"ॐ श्री शतायुषी स्तोत्र"

भीमरूपी महारुद्र / हनुमान तो वीरभद्र
त्यासि वंदून हे स्तोत्र / ठेविले जे जगापुढे
शतायुषी कसे व्हावे / कोलेस्टेरॉल मोजावे
आणि त्यासी रोखावे/ दोनशेच्या आत ते
रुधिरमात्रा त्याची येते / अन्नातुनी वीस टक्के
आणि बाकी ऐंशी टक्के / शरीरचि बनवे पां
प्राणिज पदार्थ नच खावे/ लाल मांस टाळावे
चिकन तेही कमी खावे / कोलेस्टेरॉल सर्वत्र
कमी स्निग्धांशाचे दूध / एक टक्का दोन टक्के
लक्षात ठेवावे पक्के / डेअरी मध्ये जाताना
बाकी ऐंशीचे काय / त्यानेच बुडत्यात पाय
स्टॅटिन औषधे माय / त्याच्यासाठीच बनविली
रक्तदाब मोजावा / अती चढू नच द्यावा
रोखुनी तोही धरावा / एकशे वीसच्या आतचि
व्यायाम औषधे आसने / अशा अनेक उपायाने
रक्तदाब तो रोखणे / शक्य सहज त्वांसि पां
साखर हा शत्रू मोठा / मधुमेह हाणी सोटा
स्नायूंचा टाळावा तोटा / चाळीशीच्या नंतरी
सूर्यनमस्कार घालावे / डंबेलही असू द्यावे
मधून मधून मापावे / शरीराचे वजन ते
बी एम आय काढावा / चोवीसखाली आणावा
आणि तेथेचि रोखावा / मिताहार करोनिया
व्यायामाचे फायदे तोटे / वजन त्याने नच घटे
वजन-नियमन-रहस्य मोठे / कमी खाणेचि प्राप्त पां
दिवसभराचे खाणे/ सहा भागी विभागणे
एकेक तो भक्षणे / दोन-तीन तासांनी
शतायुषी होण्यामध्ये / शरीराचा भाग छोटा
मनाचा भाग जो मोठा / मन जणू सर्वकाही
खिन्नता जडू नच द्यावी / अनेक माणसे जोडावी
नव-साधने वापरावी / फेसबुक उत्तम ते
त्यामध्ये मात्र पहा / काही पथ्ये पाळावी
कटू चर्चा टाळावी/ रक्तदाब वाढे तो .
रॅपामायसीन औषध नवे/ एक मिलिग्रॅम रोज घ्यावे
नवजीवन पावावे / नवे जाणा रहस्य हे
दोनशे रुपयांची कविता / मोफत तुम्हां देतो आता
पहातो कसे ठेवता / आरोग्य-वर्तन आपले !

जय जय रघुवीर समर्थ !

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

पहिली रक्तदाबाची गोळी ती सुळावर चढवी।
अँटिबाइयोटिक्सचा गैरवापर तो सर्दी खोकल्यावरी
शरिराचा खोकडा करी।
तयार प्रोटिन आहार तो बालकांस दुबळा करी।
चणेदाण्यांची दुकाने ती त्यांच्या जागा मेडिकल स्टोरस घेती।
गल्ल्यावर फिरवून उदबत्ती इच्छितो मालक तुम्हासी पेट्रन।
कोक चॅाकलेटस पिझ्झावरती गेले ते बालपण तारुण्यातले ते दुग्धपान काय देईल शतायुष्य?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोघे पण सव्वाशेर...
अचरटबाबा, लै झ्याक धार आलेली आहे लेखनाला. मी गरीब एवढच म्हणू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

आरोग्यपूर्ण कविता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

**********

राम का गुनगान करिये |
रामप्रभू की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिये ||