ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ८

प्रकरण ८ आयुर्वेदाचे शिक्षण आणि नंतर

सुधीर भिडे

विषयाची मांडणी

  • आयुर्वेदाचे शिक्षण
  • आयुर्वेदाचे डॉक्टर्स ॲलोपाथीची प्रॅक्टीस करतात!
  • ॲलोपाथीचे डॉक्टर्स आयुर्वेदाची औषधे देऊ शकतात ?
  • आयुर्वेदा साठी कायदा
  • आयुर्वेदाच्या तज्ज्ञांची ॲलोपाथीविरुद्ध तक्रार
  • समालोचन

***

औषधे

आयुर्वेदाचे शिक्षण

आयुष मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात एकंदर ४१३ आयुषचे शिक्षण (आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी) देणार्‍या संस्था आहेत. त्यांपैकी आयुर्वेदाची BAMS पदवी देणारी २७३ कॉलेजे आहेत. Central Council of Indian Medicine (CCIM), या संस्थेची स्थापना १९७० साली करण्यात आली. आयुर्वेदाच्या शिक्षणाची जबाबदारी या संस्थेकडे आहे. देशातील २७३ महाविद्यालयात साडेपाच वर्षांच्या शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचार्य (Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery (BAMS) ही पदवी दिली जाते. प्रवेशासाठी सरकारने The National Eligibility cum Entrance Test (NEET UG) ह्या परीक्षेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये आयुषसाठी ५२७२० जागा आहेत. ॲलोपाथीचे उच्च शिक्षण देणार्‍या AIIMS प्रमाणे आयुर्वेदाचे शिक्षण देण्यासाठी सरकारने २०१७ साली All India Institute of Ayurved सुरू केली.

A majority of students see Ayurveda programs as a backdoor entry to practice western medicine/surgery. They join these colleges because they were unable to get into MBBS programs. Loopholes in the system have allowed the establishment of sub-standard colleges in large numbers. Out of 400 and odd colleges that are functional at present, about 250 were established during the last 20 years. In many colleges there are neither patients nor teachers.

Kishor Patwardhan and Manoj Kumar. J Ayurveda Integr Med. 2021 Jan-Mar; 12(1): 195–197.

CCIMने २०१४ साली काढलेल्या notificationप्रमाणे, आयुर्वेदाचे शिक्षण देणारे महाविद्यालय एका आयुर्वेदाच्या रुग्णालयाशी संलग्न असणे जरूर आहे. अशा रुग्णालयात जितके विद्यार्थी तितक्या रुग्णांसाठी खाटा असणे आवश्यक आहे. याचा अर्थ ६० विद्यार्थी दर वर्षी प्रवेश घेत असतील तर रुग्णालय साठ खाटाचे हवे, या शिवाय यातील ४०% खाटा नेहमी भरलेल्या हव्यात. National Medical Commission (NMC)च्या नव्या आदेशानुसार, एम. बी. बी. एस.च्या १०० जागांसाठी ४३० खाटांच्या रुग्णालयाची गरज आहे. ॲलोपाथीच्या शिक्षणासाठी जास्त खाटा (मोठे रुग्णालय) आणि आयुर्वेदाच्या शिक्षणासाठी कमी खाटा (लहान रुग्णालय) असे का?

BAMS अभ्यासक्रमात ॲलोपाथीच्या सर्व विषयांचे शिक्षण देण्याची तरतूद आहे.

Modern Physiology आणि Anatomyचे शिक्षण पहिल्या वर्षी दिले जाते.
दुसर्‍या वर्षी Pharmacology, Pathology आणि Toxicologyचे शिक्षण देण्यात येते.
तिसर्‍या वर्षी Haematology, Epidemiology आणि Obstetricचे शिक्षण दिले जाते.

या विषयांना मॉडर्न असे म्हटले जाते. त्यासाठी योग्य शब्द शास्त्रीय असा आहे. पण ॲलोपाथीला शास्त्रीय म्हणून काहींचे इगो दुखावले जातात. या कोर्सेसची मजा अशी की प्रथम आयुर्वेदिक फिजिऑलॉजी शिकविली जाते आणि नंतर ॲलोपाथीची फिजिऑलॉजी! शरीरातील प्रक्रिया आयुर्वेदाप्रमाणे आणि ॲलोपाथीप्रमाणे निरनिराळ्या कशा असू शकतील? यामुळे आयुर्वेदाची फिजिऑलॉजी शिकविताना काय तारांबळ उडते ते डॉक्टर पटवर्धनांच्या लिखाणात येतेच.

या शिवाय मुद्दा असा की ॲलोपाथीची फिजिऑलॉजी (शास्त्रीय फिजिऑलॉजी) आयुर्वेदाच्या कॉलेजात शिकविण्याची गरजच का भासावी?

खाली उद्धृत केलेल्या शोधनिबंधात देशातील ३२ आयुर्वेद कॉलेजांतील शिक्षक आणि विद्यार्थी याना एक प्रश्नावली देऊन पाहणी करण्यात आली. देशात आयुर्वेद कॉलेजांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. कॉलेजातून शिक्षक आणि संसाधनांची कमतरता भासते. शिक्षक आणि विद्यार्थी यांना काय कमतरता वाटते, ह्याची या सर्वेक्षणामध्ये माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला गेला.

The Ayurveda Education in India: How Well Are the Graduates Exposed to Basic Clinical Skills? Kishor Patwardhan, Sangeeta Gehlot, Girish Singh, and H. C. S. Rathore. Evidence Based Complement Alternate Medicine. 2011: 197391. Published online 2011 Feb 14.

Fundamental knowledge of contemporary (modern) biomedicine in the subjects like physiology, pathology, biochemistry, pharmacology, medicine, pediatrics, obstetrics & gynecology, ophthalmology, ENT and surgery is essential. Both the teacher and the student group tend to agree that the basic knowledge in these subjects is not being adequately imparted at the BAMS level.

Basic knowledge regarding the modern methods of investigation like ECG, X-ray, USG, and so forth, is essential for a BAMS graduate because this helps one in arriving at a correct clinical diagnosis. Ancient diagnostic techniques explained in the classical textbooks of Ayurveda are probably inadequate for this age, and therefore, an adequate exposure to basic diagnostic tools is essential at the graduate level. But, as the responses to the questionnaire suggest, the Ayurveda graduates are generally not exposed to the basic knowledge of these modern methods of investigation.

Students are not satisfied with their training in some of the unique skills related to Ayurveda.

The responses of the student group indicate that they are not adequately exposed to basic skills of physical examination, diagnosis and management of common clinical conditions.

आयुर्वेदाच्या शिक्षणाचा खर्च  
ज्या शिक्षणाचा पायाच डळमळीत आहे ते शिक्षण स्वस्त नाही. खालील माहिती टाईम्स ऑफ इंडियाच्या १३ फेब्रुवारी २०२३च्या अंकातून घेतली आहे.

कॉलेजेसमधून ओपन आणि संचालकांचा कोटा अशा दोन प्रकारच्या जागा असतात. सरकारी नियमाप्रमाणे संचालकांच्या कोट्यातील जागांना तीनपट फी आकारता येते. संचालकांना १५% जागा त्यांच्या कोटासाठी राखीव ठेवता येतात. प्रत्यक्षात काय घडते?

सांगलीतील एका कॉलेजात ओपन जागांची वार्षिक फी १.९ लाख आहे. पालकांना पाच वर्षांत दहा लाख खर्च. नाशिकमधील एका कॉलेजात ओपन जागांची वार्षिक फी ३.१ लाख आहे . पाच वर्षांचा खर्च १५ लाख.

संचालकांच्या कोट्यामधील जागांसाठी सांगलीतील कॉलेज वार्षिक फी ९.९ लाख रुपये घेते. पाच वर्षाचे पन्नास लाख. नाशिक मधील कॉलेज संचालकांच्या कोट्यातील जागांसाठी वार्षिक फी ९.३ लाख घेते. जी कॉलेजेस संचालकांच्या कोटा जागांसाठी तीन पटीपेक्षा जास्त फी घेतात अशा संस्था वरची फी रोकड प्रकारे घेतात.

ॲलोपाथीच्या शिक्षणात काही निराळी स्थिती नाही, यापेक्षा खराब आहे.

आयुर्वेदाचे डॉक्टर ॲलोपाथीची प्रॅक्टीस करतात!

या विषयावरची आकडेवारी उपलब्ध नाही पण अंदाज बांधता येतो – कसा ते पाहू.

वरील माहितीप्रमाणे देशात सुमारे ४००० आयुष रुग्णालये आहेत. आपण हे पाहिले की आयुष पदवीधरांना ॲलोपाथीचे शिक्षण दिले जाते. यानंतर यातील काही पदवीधर ॲलोपाथीच्या रुग्णालयात कनिष्ठ वैद्यकीय ऑफिसर अशी नोकरी चालू करतात. काही जनरल प्रॅक्टिशनर (जी. पी.) म्हणून स्वत:ची प्रॅक्टीस चालू करतात आणि काही शहरापासून दूर, ग्रामीण भागात रुग्णालय चालू करतात. हे सर्व जण कमी-जास्त प्रमाणात ॲलोपाथीचीच प्रॅक्टीस करत असतात. शुद्ध आयुर्वेद किंवा शुद्ध होमिओपाथीची प्रॅक्टीस करणारे थोडेच असतात. याशिवाय RCT आणि इन्शुरन्स ही क्षेत्रेही या पदवीधरांना उपलब्ध आहेत.

National Accreditation Board for Hospital and healthcare providers ही संस्था रुग्णालयातील सेवेची गुणवत्ता ठरविण्यासाठी २००५ साली स्थापन करण्यात आली. या संस्थेने आतापर्यंत देशातील ९५० रुग्णालयांना सेवेच्या गुणवत्तेची प्रमाणपत्रे दिली आहेत. NABHने एका पत्रकाद्वारे आयुष डॉक्टरांना क्लिनिकल काम देण्याची आणि रेसिडंट मेडिकल ऑफिसर नेमण्यासाठी बंदी केली आहे (इंडियन एक्स्प्रेस रिपोर्ट, २२ जुलै २०२२). NABHला असे पत्रक काढण्याची का वेळ आली? कारण मोठ्या प्रमाणावर आयुष डॉक्टर्स ॲलोपाथीच्या रुग्णालयात काम करीत आहेत.

ही बंदी अर्थातच फक्त NABH सर्टिफाईड रुग्णालयांना लागू आहे. देशातील इतर ६४००० हॉस्पिटलांना लागू होत नाही. याचा अर्थ आयुष डॉक्टर्स मोठ्या प्रमाणावर ॲलोपाथीच्या क्षेत्रात या ना त्या प्रकारे काम करीत आहेत. असे काम करणे हे नैतिकदृष्ट्या किती योग्य हा निराळाच विचार.

80% of the Ayurveda college graduates end up practicing Allopathy.

AYUSH students and graduates work as understudies and acquire training in Allopathic practitioners’ clinics. Later, they start independent Allopathic practice or join smaller hospitals on cheaper salaries. BAMS graduates are in high demand in urban areas where nursing homes and hospitals, who employ BAMS doctors to function as a second line workforce – even managing post-operative and Intensive Care Unit (ICU) work. Ayush graduates sometimes run single practitioner clinics in the periphery of townships but offering mainly Allopathic treatment.

The question why AYUSH graduates opt to pursue Allopathic work over the system they have graduated is at the heart of the debate. However, the question of letting AYUSH doctors continue to treat using Allopathic drugs has been left to be decided by the states. De facto the states have been allowing BAMS doctors and even homeopaths to use Allopathic medicine.

Should Allopathy practice by AYUSH graduates continue as has been going on or should the syllabus and training be further Allopathised to facilitate their utilisation in the Government and private sector?

Allopathic, AYUSH and informal medical practitioners in rural India – a prescription for change, Shailaja Chandra and Kishor Patwardhan (BHU)
Journal of Ayurveda Integr Med , v.9(2); Apr-Jun 2018

खालील संदर्भात आल्याप्रमाणे वर्मा यांनी सरकारी आयुर्वेदिक आणि सरकारी ॲलोपाथी हॉस्पिटलांमधील OPDमध्ये जी औषधे दिली गेली याचा आढावा घेतला. असे आढळून आले की ॲलोपाथी हॉस्पिटलांमध्ये १२% आयुर्वेदिक औषधे दिली गेली आणि आयुर्वेदिक हॉस्पिटलांमध्ये ॲलोपाथीची ५८% औषधे दिली गेली.

(Issues to settle- Cross System Medical Practice, Yash Paul, Satish Tiwari, Journal of Association of Physicians; 27.09.2013)

ॲलोपाथीचे डॉक्टर्स आयुर्वेदाची औषधे देऊ शकतात?

आपण हे पाहिले की आयुर्वेदाचे डॉक्टर्स मोठ्या प्रमाणावर ॲलोपाथीच्या हॉस्पिटलांमध्ये नोकरी करतात आणि स्वतंत्र प्रॅक्टीसमध्ये मोठ्या प्रमाणावर ॲलोपाथीची औषधे देतात. ॲलोपाथीच्या डॉक्टरांनी आयुर्वेदिक औषधे देणे आणि आयुर्वेदिक हॉस्पिटलांमध्ये नोकरी करण्याबद्दल काय परिस्थिति आहे? हे साधारणपणे माहीत नसते, पण ॲलोपाथीच्या डॉक्टरांवर आयुर्वेदाची औषधे देण्यास कायद्याने बंदी आहे.

Supreme Court ruling forbids the doctors of modern medicine from prescribing / administration of non-allopathic drugs by rendering them liable to prosecution under both civil and criminal laws leading to cancellation of registration and/or imprisonment.

Clause 1.1.3 of MCI prohibits the allopathic practitioners to prescribe ayurvedic or homoeopathic drugs.

(Issues to settle- Cross System Medical Practice, Yash Paul, Satish Tiwari, Journal of Association of Physicians; 27.09.2013)

आयुर्वेदासाठी कायदा

औषधांना THE DRUGS AND COSMETICS ACT, 1940 [Act 23 of 1940 as amended up to Act 26 of 2008] लागू होतो. याशिवाय १९५० साली the Drugs (Control) Act, 1950 लागू झाला. या कायद्यातील CHAPTER IV-A आयुर्वेदच्या औषधांना लागू होतो. यात क्लिनिकल ट्रायल्सचा उल्लेख नाही.

आता आयुर्वेदिक औषधे आयुष मंत्रालयाखाली येतात. (Aayurved, Yoga, Unaani, Siddha and Homeopathy). हे मंत्रालय २०१४ साली बनले.

भारतात हजारो कंपन्या आयुर्वेदिक औषधे बनवितात. यांपैकी जवळजवळ ३० मोठ्या कंपन्या आहेत. हा धंदा कोट्यावधी रूपयांचा आहे. सरकारी वटहुकूमाप्रमाणे या कंपन्यांना क्लिनिकल ट्रायल्स जरूर नाहीत. राज्य सरकारांनी पण आयुर्वेदासाठी क्लिनिकल ट्रायल्स काढून टाकल्या.

आयुर्वेदाच्या तज्ज्ञांची ॲलोपाथीविरुद्ध तक्रार

असा सूर निघतो की शास्त्रीय वैद्यकाने आयुर्वेदाला पुढे येऊन दिले नाही. त्याची गळचेपी केली.

डॉक्टर बालाजी तांबे त्यांच्या आयुर्वेद उवाच या पुस्तकाच्या मनोगतात काय लिहितात ते पाहू -

मध्यंतरीच्या काळात ॲलोपाथीचा रेटा खूप वाढला. औषधे विकणार्‍या कंपन्यांनी जाहिरातीवर भर देऊन औषधांचा खूप प्रसार केला. तसेच जीवन गतिमान वाढल्यामुळे तातडीचे इलाज आणि शल्यकर्माची जरूर भासू लागली. त्यामुळे लोकांचा ॲलोपाथीकडे कल वाढला.

वैद्यराज हे मान्य करत नाहीत की ॲलोपाथीची वाढ होत आहे कारण ॲलोपाथीत काही विशेष गुण आहेत ज्यामुळे या शास्त्रीय वैद्यकाची इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.

समालोचन

देशात आयुर्वेदाचे शिक्षण मोठ्या प्रमाणावर दिले जात आहे. ही महाविद्यालये आयुर्वेदाच्या रुग्णालयाशी संलग्न असणे कायद्याने आवश्यक आहे. आयुर्वेद महाविद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना ॲलोपाथीचे विषय पण शिकविले जातात. या महाविद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे या विद्यार्थ्यांची इच्छा आहे की त्यांना अजून प्रभावीपणे आधुनिक, शास्त्रीय वैद्यक शिकविले जावे. याचे कारण पदवीनंतर हे डॉक्टर्स मोठ्या प्रमाणावर ॲलोपाथीच्या क्षेत्रात काम करताना दिसतात.

क्रमशः

***

भाग १ - शास्त्रीय दृष्टीकोनातून निरनिराळ्या वैद्यकीय प्रणालींचे मूल्यांकन
भाग २ - ॲलोपथीच्या आधीचे पाश्चिमात्य वैद्यक
भाग ३ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त
भाग ४ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त – त्रिदोष
भाग ५ - परीक्षा आणि चिकित्सा
भाग ६ - आयुर्वेदाची औषधे – भाग १
भाग ७ - आयुर्वेदाची औषधे – भाग २

field_vote: 
0
No votes yet

आधुनिक वैद्यकासंबंधी अत्यंत अभ्यासपूर्ण व संदर्भासहित लेखमाला लिहिण्यासाठी सुधीर भिडे यांचे अभिनंदन आणि आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधुनिक वैद्यकासंबंधी लेख म्हणजे एक तर त्यातील तज्ञांनी दिलेली त्यांच्या शाखेतील आजार व उपचारांची माहिती असते; किंवा इतरांनी दिलेली आधुनिक वैद्यकावरील, बहुधा नकारात्मक प्रतिक्रिया असते. या लेखमालेत प्रथमच यामागील शास्त्रीय विचार, तर्कशुद्ध बैठक, objectivity, experimental confirmation या आणि अशा गोष्टी लिहिल्या आहेत.
आजचे वैद्यक, मागील 200 वर्षांतील विविध विषयांत झालेल्या प्रगतीच्या पायावर उभे आहे. उदा. physics, chemistry, biochemistry, microbiology, immunology, human anatomy, physiology, pathology, surgical sciences etc. नवनवीन शोधांबरोबर, विविध आजारांबद्दलची समज आणि त्यांची उपचारपद्धती उत्क्रांत होत जाते. हीच सर्वात जमेची बाजू आहे. या बाबतीत पर्यायी वैद्यकीय प्रणाली मागे पडतात.
आधुनिक वैद्यकाचे संशोधन, त्याचे उपयोजन, सर्वसमावेशकता हे गुण गेल्या दोन शतकांत उत्क्रांत होत आलेत. त्यांची गोष्ट फास्ट फॉरवर्ड करुन बघायची असेल, तर 2020-21 मधील कोविड -19 साथीवर मिळवलेल्या controlची माहिती घ्यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगवेगळे नियम,कायदेही दिले आणि ते केव्हा आले हे आवडले.
बिझनेस मॉडेलचा विचार केला तर यामध्ये (अलोपथीमध्ये) काम करणाऱ्या सर्वांना भरपूर आणि सातत्याने पैसे मिळण्याची सोय झाली.

फारशा चाचण्या न करता रोग्याची लक्षणे ऐकून दिलेले औषध आठवड्याभरात रोग बरा करत असल्याने आयुर्वेदिक शाखेत पयशे कमवायला फारसा वाव राहात नाही हे माझे मत. शिवाय श्रीमंत रोग्यांना "मला कसा त्रास झाला मग मी कशा संपूर्ण महागड्या चाचण्या केल्या,महागडी औषधे घेतली,हा रोग स्ट्रेस मुळे कसा होतो वगैरे" गप्पा हाणायला आयुर्वेद उपचार उपयोगाचे नाहीत. प्रतिष्ठा वाढवणारे 'आइ'उपचार यांत नाहीत हे सुद्धा कारण ठरते.

स्वस्त आणि चांगली योजना,उपचार अलोपथीमध्ये नाहीत असे नाही. पण स्वउपचार फार वाईट आणि अलोथीतले तर फारच वाईट एवढे सांगून खाली बसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> फारशा चाचण्या न करता रोग्याची लक्षणे ऐकून दिलेले औषध आठवड्याभरात रोग बरा करत असल्याने

फ़ार नाही, पण थोड़ा अनुभव घेतला आहें आयुर्वेदीक वैद्यांकडे जाण्याचा. पहिले वाक्य ऐकू आलेय ते म्हणजे आयुर्वेद रोग समूळ बरा करतो, आणि उतावीळपणा कामाचा नाही. वेळ लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारशा चाचण्या न करता रोग्याची लक्षणे ऐकून दिलेले औषध आठवड्याभरात रोग बरा करत असल्याने....

हे सर्दी, खोकला, ताप इत्यादी चिल्लर अस्वास्थ्याकरता कदाचित बरोबर असेल. पण सरसकट असे विधान करणे म्हणजे रुग्णांची दिशाभूल करणे ठरेल असे मला वाटते. आयुर्वेदाचा अट्टहास करून स्वत:चे नुकसान करून घेतलेल्यांची काही उदाहरणे आठवतायत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

रोग निदान करणारी सर्व यंत्र ही काही allopathy शी संबंधित नाहीत
ते वेगळेच विश्व आहे.
अगदी डॉक्टर लोकांशी पण त्या विभागाशी काही देणे घेणे नाही.
आणि त्यांचे काही योगदान पण नाही.
औषध निर्मिती हे पण वेगळे क्षेत्र आहे.
त्याच्या मध्ये पण डॉक्टर लोकांचे योगदान नाही.
ती सर्व वेगळी लोक आहेत.
आयुर्वेद नी वरील दोन्ही तंत्र वापरणे हा काही गुन्हा नाही.
उपचार वेगळे असू शकतात.
निदान करण्यासाठी आयुर्वेदात डॉक्टर झालेले आणि allopathy मध्ये डॉक्टर झालेले.
वेगवेगळे प्रयोग करू शकतात(प्रयोग हा शब्द च अगदी योग्य आहे.)
भांडण दोघात काही नाही.
रोग निदान करणारी आधुनिक यंत्रणा ही allopathy च हिस्सा आहे असे त्या क्षेत्रातील डॉक्टर समजतात.
पण ते साफ चुकीचे आहे.
बनवेगिरी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोग निदान करणारी सर्व यंत्र ही काही allopathy शी संबंधित नाहीत
ते वेगळेच विश्व आहे.

काही कळलेच नाही.

औषध निर्मिती हे पण वेगळे क्षेत्र आहे.
त्याच्या मध्ये पण डॉक्टर लोकांचे योगदान नाही.

माझ्या माहिती प्रमाणे, अनेक कसोट्या, निकष लावून सिद्ध केलेली औषधे प्रथम काही ठराविक डॉक्टर्स ना वितरीत करतात. हे डॉक्टर ती औषधे काही विवक्षित रुग्णांना (प्रयोग म्हणून) देतात, आणि त्या रुग्णांना (म्हणजे त्यांच्या प्रकृतीला) मॉनिटर करतात. त्याचे जे बरे वाईट निष्कर्ष असतील ते औषध निर्मिती करणाऱ्यांना सांगितले जातात. त्या नंतर त्यात काही सुधारणा आवश्यक असेल तर ती करून ते औषध रुग्णाना देण्यास योग्य आहे असा परवाना देणाऱ्या यंत्रणेकडे पाठविले जाते, आणि त्या नंतर बाजारात उपलब्ध होते. औषध निर्मितीमधे डॉक्टरांचा सहभाग आवश्यक आणि महत्वाचा असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

मानवी शरीर हे जगातील सर्वात जास्त गुंतागुंत असणारी यंत्रणा आहे.
एक एक अवयव चे कार्य पूर्ण माहीत पडायला हजारो वर्ष जातील.
पाच ते सात वर्ष डॉक्टर की चा कोर्स करून मानवी शरीराचे कार्य यंत्रणा कधीच समजून येणारं नाही.
अभिमान ,इगो सोडा आणि सर्व ज्ञान चा आदर करा.
अगदी अडाणी आजी चे पण मत लक्षात घ्या.
अनुभव आहे.
निदान करणे डॉक्टर ना खूप अवघड जाते.
फक्त त्याच्या बातम्या होत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0