शुक्राचे अधिक्रमण

शुक्राचे अधिक्रमण म्हणजे सूर्याच्या तबकडीवरून शुक्र सरकताना दिसतो. सूर्यग्रहण दिसतं तसाच प्रकार फक्त शुक्राचा आकाशातला भासमान आकार चंद्र आणि सूर्यापेक्षा बराच कमी असल्यामुळे या घटनेला ग्रहणाऐवजी अधिक्रमण म्हणतात. सूर्य आणि पृथ्वीच्यामधे शुक्र आणि बुध हे दोन ग्रह आहेत; त्यामुळे अधिक्रमण या दोन ग्रहांचंच दिसतं.

५-६ जूनला शुक्राचं अधिक्रमण दिसणार आहे. हे पहाण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता नाही, पण सोलर फिल्टरची नितांत गरज आहे. योग्य फिल्टर वापरल्याशिवाय कृपया सूर्याकडे पाहू नका, अगदी कॅमेर्‍यातूनही.

यासंदर्भात मराठीतून अधिक माहिती इथे आणि इथे आहे.

या वर्षीचे शुक्राचे अधिक्रमण न पाहिल्यास सध्या जिवंत असणार्‍या लोकांना शुक्राचं अधिक्रमण दिसणं कठीण आहे; शुक्राचं पुढचं अधिक्रमण २११७ साली होणार आहे.

सध्या पश्चिम आकाशात, सूर्यास्तानंतर क्षितीजापासून साधारण २० अंश उंचीवर शुक्र दिसतो आहे.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

महत्त्वाची माहिती.
सूर्याकडे बघताना काजळी धरलेल्या काचेपेक्षा सूर्यग्रहणाचा आपल्या व्य्वस्थित मापाचा गॉगल वापरावा अशी (आगाऊ) सुचना करतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मायलर फिल्मस मिळतात. त्यावर एकही ओरखडा येऊ न देता आपल्या नेहेमीच्या चष्मा अथवा गॉगलवर ती फिल्म चढवूनही सूर्याकडे पहाता येईल. पुण्यात, आयुकाच्या अरविंद गुप्तांच्या ऑफिसात ते अगदी नाममात्र दरात डोळ्यांसाठी गॉगल्स आणि कॅमेर्‍यांसाठी फिल्म्स विकत होते.
कॅमेर्‍यात भिंग असतात, त्यासाठी अधिक जास्त फिल्टर करण्याची गरज असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माहितगार,

सध्याच्या पिढीच्या दृष्टीने खरंच खूप महत्त्वाची माहिती दिली आहे तुम्ही.
पुढच्या पिढीलाही कदाचित ही नयनरम्य घटना पहावयास मिळणार नाही.
तेव्हा मंडळी बघून घ्या.

अवांतर : शुक्राची मजा जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंतच जास्त चांगली घेता येणार आहे. तोपर्यंत शुक्राचे नेत्रसुखद दर्शन घेत रहा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

५-६ जूनला शुक्राचे अधिक्रमण असेल त्यामुळे अगदी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही शुक्र कितपत दिसेल याबद्दल मला शंका आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

येत्या आठवड्यात होणार्‍या अधिक्रमणाच्या वेळा आणि अधिक माहिती या संस्थळावरून मिळेलः
http://www.transitofvenus.org/june2012/where-to-be

भारतात ६ जूनच्या सकाळी आणि अमेरिकेत ५ जूनला संध्याकाळी अधिक्रमण दिसणार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अमेरिकेत आदल्या दिवशी (पक्षी ५ तारखेला) अधिक्रमणाचा शो ठेवल्याबद्दल दुर्बिटणेबैंचा निषेध.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पुढच्या वेळेस चूक दुरूस्त करण्याचा प्रयत्न करेन. Wink पण तुमच्यापैकी कोणी २२ व्या शतकात मला शाबासकी द्यायला येणार आहात का?

http://transitofvenus.nl/wp/where-when/local-transit-times/
या संस्थळावर अधिक्रमणाच्या वेळाच दिसत आहेत.

मुंबईत, एकूण भारतातच सूर्योदय होतानाच अधिक्रमण सुरू असेल आणि दहा वाजल्यानंतर शुक्र सूर्याच्या तबकडीवरून बाहेर जाईल. मुंबईतली वेळ सकाळी १०:२२. अमेरिकेत साधारण संध्याकाळी चार वाजता (सेंट्रल डेलाईट टाईम) अधिक्रमण दिसायला सुरूवात होईल, अधिक्रमण संपण्याच्या वेळेस सूर्यास्त झालेला असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

येथे http://mutha.ncra.tifr.res.in/ncra/for-public/transit-of-venus क्लिक केल्यास NCRA च्या संस्थळावरील मराठी, कन्नड, बंगाली, इंग्रजी इत्यादी अनेक भाषेतील PDF Download करता येतील. रेखाचित्रातून छान माहिती दिली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://mutha.ncra.tifr.res.in/ncra/for-public/transit-of-venus इथे वेगवेगळ्या भाषांत मुलांसाठी अधिक्रमणाबद्दल माहिती दिली आहे.

अरेच्चा! मी माझ्या कूर्मगतीने टंकून दुवा देईपर्यंत नानावटींनीही हिच लिंक दिलेली दिसते. असो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0