शेजारच्या काकूंनी केसांबद्दल चौकशी न केल्यामुळे नवीन शेजारी त्रस्त

नौपाडा, २ सप्टेंबर.

जोशी कुटुंबीय हल्लीच डोंबिवलीहून नौपाड्याला राहायला आले. डोंबिवलीहून फक्त ठाण्यात नाही, तर नौपाड्यावर राहायला आल्यामुळे डोंबिवलीत त्यांच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांनी जोशी कुटुंबासाठी त्यांच्या सोसायटीच्या गच्चीवर खास जेवणावळ घातली होती.

मात्र नौपाड्याला आल्यावर जोशी कुटुंबियांची फार निराशा झाल्याचं समजतं. जोशी दांपत्याशी याबद्दल बोलताना ते म्हणाले, "आमच्या शेजारच्या वैद्य काका आणि देशपांडे कुटुंबियांनी आम्हांला एकेक दिवस जेवायला बोलावलं. आमच्या गप्पासुद्धा चांगल्या रंगायला लागल्या होत्या. आम्ही किती शिकलो आहोत, कुठे नोकऱ्या करतो, मूळचे कुठले, अशा सगळ्या गप्पागोष्टी झाल्या. मात्र आम्हांला कुणीच मुलांचे मार्क किती असतात, हे विचारलं नाही. याचे केस अकाली गळायला लागले आहेत, माझे केस अकाली पांढरे झाले आहेत, त्याबद्दल विचारलं नाही. त्या सगळ्यांचे केस भरपूर नाहीत, पांढरे झालेत हे आम्हीही बघितलं आहे. त्यांच्या मुलांपैकी एक कॉलेजात आहे, आणि त्याचेही केस पांढरे आहेत. तरीही त्यांना आमच्या केसांबद्दल काही काळजीच नव्हती. त्यांच्याकडे नक्कीच कुठलेतरी खास, आयुर्वेदिक उपाय असणार. पण ते त्यांनी आमच्यापासून लपवून ठेवले. किमान रीत म्हणून त्यांच्या बाल्कनीतल्या तुळशीची दोन पानं देऊ करायला हरकत नव्हती. आमच्या डोंबिवलीत जाण्यासाठी चांगला रस्ता नसला तरी आम्ही घरी येणाऱ्या लोकांना केसांबद्दल सल्ले दिल्याशिवाय सोडत नाही. नौपाड्याचे लोक फार शिष्ट आहेत."

तेल आयुर्वेदिक

आपण योग्य ठिकाणी राहायला आलो आहोत ना, याबद्दल जोश्यांना प्रश्न पडायला लागले आहेत. त्यांनी मात्र डोंबिवलीची संस्कृती नौपाड्यात रुजवण्याचा चंग बांधला आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवडू लागली आहे.
सामान्य लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न पूर्वी पुलं, आणि वपुंनी घेतले होते.
------------
सायकलिंगचा धागाही चांगला आहे.
-------------
गणितासह पन्नास वर्षांपूर्वीचा परदेशी शिक्षण प्रवासही मजेदार आहे.
-------
सध्या बापटअण्णांनी पाश्चात्य संगीतावर लेखन बंद केलं आहे.
------------
मह्याचे नवीन उपक्रम वाचायला उत्सुक आहे.
------------
मंडळाच्या मंडपात चांगले आइटेम येत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तेल तापवून त्यात भरपूर कडीपत्ता आणि मेथी दाणे घालायचे. त्याचा अर्क रात्रभर मुरू द्यायचा आणि मग डोक्यावरचा एक एक केस सुटा करून त्याच्या मुळाशी हे मिश्रण लावायचं.
असं केल्याने घनदाट केशसंभार प्राप्त होतो कोणत्याही वयात. आमच्या शेजारच्या भोळे काकांच्या पूर्ण टकलावर घनदाट केस आले असं करून.
आम्ही नेहमी असे सल्ले देतो. जोशी दांपत्याने आमच्याकडे जेवायला यावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यांना नौपाडी शेजाऱ्यांचे सल्ले हवेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही नेहमी असे सल्ले देतो. जोशी दांपत्याने आमच्याकडे जेवायला यावं.

सल्ले देण्याकरिता जेऊ(सुद्धा) घालणे, हा घाट्याचा सौदा होत नाही काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सगळ्या गोष्टी अशा पैशांत मोजणाऱ्या अमेरिकेत राहून तुम्हाला शेजाऱ्यांवर प्रेम करा, शेजाऱ्यांवर अधिकार गाजवा वगैरे भारतीय संस्कृतीचा विसर पडलेला दिसतोय.

गेल्याच विकेण्डला, समोरच्या घरात राहायला आलेल्या बाईनं मला ब्रू इनस्टंट कॉफी पाजली; आणि मग बरेच सल्ले दिले. त्यांतले काही येतीलच इथे शेजारच्या काका-काकूंच्या मुखातून!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

केस अवघड आहे..

संस्कृती रुजविण्यासाठी बिया पेरल्या की डोंबिवलीहून रोपे मागवली?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

असुनी खास मालक घरचा - म्हणती चोर त्याला |
परवशता पाश दैवे - ज्याच्या गळा लागला ||

कळत नाही ब्वॉ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0