चुकीचा संदेश

प्रिय चार्वी

फेसबुकावर एक भिरभिरणारा एक व्हीडीओ नुकताच पाहीला आणि मला धक्का बसला. स्त्री-सक्षमीकरणाचा संदेश चुकीच्या रितीने त्यात दिला आहेच पण त्याचे परिणाम समाजमनावर किती विचित्र परिणाम होऊ शकतात याचा विचार त्या क्लिपच्या (बिनडोक) निर्मात्याने अजिबात केलेला दिसत नाही.

तू अशा परिस्थितीत सापडलीस आणि अशीच वागलीस तर बाप म्हणुन मला ते अजिबात आवडणार नाही. विचार कर गर्दीमध्ये जर हे घडलं तर तर तिथला जमाव नाहक एका निरपराध तरूणाला मरेपर्यंत मारू शकतो. विचार न करता प्रत्युत्तर म्हणजे सक्षमीकरण नाही.

मग काय करायचे?

शक्यतो दुर्लक्ष करायचे, किंवा न चिडता समज द्यायची (याला आपला समाज दूर्दैवाने कमकुवतपणा मानतो.) तरी पण परत कुणी त्रास देत असेल तर बाजुला व्हायचे. त्रास देणारी व्यक्ती मग मागे आलीच तर अवश्य चप्पल उगारावी. यामुळे त्रास कोण देत आहे हे ठरवायला/कळायला मदत होईल.

बिनडोक लोकांच्या हातात एखादे ताकदवान माध्यम गेले की अशा कलाकृती निर्माण होतात.

-- डॅड

संदर्भ - http://www.scoopwhoop.com/inothernews/girl-slaps-guy/

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सगळ्यात वाईट प्रकार रेडिओवरच्या जाहिराती. फक्त पोरिंचे कवतुक. अरे मुलांनी काय घोडे मारलेत का तुमचे? मंजे त्यात सरळ 'मुले काय कामाची' असे म्हटलेले नसते, पण त्या जशा रिपिट होतात, तेव्हा तोच भाव येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सेक्शुअल पुनरुत्पादन करणे हे मानवजातीचे जैविक दौर्बल्य असल्यामुळे पुरुषांचे अस्तित्व खपवून घ्यावे लागते त्याला इलाज नाय ओ.

एनीवे, आता टिपिकल प्रतिसाद येणारच. पण मज्जा नाय येणार एवढं निछ्छित! स्त्रीद्वेषाची पोष्टरे घेऊन आम्हांला चिकटवतात की नाय ते बगा.

शिवाय, भारताला वाचवण्याच्या शक्यतेपासून आपण लै दूर आलेलो आहोतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असं काही नाही.
१. मानवजात पुढे चालू ठेवणे आवश्यक नाही असे कोणास वाटू शकते. (संगोपन कठीण आहे, नको आहे म्हणून उत्पादन करू नये हा विचार बळावत आहे. तो सर्वत्र चरमपदावर पोहिचल्यास ही विचारसरणी पुढे येईल.)
२. आता स्त्रीयांच्याही देहात बीजांड न वापरता, पुनरुत्पादानाशी काहीही संबंध नसलेली पेशी वापरून नविन सजीव बनवता येतो. तसाही पुरुषाचा पुनरुत्पादनात फार रोल नसतो. http://www.nytimes.com/2012/08/25/opinion/men-who-needs-them.html
३. काही काळाने नक्कीच असे तंत्रज्ञान येणार आहे ज्याने ओव्हमचे फर्टिलायझेशन बिना स्पर्मने ट्रिगर व्हावे.
http://www.explorestemcells.co.uk/stem-cells-same-sex-reproduction.html

-------------
आजही य गुणसुत्र लहान होत चालले आहे, ते शेवटी नष्ट होईल, पुरुष संपतील (स्त्रीया तेवढ्या कायम राहतील) असे मानणारे अनंत विद्वान आढळतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

रोचक आहे. बाकी तूर्त तरी पुरुष नष्ट वैग्रे इज़ लिटल मोर द्यान अ वेट ड्रीम ऑफ सम इच्यारवंत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दृष्टीकोन आवडला. ती क्लिप खरच चूकीचा संदेश देते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0