चर्चांचे चिकन खाल्ल्यासारखे झणझणीत कार्यक्रम बघा.

ईईईईईईईईईईईईईईईईईईईईई!!!!!!! म्हणजे हा भटुरडा हाडे का चोखतो???

(कोब्रा असूनही 'शिकरण पुरणपोळीबरोबर खात नाहीत' हे जर ठाऊक नसेल, तर हाइट आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0