कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी!
हे जग विरोधाभासाने, दांभिकतेने आणि दुटप्पीपणाने भरलेले आहे. हे जग फक्त बळीचा बकरा शोधत राहते. दोष देण्यासाठी! विशेषतः भारतीय सामाजिक आणि कौटुंबिक जीवन हे दुटप्पीपणाचे मोठे आगार आहे.
जो मुलगा लग्नाआधी आई वडिलांच्या शब्दाबाहेर नसतो आणि ज्याला स्वतंत्र विचार करण्याची सवय न लावता फक्त आई वडील सांगतील तेच ऐकायची सवय लावली जाते, त्याने लग्नानंतर बायकोच्या योग्य गोष्टी ऐकल्या तर त्याला बायकोचा बैल म्हटले जाते. मग तो आधी आई वडिलांचे ऐकत होता तेव्हा तो "बैल" का नसतो? लग्नानंतरच अचानक त्याचे बैलात रूपांतर कसे होते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
मुळात एखाद्याने कुणाचेही वैचारिक परावलंबित्व किंवा गुलामगिरी पत्करली तर तो निर्णयासाठी कुणावर तरी अवलंबून राहणारच आहे! त्यापेक्षा स्वतंत्र विचारशक्ती असणे केव्हाही चांगले!
पण स्वतंत्र विचारसरणीवाला मुलगा सुद्धा दांभिक विचारांचा बळी होण्यापासून सुटू शकलेला नाही. जर एखाद्या मुलाने एखादी गोष्ट आई वडिलांना न पटणारी केली तर हे दांभिक जग त्यात त्याच्या बायकोला बळीचा बकरा बनवते. याने नक्की बायकोचे ऐकून असे केले असे म्हटले जाते, भले त्याने त्या वेळेस बायकोचे ऐकले नसेल तरीही!
पण मुलाने जर आई वडिलांना योग्य वाटेल असा निर्णय घेतला तर त्या बाबत मात्र बायकोला जबाबदार धरत नाहीत. तेव्हा त्याने हा निर्णय स्वतः घेतला असे मानले जाते, मग त्याने त्या वेळेस बायकोचा सल्ला ऐकला असला तरी.
सुनेच्या ज्या गोष्टी पटत नाहीत त्याच लेकीने तीच्या सासरी केल्या तर चालतात.
मुलगा सुनेची बाजू घेतो ते चालत नाही पण जावयाने लेकीची बाजू घेतली पाहिजे असे वाटते.
एकीकडे मुलगा मुलगी समान असे म्हटले जाते, तर दुसरीकडे कर्तव्य पार पाडण्याच्या वेळेस फक्त मुलगाच आठवतो. हक्क मागायला मात्र प्रथम मुलगी हजर असते कारण आज स्त्री पुरुष समानतेचा जमाना आहे!!
"मुलगा सुनेचे ऐकतो, आमचे ऐकत नाही" असे मान्य करून आई वडील एक प्रकारे आपल्या मुलाला स्वत:ची विचार शक्ती नाही असे अप्रत्यक्षरीत्या मान्य करून स्वत: मुलावर केलेल्या संस्कारांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत असतात, नाही का?? विचार करा!!
आहे ना विरोधाभास?
तुम्ही या लिस्ट मध्ये आणखी भर घालू शकता, तुम्हाला आलेल्या अनुभवानुसार!
वस्तू विकण्यासाठी कायपण
वस्तू विकण्यासाठी कायपण विरोधाभास पचवले जातात.
"आम टूथपेस्टमें होते है नमक जैसे खुरदुरे तत्व जो आपके दांतोंको नुकसान पहुंचा सकते है"
"क्या आपके टूथपेस्ट में नमक है?"
किंवा मॅट्रिमोनीतले असंख्य..
"उच्चांतर्जातीय चालेल.." हे एका वाक्यात पॅरेडॉक्सचं उदाहरण आहे.
"आंतर्जातीय चालेल, एस्सीएस्टी क्षमस्व" हेही.
सध्या एक कोणीतरी मुलगी तिच्या मॅट्रिमोनी वेबपेजमुळे चर्चेत आहे. तिने स्वतःचे वर्णन टॉमबॉय, लहान केस आणि कधीच वाढवायचे नाहीत, चष्मिस इत्यादि इत्यादि करुन "लुकिंग फॉर" या अपेक्षांमधे एक कलम असंही जोडलं आहे की "अॅडिशनल पॉईंट्स फॉर हेटिंग चिल्ड्रेन"
हे सर्व प्रामाणिक आणि चांगलंच आहे. तिचं कौतुकही होतंय आणि टीकाही. पण कौतुक जास्त, कारण न्यूजपेपर्समधे वगैरे निश्चित कौतुकाच्या स्वरात आलेलं आहे.
पण हे फक्त निमित्त होऊन एक विचार आला. समजा...
एखाद्या पुरुषाने याच लाईन्सवर प्रोफाईल बनवलं आणि "मी मागून टक्कल पडलेला, सोडावॉटर चष्मेवाला, बुटका, घरी बसून आयते खाऊ इच्छिणारा, परम मातृभक्त, स्वतःची आणि सासूसासर्यांची सेवा करणारी बायको इच्छिणारा, तिचे केस नेहमीच लांबच हवे असणारा. तिला दरवर्षी एक या दराने पोरं हवीत अशी इच्छा असलेला. घरदार भरलेलं हवं असं मानणारा. अशा प्रकारचा मजकूर टाकला तर त्याला "प्रामाणिक" म्हटलं जाईल की "एमसीपी"?
;)
लाईफ इज फुल्ल ऑफ पॅरेडॉक्सेस.
लाईन नक्की कोणती
एखाद्या पुरुषाने याच लाईन्सवर प्रोफाईल बनवलं आणि ...
या मुलीची लाईन नक्की कोणती असं तुम्हाला वाटतं?
माझ्या मते, ही मुलगी प्रस्थापित व्यवस्था, अपेक्षा मोडणारी, थोडक्यात बंडखोर आहे. तिच्याच लायनीवर जायचं तर पुरुषाचं प्रोफाईल, "मी स्वतःच्या रंगरूपाची काळजी घेणारा, दहा मिनीटं उन्हात जायचं असेल तरीही सनस्क्रीन लोशन लावणारा, फक्त निव्हीयाचंच लिपक्रीम वापरणारा, स्वयंपाक आवडणारा, पोराबाळांमध्ये रमणारा, नोकरी-करियरबद्दल महत्त्वाकांक्षा नसणारा .... " असं काहीतरी पाहिजे. पारंपरिक, स्टिरीओटिपिकल एमसीपी पुरुष बंडखोर ठरत नाही.
लाईफ इज फुल्ल ऑफ पॅरेडॉक्सेस.
बरोबर.
लोकसत्ताचं उदाहरण घेऊ.. पण
लोकसत्ताचं उदाहरण घेऊ..
पण याहून जास्त खरा वाटला तो तिचा प्रामाणिकपणा आणि आपण जसे आहोत तसं स्वीकारावं ही इच्छा. .
स्वत:चं खरंखुरं वर्णन नि स्पष्ट, रोखठोक अपेक्षा तिने त्यात मांडल्या. 'कुंटुबाच्या गोतावळ्यात रमणारा नवरा नको. एक्स्ट्रा पॉइंट्स टू द वन हू हेट्स किड्स', असंही इंदुजानं अपेक्षांमध्ये लिहिलं होतं
कोणती बाजू डिफेंड करायची ते आधीच ठरवलेलं असलं की मग प्रामाणिकपणा हायलाईट होतोय की फक्त बंडखोरपणा हे तपशिलात जाऊन पाहिलं जात नाही.
खराच आहे तुझा मुद्दा. दाढीवाला, वन हू हेट्स किड्स आणि not a famiy man हे अपेक्षालेखन जर रोखठोक अन प्रामाणिक तर मग गोरी, लांब केस , सेवाभावी , उत्तम स्वैपाकीण असं लिहिलं तर ते रूढीप्रिय पुरुषप्रधान घिसंपिटं पुरुषी एमसीपीत्व मानलं जाईल की स्पष्ट अन प्रामाणिक?
कोणती बाजू डिफेंड करायची ते
कोणती बाजू डिफेंड करायची ते आधीच ठरवलेलं असलं की मग प्रामाणिकपणा हायलाईट होतोय की फक्त बंडखोरपणा हे तपशिलात जाऊन पाहिलं जात नाही.
खराच आहे तुझा मुद्दा. दाढीवाला, वन हू हेट्स किड्स आणि not a famiy man हे अपेक्षालेखन जर रोखठोक अन प्रामाणिक तर मग गोरी, लांब केस , सेवाभावी , उत्तम स्वैपाकीण असं लिहिलं तर ते रूढीप्रिय पुरुषप्रधान घिसंपिटं पुरुषी एमसीपीत्व मानलं जाईल की स्पष्ट अन प्रामाणिक?
पर्ति घेन्र कं?
एक्स्ट्रा पॉइंट्स टू द वन हू
एक्स्ट्रा पॉइंट्स टू द वन हू हेट्स किड्स'
हफपोस्ट, गार्डियन, न्यू यॉर्क टाईम्स वगैरे चाळले तर साधारण आठवड्यातून एकदा तरी "अमक्या बाईला मुलं नाहीत तरीही ती आनंदात आहे" अशा प्रकारच्या बातम्या असतात. निष्कर्ष, भारतापेक्षा जिथे जास्त स्त्रीपुरुष समानता आहे त्या यूएस, यूकेत स्त्रियांना मुलं नाहीत म्हणून सामाजिक दडपणं येतात.
या बातमीचं कोणत्याच माध्यमांमध्ये आलेलं वार्तांकन पाहिलेलं, वाचलेलं नाही. पण तरीही "आंतर्जातीय, एस्सी. एस्टी क्षमस्व" असल्या प्रामाणिकपणाच्या बातम्या का होत नाहीत याचं स्पष्टीकरण मला अजूनही मिळालेलं नाही.
माझ्या दृष्टीने कारण स्पष्ट आहे, प्रतिगामीपणातल्या प्रामाणिकपणाचं उदात्तीकरण कोणी करत नाहीत, प्रवाहाविरोधात पोहोणाऱ्यांचं कौतुक होतं. या मुलीची बंडखोरी, फक्त बंडखोरीकरता केलेली आहे असं वाटत नाही. त्यात भारतीय (आणि जगात सगळीकडेच असणाऱ्या) पुरुषप्रधानतेला धक्का दिलेला आहे, म्हणून या प्रवाहाविरोधात पोहोण्याचं कौतुक आहे. त्यातही लग्न करायचं आहे, (कशी का होईना) जाहिरात देऊन जोडीदार शोधायचा आहे ( = आपल्या सामाजिक वर्तुळात शोधून, काय ते करून सवरून मोकळी झाली नाही) अशा प्रकारची पारंपरिक पद्धत दिसते म्हणून या मोजक्या बंडखोरीचं अधिक कौतुक केलं असेल का? या मुलीची बंडखोरी कमी वाटावी अशा अनेक स्त्रिया माझ्या व्यक्तिगत ओळखीच्या आहेत. त्यांच्याबद्दल कसल्याही प्रकारच्या बातम्या छापून येत नाहीत. त्या सुखासमाधानात आपलं प्रसिद्धीहीन आयुष्य जगत आहेत.
(ही कल्पना चांगली आहे. या शीर्षकाच्या बातमीचा अनियनी कल्पनाविस्तार लिहायला पाहिजे : "पिक्सी कट केलेली, लग्न न केलेली, चाळीशीची, मराठी मध्यमवर्गीय स्त्री तिसऱ्या बॉयफ्रेंडशी ब्रेकपनंतर आनंदात")
आंतर्जातीय, एस्सी. एस्टी
आंतर्जातीय, एस्सी. एस्टी क्षमस्व.ही फ्रेज मी या मुलीच्या अपेक्षांचे पुरुषी उदाहरण देताना कुठेच वापरलेली नाही..ते एक पूर्ण वेगळे पॅरेडॉक्सचे उदाहरण होते..ते वधूकडूनच अनेकदा येत असतं.इथे मी तिच्या अपेक्षांचेच केवळ तत्सम पुरुषसाइडचे इक्विव्हॅलंट दिले होते.
.तरी ते एस्सीएस्टी क्षमस्व तिकडून उचलून इथे का वापरलं जातंय ते कळलं नाही.
..खालील अपेक्षांत जातीय काय शब्द आहेत? वरचेच पुन्हा पेस्टवलेय.इट्स जस्ट सिमिलर इक्विव्हॅलंट ऑफ स्पष्ट प्रामाणिक अपेक्षा.अॅज नॉन जातीय अॅज हर वर्डस.
एखाद्या पुरुषाने याच लाईन्सवर प्रोफाईल बनवलं आणि "मी मागून टक्कल पडलेला, सोडावॉटर चष्मेवाला, बुटका, घरी बसून आयते खाऊ इच्छिणारा, परम मातृभक्त, स्वतःची आणि सासूसासर्यांची सेवा करणारी बायको इच्छिणारा, तिचे केस नेहमीच लांबच हवे असणारा. तिला दरवर्षी एक या दराने पोरं हवीत अशी इच्छा असलेला. घरदार भरलेलं हवं असं मानणारा. अशा प्रकारचा मजकूर टाकला तर त्याला "प्रामाणिक" म्हटलं जाईल की "एमसीपी"?
एवड्या उशीरा इंदुबाइ (?) ऐसीवर प्रकटल्याचे जर आश्चर्यच आहे
मलाही ते प्रकरण बरंच अजब वाटलं होतं.. म्हणजे फक्त विरोधाभासी एक्स्प्रेशन. वेबपेज क्रिएट करुन व्यक्त व्हायची आयडीया आवडलीच. तिच्या विरोधाभासी मतांवर एक धागाच काढायचा विचार होता पण रद्दबातल केला एक तर ती विनाकारण वैयक्तीक टिका झाली असती आणी महत्वाचे म्हणजे शी इज जस्ट अ किड. २३ यर ओल्ड. अँड शी हॅव फुल राइट टु एक्सरसाइज "चुका आणी शिका" धोरणा. जरा वयस्कर व्यक्तीने असा प्रोफाइल लिहला असता तर... सवीस्तर विचार नक्किच मांडले असते. एनीवे. ऑल दी बेस्ट टु हर. २३ इज नॉट एज फॉर अॅन इंजीनीअर टु गेट मॅरेड. बट इफ शी वांट, शि वांट. दॅट्स इट.
एक विनंती
शी इज जस्ट अ किड. २३ यर ओल्ड. अँड शी हॅव फुल राइट टु एक्सरसाइज "चुका आणी शिका" धोरणा. जरा वयस्कर व्यक्तीने असा प्रोफाइल लिहला असता तर... सवीस्तर विचार नक्किच मांडले असते. एनीवे. ऑल दी बेस्ट टु हर. २३ इज नॉट एज फॉर अॅन इंजीनीअर टु गेट मॅरेड. बट इफ शी वांट, शि वांट. दॅट्स इट.
मालक,
इंग्रजी लिहिताना देवनागरीत लिहिल्याबद्दल आक्षेप नाही. (मीही लिहितो अनेकदा. मराठी परिच्छेदात मध्येच इंग्रजीतून लिहिताना लिपी बदललेली चमत्कारिक वाटते. त्यामुळे ते ठीकच आहे.) पण एक कळकळीची विनंती आहे.
नाही म्हणजे, इंग्रजीत लिहायचेच झाले, तर इंग्रजीच्या गेला बाजार बेसिक व्याकरणाची आईबहीण एक न करण्याची काळजी घेऊ शकाल काय प्लीज?
आगाऊ आभार.
आदाब!
देन व्हाय आर यु क्राइंग लाइक
'लाइक' भयंकर आवडले. :) (कॉलेजच्या दिवसांची आठवण आली.) क्या बात है!
कन्सिडर इट अ रिवेंज अगेन्स्ट ब्रिटीशाज एंपायरो.
अरे, हे तर (थोड्याफार फरकाने) आम्हीच अन्यत्र म्हटले आहे. ग्रेट माइंड्स थिंक अलाइक (किंवा फूल्स सेल्डम डिसग्री). आदाब!
आणी तरीही नबाच्या...
आय लव्ह यू, टू!
सर्वप्रथम माझ्या मतावर अवांतर
सर्वप्रथम माझ्या मतावर अवांतर प्रतिक्रीया देउन विषय न भरकटवल्याबद्दल अभिनंदन. कारण आल्याभट्ट बचाव समर्थकांडून वा त्यांच्या सहानुभुतीदारांकडून हा प्रयत्न वारंवार होतो जेंव्हा मत व्यक्त करायची वेळ येते. बर्याच लोकांना क्रिटीसिजम सहन होत नाही अन ते फाटे फोडायला सुरुवात करतात. कारण मुद्याचे बोलणे त्यांच्या आवाक्याबाहेर असते.
बाकी मी का व्यक्त होणार नाही याबद्दल माझे मत मी वरच स्पष्ट केले आहे. पण तरीही तिच्या मताचा पुरस्कार संस्थळावरील एखाद्या जेष्ठ व्यक्तीने हिरीहिरीने केला तर अवश्य प्रतिवाद करेन. पण उगाच इंदुला विनाकारण टिकेचे धनी बनवण्यात मला रस नाही कारण ती खरच अजुन फार लहान आहे. शि इज इनोसंट अँड आय कांट गो ब्रूटल फोर धिस रिजन. तेंव्हा एखाद्या जेष्ठ व्यक्तीने इंदुचे वकीलपत्र घेतले बरे होइल..
अभिनंदनासाठी आभार . इंदुचे
अभिनंदनासाठी आभार :-).
इंदुचे वकीलपत्र कोणा ज्येष्ठाने घ्यायची आवश्यकता आहे असे मलातरी वाटत नाही. तिने ज्या अपेक्षा लिहील्या आहेत त्या ३०+ किंवा ४०+ स्त्रिच्यादेखील असू शकतात. फक्त त्या लग्नासाठी शोध घेणे वगैरे करतील का हा प्रश्न आहे. तर अशाच एखाद्या इम्याजनरी स्त्रिच्या अशाच डिट्टो अपेक्षांना तुम्ही नक्की कसे काउंटर अर्ग्यु करणार आहात याची उत्सुकता आहे. चर्चा अशी करायची नाहीचय. कोण बरोबर कोण चूकची पकडापकडीही नकोय. फक्त तुमचा दृष्टीकोन काय आहे याची उत्सुकता. तेपण तुम्हीच उल्लेख केलात म्हणून. सांगायचा की नाही हा तुमचा निर्णय.
४२ पैकी थोडे वगळता सगळे भरकटलेले प्रतिसाद!
४२ पैकी थोडे वगळता बाकी सगळे प्रतिसाद हे भरकटलेले किंवा प्रतिसादाला प्रतिसाद द्यायचे म्हणून मूळ विषयाला थोडे सोडून प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या.
मूळ कौटुंबिक विषयाला धरून प्रतिसाद आले तर जरा उन्हाळ्यात थंडगार वाऱ्याची झुळुक आल्यासारखे बरे वाटेल....
मूळ विषयाला धरून प्रतिसाद मिळतील का?
सुनेने आपल्या आईवडिलांऐवजी
सुनेने आपल्या आईवडिलांऐवजी आपले ऐकावे असे वाटणार्यांना मुलाने आपले टाळून सासु-सासर्यांचे ऐकलेले आवडत नाही.
आपला नवरा घरात "जर्राही" मदत करत नाही म्हणणार्या बायका आपल्या मुलग्यांना घरातले काम शिकवत नाहीत
"आधुनिक" पेहराव घालणारी बायको आवडणार्या मुलाला आईने, आजीने, मुलीने बॉब करून, लोवेस्ट जीन्स टिशर्ट घालून किंवा स्लीव्हलेस किंवा डीपनेक टॉप घालून लोकांसमोर आलेले आवडत नाही.
अजूनही आहेत तुर्तास इतकेच. मग वेळ मिळाला की भर घालेन