अन्नपूर्णा देवीचं पुस्तक वाचून शेजारच्या काकू निराश
बिबवेवाडी, पुणे, १३ ऑक्टोबर.
करोनाकाळातल्या लॉकडाऊनमध्ये शेजारच्या काकूंनी अनेक वेबिनार मनापासून बघितले. तेव्हापासून त्यांना नवनवीन पुस्तकं वाचून, परंपरा पुन्हा शोधण्याची इच्छा निर्माण झाली. परंपरांबद्दल अधिक माहिती करून घ्यायची म्हणून त्यांनी पुस्तकं वाचायची ठरवली. आणि पुस्तकांची दुकानं उघडल्यापासून त्यांना खूपच आनंद झाला.
बिबवेवाडीत ॲमेझनची डिलिव्हरी मिळत असली तरी प्रत्यक्ष दुकानात जाऊन काकूंनी पुस्तक विकत घ्यायचं ठरवलं. दुकानात समोरच अन्नपूर्णादेवी असं नाव लिहिलेलं पुस्तक त्यांनी बघितलं आणि उत्साहानं ते घेऊन काकू घरी आल्या.
आज आपण परंपरेबद्दल तपशिलात माहिती मिळवायचीच असं त्यांच्या मनानं घेतलं होतं. नवरात्र, स्त्रीशक्ती, अन्नपूर्णा देवी, सगळं काकू कधीपासून मनात घोळवत होत्या. आज प्रत्यक्ष आणि धडक कृती केल्यामुळे काकू अतिशय प्रफुल्लित आणि उत्तेजित झाल्या होत्या. काकूंनी अंबाबाईसमोर, पाटावर पुस्तक ठेवलं; बाल्कनीतल्या कुंडीतून शेवंतीचं फूल खुडलं; पुस्तकाला हळदी-कुंकू, अक्षता, फूल वाहिलं. मनोभावे देवीला नमस्कार केला, पुस्तकातल्या अन्नपूर्णेची करुणा भाकली.
आज काकू नैवेद्यासाठी नवीन पाककृती करणार होत्या. पण हाय! ते पुस्तक गायिका अन्नपूर्णा देवी यांचं चरित्र निघालं.
काकूंनी मैत्रिणीला फोन केला आणि मग काकूंना उलगडा झाला. हातात वीणा घेतलेली देवी सरस्वती असते. अन्नपूर्णेच्या हातात भात आणि पळी असतात, मैत्रीण त्यांना सांगत होती; पण काकूंनी त्यांतलं काहीही ऐकलं नाही.
#शेजारचे_काकू_काका
प्रतिक्रिया
गायिका!!
अन्नपूर्णादेवी गायिका??????
त्या सतारिया आणि फार वरच्या दर्जाच्या संगीतज्ज्ञ होत्या, पण गायिका नव्हत्या हो!
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
शेजारच्या काकूंना एवढे तपशील
शेजारच्या काकूंना एवढे तपशील का माहीत असतील!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
असो!
त्या निमित्ताने अन्नपूर्णा देवींच्या पुस्तकाची पुजा तरी घडली.
काही काळानंतर का होईना ते पुस्तक उघडण्याची बुद्धी, देवी सरस्वतीने काकूंना प्रदान करावी अशी प्रार्थना करूयात.
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता |
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ||
*********
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना |
ऐसे मनमौजीको मुश्कील हैं समझाना | है ना?