फुसके बार – ०१ फेब्रुवारी २०१६ - जेवणावळींवरील अफाट खर्च, केस कापण्यासाठी योग्य दर, वगैरे

फुसके बार – ०१ फेब्रुवारी २०१६ - जेवणावळींवरील अफाट खर्च, केस कापण्यासाठी योग्य दर, वगैरे
.

१) लग्नातल्या जेवणावळी

मित्राच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो. आजकाल आहेर आणू नये म्हणून सांगितले जाते. तर मग अशा कार्यक्रमांना सकुटुंब सपरिवार जाणे योग्य आहे का? आज पुण्यात अशा कार्यक्रमातील ताटाचा दर २०० ते ६०० रूपये आहे, तर मुंबईत त्याच मेनुसाठी हा दर ४०० ते १,००० आहे असे कळते. तुमची ‘हौस’ किती त्याप्रमाणे हा दर आणखीही वाढू शकतो.

निमंत्रण देणारा पक्ष आहेर स्विकारत नाही, मात्र हा खर्च एकतर्फी करायला तयार असतो. आहेर न स्विकारणे हे पुरोगामीपणाचे लक्षण समजले जाते आणि जे योग्यच आहे, तर मग यजमानांना या जेवणावळींच्या अफाट खर्चात टाकणे पाहुण्यांना योग्य वाटावे का?

मागे मी काही जणांचे म्हणणे ऐकले होते की आपला वर पक्ष आहे, लग्नाचा सगळा खर्च वधुपक्षाचे लोक करणार आहेत, तेव्हा जितक्या अधिक संख्येने जाता येईल तेवढे जाऊया. अर्थात अशा बोलण्याला काही अर्थ नाही.

यावरचा उपाय काय काढावा? एकीकडे यजमानांची हौस म्हणून हे सारे नको म्हणून जाणेच टाळावे तर प्रसंग लग्नकार्यासारखा, तेव्हा न जाणेही योग्य ठरणार नाही. बरे, लग्नाला गेलो, पण तेथून न जेवता निघून आलो, तरी यजमानांना त्याचे वाईट वाटणार. अलीकडे तर वाढदिवसाचा केक खायला नको म्हटले तरी अनेकांना सत्यनारायणाच्या प्रसादाला नकार दिल्यासारखा राग येतो, मग लग्नाला जाऊन न जेवता बाहेर पडणे हा तर घोर अपराधच व्हायचा.

एकतर पूर्वी असे कार्यक्रम कौटुंबिक स्वरूपाचे असत. प्रत्येकाचा काही ना काही स्वरूपात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असे. आता अगदी चुलत नात्यातले लोकदेखील पाहुण्यासारखे आलेले दिसतात. स्वत:चे जेवण झाले की लगेच निरोप घेतात. असा कोरडेपणा आलेला आहे.

तेव्हा याबाबतीत दोन पर्याय आहेत.

यापुढे विवाह कार्याचे वगैरे आमंत्रण आले की यजमानांना परतीचा निरोप पाठवावा, की आम्ही तुमच्या आनंदात सहभागी आहोतच. परंतु अशा प्रसंगी तुम्ही आमच्यावर जेवणावळींच्या निमित्ताने इतका अफाट खर्च करावा हे आम्हाला उचित वाटत नाही. त्यामुळे आम्ही अशा प्रसंगी दुरूनच आशीर्वाद देत आहोत. लग्नानंतर विविध कारणांनी जेव्हा आपल्या कौटुंबिक स्वरूपाच्या भेटी होतील, तेव्हा भोजन वगैरे होत राहिलच. उलट भविष्यात तसे प्रसंग न आल्यास आम्ही हे करत आहोत हे योग्यच झाले हे सिद्ध (स्पष्ट) व्हावे. कृपया राग मानू नये. पुन्हा एकदा शुभेच्छा.

हे झाले कार्यक्रमाला न जाता दुरूनच शुभेच्छा देण्याबाबत. आता कार्यक्रमाला हजर राहून जेवणासाठी हजर न राहण्याबाबत.

आम्ही तुमच्या आनंदात सहभागी आहोतच. परंतु अशा प्रसंगी तुम्ही आमच्यावर जेवणावळींच्या निमित्ताने इतका अफाट खर्च करावा हे आम्हाला उचित वाटत नाही. त्यामुळे आम्ही कार्यक्रमाला हजर राहूच; मात्र जेवणाचा आग्रह करू नये व आम्ही न जेवल्याबद्दल वाईट वाटून घेऊ नये. लग्नानंतर विविध कारणांनी जेव्हा आपल्या कौटुंबिक स्वरूपाच्या भेटी होतील, तेव्हा भोजन वगैरे होत राहिलच. उलट भविष्यात तसे प्रसंग न आल्यास आम्ही हे करत आहोत हे योग्यच झाले हे सिद्ध (स्पष्ट) व्हावे. पुन्हा एकदा शुभेच्छा.

अशा स्वरूपाचा निरोप पाठवल्यावर यजमानांची कोणती प्रतिक्रिया होईल असे वाटते? यावरील मध्यम मार्ग कोणता ठरेल?

खरे तर आजवर मी स्वत: अशा अनेक कार्यक्रमांना हजेरी लावून मेजवान्या ‘झोडल्या’ आहेत. तेव्हा आता असे म्हणणे म्हणजे काहींना ‘सौ मेजवान्या झोडके अब बने ग्यानी’ असे वाटण्याची शक्यता आहे.

मात्र कोठे तरी सुरूवात ही करायलाच हवी. तुम्ही काय म्हणता? हे कशा पद्धतीने अंमलात आणता येईल? की आपल्याला पटत नसेल, तर आपण अशा कार्यक्रमांना न जाता घरी बसावे. जग असेच चालेल.

जेवणावळींचे प्रकार केवळ लग्नकार्यापुरतेच मर्यादित नसतात. तेव्हा याबाबतच काही सकारात्मक पायंडे पडले तर चांगलेच निष्पन्न व्हावे. यात कोणाची ऐपत किती आहे हा प्रश्न यायला नको.

२) टायरच्या जाहिराती

टीव्हीवर विविध टायरच्या जाहिराती पाहिल्या की असे नेहमी जाणवत राहते की त्याबरोबर त्या जाहिरातीतील गाड्यांचीही जाहिरात होते. तेव्हा अशा जाहिराती वाहनाची कंपनी आणि टायरची कंपनी अशा दोघांनीही केल्या तर त्यासाठीचा खर्च कमी होईल का?

अर्थात एखाद्या वाहनासाठी एकाच टायर कंपनीचा आग्रह धरला जाऊ शकत नाही हे कळते.

३) “इन्सान को डिब्बे में तब होना चाहिये जब वो मरा हुआ हो.”

हा सुंदर संवाद कोणत्या सिनेमातला आहे? बरोबर ओळखल्यास बक्षिस म्हणजे हा सिनेमा आधी पाहिले असला, तरी पुन्हा पाहण्याची गोड ‘शिक्षा'.

४) शारीरिक सेवांची खरी किंमत किती असावी?

केशकर्तनालयामध्ये केस कापण्याचे दर नुकतेच वाढवण्यात आले. बहुधा ८०-९० रूपये घेत आहेत आता. नुकतीच बातमी वाचली की कुठल्याशा मोठ्या खेड्यात ग्रामसभेने हे दर वाढवून देण्यास मनाई केली,म्हणून त्या गावातील सर्व नाभिकांनी एक दिवस आपली कामे बंद ठेवली. अर्थात शहरांमध्ये नाभिकांची युनियन हे दर ठरवते.

स्वत:च स्वत:चे केस कापणे हे अतिशय अवघड आहे. अर्थात पूर्ण चकोट करायचा असेल किंवा सगळ्या बाजूंनी एकाच नंबरचे मशीन फिरवायचे असेल तर गोष्ट वेगळी. अन्यथा दुस-यावर अवलंबून रहावेच लागते.

कोणी आपल्याला अशी सेवा देत असेल तर तिचे मूल्य किती असावे? आता जे मूल्य आकारले जाते ते पुरेसे आहे की ते आणखी वाढवायला हवे असे वाटते?

आज स्त्रियांबरोबरच पुरूषांसाठीही स्पा, केसांची खास निगा वगैरे सेवा उपलब्ध आहेत. त्या सेवांसाठी अवाजवी पैसे आकारले जातात अशा तक्रारी असतातच. मात्र मी तशा सेवांबद्दल बोलत नाही. केस कापण्याची जी मूलभूत गरज आहे त्याबद्दल बोलत आहे.

आजही आपल्या काखा दुस-यांकडून साफ करून घेणारे पाहतो. हे लोकही सहसा विनातक्रार ते करताना दिसतात. त्यासाठी वेगळी रक्कम घेतल्याचे दिसत नाही. कदाचित घेत असतीलही. अशा गोष्टी आपल्याआपण करू शकत असताना दुस-यांकडून त्या का करून घ्याव्यात?

५) सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीस या एकापाठोपाठ एक स्पर्धा जिंकत आहेत. त्यापोटी मिळणारी रोख रक्कम तर त्या विभागून घेत असतील. मात्र जेतेपदासाठी जी ट्रॉफी मिळते ती कशी विभागून घेत असतील?

प्रतिक्रिया

आवडलेच.
मस्त.

आज पण .... Smile

हा हा हा. मागे एकदा शुची यांनाही संधी मिळाली. गेट बंद होण्याच्या आधी.

पण आज गेट बंद झालंच नाही.

मुबारक हो, आपको स्वातंत्र्य मिल गया :party:

काही नेम नाही. किंवा आज विसरले असतील कदाचित. पण तसे काही नसेल तर मात्र धन्यवाद.

...तुमच्या कोंबडीच्या पिल्लांची जनगणना करू नये, म्हणतात.

बाकी असो.

'कोंबडीच्या पिल्लांची' म्हणताय. याआधी कोणी डुकरांची पिलावळ म्हटले होते हो. तेव्हा एवढे कौतुक करू नका. सवय नाही. असो.

तस नाही म्हणायचं त्यांना राकु. Don't count your chickens before they are hatched चे मराठी भाषांतर आह ते.
म्हणजे हुरळून जाऊ नका, अजुनही कदाचित धागा वाचनमात्र होइल असे म्हणतायत नबा.

मराठी भाषांतर कळले नाही. हुरळून जाण्याचा प्रश्न नाही. अजूनही शक्यताही ग्ृहित धरलेली अाहेच सुरवंट यांच्या कमेंटवर.

जेवणावळींबद्दल खरे आहे. पण धरलं तर चावतय सोडलं तर पळतय अशीच स्थिती आहे झालं. यजमानांना असं खर्चात घालणं योग्य वाटत नाही.

फ्द्फ्फ्द्स्फ्स्द्फ्ग्व्द्स्ग्व्फ्स्ग्रेव्र्त्२र्ग्फ्द्च्द्च्व्द्व्द्व्द्ग्र्फ्ग