ही बातमी समजली का? - ७२

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
========================================================================================================

http://www.hindustantimes.com/india-news/ranaghat-rape-case-two-key-accu...
बांग्लादेशी इमिग्रंट हिदू आणि स्थानिक मुस्लिम चर्चच्या ननच्या रेपचे संभावित आरोपी.

आग्र्याच्या (इथे मुस्लिम प्रेमिने ख्रिश्चन मुलीसाठी चर्चवर अन्याय (जे काय ते) केलेला) केस मधे उजव्या (प्रशासन, पक्ष वा आर एस एस असोच, मवाळ किंवा कडव्या उजव्या) लोकांचाही काही एक संबंध नसताना मोदी सरकार ख्रिश्चनांवर अन्याय वाढले म्म्हणून बदनाम होते आहे.

ही बदनामी स्पाँसर्ड तर नाही अशी आता भिती वाटू लागली आहे.

field_vote: 
0
No votes yet

Be bold, not paranoid

As former Prime Minister Atal Bihari Vajpayee would say, one can change history but not geography.

भारताने अमेरिकेच्या (व जपान, फिलिपाईन्स इत्यादी च्या) बरोबर हातमिळवणी करून चीन ला contain करण्याचा यत्न करावा - असे माझे मत नाही.

पण हे - You cannot choose your neighbors चे लॉजिक कितपत सुयोग्य आहे ते तपासून पहायला हवे. रशिया व अमेरिका हे शेजारी नाहीत काय ? बेरिंग स्ट्रेट फक्त ५५ मैल रुंद आहे.

पाकिस्तानचा भारत हा शेजारी असूनही पाकिस्तान ने इतक्या कुरापती काढूनही भारत त्याचे काहीही वाकडे करू शकलेला नाही. पाकिस्तान अपनी मौत मर रहा है (If at all Pakistan is failing as a state.).

व आज ICBM, SLBMs, SLCMs च्या जमान्यात हे कितपत अ‍ॅप्लिकेबल आहे ? Cyber-security threat च्या जमान्यात ??

----------------------------------------------------

Sonia Gandhi says minorities feeling ‘increasingly insecure’

मला हे समजत नाही की यांना कसं कळतं की - minorities are feeling ‘increasingly insecure’ ??

असा काही एक सर्व्हे आहे का की ज्याच्यातून त्यांना हे समजतं ???

तीन महिलांचा पुरूषावर बलात्कार मला हा प्रकारच विनोदी वाटतोय.

तरीही कॉलिंग अनु राव.

actions not reactions..!...!

> तीन महिलांचा पुरूषावर बलात्कार मला हा प्रकारच विनोदी वाटतोय.

नै तर काय!
पुरुषावर कधी बलात्कार होऊ शकतो का? षंढ साला.

बाकी त्या परवाच्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या मेणबत्ती मोर्च्या ला येणार ना बॅक्षी?

गोगो अनु राव यांनी पुरुषावर बलात्कार होउच शकत नाही असे ठाम विधान केले होते म्हणून त्यांच्या प्रतिसादाची वाट बघत आहे...

actions not reactions..!...!

अनु राव यांनी पुरुषावर बलात्कार होउच शकत नाही असे ठाम विधान केले होते

माझे अजुनही तसेच मत आहे. ह्या उपर मी काय लिहावे अशी अपेक्षा आहे?

हम्म, बरोबरे. तुमचाच बैल चितळ्यांना दूध सप्लाय करत असेल मग.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुमचाच बैल चितळ्यांना दूध सप्लाय करत असेल मग.

हे तत्त्वतः अशक्य नसावे.

चितळ्यांना होणारा दूधपुरवठा बैलगाडीतून होत असल्यास, आणि अशा एखाद्या बैलगाडीस प्रस्तुत बैल जुंपलेला असल्यास हे शक्य आहे.

('जेनेटिकली मॉडिफाइड बैल' वगैरे शक्यता येथे जमेस धरलेल्या नाहीत.)

आभार!
आता या मुळे काहिंच्या (सगळ्यांच्या शक्य नाही, काहिंना जरा वेळच लागतो Wink ) डोक्यात लिंगनिरपेक्ष कायद्यांचं महत्त्व समण्याचा उजेड पडला म्हणजे या बातमीचं सार्थक झालं!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

http://www.telegraph.co.uk/news/uknews/1582981/Rogue-monkey-accused-of-a...
मला वाटतं तुम्हाला 'निरपेक्ष' या शब्दाबद्दल थोडीशी क्रेझ आहे. आता वरील बातमी वाचून स्पेसिसनिरपेक्ष (प्रजातिनिरपेक्ष) कायद्याचं महत्त्व देखिल आहे म्हणाल काय?

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

म्हटलं ना काहिंना वेळ लागतो! Blum 3

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काहींना शीघ्रपतनाची समस्या असते खरी! ROFL ROFL ROFL ROFL ROFL

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

याला मात्र ऋण श्रेणी देणे भाग आहे.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लिंगनिरपेक्ष कायदा हा लैंगीक बाबतीत जरा कठीन बाब आहे... उदा बलात्काराच्या कायदेशीर व्याखेत शिस्न, योनी संपर्क वगैरे वगैरे डिटेलमधे लिहलेले असते. आणी ते तसेच घडले असेल तरच कायदेशीर व्याखेत तो बलात्कार ठरतो. म्हणूनच म्हणतात ना की पिडीत स्त्रियांना कोर्टात केस चालु असताना साक्ष वगैरे देताना पुन्हा एकदा तो प्रसंग जसाच्या तसा सहन करावा लागतो.

होप आय एक्स्प्लेन माय प्वाइंट नाइसली.

आता जर कायदा लिंग निरपेक्ष करायचा प्रयत्न केला तर... कोणी कोणावर बलात्कार केला हेच कायदेशीर व्याख्खेत सिध्द करणे अवघड होइल असे वाटते.

actions not reactions..!...!

अर्थात अशा सापेक्ष शब्दामध्ये बदल करावा लागेलच! पण ते काही तितके कठीण नसावे.

असा कायदा ज्यात कोणत्याही एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीवर जबरदस्तीने केलेला लैंगिक बलप्रयोग हा गुन्हा मानणे, व तो बलात्कार स्त्रीने केलाय की पुरूषाने हे न बघता समान शासन मिळणे गरजेचे आहे.

सध्याच्या कायद्यात केवळ संभाव्य बलात्कारांपैकी फक्त पुरूषाने स्त्रीवर बलात्कार केल्यासच शासन होऊ शकते. समलैंगिक बलात्कार, किंवा स्त्री ने पुरूषांवर केलेल्या बलात्काराला मुळात सद्य कायदा बलात्कार म्हणूनच धरत नाही त्या बलात्कार्‍यांना शिक्षा होणे तर दूरच!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्त्रीने पुरुषावर केलेला, समलैंगिकांनी एकमेकावर केलेला, समलैंगिकांनी आणि स्ट्रेट लोकांनी एक दुसर्‍यावर केलेला समलैंगिन, विवाहांतर्गत, मनुष्य -आणि -प्राणी, इ इ मधील बरेच प्रकार शिक्षामुक्त दिसतात.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मनुष्य -आणि -प्राणी

आता प्राणी तर तक्रार करत नाहीत त्यामुळे मनुष्यच अनैसर्गीक संभोग या गुन्ह्यास पात्र होतो. तीच बाब इतर बलात्कारांची ते सर्व अनैसर्गीक समागम म्हणूनच गुन्हा समजले जातात बलात्कार नाही. म्हणजे ते शिक्षामुक्त आहेत असा समज नको.

actions not reactions..!...!

मध्यंतरी एका कुत्र्याबरोबर संभोग करायचा प्रयत्न करणार्‍या एका पुणेकरास अटक करण्यात आली असे वृत्त वाचले होते.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुर्तास समलैंगिक संबंध हे अनैसर्गिक आहेत का? हे बाजूला ठेऊ. सद्य कायद्याच्या दृष्टीने ते तसे आहेत.

अनैसर्गीक समागम म्हणूनच गुन्हा समजले जातात बलात्कार नाही. म्हणजे ते शिक्षामुक्त आहेत असा समज नको.

अनैसर्गिक समागम आणि बलात्कार हे सारख्याच तीव्रतेचे गुन्हे आहेत का? माझ्या मते नाही.

बलात्कारामध्ये समोरच्याची इच्छा नसताना केलेला/करवलेला संभोग असतो. अनैसर्गिक समागमात तसे असेलच असे नाही. तेव्हा बलात्कार वेगळे व अनैसर्गिक समागम वेगळा, इतकेच नाही तर बलात्कारात फक्त बलात्कार करणार्याला शिक्षा होते, अनैसर्गिक समागमात तसे नाही

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कोणकोणती कृत्ये "बलात्कार" असताना स्कॉट फ्री गुन्हेगार सुटतो त्याचा अंदाज घेत होतो.
----------------------------------------------------------------------------------
ती प्राण्यांची केस खूपच किचकट आहे. पण अन्यथा, समजा भारतात जर अन्य सर्वच प्रकारचे समागम नैसर्गिक मानले गेले तरी त्यांच्यातला (पुरुंषाकडून स्त्रीवर सोडून) बलात्कार हा प्रकार शिक्षेस पात्र नसेल कि काय असे वाटले म्हणून लिहिले.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बरीच विश्वसनीय कहाणी वाटत आहे व एकुणच अमेरिकेचे अजुनही पाकधर्जीणे धोरण बघता त्यात तथ्य आहे असेच म्हणावेसे वाटते.

actions not reactions..!...!

राजीव दीक्षित यांनी तर १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले हे खोटे असल्याचा आरोप केला होता. ROFL

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दहशतवाद्यांच्या डोक्यावर इनाम लावले तर ते परिणामकारक ठरते

I can’t evaluate Hersh’s larger claims but I find this part of the story plausible. - हे वाक्य किंचीत सेल्फ सर्व्हिंग वाटते. स्वतःचीच पाठ थोपटणे टाईप.

----

अरे ओ सांबा ... कितना इनाम रखे है सरकार हम पर ??

----

हा प्रतिसाद मी "ही बातमी समजली का? - ७४" वर करू शकत होतो. पण इथे पोस्ट केला कारण तो बिन लादेन च्या बद्दलच्या सेमॉर हर्श यांच्या भांडाफोडीच्या लेखाशी निगडित आहे.

प्रतिक्षा यादीत तिकीट न मिळाल्यास विमानप्रवास
हे सगळं कसं एक्स्झिक्युट होईल कळलं नाही नीट

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रवाशांना हवाई सेवेचे पूर्ण शुल्क भरावे लागेल. तिकीटासाठी दिलेली रक्कम हे शुल्क भरून घेताना परस्पर वळती करता येणार नाही. त्यासाठी तिकीटाचे पैसे परत मिळवण्याच्या नेहमीच्या प्रक्रियेचा अवलंब केला जाईल.

मूर्खात काढताहेत.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आधी आयआरसीटीसीची वेबसाईट नीट चालवली तरी खूप झालं!पूर्वी त्यावरून विमानाची तिकिटेही बूक करता यायची(म्हणे). त्याकाळी दोन वेळा कार्डावरून पैसे कटले, पण तिकीट जनरेट झालं नाही तेंव्हा गुमान दुसर्‍या वेबसाईट्च्या आश्रयाला जावे लागले. बाय-द-वे-'फेल्ड बुकिंग' चा रिफंड जमा व्हायला ४ ते १० दिवस लागतात. एव्हढे दिवस (अनेकांची)रक्कम रेल्वे फुकट वापरते का? आयाआरसीटीसी च्या ग्राहक संपर्क विभागाला हा प्रश्न विचारलेला- पण त्यानी मुद्दा सोडून दुसरेच उत्तर दिले होते.

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

कॉलिंग ऋषिकेश.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ऑ! मला का कॉलिंग.. म्हणजे करा कॉल पण काय अपेक्षाय?
मला आयाअरसीटीसीत कधीच असे प्रॉब्लेम आले नाहीत ही काय माझी चुक आहे?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गंमतच करता. प्रसन्ना यांस काही मार्गदर्शन करता आले तर पहा म्हणायचं होतं.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ओह तसं.. सॉरी, मला आधी काही कळलंच नै! Smile
पण मी आयआरसीटीसी वरून कधी विमानाचं/हॉटेलचं बुकिंग नाही केलंय Sad
बहुदा मोबाईल अ‍ॅपसुद्धा केवळ रेल्वे बुकिंगचंच आहे

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

http://zeenews.india.com/news/eco-news/carbon-dioxide-levels-set-new-rec...
माझ्या लहानपणी वातावरणात ०.०३% CO2 असे. आता तो 0.04% झाला आहे. (पी पी एम वरून मास किंवा आकारमानाबद्दल असं म्हणता येईल.)

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आपण इतकी वर्षं एवढे फुंक फुंक फुंकूनही अन जाळ जाळ जाळूनही फक्त ०.००१% ची वाढ.. छे...!!

बाकी, कार्बन डाय ऑक्साईड हा ग्लोबल वार्मिंग, ग्रीनहाऊस इफेक्ट आणि प्रदूषण या तिन्ही दृष्टींनी अजिबात प्रमुख शत्रू नाही असं हल्लीच वाचनात आलं. पाण्याची वाफ हा जास्त मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असलेला ग्रीन हाऊस गॅस आहे असं अनेक ठिकाणी वाचलं.

०.००१% ची वाढ नव्हे, ०.०३% चे ०.०४% झाले (दहा हजारात तीन होते त्याचे दहा हजारात चार झाले) म्हणजे प्रमाण ३३% ने वाढलं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

०.००१% नाही ०.०१%.

हा डेसिमल प्वाइंटिया लैच प्राब्ळम्याटिक आहे. बाकी अदितीने काय ते सांगितलेलं आहेच.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गवि, तसं तुम्ही लिहिलंय ते बरोबर आहे. फक्त एक शून्य जास्त झालं आहे.

०.०१% ची वाढ म्हणजे ... ची वाचताना जाणवतं कि ...०.०१% percentage point ची वाढ जे योग्य आहे.
-----------------------------------------------
०.०१% ने वाढ म्हणाला असतात तर चूक असतं, तिथे ३३.३३%, बाय रेणूसंख्या, वाढ आहे.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कार्बन डाय ऑक्साईड हा ग्लोबल वार्मिंग, ग्रीनहाऊस इफेक्ट आणि प्रदूषण या तिन्ही दृष्टींनी अजिबात प्रमुख शत्रू नाही असं हल्लीच वाचनात आलं

आशिया/उत्तर आफ्रीकेतली खंडातली वाढती लोकसंख्या आणि युरोप्/अमेरिकेतली घटती मुळ लोकसंख्या हा एकमेव शत्रु आहे जगाचा.

http://www.azooptics.com/News.aspx?newsID=20872
जीन एडीट करून उत्पन्न होणार्‍या सजीवातील गुण दोष हाताळण्याची सुविधा तयार झाली आहे.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आयला, म्हणजे ९.९ जीपीएवाल्या कंप्यूटर सायन्स टॉपर्सची फौज तयार होणा म्हणा आता.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

१०. ते मराठीपण ठेवा मागे आता. Wink

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हाहाहा, अगदी अगदी. Wink

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

India wants its rich temples to part with their gold to help the economy

.
.

यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम्

.
.

Wealthy Hindu temples such as this one are repositories for much of the $1 trillion worth of privately held gold in India — about 22,000 tons, according to an estimate from the World Gold Council. In 2011, one temple in south India was found to have more than $22 billion in gold hidden away in locked rooms rumored to be filled with snakes. Another has enough gold to rival the riches stashed at the Vatican, experts say.

and now Prime Minister Narendra Modi’s government is looking to mon­etize India’s vast hidden wealth. In coming weeks, the government plans to begin a program that will allow temples to deposit their gold into banks to earn interest and circulate in the economy, rather than sit idle in musty vaults. The gold, officials say, would be melted down and sold to jewelers.

आधीच्या सरकारांनी असा विचार केला असता तर गझनीच्या महंमदापर्यंत तुलना पोचली असती.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एक्झॅक्टली हाच विचार माझ्या मनात आला होता. भाजपा ला असे वाटते की ते हिंदु नॅशनलिस्ट / हिंदुत्ववादी असल्यामुळे हिंदु मंदिरांबद्दलचे व मंदिरांच्या मालमत्तेचे व्यवहार करण्यास (म्हंजे मंदिरांच्या कारभारात सरकारी हस्तक्षेप करण्यास) फक्त त्यांचेच सरकार हे क्वालिफाईड आहे. किती अ‍ॅरोगन्स आहे !!!

आता मजा बघा की भारतात आस्तिक असण्याची सक्ती नाही, आस्तिक असल्यास मंदिरात जाण्याची सक्ती नाही, मंदिरात गेलात तर मंदिरात धन अर्पण करण्याची सक्ती नाही, धन अर्पण केलेत तरी त्याबदल्यात अर्पण करणार्‍यास काही दिले जावे अशी सक्ती नाही. व त्या बदल्यात काहीही मिळाले नाही तरी मंदिरात जाणारा तक्रार करीत नाही. अर्पण करणार्‍यास चांगले माहीती असते की हे अर्पण केलेले धन मंदिराच्या चालकांना / पुजार्‍यांना मिळणार आहे (असा माझा समज आहे.). मंदिरात अर्पण केलेल्या त्या धनाचा त्रयस्थ व्यक्तीवर कोणताही दुष्परिणाम (negative externalities) होत नाही. म्हंजे कोणाचेही शोषण होत नाही व कोणावरही अन्याय होत नाही. (Whose rights are violated ??). तरीही (मोदी) सरकारला मंदिराच्या कारभारात हस्तक्षेप करायची सुरसुरी का यावी ?? ( संभाव्य आक्षेप - आता मंदिराचे चालक / पुजारी ते धन आयते मिळवतात व त्याचा दुरुपयोग करू शकतात म्हणून सरकारी हस्तक्षेप इष्ट आहे.)

पण माझा ते सोने वितळवण्याला विरोध नाही.
उलट ते सरकारने जप्त करावे असे माझे मत आहे. जसा आधीच्या एनडीए सरकारने एक डिसैन्व्हेस्टमेंट मिनिस्टर नेमला होता तसा एक देवोत्पाटन मंत्रीसुद्धा असायला हवा.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझे म्हणणे नेमके विरुद्ध आहे.

मंदिरांच्या कारभारात कोणताही हस्तक्षेप करण्याचा सरकारला अधिकार नाही पाहिजे. (अर्थात जोपर्यंत तिथे देशविघातक् कारवाया चालू नाहीत व कोणताही बलप्रयोग होत नाही तोपर्यंत.).

देशविघातक म्हणजे काय?
उत्पन्न वाढावे म्हणून चमत्कारांच्या कथा प्रसृत करुन लोकांना नादी लावणे व मनुष्यबळासकट अनेक स्रोत त्यातून वाया जाणे हे देशविघातक आहे का? मंदिराने देशाची चिंता का करावी?

उत्पन्न वाढावे म्हणून चमत्कारांच्या कथा प्रसृत करुन लोकांना नादी लावणे व मनुष्यबळासकट अनेक स्रोत त्यातून वाया जाणे हे देशविघातक आहे का?

हे देशविघातक नाही.

कारभारात हस्तक्षेप करा वा न करा. सोने मात्र जप्त करावेच.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझे म्हणणे नेमके विरुद्ध आहे. पुनश्च.

सरकारला हे सोनं जप्त करण्याचा अधिकार कुठुन आला ?

असाच.....
देणार्‍याने सोने देवाला दिलेले आहे.
देव ते सोने वापरत नाही वापरू शकत नाही.
देवाला वारस नाही.
त्या अर्थी ते सोने ओपन स्पेसमध्ये (डोमेन) टाकलेले आहे.
ओपन स्पेसमधील संपत्ती सरकारने घ्यायची असते.

एमिनंट डोमेन

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे डोमेन अ‍ॅश्युम करणे झाले. देणार्‍याच्या मनात सरकारला अर्पण करायचे असते तर त्याने सरकारला अर्पण केले असतेच. सरकार ही एंटिटी लोकांपासून लपून राहीलेली नाही. त्यामुळे अर्पण करणार्‍याने सरळ सरकारदरबारी जमा केले असते. सरकारचा अ‍ॅरोगन्स कुठल्या लेव्हल वर पोहोचलेला आहे त्याचे हे लख्ख उदाहरण.

ओक्के. पण देणार्‍याने ते सोने देवळाच्या तिजोरीत कायम रहावे म्हणून दिलेले असते का?

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पण देणार्‍याने ते सोने देवळाच्या तिजोरीत कायम रहावे म्हणून दिलेले असते का?

हा क्रायटेरिया कुठुन आला अचानक ?

देणार्‍यास अर्पण करण्याचे मानसिक समाधान मिळते म्हणून देणारा/री देतो/देते. त्याचे कोणी काय करायचे ते देणारा अजिबात स्पेसिफाय करीत नाही. स्वप्नात सुद्धा हा विचार देणारी व्यक्ती करीत नाही. इदं न मम - अशीच धारणा असते. मग आता ती संपत्ती घेणार्‍याची झाल्याबरोबर ती स्थिर असायला हवी वा नसायला हवी ह्या बेसिस वर अचानक क्रायटेरिया उभा करून सरकारला ती जप्त करायचा अधिकार मिळाला ??? खरंच ???

देवळाची बिल्डिंग व मूर्त्या ह्या सुद्धा देवळात कायमच्या राहतात. मग त्याही जप्त कराव्यात ???

>>मग आता ती संपत्ती घेणार्‍याची झाल्याबरोबर ती स्थिर असायला हवी वा नसायला हवी ह्या बेसिस वर अचानक क्रायटेरिया उभा करून सरकारला ती जप्त करायचा अधिकार मिळाला ??? खरंच ???

संपत्ती घेणार्‍याची झालेलीच नसते कारण देणार्‍याने ती घेणार्‍याला म्हणून (मंदिर ट्रस्ट) दिलेलीच नसते. They are receiving it on behalf of god.

>>देवळाची बिल्डिंग व मूर्त्या ह्या सुद्धा देवळात कायमच्या राहतात. मग त्याही जप्त कराव्यात ???

माझी व्यक्तिशः काही हरकत नाही. पण सरकारने मूर्त्यांची अडगळ स्वतःकडे कशाला घ्यावी. आणि बिल्डिंग वापरात असतेच. पडून राहिलेली नसते. मूर्तीसुद्धा (दर्शनाच्या) वापरात असते.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

संपत्ती घेणार्‍याची झालेलीच नसते कारण देणार्‍याने ती घेणार्‍याला म्हणून (मंदिर ट्रस्ट) दिलेलीच नसते. They are receiving it on behalf of god.

१) हे तितकेसे पटत नाही. देणार्‍यास माहीती असतेच की ती मंदिराच्या चालकाकडे/पुजार्‍याकडे जाणारे म्हणून.
२) व ट्रस्ट ची नसते तर मग कुणाची ? जर दुसर्‍या कुणास अर्पण करायची असती तर त्यास दिली असतीच ना देणार्‍याने.
३) घेणारा देवाच्या वतीने घेतो. व देणारा देताना असे समजून देतो की घेणारा देव किंवा देवाच्या वतीने घेत आहे. सरकारला सक्ती ने जप्त करायचा अधिकार आला ?? कसा ?

अर्पणही न करणाऱ्या पॅलेस्टिनींची जमीन इस्रायल अश्युम्ड डोमेन म्हणून हडप करते आहे असंही काही लोक म्हणतात म्हणे. खरं खोटं कोणाला ठाऊक?

Smile

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शिवाय हळूहळू लोकांच्या उपासना पद्धतीत किंवा उपास्य देवतांमध्येही बदल करण्याइतके धारिष्ट्य सरकारमध्ये निर्माण होऊ शकेल. सोने गेल्याचे दु:ख नाही पण सरकार सोकावेल.
म्हणजे उदा.धनुर्धर राम आणि शक्तिमान वीर वज्रांग यांच्याच उपासना कराव्यात, मंदिरांमध्ये या दोन प्रतिमा असाव्यातच, जर मल्टिदैवत देवळांमध्ये ह्या प्रतिमा आडबाजूला किंवा कोनाड्यात असतील तर मुख्य दैवत सोडून यांचीच पूजाअर्चा धूमधडाक्यात व्हावी; साईबाबा, शेळपट रणछोडदास कृष्ण मागे पडावे, वगैरे.
तसेही आतापर्यंत मंदिरांच्या व्यवस्थापनामध्ये पूर्वीच्या सरकारचे चेले असायचे. आता मंदिरांची अमाप संपत्ती लक्षात घेता या सरकारलाही आपल्या चेल्यांची वर्णी त्यांच्या जागी लावावी असे वाटल्यास नवल नाही.

सोने गेल्याचे दु:ख नाही पण सरकार सोकावेल.

सोनं जाण्यापेक्षाही जुनी, सुंदर डिझाईन्स जातील. बाहेर काढायचंच होतं तर निदान होतं त्या रूपात तरी ठेवायचं.
मुंबईच्या चोर बाजारात काही विक्रेते आहेत. त्यांच्याकडे लाल, रास्पबेरीच्या रंगाच्या काचा असलेले दिवे विकायला असतात. हे दुकानदार असे दिवे कोणा सोम्यागोम्याला विकत नाहीत. जे लोक हे दिवे नीट जपून ठेवतील, तोडफोड न करता, चांगली देखभाल ठेवून वापरतील त्यांनाच विकतात. 'मटण रस्ता' नामक टुकार नाव असणाऱ्या बोळकांडात दहा टक्के नफा मिळवून व्यवसाय करणारे लोक जितपत संस्कृती जपतात तेवढी भारत सरकारला जपावीशी वाटू नये?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>लोकांच्या उपासना पद्धतीत किंवा उपास्य देवतांमध्येही बदल करण्याइतके धारिष्ट्य सरकारमध्ये निर्माण होऊ शकेल.

याला मुळीच धारिष्ट्य लागत नाही. सत्ताधारी ज्या देवाला धार्जिणे असतात त्या देवाची पूजा लोक आपोआप करू लागतात. गणपती हे पेशव्यांचे कुलदैवत असल्यामुळे महाराष्ट्रात घरोघरी गणपती बसू लागले. पेशवे गणपती मंदिरासाठी दानधर्म आणि जमिन जुमला देतात हे कळल्यावर विविध लोकांना आपल्या अंगणात गणपतीची मूर्ती पुरलेली असल्याचे दृष्टांत स्वप्नांतून झाले आणि मग अशा मूर्ती सापडून अष्टविनायक आणि इतर देवळे उभी राहिली.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

चांगला निर्णय!
सोने प्रार्थनास्थळांमध्ये पडून रहाण्यापेक्षा अर्थव्यवस्थेत फिरेल. फक्त हा निर्णय सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांबद्द्ल घ्यावा असे वाटते.

==

@गब्बरः ही योजना ऐच्छिक आहे. जर त्यांना सोने गहाण ठेवायचे असेल तर ते या योजनेत सहभागी होऊ शकतात. प्रत्येक धर्मस्थळाला सोने देणे बंधनकारक नाही.
हे ऐच्छिक असूनही तुमचा विरोध? मला आश्चर्य वाटले.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्यांचा विरोध ऐच्छिकला नसून मी सोने जप्त करावे म्हटले त्याला असावा.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अगदी. जप्त करणे - यास प्रचंड विरोध आहे.

-----

पुढे .... (मी सरकार या एका एंटिटीबद्दल खूप सस्पिशियस आहे. नुस्ते नाव काढले की आमचा पोटशूळ उठतो.)

ऐच्छिक असले तरी ही त्याचे हळूहळू रुपांतर रिक्वायरमेंट मधे करण्यात सरकार तरबेज असते (असा माझा समज आहे.).

Nothing is so permanent as a temporary government program ______ Milton Friedman. (हा क्वोट मी ओढूनताणून इथे डकवलेला आहे.)

(मी सरकार या एका एंटिटीबद्दल खूप सस्पिशियस आहे. नुस्ते नाव काढले की आमचा पोटशूळ उठतो.)

सरकारच्या कोणकोणत्या सेवा तुम्हाला नकोतच?
जे उरलं त्याला सरकार म्हणता येते का पाहू.
--------------------------------------------------------------------------------------------------
तुमचं नाव काढलं कि मला पोटशूळ उठतो. गरीब लोकांना, गरीब आहेत म्हणून, मारूनच टाकावं असं पब्ब्लिकली वारंवार म्हणायला माणूस विकृतच असायला लागतो.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी जी मूळ बातमी वाचली होती त्यात 'मंदिरांच्या ताब्यात असलेलं सोनं वितळवून ते बॅंकांमध्ये डिपॉझिट करायचं, आणि त्याबदल्यात मंदिर ट्रस्ट्सना कर्जरोखे मिळतील' अशी काहीशी योजना होती. म्हणजे हे सोनं सर्क्युलेशनमध्ये येईल, आणि मंदिरांनाही त्या बदल्यात व्याज मिळेल.

यात दोन मुद्दे आहेत. असं देवाचं सोनं बाजारात काढावं का? या स्वरूपाचा भावनिक प्रश्न निर्माण होतो. त्याबाबत अर्थातच मला काही वाटत नाही. कारण त्या भावनेशी मला सहानुभूती नाही.

दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा शैलेन भंडारेंनी मांडला होता. तो म्हणजे मंदिरांच्या ताब्यात असलेला हा ठेवा, म्हणजे नुसतं सोनं नाही. तो एक ऐतिहासिक ऐवज आहे. गेल्या अनेक शतकांतली नाणी, जवाहिर, आणि विविध शैलीमधले दागिने त्यात आहेत. हे सर्व भांडार वितळवून टाकणं म्हणजे आपल्या मोठ्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेव्याचा नाश करणं. अनेक इतिहासकार, अभ्यासक या ठेव्याकडे ज्ञानाचं भांडार म्हणून पाहात आहेत. मंदिरांच्या ट्रस्टी़जकडून अभ्यासापुरते तरी तात्पुरते मिळावेत म्हणून प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत ते वितळवून टाकण्याऐवजी त्यांची विक्री करावी, आणि त्यातून निर्माण होणारं भांडवल येन केन प्रकारेण वापरावं. जेव्हा विक्री होते, तेव्हा तो मूळ ऐवज सुरक्षित राहातो. इतकंच नाही, तर त्याच्या विक्रीतून सोन्याच्या किमतीपेक्षा कितीतरी अधिक किंमत मिळते. आणि अभ्यासकांना तो मिळण्याचा मार्ग खुला होतो. म्युझियम्सना तो विकत घेऊन जनतेला पाहाण्यासाठी खुला करता येतो. वितळवून टाकण्याने या सगळ्यावर पाणी फिरतं. वितळवून टाकण्याच्या प्रक्रियेत अर्थातच ट्रस्टी आणि सरकारी बाबू/राजकारणी यांना हा मलिदा खाण्यासाठी मार्ग मोकळा होतो. यात अनेक गैरव्यवहार होऊ शकतात. समजा पंधरा ग्रॅम वजनाचं ११व्या शतकातलं अत्यंत दुर्मिळ नाणं आहे. मी ट्रस्टी म्हणून ते लाटू शकतो, आणि त्या जागी पंधरा ग्रॅम सोनं देऊ शकतो. त्या नाण्याला जी सोन्याच्या दहापट किंमत येते, तिचा नव्वद टक्के भाग माझ्या खिशात. यापेक्षा खुल्या लिलावात जर विक्री झाली तर असले प्रकार होणं कमी होईल.

हा दुसरा मुद्दा मला मनापासून पटतो.

ह्म्म पॉइंट आहे. हा दुसरा मुद्दा लक्षातच आला नव्हता.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आता ह्या मंदीरांचे ट्रस्टी भरपुर गोलमाल करतील. जेंव्हा सोने सरकारी बँकेत जमा करायची वेळ येइल तेंव्हा ते कमी प्रतीचे आहे किंवा नुस्ताच सोन्याचा मुलामा दिलेला आहे असे दिसेल कारण खरे सोने ह्या चोरांनी कधीच लाटलेले असणारे.

ही स्कीम जर राबवायचीच असेल तर वेगवेगळ्या जर्मन आणि स्कँडेनेव्हीयन बँकांना हे काम द्यावे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बरोबर आहे कारण तो निर्णय अडवाणींचा होता

एफडीआय इन रीटेलला विरोध ही चूक होती असं म्हणायची वाट पहात आहे. Smile

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ROFL

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एफडीआय इन रीटेलला विरोध ही चूक होती असं म्हणायची वाट पहात आहे.

हाहाहा.

----

अणु करारा स विरोध करणे चूक होते असे ही म्हणायची वाट पाहत आहे.

अणु करारा स विरोध करणे चूक होते असे ही म्हणायची वाट पाहत आहे.

त्यास विरोध होता? असेल पण ते जुने झाले.
आता उलट जैतापूरसाठी शिवसेनेला सुरक्षितपरतीचा मार्ग कसा द्यावा यावर विचार चालु असे!!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चुका मान्य करतायत हे आवडलं!

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हे बरंय

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

च्यामारी, काही केलं तरी प्रॉब्लेमच हां?

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहो, ते स्वतःची चुक नाही कबूल करत आहेत, इतरांच्या कृतीला चूक म्हणतात. आपल्याच पक्षातील पूर्वासुरींचे महत्त्व कमी करणे चालले आहे आणि स्वराज, अडवाणी यांचे दात त्यांच्याच घशात घालणे झाले Sad .

माझ्याच पक्षातील "त्यांनी" केली ती चूक, मी नी माझे विधेयकच काय ते बरोबर आहे असा पवित्रा आहे!
---
भा.ज.पा.च्या अध्यक्षांनी ही पक्षाची चुक होती असे कबूल केले तर थोडा तरी अर्थ होता - तरी ते योग्य असते असे नव्हेच!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जमीन अधिग्रहण कायदा मंजूर करण्याकामी युपीएच्या राजवटीत घिसाडघाईच झाली आणि त्यास त्यावेळी त्यास पाठिंबा देऊन आम्ही चूकच केली, अशी स्पष्ट कबुली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

आम्ही म्हणतायत ते!

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

चुका मान्य करतायत हे आवडलं!

पण ते तर डाव्यांचे व्यवच्छेदक लक्षण होते ना? ते उजव्यांकडे कसे आले?

नितिन थत्ते
मंदिरातले सोने सरकारने का जप्त करावे यावर...

असाच.....
देणार्‍याने सोने देवाला दिलेले आहे.
देव ते सोने वापरत नाही वापरू शकत नाही.
देवाला वारस नाही.
त्या अर्थी ते सोने ओपन स्पेसमध्ये (डोमेन) टाकलेले आहे.
ओपन स्पेसमधील संपत्ती सरकारने घ्यायची असते.

एमिनंट डोमेन

१. अस्सेच जप्त करावे? अस्सेच बरेच काही करता येईल. अस्सोच.
२. मालक - जर देणाराने कायदेशीरपणे सोने देवाला दिले आहे तर सरकारला मालकीवर प्रश्नचिन्ह ठेवता येत नाही.
३. वापर - घरातल्या एका, से गेस्टरूममधल्या, टॉयलेटमधे कोणी ६ महिने गेलेच नाही, तर ते सरकारने जप्त करावे काय? किंवा उद्या मी एक कार घेतली आणि वर्षभर चालवलीच नाही तर सरकारी एजंटांची ती फुक्क्क्ट जप्त करावी कि काय? आणि देव ते सोने वापरत नाही कशावरून? सोने विकायची पाळी आली नसेल त्याच्यावर. वापरू शकत नाही हे तरी कशावरून? सध्याला देवळे सुरक्षित नाहीत म्हणून त्याने सोने कोंडून ठेवले असावे. असं नसतं तर ती रोजची देवाची आरास राहिली असती. अन्यत्र आपण रोज वेगळे कपडे घालतो तसे रोह तो वेगळे सोने घालत असेल.
४. वारस - अ. आपण खुद्द कोण आहात? ब. किंवा हा लेकरे नसलेल्यांचा अपमान नव्हे काय? क. ईश्वर हा अनादि नि अनंत आहे. आता किमान तो मरेपर्यंत तरी वाट पहा. मुघली घाई नको ना.
५. एमिनंट डोमेन मंजे योग्य मोबदला देउन सरकार खासगी संपत्ती, प्रोपर्टी घ्यायची. म्हणजे मोबदला योग्यच फक्त समोरचा 'मला विकायचेच नाही' म्हणून अडेलतट्टूपणा करू लागला तर तो बेकायदा. पण नितिनजी- इथे सरकारला सोन्यासारखा लिक्विड असेट घ्यायचाय. सरकारने बिनकामाचे पैसे देऊन सोनं घेणं म्हणजे मूर्खपणा नै का?
==================================================================================================
आता -
१. समजा हे सोनं सरकार म्हणते तसं "ग्रॅज्यूअली" इकॉनॉमीमधे इंट्रोड्यूस केलं तर बँका मंदिरांना तो एक गिल्ड बाँड इ इ म्हणून नियमित व्याज देतील. हे सोनं बँका त्यांची रिजर्व लायाबिलिटी मीट करण्यासाठी रिजर्व बँकेला देतील आणि देशावरचे गोल्ड इंपोर्ट बर्डन कमी होईल. शिवाय जो गोल्ड + फॉरेक्स काँबो आहे त्यात संतुलन राखायला मदत होईल. इतकं सोनं इंटर्नालाइझ करावं इतका अपेटाइट सिस्टिम मधे आहे.
२. घासकडवी म्हणतात हे सोनं मेल्ट करू नये. पण ७५० बिलियन डोलर ही सोन्याचीच किंमत आहे. त्यांना ७.५ ट्रिलियन डॉलर इतकी आर्ट इंडस्ट्री म्हणून किंमत अभिप्रेत आहे. अर्थातच इतकी मोठी (इतकी काय याच्या सहस्रांश देखिल) आर्ट इंडस्ट्री भारतीय कलेसाठी भारतात वा जगात नाही.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

घासकडवी म्हणतात हे सोनं मेल्ट करू नये. पण ७५० बिलियन डोलर ही सोन्याचीच किंमत आहे. त्यांना ७.५ ट्रिलियन डॉलर इतकी आर्ट इंडस्ट्री म्हणून किंमत अभिप्रेत आहे.

शैलेन भांडारेंनी मांडलेला मूळ मुद्दा तुमच्या नीट लक्षात आलेला नाही. मान्य आहे, की यातलं बरंच सोनं हे 'नुसतं सोनं' आहे आणि इतर भाग हा ऐतिहासिक वारसा आहे. मुख्य प्रश्न असा आहे की हा असा नीरक्षीरविवेक करणार कोण आहे? ट्रस्टी आणि सरकारी बाबू? त्यांच्यात ना ते स्किल आहे ना इच्छा. त्यामुळे 'सरसकट वितळवणं' ही मूर्खपणाची पॉलिसी आहे. तसंच यात गैरव्यवहार होऊन अनेक लोक गब्बर होण्याची शक्यता आहे.

जर खरोखरच ७५० बिलियनचं सोनं असेल, आणि त्यातलं समजा २% जरी दसपट किमतीचे दागिने असतील, तरी हिशोब ७५० ऐवजी ८८५ बिलियनचा होतो. तुमच्या मते या १५० बिलियनचं मार्केट नाही. कदाचित १५ बिलियनचंच असेल - येत्या दहा वर्षांत, वीस वर्षांत - तरीही तेवढंच विकलं, तरी ७५० बिलियन मिळतातच. उरतात १३५ बिलियनचे दागिने किंवा १३.५ बिलियनचं सोनं. सगळंच आंधळेपणाने वितळवून टाकलं तर तुम्हाला कमी पैसे मिळणार नाहीत का? अहो बेसिक गणित आहे हे.

समजा ५% जरी दसपट किमतीचे दागिने असतील, तरी हिशोब ७५० ऐवजी ८८५ बिलियनचा होतो.

सहमत.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>सरकारने बिनकामाचे पैसे देऊन सोनं घेणं म्हणजे मूर्खपणा नै का?

मूर्खपणाच आहे. म्हणून सरकारने पैसे न देताच सोने घ्यावे. Smile

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जनरली तुम्ही असं लिहित नाहीत. पण असंच लिहायचं असेल तर ... याच धर्तीवर ...सरकारने सगळ्या पुरोगाम्यांना लुटावे असं म्हणेन. ते देखिल श्रीमंतच असतात.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पुन्हा ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप. नेपाळमधे. एव्हरेस्टजवळ. आणि त्याचवेळी अफगाणिस्तानात केंद्र असलेला ६.९ स्केलचा भूकंप. दिल्ली, उत्तर, पूर्व ,मध्य इत्यादि प्रदेशांतच नव्हे तर अगदी मुंबईपर्यंतही हादरे जाणवले.

अरेरे! नेपाळमधील पाठोपाठचे भुकंप म्हणजे दुर्दैवाचा दशावतारच झाला Sad
=---
खरंच मुंबईत कोणाला जाणवले का हादरे?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आम्हाला चांगलेच जाणवले.

आम्ही तरी ऑफिसातून धूम ठोकली. लातूरचा असल्याने मी सर्वात अगोदर पोचलो असेन. पण नंतर ५०-१०० जण आलेले.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

दिल्लीत कितपत थरथराट होता?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तो मजल्यानिशी बदलतो.
तळमजला सोडून सगळे बाहेर आले.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आशा करतो अजो, रोचना आणि इतर उत्तर, पुर्वेला रहाणारे/असणारे ऐसीकर आणि त्यांचे परिचित, नातलग सुखरूप आहेत!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इतका वेळ घेऊन शेवटी जमिन अधिग्रहण विधेयक "जॉइंट कमिटी'कडे सोपवायला सरकारला विरोधकांनी भाग पाडले आहे.
आधीच विरोधकांशी संवाद साधला असता आणि समझौता केला असता तर सरकारची प्रतिमा इतकी घसरती ना!

असो. 'देर आये लेकीन दुरूस्त आये' असे म्हणण्याचा चानस सरकार देईल अशी आशा करूयात.

==

विरोधकांचे अभिनंदनही करायलाच हवे!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ही सिरीयल कोणी पाहतं का? पाहिलीये का? ती बंद केली जाऊ शकते म्हणे.

याचे कारण
Although Dastaan has been edited for Indian viewing and renamed Waqt Ne Kiya Kya Haseen Sitam, it appears that viewers still felt that it was portraying Pakistan’s version of the Partition.

जरी असे असले तरी ही सिरीयल बंद व्हावी किंवा भारतात दाखवताना त्यात अधिक बदल व्हावेत असे वाटते का?

Zindagi channel might be asked to modify the drama further or be advised against its telecast in India.
असे त्या बातमीत म्हटले आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एक (कदाचित ओव्हरलि) बेसिक प्रश्न आहे. फाळणीची पाकिस्तानी व्हर्जन म्हणजे नेमकं काय???????????

भारत अन पाकिस्तान हे फाळण्युत्तर कन्स्ट्रक्स्ट्स नव्हेत काय???????????

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाकिस्तानी व्हर्जन....
हिंदूंनी निरपराध मुसलमानांवर अनन्वित अत्याचार केले. मुसलमान स्त्रियांवर अमानुष बलात्कार केले मुसलमानांची मालमत्ता लुटून नेली. इ. इ.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हम्म तसं होय. पण मग स्थलांतरितांना पाकिस्तानातच फडतूस समजतात त्याचे काय? ते अंमळ विरोधी होत नै का?

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तसे तर आपण पण सिंध्यांना तसंच समजतो.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पण मोहाजिर शब्दाची तीव्रता त्यात आजिबात नाही. "लोटा घेऊन आले आणि श्रीमंत झाले" छाप टीका असते त्यांच्यावर तेवढीच.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"लोटा घेऊन आले आणि श्रीमंत झाले" छाप टीका असते त्यांच्यावर तेवढीच.

ही टीका आहे की कौतुक?

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

दोन्ही. रादर कौतुक आणि असूया.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नुसते तसे नसावे.
फाळणी कोणामुळे झाली? ती झाली हे वाईट झाले की चांगले? यामुळे भारताचा लाभ झाला की तोटा? पाकिस्तानला याचा फायदा झाला की तोटा? भारताने फाळणी करताना (माउंटबॅटनना हातीशी घेऊन) काही डावपेच खेळले ते खरे की खोटे? मुख्य म्हणजे जीना, नेहरू, गांधी आदी पात्रे हिरो का व्हिलन? कितपत हिरो कितपत व्हिलन?
इत्यादी प्रश्नांची उत्तरे - खरंतर उत्तरे नव्हेत पॉप्युलर समज सीमेच्या दोन्ही बाजुला वेगळे असावीत Smile

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खरंतर उत्तरे नव्हेत पॉप्युलर समज सीमेच्या दोन्ही बाजुला वेगळे असावीत

सीमेच्या दोन्ही बाजूला कशाला, एकाच बाजूलाही दोन वेगवेगळे पापुलवार समज हैतच की! Wink

तरी ही सिरीयल बंद व्हावी किंवा भारतात दाखवताना त्यात अधिक बदल व्हावेत असे वाटते का?

भारतात पाकिस्तानबद्दल चांगले बोलायला, त्याचे राष्ट्रगीत गायला, झेंडा लावायला, मालिका दाखवायला, इ इ मूळीच बंदी असू नये. बदल होऊ नयेत.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी ही मालिका काय आहे ते अजिबातच बघितलेलं नाही. पण

भारतात दाखवताना त्यात अधिक बदल व्हावेत असे वाटते का?

बदल व्हावेत असं वाटत नाही. त्या निमित्ताने सामान्य पाकिस्तानी नागरिकांच्या मनात काय सुरू असतं याची कल्पना येईल. आणि निदान काही सामान्य भारतीय नागरिकांना/दर्शकांना "आपल्याकडेही असाच प्रचार चालतो की" असा विचार करायची प्रेरणा मिळू शकेल. नाही तर निदान बहुसंस्कृती, बहुभाषा, अशी विविधता मिरवणाऱ्या देशाच्या नागरिकांना वेगळा दृष्टिकोन माहित असण्याचा उदारमतवाद तरी मिरवता येईल.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.