पुणे - वाई - पुणे सायकल राईड

पुणे - वाई - पुणे सायकल राईड

गेले सात आठ महिने घरातच घालवल्याने सगळ्यांना जशी बाहेर फिरायला जायची इच्छा होत आहे तशीच मलापण होत होती. त्यातच ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने स्वताला द्यायला थोडा वेळही हाताशी होता. त्यामुळेच दहावी पासून सुमारे सहा सात वर्षे उराशी बाळगलेले 150+ किमी सायकल राईड करायचं स्वप्नं पूर्ण करायची हीच योग्य संधी आहे हे ओळखून मी सायकलींग करायला सुरुवात केली. यापूर्वी साधारणतः तीन चार वर्षांपूर्वी मी सिंहगडाची शेवटची राईड केली होती पण त्यानंतर मात्र माझ सायकलींग जवळपास बंदच होत, पण मनातलं सायकल विषयीच प्रेम जराही कमी झालं नव्हतं. त्यामुळे संधी मिळताच मी ती साधली आणि रोज तीस-पस्तीस किमी. सायकलींग करायला लागलो.सुरुवातीला डायरेक्ट तीस पस्तीस किमी. च्या राईड करणं अवघड वाटलं पण चार - पाच दिवसातच सवय झाली मग काय रोज तीस - बत्तीस - पस्तीस - चाळीस असे किमी. वाढवत गेलो, आणि माझ्या या सगळ्या गोष्टींमुळे घरी वडिलांनाही कळलं की मी पुन्हा सायकलच्या प्रेमात पडलो. त्यामुळे वडिलांनीही नकळत माझ्या मनात सायकल राईड ची स्वप्नं पुन्हा जगवयाला सुरुवात केली.

फायनाली एक दिवस अचानकच मी बोलता बोलता खंबाटकी घाट चढून यायचं म्हटलं आणि घरच्यांनी ही कोणताही आक्षेप न घेता त्यावर होकाराची मोहोर उठवली. मग काय लगेच दोन दिवसात येणाऱ्या शुक्रवारी मी ही राईड करायचं ठरवलं. पण अचानकच राईड च्या आदल्या रात्री सायकलाचा टायर पंक्चर झाला आणि सगळ्या गोष्टी फसाल्या मग नवीन दिवस ठरवला रविवार आणि मध्ये एक दिवस सायकल रेडी करायला दिला. (माझ्या सायकलचे काही खास प्रॉब्लेम आहेत जे मी नंतर कधीतरी सांगेन )

राईडच्या आदल्या रात्री नेहमीपेक्षा जरा लवकरच जेवण करून आणि राईड ची सगळी तयारी करून मे झोपायला गेलो. पण झोप काही लागेना हेरवी वर्षभर उशिरा ( अल्मोस्ट पहाटे) झोपायची सवय असल्याने लवकर झोपणे जरा अशक्यच झाले. फायनली ज्या दिवसाची मी गेली अनेक वर्षे वाट बघत होतो तो दिवस उजाडला आणि सगळी तयारी करून मी निघालो.

सकाळी साधारणतः सहा वाजता मी राईड साठी निघालो.थंडीचे दिवस असले तरी कोणास ठाऊक का पण मला मात्र आजीबताच गार लागत नव्हतं.कदाचित सायकलच्या सहवासाने आणि पहिल्या लाँग राईड च्या उत्सुकतेने मला जणु बेधुंदच केले होते. साधारणतः एक - सव्वा एक तासात मी नवीन कात्रज बोगद्याजवळ पोहोचलो. जाता जाता वाटेत दरीपुलावरून दिसणारा नजारा खूपच वेगळा होता आजपर्यंत मी दरीपुलावरून कधी ह्या वेळेस गेलो नव्हतो.त्यामुळे तो नजारा मी कॅमेरा-मध्ये टिपला व पुढे निघालो.घरच्यांनी सांगितल्याप्रमाणे दर तासाला घरी माझी सलामती कळवत होतो.

नवीन कात्रज बोगदा

कात्रजचा नवीन बोगदा हा तसा माझा आवडता सायकलींग रूट आणि या आधीसुद्धा बऱ्याचदा मी इथे सायकलवर आलो असल्याने तसा हाताखालचा होता. त्यामुळे सकाळच्या त्या अंधारातही काही प्रॉब्लेम वाटत नव्हता. साधारणतः सात - सव्वासात वाजता मी खेदशिवापुरचा टोलनाका क्रॉस केला. पुढचा रस्ता तसा अनोळखी होता त्यामुळे मनात थोडी एक्साईटमेंट होती. तस म्हणायला मी साधारणतः तीन - चार वर्षांपूर्वी या वाटेने सायकलवरून गेलो होतो. पण त्या नंतर आज पहिल्यांदाच या वाटेने चाललो होतो. वाटेत दर पाऊण - एक तासाने घरच्यांना सलामती कळवत होतो. साधारणतः आठ - साडेआठ ला वाटेत एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो. आजूनही हवेत गारवा होताच त्यामुळे वाफाळता चहा आणि बिस्कीट पोटात गेल्यावर एक वेगळाच उत्साह अंगात संचारला होता. आता पुढे शिरवळपर्यंत नॉनस्टॉप जायचं ठरवलं फक्त वाटेत नीरा नदीजवळ जरा क्लिक क्लिक करायला न विसरता थांबायचं ठरवलं आणि सायकलवर मांड ठोकली.

नीरा नदीवरील सुर्योदयाचा नजरा

पुढे डायरेक्ट नीरा नदीजवळ फोटोसाठी थांबलो पण तिथे पोहचल्यावर वाटलं की आजुन जरा लवकर घरून निघालो असतो तर इथे सूर्योदयाचा खूप मस्त शॉट मिळाला असता. पण आता काय करणार. थोडी निराशा पदरी घेऊनच पुढे प्रवासाला लागलो आता खंबाटकीचा घाट दिसू लागला होता. जवळपास दोन - तीन वर्षांनी मी एखादा घाट सायकलवर चढणार होतो म्हणून जरा टेंशन आल होत.पण या आधीच्या सिंहगडाच्या राईड -च्या आठवणींना मनात उजाळा देत आणि स्वतःला मोटिवेट करत घाट चढू लागलो.
बघता बघता अवघ्या वीस - पंचवीस मिनिटात घाटमाथा आला होता, आता यापुढे उतार चालू होणार म्हणून मग घाटमाथ्यावरच थोडी विश्रांती घेतली ( म्हणजे घाटउताराचा फायदा घेऊन जास्तीत जास्त अंतर विदाउट प्यादल कापता येईल हाच त्या मागचा उद्देश.)

खंबाटकी घाट

घरी सलामती कळवून फोटो वगैरे काढून निघालो आता वाई फाटा जवळ आला होता आणि माझ्या राईडच अर्ध अंतर संपणार होत.पण आता फक्त अकरा - सव्वाअकराच वाजले होते त्यामुळे घरच्यांनी मला थोडे पुढे म्हणजे पसरणी घटापर्यंत जाण्याची परवानगी दिली.आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला करणं आधी खंबाटकी घाटापर्यंतच जा असे बजावून सांगणारे आता स्वतःहून मला पुढे जाण्याची परवानगी देत होते. माझ्यासाठी हे. म्हणजे जणू दुधात साखर पडावी असाचं होत. त्यामुळे जराही वेळ न दवडता मी वाईच्या दिशेने कूच केली मात्र वाई फाट्यापासून वाई पर्यंतचा रस्ता बराच छोटा असल्याने व वीकेंड असल्याने बरीच गर्दी होती. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती असल्याने हेडविंडस पण होतेच.त्यामुळे माझा वेग मंदावला व तो शेवटपर्यंत मंदावलेलाच होता. या मंदावलेल्या वेगाने मी इतका वेळ वाया घालवला की वाई फाटा ते वाई हे अवघ्या अकरा किमी. च अंतर कापायला मला जवळ जवळ एक तास लागला. आता दुपारचे बरा वाजून गेले होते आणि पसरणी घाट आजुन जरा दूरच होता त्यामुळे आता वाई गावातूनच परत फिराव लागणार होत. मनात थोडी निराशा होती कारण जर पसरणी घाट सर करता आला असता तर माझी ही राईड एकशे ऐंशी किमी. च्या आसपासची झाली असती. पण आता दुसरा पर्याय नव्हता म्हणून वाई गावातूनच परत फिरलो जवळच असणाऱ्या एका हॉटेल मध्ये जेवण केलं आणि परतीच्या प्रवासाला लागलो.

मॅप्रो फूड पार्क

पण आज एकटाच असल्याने मस्त आरामात आणि जरा जास्तच जेवण केलं होतं त्यामुळे आता अख्ख शरीर सुस्तावला होता. त्यामुळे वेग आणखीनच मंदावला होता मात्र मनातला उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. त्याच उत्साहात परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आता पुण्याकडे येतानाचा खंबाटकीचा बोगदा लागला. हा बोगदा माझ्यासाठी तसा नवीनच होता कारण या आधी कधीच मी या बोगद्यातून सायकलवर गेलो नव्हतो. त्यातच या बोगद्याची रुंदी खूपच कमी असल्याने मनात जरा जास्तच भीती होती. त्यामुळे घरच्यांना सलामतीचा फोन करून मे बोगद्यात शिरलो. बोगद्यातला तो काळाकुट्ट अंधार आणि त्यातच लांब लांब अंतरावर असलेले दिवे त्यामुळे खालचं काहीच दिसत नव्हतं.आणि त्यातच घोंगावणारे ट्रक आणि बसच्या इंजिनाचे आवाज मनात आजुनच धडकी भरवत होते. आजपर्यंतच्या आयुष्यात मी सायकलींग चा इतका थ्रीलींग अनुभव मी आजपर्यंत कधीच घेतला नव्हता आणि यानंतरही कधी घ्यायचा माझा आजूनतरी विचार नाही ( करणं या सायकल राईड ला माझ्याकडे ना प्रॉपर लाइट्स होते नाही इतर साहित्य ) खंबाटकी बोगद्यातला या अनुभवातून सावरतो न सावरतो तोपर्यंत पुढच्या उताराच्या रस्त्याने मला प्रसाद दिला आणि रस्त्यावरच्या खड्डयात सायकल जोरात आदळली पण नशिबाने चाकाला काही झालं नाही जर चाकाला काही झालं असतं तर ही राईड इथेच संपली असती पण तस काही झालं नाही.

खंबाटकी बोगदा

आता अर्ध्याहून जास्त राईड सक्सेसफुल झाली होती. पुढे नीरा नदी ओलांडली व एका शेताच्या कडेला झाडाच्या सावलीत थांबलो आता चांगलीच दुपार झाली होती आणि आज पहिल्यांदा मला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांचं खरं महत्व कळत होतं. कोणत्या हायवेने गाडीत एसी लावून जाताना काही वाटत नाही पण ज्यांना वाटेवरच्या झाडाची खरी किंमत समजून घ्यायची आहे त्यांनी आयुष्यात एकदा तरी भर दुपारी हायवे ने सायकल राईड करावी.
आता राईड च्या शेवटच्या फेज ला सुरुवात झाली होती. शिरवळ ते पुणे हे शेवटचे अवघे चाळीस - पन्नास किमी. अंतर राहील होत आणि इतक्यात सायकल चा पुढचा टायर पंक्चर झाला माझ्याकडे पंक्चर रीपैर किट होता पण हवेचा पंप नव्हता.पण नशीब इतकं बलवत्तर होता की अवघ्या शंभर मीटर वर एक पेट्रोलपंप व ट्रक च्या पंक्चर च दुकान होतं या दोन्ही ठिकाणी मला सायकल मध्ये हवा भरता येणार होती. तेव्हा मे त्या दिशेने पायी चालत निघालो. तेव्हा त्या पंक्चर च्या दुकानाच्या मालकाने मला काय झालं असं विचारला सगळ सांगितल्यावर त्याने मला त्याच्या इथेच पंक्चर काढायला सांगितलं त्याचेकडे सायकल च पंक्चर काढायचं समान नव्हतं पण मदत करायची इच्छा होती म्हणून त्याने मला पंक्चर काढायला मदत केली तेही कोणत्याही मोबदल्याशिवाय. बोलता बोलता कळलं की हा माणूस केरळ चा आहे त्यामुळे त्याला सगळे अण्णा म्हणतात. तो केरळचा आहे हे कळल्यावर मग त्याच्याशी केरळमधल्या पर्यटन स्थळांविषयी गप्पा झाल्या. पंक्चर काढताना कळलं की माझी सायकल ही एका बाभळीच्या कट्यामुळे पंक्चर झाली आहे. मग लक्षात आलं की सायकल पंक्चर होण्याच्या जस्ट आधी मी जो ब्रेक घेतला होता त्यात मी ज्या झाडाखाली थांबलो होतो ते झाड पण बाभळीचच होता त्यामुळे हा बहुदा त्याचाच प्रसाद असावा. फायनली पंक्चर काढून झाली व त्या अण्णाचा निरोप घेऊन मी निघालो. आता साधारणतः तीन - साडेतीन झाले होते आणि ऊन उतरायला सुरुवात झाली होती त्यामुळे मी पुन्हा वेग पकडायला सुरुवात केली आणि बघताबघता खेदशिवापुरच्या जवळ येऊन पोहचलो वाटेत संध्याकाळचा नाष्टपण केला होता.
आता खेडशिवापुरच्या टोलनाक्याला आलो होतो आणि तिथल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा बघून मलाच मी सायकलवर असल्याचा हेवा वाटत होता कारण दोन गड्यांमधल्या जागेतून मी बऱ्याच चांगल्या वेगात पुढे सरकत होतो. आता मात्र माझा धीर सुटत चालला होता आणि मी बऱ्याच वेगात सायकल मारायला लागलो होतो त्यातच हायवेला येवढं ट्रॅफिक होता की मला शहरात सायकल चालवल्याच फील येत होत. साधारणतः पाच - साडेपाच च्या सुमारास मी पुन्हा कात्रज च्या नवीन बोगद्याजवळ येऊन पोहचलो. आता पुढचा रस्ता हताखलचा असल्याने घरच्यांना मी येत असल्याची वर्दी देण्यासाठी या राईडचा शेवटचा फोन केला आणि बोगद्यात शिरलो. आता मात्र मगासच्या खंबाटकीच्या बोगद्यासारखी कोणतीच भीती मनात नसल्याने मे ब्रेक न लावता दरी पुलावर व नंतर नवले ब्रीज पर्यंत पोहचलो.
आता मात्र सिंहगड रोडच ट्रॅफिक लागलं होतं पण मला मात्र त्याच काहीच वाटत नव्हत कारण आता माझी अंदाजे एकशे साठ किमी. ची सायकल राईड कंप्लीट होणार होती. गेली सहा - सात वर्षे उराशी बाळगलेले 150+ किमी सायकल राईडच स्वप्नं आज पूर्ण झाला होतं..पण जस घरी पोहचून फ्रेश झालो तस लक्षात आलं की माझ्या पृष्टभागाची saddle sore मुळे पराच वाट लागली आहे आणि आता पुढचे काही दिवस जरा वेगळ्याच प्रकारे चालावं लागणार होत....

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाह!! तुमच्याबरोबर आम्हीही मनाने राईड अनुभवली. फोटो दिसत नाहीत तेवढं जरा पहाल का?

Dhanyavad........ me update karayacha prayatna karto.....

मी सायकलवाला नाही पण सायकलिंगचे लेख वाचतोच. शिवाय माझे ओळखीचे सायकलिस्टही आहेत.
१५०+ किमी बद्दल अभिनंदन. एकटेच गेलात म्हणून आणखी शाबासकी. माझ्या इमारतीतला एक मुलगा नेहमी जातो. मागच्या आठवड्यात कल्याण - माळशेज घाट २००+ किमि करून आला. दुसरा एक हिमाचलमध्ये चौदा दिवस जाऊन आला. ती टुअर तुम्हास माहिती असेलच. युथ होस्टेल आयोजित सायकल टुअर आता कोरोना काळातलीच. मागच्या महिन्यात संपली. चौदा दिवस ,अठ्ठावीस हजार रु, सायकली त्यांनी तिकडेच दिल्या आणि राहाणे जेवणे सोयीसह. प्रथमच जाणाऱ्यास उपयोगी ठरावे. कारण कोरोना अडचणी.

पुढील टुअर कर्नाटकात करा. सुंदर जागा आहेत तिकडे.

Dhanyavad ...... yes pune - karnatak , pune - goa, K to K hya mazya dream rides aahet .... aashech ride sathi navin suggestions det raha tyatle jamtil tevdhaya rides karayacha pramanik prayatna karin

Dhanyavad ...... yes pune - karnatak , pune - goa, K to K hya mazya dream rides aahet .... aashech ride sathi navin suggestions det raha tyatle jamtil tevdhaya rides karayacha pramanik prayatna karin

हा लेख वाचून मला १९५८साली विजयादशमीच्या दिवशी मी पुण्याहून साताऱ्याला सायकलीने गेलो होतो त्याची आठवण झाली.

ते माझे कॉलेजचे पहिलेच वर्ष होते. दिवाळीची सुटी सुरू झाली आणि मी सायकलने साताऱ्यास जाऊन घरातील सर्वांना चकित करण्याचा बेत ठरवला. विजयादशमीला पहाटे ४ ला उठलो आणि ५|| वाजता सायकलवर टांग टाकली. ६|| पर्यंत कात्रजच्या पायथ्याशी पोहोचलो. त्या वेळी कात्रज आणि खंडाळा हे दोन्ही घाट चढून जायला लागायचे. कात्रजला सायकल दामटणे लवकरच संपले आणि सायकल हातात घेऊन बोगदयापर्यंत पोहोचलो. तसाच खम्बाटकीहि पार केला. वाटेत शिरवळला रस्त्याच्या कडेला थंबून थोडी पोटपूजा केली. दुपारी २|| ला घरी पोहोचलो. असला आचरटपणा कोणाला न कळविता केल्याने आईवडील थोडेसे रागावले.

तुमच्या काळी दिवाळीच्या सुट्टीत विजयादशमी (पक्षी दसरा) येत असे काय?

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

१. कदाचित देवदत्त या आयडीधारकाने अरविंद कोल्हटकर या आयडीधारकाच्या शरीरात परकायाप्रवेश केला असावा.

२. कदाचित देवदत्त हा अरविंद कोल्हटकर यांचा डुआयडी असावा. (किंवा व्हाइसे व्हर्सा.) आणि मग नजरचुकीने त्यांनी हा प्रतिसाद चुकीच्या आयडीने लिहिला असावा.

३. किंवा मग, लोक इथे लिहिलेले खरोखर कितपत वाचतात (की वरवर वाचून - किंवा न वाचताच - 'मार्मिक'पासून ते 'पकाऊ'पर्यंत कोणतीही श्रेणी 'अडमतडमतडतडबाजा' पद्धतीने बहाल करतात), हे तपासण्याकरिता श्री. कोल्हटकर यांनी असा प्रयोग करून पाहिला असावा.

(चूभूद्याघ्या. खरेखोटे श्री. कोल्हटकरच जाणोत.)

कदाचित 'Rajesh188' की काय ते, त्या आयडीने तुमच्या दोघांच्या (आभासी) शरीरात प्रवेश केला असेल, त्याशिवाय एकेकाळी दिवाळीची सुट्टी ही दसऱ्यापासूनच सुरू होत असे आणि ही उन्हाळी सुट्टीप्रमाणेच चांगली महिनाभर तरी चालत असे हे तुमच्या लक्षात राहिले नसावे. (अलास! गॉन आर दोज डेज्! पक्षी: गेले ते दिवस गेले...) त्यामुळे अरविंद कोल्हटकर यांना दिवाळीची सुट्टी लागल्या-लागल्या ते त्यांच्या साताऱ्याच्या घरी पुण्याहून सायकलवर टांग मारून दत्त म्हणून हजर झाले आणि तो दिवस विजयादशमीचा होता यात मला कुठलाही विरोधाभास किंवा anomaly वगैरे आढळत नाही.