वाचकांचा अभिप्राय - आंबट-गोड
वाचकांचा अभिप्राय - आंबट-गोड
पॉर्नांकाचे पिकलेले आंबे पेट्यांतून काढून घरपोच होत आहेत. काही अजून पेंढ्यातच भरून आहेत. रसिक लोक उड्या मारून रस चाखताना दिसताहेत. दरेक आंब्याला काही ना काही वाहवा मिळते आहे हे दिसतं आहे. पण तरीही संपूर्ण पेटीबद्दल लोकांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी हा धागा. ऐसीतर्फे सादर होणाऱ्या विशेषांकांसाठी खरं तर एकंदरीत अंकाबद्दल मत देण्यासाठी काही विशिष्ट जागा राखून ठेवली जात नाही. कधीकधी वाचक संपादकीयावर प्रतिसाद देतात. पण हे विशेषांक अनेक दिवस प्रसिद्ध होत असल्यामुळे नक्की कायकाय आवडलं, काय आवडलं नाही याबद्दल रेखीव काही हाती लागतंच असं नाही. म्हणून हा प्रयत्न. जमल्यास या विशेषांकापासून प्रतिसादासाठीच्या धाग्याचा पायंडा पाडण्याचा मानस आहे.
या अंकाची दखल महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत, मराठी प्लस अशा वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये घेण्यात आलेली आहे ही जमेची बाजू आहे. आत्तापर्यंतचा विशिष्ट लेखांवर आलेला प्रतिसादही बहुतांशी सकारात्मक आहे. या सगळ्यामुळे संपादक मंडळाच्या अंगावर महिनाभर आंबे ओरपल्याप्रमाणे मुठीमुठींनी मांस चढलेलं आहे. पण तरीही आत्ता जेमतेम निम्मा अंक प्रकाशित झालेला आहे. तेव्हा ऐसीचे चोखंदळ वाचक या अंकाबद्दल तोंडात चव ताजी असताना काय म्हणतात ते जाणून घ्यायची इच्छा आहे. तेव्हा आंबट-गोड, रसाळ-पाणचट, कच्चा-पिकलेला-जास्त झालेला... जी काही चव लागली ती जरूर कळवा. यातून पुढच्या अंकांसाठी आम्हाला शिकायला मिळेल.
प्रतिक्रिया
पुढच्या अंकांसाठी?
पुढच्या पॉर्न अंकांसाठी?
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
नाही, पुढचे वेगवेगळ्या
नाही, पुढचे वेगवेगळ्या विषयांवर विशेषांक काढू त्यासाठी.
पेटीतले काही आंबे हमखास खराब
पेटीतले काही आंबे हमखास खराब निघतात असं निरिक्षण आहे. इथेही तस झालेलं आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
जबरा
अवांतर:- मुळात टेबु विषय आहे ओपनप होउया लोकं नाके का मुरड्तात म्हणताना ऐसी अक्षरे वरती हां विषय विशेशांकापुरता मर्यादित का ठेवता ? हां प्रश्नही मनात येतोच. या विषयासंबंधी साहित्यासाठी इथेच एक स्वतंत्र विभाग सुरु करून आपण आपल्या विचारान्सोब्त प्रामाणिक आहोत याचा वस्तुपाठ ऐसी अक्षरे नि इथे घालून द्यावा नाहीतर पोर्न विशेशांक निव्वळ दांभिकता ठरेल असे वाटते
actions not reactions..!...!
या विषयासंबंधी साहित्यासाठी
नाय पटले.
माझ्या माहीतीनुसार कथा, ललित या सेक्शन मधे पॉर्न विषयक काही लिहिलेत तर काढून टाकले जाईल असे नाही (हे माझे निरिक्षण कम मत आहे. मी ऐसीच्या व्यवस्थापनाचा, संपादक मंडलाचा सदस्य नाही.)
शीत परीक्षक मोठ्या प्रमाणावर बघण्यात आले
शीत परीक्षक या पॉर्न निमीत्ताने मोठ्या प्रमाणावर बघण्यात आले.
शीत (जचिंचं थियरी प्रॅक्टीकल हे या विशेषांकाच शीत आहे अस समजुन बाकी भातावर टीकाकारांकडुन अगोदरच तयार भात्यातुन टीकाबाणांचा वर्षाव झाला) पण संपादकांच्या मनात वेगळीच खिचडी शिजत असावी हमारा लाल किला बासमती राइस है खुशबु फैलेगी ही असा आत्मविश्वास असावा अस वाटत होत पण इथे तर धाकधुक निघाली की.
शीघ्रप्रतिसादन हा नविन विलक्षण शब्द या निमीत्ताने वाचावयास मिळाला जनकाचे जितके कौतुक करावे तितके कमीच.
घासकडवींकडुन इतक्या घाईने हा धागा जो समारोपावर यायला हवा होता तो आताच आला याला काय म्हणावे ?
घमासान पे कीया हुआ शीघ्रखुलासान.
आता हे फार रोचक आहे बाहेरच्याला मिसगाइड करायच तर फक्त जचिंच प्रॅक्टीकल दाखवायच बघा लेको असल काय काय आहे हो या विशेषांकात ते पोप विमानतळावर उतरला त्याला पत्रकारांनी विचारल तो जोक आठवला. आणि ते एक मोठ्या बातमीशेजारी छोट पिल्लु सोडायच. उदा.
मोठी बातमी- भारतात बलात्कारांच प्रमाण १० % नी वाढल एक सर्व्हे
पिलु बातमी- ............. तळेगाव ब्रुद्रुक च्या घटनेत सहभाग आढळला.
जचिंचा बॉम्ब थोडा शेवटी घ्यायला हवा होता असे वाटते. पायरी पायरी ने मनाची तयारी झाली असती.
एकदम विश्वरुप दर्शन दिल्यासारखा प्रकार झाला अनेक अर्जुनांना भोवळ आली.
सहन होत नाही आणि सांगताही येत नाही असल काहीतरी झाल असाव.
इनसेस्ट खरच त्यातही साद अनेकांसाठी डिफीकल्ट टु डायजेस्ट आहे.
एकंदरीत तुमचं आत्तापुरतं
एकंदरीत तुमचं आत्तापुरतं अंकाबाबत मत आहे की 'गाडी भस्सकन ठेसनात आली, माझ्या नवऱ्याची धांदल झाली' सारखं चालू आहे तर. फोरप्लेमध्ये फार वेळ न घालवता शक्य तितक्या लवकर मुख्य मुद्द्याला हात घालण्याच्या पॉर्न फिल्मी धोरणाला हे साजेसंच आहे.
वैविध्य खूपच आहे. मला तर
वैविध्य खूपच आहे. मला तर सर्वच लेख आवडले. अनेक मुद्दे माहीतच नव्हते, काही लक्षात आलेले नव्हते. अंक खूपच आवडला.
'इमेजेस एवढ्या हेवी का
'इमेजेस एवढ्या हेवी का ठेवल्यात? आबांच्या आजच्या लेखातली इमेज ५+ एम्बीची आहे. चित्राचा फोटो काढत असाल तर तो फोटो MS पेंटमधे ओपन करून तीनचारदा सेव्ह अॅज केलं तर साईझ बराच कमी होतो. - एका अनामिक व्यक्तीकडून आलेला प्रतिसाद. या व्यक्तीला नाव सांगायचे नाहीये.
बोजड चित्रं
चित्रांचा तांत्रिक बोजडपणा ध्यानात आणून दिल्याबद्दल आभार तुमचे नि अमामिक व्यक्तीचे. लवकरच बदल करतो.
धन्यवाद.
मुद्दाम नाही
प्रतिमांचा आकार कमी करायचा असेल तर जिंपमध्ये उघडायच्या, इमेज-साईझ कमी करायचा, प्रतिमा साठवायची. शिंपल! येवडंबी कळंना. तेवढ्यासाठी विंडोज कोण इन्स्टॉल करणार!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
प्रतिमांचा आकार कमी करायचा
प्रतिमांचा आकार कमी करायचा असेल तर टर्मिनलमध्ये कन्व्हर्ट कमांड वापरायची. शिंपल! येवडंबी कळंना. तेवढ्यासाठी जिंप कोण इन्स्टॉल करणार आणि ते उघडून चार ठिकाणी कोण क्लिकवणार!
अभिनंदनीय स्वागतार्ह
अंक उत्तम आहे.
डाॅ.धीरज
सुमार कविता
अंक उत्तम आहे, पण कवितांनी साफ निराशा केली.
केवळ कविता घ्यायच्या म्हणून घेण्याला काहीच अर्थ नाही. समकालीन बझवर्ड्स वापरून केलेल्या सुमार कविता वाचून त्या अनावश्यक आहेत हे जाणवले.
उसंत सखू यांची कविता तर कॉलेजच्या वार्षिकात असतात तसल्या प्रकारचे सुमार विडंबन आहे.
आदूबाळ यांची सेरिज, अंकातील समग्र मेघना भुस्कुटे, फ्रेश धर्मकिर्ती सुमंत, जयदीप चिपलकट्टी यांचा दीर्घ लेख; वाचले आणि बेहद्द आवडले. संवेद यांचा लेख त्यांच्या लैंगिकता या विषेशांकाचे एक्स्टेंशन वाटले. बाकीचं आधी वाचलेलं आणि निरोचक.
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
सगळेच लेख वाचले नाहीत; पण
सगळेच लेख वाचले नाहीत; पण पॉर्नचे भविष्य आणि तंत्रज्ञान ह्यावर कोणी काही लिहीलेले नाही. शिवाय पॉर्नमुळे नातेसंबंधांवर परिणाम होतो वगैरे मत मांडणार्या लेखांच्यासमोर "तो का होऊ नये?" असा प्रश्न विचारणारे लेख नाहीत. जसा समाज आधीच्या प्रगतीमुळे उत्क्रांत होत गेला तसाच ह्या गोष्टींनीही उत्क्रांत होत जाणारच.
आत्ताच बाजारात मानवसदृष बाहुले-बाहुल्या मिळतात. पुढे व्हर्च्युअल रिॲलिटी वगैरेमुळे आपल्या फँटसीज जगण्याचा अनुभव मिळवता येऊ लागेल अशी शक्यता आहे. शिवाय तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे प्रत्यक्ष माणसांना पॉर्न बनवायची वेळ येणार नाही आणि युजरला स्वतःच्या आवडीप्रमाणे व्हर्च्युअल पात्रे बनवता येतील. म्हणजे माणसांचे शोषणही थांबेल आणि कदाचित पूर्ण व्यक्तिस्वातंत्र्याच्या जवळ पोचता येईल. बरेच लोक पाहण्यातल्या/भेटलेल्या व्यक्तींशी निगडित कल्पनाविलास करून हस्तमैथुन करतात. अशा लोकांनी त्या व्यक्तींची व्हर्च्युअल पात्रे करण्याबाबतचे नैतिक घोळ वगैरे होऊ शकतात.
अशा धरतीवरचे आणखी काय बदल होऊ शकतील त्यावर लेख आला असता तर बरं झालं असतं. पॉर्नचा इतिहास व वर्तमान झाला. भविष्याचाही थोडाफार विचार व्हायला हवा होता.
आत्मजाहिरातीचा दोष पत्करून
आत्मजाहिरातीचा दोष पत्करून लिहितो, माझा लेख वाचाल तर तुम्ही म्हणताय त्यातील काही भाग आहे इतकेच नमूद करतो.
ते लेखन तुमच्या अपेक्षेला उतरणारे आहे की नाही हे तुम्ही सांगायचे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
धन्यवाद. लेख वाचला. पुढील
धन्यवाद. लेख वाचला. पुढील ट्रेंड्सचा उल्लेख तुम्ही केला आहे पण त्यांचे जनरल इम्प्लिकेशन्स काय होतील याच्यावर लिहीण्याचा तुमच्या लेखाचा स्कोप नाही. माहिती म्हणून लेख चांगला आहे.
लैंगिकतेचा फार प्रादुर्भाव
लैंगिकतेचा फार प्रादुर्भाव झाला आहे हल्ली सगळीकडे!
जगदंब जगदंब!!
शिव शिव!!
श्रीराम श्रीराम!!
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
या चर्चेत सहभागी होणारांना
या चर्चेत सहभागी होणारांना नम्र विनंती. चांगला आहे, वाईट आहे अशा थंब्स अप थंब्स डाउन पद्धतीच्या कॉमेंटपलिकडे अजून काही विशिष्ट प्रतिसाद देता येतील का? म्हणजे
१. तुम्हाला विशेष आवडलेले लेख कुठचे
२. तुम्हाला विशेष न आवडलेले लेख कुठचे
३. अंकात अजून काय आलेलं आवडलं असतं
४. कुठच्या गोष्टी अंकात नसत्या तरी चाललं असतं
५. रंगसंगती, चित्रं आणि मुखपृष्ठ यांबद्दल मत काय आहे
६. एकंदरीत सादरीकरणाबद्दल काही मतं
अशा प्रश्नांची उत्तरं थोडक्यात दिलेली आवडतील.
तुम्हाला विशेष न आवडलेले लेख
नका विचारु तो प्रश्न राघा, त्य माशाला लोक तळून खातील

नमस्कार यू नो व्हू. _/\_
नमस्कार यू नो व्हू.
_/\_
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तुला देजा वु झालं का रे
तुला देजा वु झालं का रे बॅट्या.
वरील वाक्य फक्त बॅट्यासाठी आहे तेव्हा अर्थ विचारुन भंडावु नये
नाही नाही, देजा वू नाही तर
नाही नाही, देजा वू नाही तर देजा शु झालं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अंकाविषयीची माझी मते
१-
एकुण लेखांची संख्या फार जास्त होती कदाचित ४० ते ५० च्या घरात असतील मी मोजली नाहीत. संख्याबाहुल्याने अवधानशैथिल्य येते डिट्टो पॉर्न साइट्स सारख एक बंद केली तर दुसरी दुसरी क्लोज केली तर तिसरी व सतत आव्हान देणारी चलचित्रे तस काहीस सतत इवल्याशा मेंदुला आव्हान देणारे तयारीने उतरलेले दिग्गज एकेकाचा दिर्घकालीन चिंतनातुन आलेला लेख थोड चलबिचल झाली हे वाचु की ते वाचु अस उंदीरदमछाक झाली.
त्यावर संपादकानी जुना उपाय केला रोज थोडा थोडा ४-४ ने ठीक आहे. पण एकुण संख्या थोडा क्वालिटी बार अधिक उंच ठेवत थोडी संपादकीय कात्री मारत एकुण लेख संख्या घटवणे हा एक उपाय होउ शकला असता.
दुसरा थोडा दोन सीझनमध्ये पॉर्न उन्हाळी पॉर्न सावन असा दोन सीझन मध्ये थोडा दोन महीन्याच्या गॅपने तर थोडा आनंद आला असता अस मला आपल एक वाटत. कारण कुठेतरी विषय एकच असल्याने थोड्डास्सा बोर झाला तो झालाच.
२-
जचिंचा बॉम्ब आवश्यकच होता अगोदर हिरोशीमा मग नागासाकी मजा आली. मात्र जर तो देण्यात अडचण नव्हती व एकंदरीत पॉर्न विषयी फार टोकाची मते दोन्ही टोकाची भयानक वाइट ते भलतेच आवश्यक संपादकांची नव्हती. तर सुंदर सुशील सात्विक कलात्मक पॉर्न च ही एखाद दुसर उदाहरण चित्रापेंटींग सहीत दिल्याने बॅलन्स झाला असता. व इतकी सर्व प्रौढ पॉर्नभोगी एकाठीकाणी आलीच आहेत तर माझ आवडत दर्जेदार सुंदर सुशिल पॉर्न कादंबरी उतारा वेबसाइट लिंक्स असही होउन जाऊ दिल असत. शेअरींग नी मजा वाढली असती. मात्र हाच धागा पकडुन याने वाईट शिक्का मारला जाण्याची शक्यता वाढली असती. त्यामुळे आपली कोरडी चर्चा चालवली सुकी भेळ वाटली ते बरेच झाले. थोड प्रत्यक्ष प्रणयाहुन वैमैथुन वर भर दिला गेला. मग जचिंजा बॉम्ब का टाकला. तो समाजाला "हलवण्यासाठी" आवश्यक होता म्हणुन का ?
३-
लेखकांत एले व मुले दोन्ही लेखकांच प्रमाण यावेळेस संतुलित होत ते आवडल. बाकी मुक्या लेखकांमध्ये काहींना वाचा फुटल्याने बरे वाटले. हे मुक्यांचा अधिकार पुर्ण मान्य करुनही (आपण सर्वच हा मुकाधिकार वापरतो) हे मुले संवादाची इतकी चांगली संधी उपलब्ध असतांनाही मुके का राहतात ते एक कोडच आहे. एक शक्यता आहे की त्यांना अपेक्षीत असलेल्या दर्जापर्यंत संवाद प्रतिसाद कदाचित जात नसावा. किंवा वैताग असावा एकुण या प्रकाराविषयी किंवा सवय आवड नसावी काय ते माहीत नाही मुले ती मुलेच मुलांच काही सांगता येत नाही कस मुड आहे त्यावर अवलंबुन असतो. पण मी तपास केल्यावर काही मुले बोलण्यास उत्सुक असतात कार्यक्रमात वगैरे जाऊन बोलतात वगैरे असेही ऐकले. मग कदाचित आपणच त्यांना "उचकवण्यात" कमी पडत असु. (उचकवणे सकारात्मकतेने घ्यावे ही विनंती )
४-
विषयाचे सर्व पैलु विविध पैलु कव्हर करण्याचा, त्यात संतुलन साधण्याचा उदा. आजगावकर-जावडेकर. रुची-उत्पल, कोल्हटकर-मोंपासा, कथा-कविता सर्वत्र जबरदस्त सुंदर कलात्मक बॅलन्स साधलेला होता. एकच रंग एकदाच वापरला पुन्हा त्याच्या शेजारी कॉन्ट्रास्ट ठेवला फारच सुंदर संपादक अमर रहे. शिवाय स्ट्रीपटीज चा सेन्स ही जबरदस्त होता. आज ये तो कल वो धीरे धीरे ( हमारे और उनके प्यार मे बस फर्क है इतना उधर है जल्दी जल्दी इधर आहीस्ता आहीस्ता) आहिस्तावादी संपादकांनी उत्सुकता ताणुन धरली. भस्सकन काही टाकल नाही. परीश्रम किती घेतले ते तर दिसतच आहे. मराठी संस्थळे नसती तर कितीतरी जण अव्यक्तच राहुन गेले असते.
सर्व संपादकांचे अंकासाठी परीश्रम घेणारांचे जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन !
आम्हाला ही इतकी मोठी मेजवानी देण्यासाठी हजार आभार.
धन्यवाद !
उत्तम झालाय अंक.मराठीत असा
उत्तम झालाय अंक.मराठीत असा पहिलाच प्रयत्न झाला आहे.उगाच टिका करणे बरोबर नाही.जगदंब,शिव शिव वाचकांचे प्रमाण जास्ती आहे तर लेखकांचे आणि तेही एका ऐसीवर किती असणार?
जसं ग्रामिण कथा लिहिणं चित्तुर पकडण्याइतकं अवघड आहे ( श्रेय : व्यंकटेश माडगुळकर ) तसं अस्सल पॅार्न लिहिणं आणि प्रकट करणंही कठीणच आहे.अंकाची कल्पना धाडसाने उचलून यशस्वी करणं जमलंय आणि लेखही भरपूर आलेत.इंग्रजीतल्या छापील अंकांशी तुलना करणं साफ चुकीचं आहे.तिथे जाहिराती,अंकांची किंमत,खप पाहता भरपूर मोबदला देऊन लेख लिहवून घेतले जातात,फोटो मिळवले जातात.
इथे ऐसीवर अगोदरपासून विनोदी,वैचारिक,थिसिसछाप,खवचट,अध्यात्मिक,मिमिरेमी वगैरे लेखन करणारे प्रसिद्धी पावलेले लेखक पॅार्न विषयातही तितकेच ताकदीचे अन प्रामाणिक लेखन करू शकतील ही अपेक्षा धरणे अवास्तव आहे.काही न लेखक इथे मात्र या विषयातले भूर्ज खलिफा ठरलेत.
एकूण स्तुत्य उपक्रम.
अपेक्षाभंगाबद्दल क्षमस्व.
पण अंकात पॉर्न सापडेल अशी अपेक्षा होती का? का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अंकात पॅार्न सापडण्याची
अंकात पॅार्न सापडण्याची अपेक्षा मला तरी नव्हती.कारण दिलंय अगोदर.शब्दांच्या कोलांट्या उड्या मारायच्याच तर पॅार्नविषयक अंक आणि पॅार्न साहित्य अंक असा फरक करता येईल.
...किंवा, जुनाच फालतू विनोद
...किंवा, जुनाच फालतू विनोद पुन्हा उगाळायचाच तर, शंकरपाळ्यात शंकर किंवा स्प्रिंगरोलात स्प्रिंगा सापडण्याची अपेक्षा आपण करतो काय?
मग पॉर्न विशेषांकातच तेवढी पॉर्न सापडण्याची अपेक्षा का करावी?
(उद्या स्क्याटालॉजी विशेषांक निघालाच, तर मग काय त्यात... जाऊदे!)
सर्व कथा फारच आवडल्या.लेख
सर्व कथा फारच आवडल्या.
लेख माहीतीपूर्ण व वैविध्यपूर्ण वाटले.
मुलाखती प्रांजळ पण मुख्य धारेच्या कडेकडेनी , उत्तरिय सावरत , पायाला पाणी फारसे न लागू देता केलेल्या वाटल्या. कविता मला आवडल्या.
मोंपासा - भाषांतरे एकदम म्हराटी मातीतील वाटली.
जचिंचा साद वाला अॅटमबॉम्ब फक्त धक्का देऊन गेला नाही तर बघे हवेतच उडवले गेले. ढुंगण सडकुन निघाले
काही मते.. शुभेच्छा आणि आभार!
5 तारीख उलटून गेली आहे तेव्हा अंक पूर्ण प्रकाशित झाला असे समजून प्रतिसाद देतो आहे:
अंक एकुणात खूप आवडला. अनेक लेख आजवरच्या ऐसीच्या रुक्ष प्रतिमेला साजेसे नसल्याचे अधिकच आवडले. माहिती आणि वाचनियता यांचा चांगला समन्वय साधलेला आहे. या दृष्टीने भारांक आणि हा अंक हे ऐसीचे उन्हाळी अंक बघता, दिवाळी अंकांपेक्षा ऐसीचे उन्हाळी अंक अधिक वाचनीय, रसभरीत आणि दर्जेदार असतात असे माझे मत होऊ लागले आहे. दिवाळी अंक अधिक कोशोबा असतात.
तुम्ही सुधारणा विचारत आहात म्हणून इथे काही सुधारणा कुठे हवी छाप मते देतोय. ती मते कशी घ्यायची हे ठरवायला संपादक मंडळ सक्षम आहेच:
अर्थात इतर अनेक लेखांमुळे अंक अजिबात कोशोबा झाला नाही याबद्दल संपादकांचे कौतुक आहे.
१. लांबी:
अंक मोठा झाला आहे. काही लेखांना थेट हे अंकात नको म्हणणं सहज शक्य होतं इतके ते ऐसीच्या दर्जाला साजेसे नाहीत. ते का अंतर्भूत झाले संपादकच जाणोत. (थेट नावंच घ्यायची तर मासा यांची तथाकथित कथा, मनाच्या श्लोकांचे (वृत्त, अर्थ सर्वच दृष्टीने) हुकलेले विडंबन, काही कविता). संपादकीय चाळणीला काही भोकं असावीत
२. संपादक की संकलक?:
एकुण ६०च्या आसपास धागे असले तरी काहि लेखन भागांत आहे (जसे अदुबाळाची कथा, अदितीचे लेख) शिवाय काही संपादकीय सदरातील लेखन आहे. ते वगळता पन्नास लेखने (धागे) या अंकात आहेत. पैकी तब्बल २५ धागे हे थेट पुर्वप्रकाशित किंवा पुर्वप्रकाशनाचा अनुवाद आहेत. तेव्हा ५०% अंक हा केवळ संकलीत आहे. असे असताना संपादकांनी स्वतःला संपादक म्हणावे का संकलक हा प्रश्न पडला
इथे एक स्पष्ट केले पाहिजे की पुर्वप्रकाशित साहित्य अंकात असु नये असे माझे मत नाही. जर एखाद्या विषयात आधीच काही लिहुन ठेवले असेल तर ते या अंकात परवानगी घेऊन समाविष्ट करणे मला अजिबातच गैर वाटत नाही. पण त्या आधी ते लेखन अंकात असलेल्या गोष्टींपेक्षा खरंच काही वेगळं देतंय का आणि ते किती प्रमाणात असावे याचे काही बंधन (अगदी ठोस नाही पण रेंज तरी) संपादक मंडळाने ठरवावी अशी सुचवणी करतो. ५०% अंक हा आधीच लिहिलेला असणे संपादक मंडळाला योग्य वाटत असल्यास काहीच म्हणायचे नाही (अर्थात हे मतही संपादकीय गाळणीतील भोकं बुजवा याच कडे निर्देश करते)
३. सजावट:
अंकाचे जे डेकोरेशन आणि मुखपृष्ठ आहे ते अंकाशी मिळतेजुळते हवे असे वाटते. यावेळी ते साफ गंडले आहे. अंकातील लेखन त्याची प्रकृती, तो अंक नक्की काय मांडतो आहे हे न बघता मुखपृष्ठ आणि आतील सजावट काहितरी वेगळंच दर्शवतं. अंकात काही का असेना, डेकोरेशन मात्र अस्संच असणारे असं काही ठरलं होतं का? त्यामुळे झालंय काय आतमध्ये साहित्यिक महोत्सव आणि बाहेर डेकोरेशन बड्डेचं असं काहितरी झालंय
४. अश्लील!
पॉर्न अंकात हा आक्षेप कसा काय असु शकतो असे अनेकांचे मत असेलही. पण अंक पॉर्नचा आहे की पॉर्नबद्दलचा आहे यात गडबड झाली असावी असे वाटण्यास वाव आहे. संपादिकाबाई संपादकीयात म्हणाल्याच आहेत की ' जे जे अनावश्यक, ते ते अश्लील' त्या अर्थाने काही लेखनामुळे (मासा यांची कथा, अनेक कविता, तांब्यांचा कथाबाह्य लेख, मुखपृष्ट 'समजावणारे' लेखन) व 'अनावश्यकरीत्या असुंदर-असंस्कृत-निर्लज्ज आहे - ते ते पॉर्न.' या व्याखेनुसारही ('असभ्य' सारखे लेखन, काही कविता) यामुळे अंकाचंच पॉर्निफिकेशन झाल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे संपादकांचा फोकस हुकला असे माझे मत आहे.
५. प्रतिसाद आवश्यकः
अनेक लेखकांचा आपल्या धाग्यावर प्रतिसाद आवश्यक आहे. त्याशिवाय ऑनलाईन लेख काढण्याचा फायदा काय हे एक. पण त्याहून महत्त्वाचे व्यवस्थापक/संपादकांचा प्रतिसाद येणे अधिक आवश्यक आहे, फेसबुक, कित्येक धाग्यांवर अनेक ऐसीबाह्य वाचकांनी काही प्रश्न विचारले आहेत. त्याला लगोलग व जाहिर उत्तरे देणे हे संपादकीय कर्तव्य आहे. त्याकडे लक्ष देता येईल. शिवाय फेसबुक व ट्विटर या माध्यमांवर धाग्याचा लिंका डकवल्या की झाली जाहिरात हा मागास समज काढणे अत्यंत गरजेचे आहे. ही दोन्ही माध्यमे अधिक कल्पकतेने वापरून कितीतरी अधिक वाचकांपर्यंत पोचणे शक्य आहे. ते होताना दिसत नाही.
अर्थात यातील प्रत्येक मत सापेक्ष आहे याची व्यवस्थित कल्पना आहे. केवळ इथे जाहिर विचारणा केल्यामुळे या सुचना जाहिर देत आहे. त्यामुळे यातील (व इतरही प्रतिसादातील) टिकेकडे किती लक्ष द्यायचं ते संपादक मंडळाने ठरवायचे आहे.
पुन्हा एकदा संपादक मंडळाचे एक (काही लहानमोठ्या उणीवा असलेला का होईना - उणीवा काय असायच्याच) दर्जेदार अंक दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार! ऐसीला पुढिल अंकांसाठी व वाटाचालीसाठी शुभेच्छा!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ऋ spoke for me too,
ऋ spoke for me too, almost...
cover is very good but I agree: ते गंडले आहे....
<पॉर्निफिकेशन झाल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे संपादकांचा फोकस हुकला> ...I too was surprised by the extent of pornification....
<पॉर्नचा आहे की पॉर्नबद्दलचा आहे यात गडबड झाली असावी असे वाटण्यास वाव आहे.>...this I guess is OK if one aimed for it because Karve's Samajswasthya used to have both...."I am naked" and "Why is it ok to be naked".....but the balance is important
but many things shone...for me they are:देखो मगर प्यार से, पॉर्न, मी आणि समाज, पदराआडचा वात्स्यायन, अजब खटला, चंदूची शिकवणी, बाईपणाचे शौकीन संदर्भ, गोडसे भटजी, न केलेलं भाषण, मराठी नाटकातील अश्लीलता(for its scholarship)...
overall great effort, good product but the editors need to get their focus for forthcoming theme issues...
"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."
काही उत्तरं
एकीचं पॉर्न ही दुसरीची इरॉटिका असते; त्यामुळे पॉर्न कोणतं हे ठरवण्याच्या फंदात मी शक्यतो पडत नाही. अगदीच वाटलं तर 'मला ही गोष्ट पॉर्न वाटते' इतपतच मत मी मांडते.
व्यवस्थापकांनी/संपादकांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे हे अपेक्षा रास्त आहे. कामाच्या बोज्यामुळे, अचानक डोक्यावर आलेल्या कामांमुळे काही लोक (होय, होय, संपादक आणि व्यवस्थापक ही माणसंच आहेत) अनपेक्षितरित्या व्यस्त झाले. काही ठिकाणी, शेरेबाजीला उत्तर देण्याची गरज नाही म्हणून शांत बसले, असं माझं आकलन आहे. जिथे शक्य असेल तिथे उत्तर दिलं जात आहे किंवा दिलं जाईल. "आमचा प्रतिसाद आल्यावर २४ तासांत त्याला उत्तर आलंच पाहिजे", अशा छापाची काही अपेक्षा असेल तर ते ही ह्याच धाग्यावर मांडायला हरकत नाही.
'मुखपृष्ठाबद्दल' धाग्याबद्दल दुसऱ्यांदा कुरकूर वाचली म्हणून - २०१५ च्या दिवाळी अंकातही असा धागा होता. हे काही नवीन नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
माझी कृति
(कवितांबाबत काही प्रतिसाद आहेत, त्या अनुषांगाने.)
माझी कृती कविता आहे की नाही याबाबत माझे आग्रही मत नाही. अनुक्रमणिकेतील वर्गीकरणात कुठेतरी ही कृती घालायची म्हणून संकलकांनी "कविता" विभागात घातली त्याबाबत माझी तक्रारही नाही.
प्रयोग म्हणून एक युक्तिवाद मांडण्याकरिता यमकबद्ध कडव्यांतली तंत्रे अतिढोबळपणे राबवलेली आहेत. तंत्राचा असा बटबटीत उपयोग कविता-या-उद्देशाकरिता लिहिलेल्या कृतीत शोभला नसता, पण न-शोभण्याचा हा मुद्दा युक्तिवाद-या-उद्देशाकरिता नि:संदर्भ आहे.
कविंनी मनावर घेऊ नये.मुळात
कविंनी मनावर घेऊ नये.मुळात काव्य सुचणे अवघड.लेखसुद्धा कठीणच.
कविंच्या मनावर कधी परीणाम
कविंच्या मनावर कधी परीणाम झालेला पाहीलाय का अचरट जी? त्यांच्या कवितांमुळे अन्य लोकांच्या मानसिक स्वास्थ्यावरती परीणाम होतो
..... सुपरिणाम हो
आभार
पोर्न विशेषांक खूपच छान आहे. सदस्यत्व घेण्यास प्रवृत्त झालो त्यातले काही उत्कृष्ट वैचारिक लेख वाचून. असेच आणखी चांगले वाचायला मिळो वेगवेगळ्या विषयांवर पुढेही.
गर्दीतला दर्दी
उत्पल आणि आदूबाळ
जेवढा अंक वाचणे शक्य झाले त्यामध्ये उत्पल यांचा लेख आणि आदूबाळ यांची कथा हा अंकातील सर्वोत्कृष्ट भाग वाटला. अजूनही काही लेख वाचणे बाकी आहे. कवितांची नावे वाचून त्या ऑप्शनला टाकल्या आहेत.
त्या त्या लेखनाखाली
त्या त्या लेखनाखाली मतप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करीन. समग्र अंकाबद्दल इथे जे मतप्रदर्शन झालं आहे, त्याला उद्देशून - बर्या-वाईट सगळ्या प्रकारच्या अभिप्रायांबद्दल आभार.
सगळ्या प्रकारच्या आक्षेपांना उत्तर देणं शक्य नाही, ते आवश्यकही नाही. प्रयोग असतात. काही यशस्वी होतात, काही फसतात. फसणार्या प्रयोगांचंही प्रयोग म्हणून एक मूल्य असतं. काळाच्या ओघात असले फसलेले प्रयोग टिकून राहत नाहीत. फोलपटाप्रमाणे वाहून जातात आणि ते योग्यच आहे. पण प्रयोगाला जागा करून दिल्यामुळे परंपरेच्या साखळीला एक नवा दुवा मिळण्याची मात्र शक्यता निर्माण होते, जे त्याचं खरंखुरं काम. असं काम या अंकाच्या प्रयोगानं करावं, तसं करताना चश्मिष्ट होऊ नये, मिश्किल आणि सखोल दोन्ही असावं, असा प्रामाणिक प्रयत्न होता, इतकंच नोंदणं उचित.
पुनश्च आभार.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
खूपच संख्येने चांगले लेख/धागे
चांगले धागे खूपच संख्येने आहेत.
आधी प्रत्येकावर काही सार्थ प्रतिसाद लिहायची योजना होती.
परंतु काहीच न लिहिण्यापेक्षा "चांगला लेख", "+१", "असेच म्हणतो" वगैरे, प्रतिसाद लिहून नोंद करण्याचे काम भागवतो आहे.
सहमत
धनंजयशी सहमत आहे. (वेळेअभावी अगदी इथे सुद्धा तुर्तास केवळ सहमती दाखवतो आहे.) वेळ मिळेल तसे धाग्यांवर प्रतिसाद देण्याचा मानस आहे.
-Nile
राजेश घासकडवी पुण्य: 2 या
राजेश घासकडवी
पुण्य: 2
या चर्चेत सहभागी होणारांना नम्र विनंती. चांगला आहे, वाईट आहे अशा थंब्स अप थंब्स डाउन पद्धतीच्या कॉमेंटपलिकडे अजून काही विशिष्ट प्रतिसाद देता येतील का? म्हणजे
१. तुम्हाला विशेष आवडलेले लेख कुठचे
मेंदू आणि पॉर्न - सुबोध जावडेकर
पॉर्नोग्राफी एक भयानक व्यसन - गोपाळ आजगावकर
कवी बिल्हणकृत 'चौरपञ्चाशिका' - अरविंद कोल्हटकर
२. तुम्हाला विशेष न आवडलेले लेख कुठचे
पु. पु. पिठातली (उर्फ भाषाभीरूची गोष्ट) - सतीश तांबे
पॉर्न, मी आणि समाज - आनंद करंदीकर
३. अंकात अजून काय आलेलं आवडलं असतं
पोर्न आणि जातवाद वंशवाद
४. कुठच्या गोष्टी अंकात नसत्या तरी चाललं असतं
मुखपृष्ठाविषयी - चिंतातुर जंतू
५. रंगसंगती, चित्रं आणि मुखपृष्ठ यांबद्दल मत काय आहे
XXX
६. एकंदरीत सादरीकरणाबद्दल काही मतं
अपेक्षाभंग पण यथातथा चांगला
अंक घाईत काढलाय
अशा प्रश्नांची उत्तरं थोडक्यात दिलेली आवडतील.
सदानकदा
आणखी आवडलेले
पंकज भोसले, सतीश तांबे आणि अरविंद कोल्हटकर यांचे लेख/कथा आवडल्या. वाचन चालू आहे.