By anant_yaatree, 11 September, 2020 कोलाहलात गर्दीच्या एकांती मी हरवतो अंधारून येता मीच अंतर्बाह्य झळाळतो रिक्ततेच्या डोहामध्ये सदा सचैल डुंबतो शून्य असूनही थेट अनंताशी झोंबी घेतो आठवता आठवता पुन्हा त्याला विसरतो दशदिशा कोंदून जो दहा अंगुळे उरतो Log in or register to post comments 1316 views