गाण्यांच्या चाली - एक उचलणे

‘भेटीत तुष्टता मोठी’ धाग्यावरची गाण्यांच्या चालींविषयीची उपचर्चा इथे हलवली आहे.

field_vote: 
0
No votes yet

उदा. प्रल्हाद शिंदे यांचा मोकळा, कमालिचा निर्मळ आवाजही अनेकदा ऐकावासा वाटतो. बुलबुलतरंग आणि संयत ढोलकी किती अफलातून वाजवली आहे. व्हिडीओ मात्र एकदम भिकार.
प्रल्हाद शिंदे सजणे कधी गोडीनं बोलायचं

गाणे ऐकल्यावर, का कोण जाणे, परंतु, 'साक़िया आज मुझे नींद नहीं आएगी'ची आठवण आली. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Dash 1 Dash 1 Dash 1 स्वधर्मच्या पोस्टमधली लिंक टंकून प्रल्हाद शिंदेचं गाणं ऐकलं आणि पहिल्या ओळीतच हे एग्झॅक्टली दुसऱ्या एका गाण्यासारखं आहे हे लक्षात आलं पण काहीहीहीहीही केल्या ते गाणं काही आठवेना!! फक्त "जगा है" दुसऱ्या ओळीतले शब्द आठवत होते. पंधरा मिनीटं डोळे मिटून आठवायचा प्रयत्न करत बसलो आणि मग पेटली एकदाची. पुढचे प्रतिसाद वाचायला लागलो आणि हे वाचलं - च्यायला आधीच ईथपर्यंत आलो असतो नबा, तर आयुष्यातली पंधरा मिनीटं आणि त्या वेळात चाललेली स्मरणशक्तीची झटापट वाचली असती !!!

अनेक वेळा गाणी शब्दांमुळे, प्रसंगामुळे लक्षात रहातात. पण कधी कधी सूर हा असा ईंगा दाखवतात - "बच्चमजी, संगीतात शब्द हे केवळ माध्यम आहेत आणि आम्ही सूर त्याचा प्राण आहोत" !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

न आठवणारं गाणं हे भाईकाकांच्या भाषेत दाढेत अडकलेल्या सुपारीसारखं त्रास देत राहतं. सारखी जीभ तिकडे निष्फळ टोकरत राहते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावरून अति अवांतर. मुन्ना बडा प्यारा, अम्मीका दुलारा हे गाणं आणि "उंदीरमामा" हे कोंकणी गाणं ही अगदी एकच धून आहे हे कधी कोणाच्या लक्षात आलं होतं का? "उंदीर मामा आयलो" गाणं आता शोधून ऐका नसेल ऐकलं तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

…‘एक मैं, और एक तू’ आणि ‘If you’re happy and you know it, clap your hands’, एकसमयावच्छेदेकरून ऐकून पाहा.

फिट्टमफाट!

(आणि, त्यानंतरही जर तृप्तता पावली नाही, तर मग ‘जरा हट के, जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान’, ‘माझी लाडकी सुशीला’, आणि ‘Oh my darling Clementine’ हेदेखील एकसमयावच्छेदेकरून ऐकून पाहा. त्यातल्या त्यात सेव्हिंग ग्रेस म्हणजे, ‘माझी लाडकी सुशीला’ हे ‘Oh my darling Clementine’चे (थोडेसे स्वैर, परंतु) थेट मराठी रूपांतर असावेसे वाटते; निव्वळ चालउचलेगिरी नव्हे. (चूभूद्याघ्या. तीच गोष्ट (शांता शेळकेकृत) ‘पप्पा सांगा कुणाचे’ नि ‘नंबर फिफ्टीफोर, द हाउस विथ द बँबू डोअर’बद्दलही म्हणता येईल.) मात्र, ‘ये है बॉम्बे मेरी जान’ची एक्सक्यूज़ काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चाल चोरली असं म्हणता येतं का? म्हणजे प्रल्हाद शिंदे यांच्या किंवा कोणत्याही गाण्याबाबत त्यामुळे एकदम त्या गाण्याकडे पहायचा दृष्टिकोनच बदलून जातो एकदम. आपल्या नजरेत ते गाणं एकदम पडून जातं. पण संगितात ते तसं नसावं बहुतेक.
आमच्या एका दादाला भजनाचा नाद होता. त्याच्याबरोबर लहानपणी भजनाला गेलो असताना एक भेदीक भजन एकून जाम हसू आलं होतं. ‘खेळ कुणाला दैवाचा कळला’ यावर अगदी थोडेसेच शब्द बदलून ‘खेळ कुणाला दत्ताचा कळला’ केलं होतं. ‘हा असो, मी असो, तो असो, कुणी असो’ या ओळींना भजन करणारा एकेकाडे बोटं दाखवून जबरी इंपॅक्ट साधत होता. मला मूळ गाणं काही सेकंदातच आठवल्यावर त्यातली मजा गेली, पण लोक मात्र भक्तीरंगात तल्लीन होऊन भजनाचा आस्वाद घेत होते. मग पुढे सिनेसंगीतावर जशीच्या तशी उचललेली अनेक भजने ऐकली आणि फक्त गाणं अनुभवायचं, चोरी शोधून मजा घालवण्यात अर्थ नाही, असं वाटत गेलं.
आपण अगदी लहानपणापासून अभिजात ओरिजनल चाल असावी असे समजून थोर समजलेली गाणीसुध्दा कुठुनतरी प्रेरणा घेऊन अवतरली आहेत, हे कऴल्यावर बौध्दीक आनंद जरूर होतो पण गाण्याची मजा जात नाही. एकदा हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितलेले असे की त्यांना ‘अरे अरे ज्ञाना झालासि पावन’ या अभंगाची चाल किर्लोस्करवाडी येथे एक भजन एकू आले त्यावरून सुचली होती. मूळ भजन चोखा डोंगा परि रस नव्हे डोंगा हे होते.
कौशल इनामदार यांनी बर्याच थोर गाण्यांचं बिंग फोडलेलं आहे. त्यात गजानना श्री गणराया आधि वंदू तुजSSमोरया - मै पिया तेरी तू माने या ना माने व मंSSSगलमूर्ती तर सेम टू सेम ‘काहे को बनाए’ वरून कसे हुबेहूब आले आहें ते दाखवले आहें.
कौशल इनामदार - चाली कुठून आल्या
अवांतर: एका स्टॅंडअपमध्ये ऐकले होते की, अन्नू मलिक यांनी कुठल्यातरी संगीतकारावर केस ठोकली होती. त्यांच्या गाण्याची चाल चोरली म्हणून नव्हे, तर ते जी चाल चोरणार होते, ती आधीच चोरली म्हणून. हिंदी संगीतकार प्रीतमने कोणते गाणे कोणत्या मूळ गाण्यावरून घेतले आहे त्याची तर एक भली मोठी लिस्टच जालावर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चाल चोरल्याचा आरोप इथे नक्की कोणी केला?

तशा त्या दोन चाली अगदी एकसारख्या नाहीत. मात्र, त्यातली एक म्हटली असता दुसरीची आठवण होण्याइतपत साधर्म्य आहे, एवढाच मुद्दा होता.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हीं आरोप केला असा आरोप मी नाही करत आहें. लोड नका घेऊ. इनामदारांचा व्हिडीओ एन्जॉय करा.
चालीत साधर्म्य आढळल्यावर माझीच मजा कशी कमी व्हायची ते बोलत होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतना ना मुझ से तू प्यार बढा’ हे सलील चौधरी यांनी रचलेलं १९६१ सालच्या ‘छाया’ या चित्रपटातलं गाणं मोझार्टच्या सर्वोत्तम ‘जी मायनर सिम्फनी क्र. ४०’ या सिम्फनीमधल्या ‘अलेग्रो मोल्टो' मूव्हमेंटवर आधारलेलं आहे. बिथोवनच्या fur Elise च्या हजारो आवृत्त्या निघाल्या. बंगाली दिग्दर्शक सत्यजीत रे यांनी एकूण ३६ चित्रपट दिग्दर्शित केले. त्यातील ३० चित्रपटांचे संगीतकार ते स्वतः होते आणि संगीतात बिथोवन आणि मोझार्ट यांच्या रचनेचा सढळ हस्ताने त्यानी वापर केला.
सलील चौधरी यांच्या माया या देव आनंद अभिनित चित्रपटात "जिंदगी है क्या सुन मेरी जां" हे चार्ली चॅप्लिनच्या लाईम लाईट वरती आधारलेले आहे.
राज कपूरच्या छलिया मधील बाजे पायल छुम छुम या गाण्याला रोन गुडविन चे संगीत वापरलेले आहे. जब प्यार किसिसे होता है यातले देव आनंदच्या तोंडी असलेले "बिन देखे और बिन पहचाने" या गाण्याला रोन गुडविन चे संगीत वापरलेले आहे.झुक गया आसमान मधील "कौन है जो सपनोमे आया" हे एल्विस प्रिस्ले चे मार्गारिटा यावरून घेतलेले आहे. बीटल्स चे I wanna hold your hands शम्मी कपूरच्या जानवर मधील "देखो अब तो किसको नही है खबर" साठी वापरली आहे. इलायराजा यांनी मोझार्टच्या ‘लिटिल जी मायनर सिम्फनी क्र. २५’ वापरून ‘अदा विटूक्कू विटूक्कू’ या लोकगीतसदृश गाण्याच्या मुखडा तयार केला.
टायटन कंपनीच्या जाहिरातीचा म्युझिक ट्रॅक मोझार्टच्या ‘लिटिल जी मायनर क्र. २५’ या सिम्फनीच्या सुरुवातीच्या मूव्हमेंटवर आधारलेला आहे.रेमंड सूटिंगची ‘द कम्प्लीट मॅन’ या जाहिरातीतल्या म्युझिक ट्रॅकची धून रॉबर्ट शुमान यांच्याकिंडर्सझिनेन या पियानोसाठी लिहिलेल्या रचनेवरून बांधल्या आहेत.
...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही यादी खूपच मोठी.

जाना सुनो हम तुमपे मरते हैं - खामोशी: bring the wine (Paul Anka)

अकेले हैं तो क्या गम हैं (कयामत से कयामत तक): Return to the Alamo (The Shadows)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"जिंदगी है क्या सुन मेरी जां" हे चार्ली चॅप्लिनच्या लाईम लाईट वरती आधारलेले आहे

थिज इज टू मच हां. ही सुरावट लाईम लाईटमधे बऱ्याच दृष्यात आहे खरी. पण म्हणून गाणंच लाईम लाईटवर आधारीत? आं??

संजय मिश्राचा "कामयाब" पाहीला आहात का? तो "लाईम लाईट"वर आधारीत आहे म्हणाला असतात तर ठीक होतं. पण त्याची कॉपी नाहीये. बघितला नसलात तर जरूर बघा.

पण या चर्चेच्या निमित्ताने लाईम लाईट परत एकदा पाहीला. साला पूर्वीचा कोलसाच च्यांगला ! त्यातली सुरावट ईथे ऐकता येईल.
- १:२४ ते २:२६ तुम्ही उल्लेख केलाय ("जिंदगी है क्या सुन मेरी जां" ज्यावर बेतलंय) ती सुरावट आहे. आणि शेवटी पण
- सुरूवातीची करूण, दु:खद अशी, अतिशय अस्वस्थ करणारी सुरावट ..... सुननेकी चीज है वह, बतानेकी नही. "याद न जाये, बीते दिनों की" गाण्यात सुरूवातीला ५ सेकंद ऑर्गनवर पीस आहे तो बराचसा याच्या जवळ जाणारा आहे. एकंदरीत गाणं पण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

....

आपण अगदी लहानपणापासून अभिजात ओरिजनल चाल असावी असे समजून थोर समजलेली गाणीसुध्दा कुठुनतरी प्रेरणा घेऊन अवतरली आहेत, हे कऴल्यावर बौध्दीक आनंद जरूर होतो पण गाण्याची मजा जात नाही

. पण तुझ्या प्रतिसादातली पहीली ओळ आहे;

चाल चोरली असं म्हणता येतं का? म्हणजे प्रल्हाद शिंदे यांच्या किंवा कोणत्याही गाण्याबाबत त्यामुळे एकदम त्या गाण्याकडे पहायचा दृष्टिकोनच बदलून जातो एकदम. आपल्या नजरेत ते गाणं एकदम पडून जातं.

का बुवा? प्रेरणा घेउन गाणं बांधलं तर बौध्दीक आनंद पण कोणाची चाल तशीच वापरली तर मात्र "गाणं पडून जातं"? हां आता एकंदरीत भट्टी जमली नसेल तर ठीक आहे. पण तसं असेल तर चाल त्याची स्वत:ची - एकदम कोरी करीकरीत! - असेल तरी काय फरक पडतो?

एकंदरीतच या "चाल चोरण्याच्या" बाबतीतलं माझं निरीक्षण - 'दिल पे छा जाएगा' असं संगीत देणं ही दैवी देणगी असते. संपत्तीची मोजदाद करता येते पण या क्षमतेची नाही. त्यामुळे "अरे नौशादने ती चाल चोरल्येय" हे म्हणताना "कसली दैवी देणगी? अरे हे काय मी सुद्धा करू शकलो असतो" अशी बहुदा वृत्ती असते !! दुसऱ्याची मोठी ओळ खोडून आपल्याएव्हढी तोकडी करायची वृत्ती सगळीकडे दिसते पण भारतीयात जरा जास्त प्रबळ असते Blum 3

या गाण्याची चाल कशी चोरल्येय हे चवीने सांगणाऱ्या एखाद्याला सांगावसं वाटतं की "मित्रा, हे घे शब्द. कुठलीही सध्याची चाल / सुरावट घे, काय हवं ते चोर, आणि श्रवणेबल गाणं ऐकवून दाखव." पण जाउद्या. मी आपला " हो रे, आयला हे मला माहीतीच नव्हतं" असं काहीतरी म्हणून त्याचा आनंद जपतो !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

"मित्रा, हे घे शब्द. कुठलीही सध्याची चाल / सुरावट घे, काय हवं ते चोर, आणि श्रवणेबल गाणं ऐकवून दाखव."

ठीक. मला मनाचे श्लोक द्या. तुम्हाला ते मी ‘जिन्हें नाज़ है हिंद पर, वो कहाँ है’ नाहीतर ‘ये दुनिया अगर मिल भी जाए, तो क्या है’च्या चालीवर म्हणून नाही दाखवले, तर नावाचा ‘न’वी बाजू नाही.

(किंवा, त्यापेक्षा, तुम्हीच का नाही गाऊन पाहात?)

——————————

हे वाक्य, आर्किमिडीज़च्या ‘मला पुरेशी लांब तरफ नि एक टेकू द्या’च्या चालीवर म्हणून पाहा. पर्यायाने, हेच वाक्य, (‘शुभ बोल रे नाऱ्या’मधल्या) ‘मला पिंडाएवढा भात द्या’च्या चालीवरही म्हणून पाहता येईल.१अ

१अ Which goes on to prove: पुरेसे तिरपागडे डोके जर असेल, तर अगदी वाटेल त्याच्या चालीवर वाटेल ते जरी नाही, तरी, बऱ्याच कशाकशाच्या चालीवर बरेच काहीकाही म्हणून पाहता येते. परंतु, हाय! योजकस्तत्र दुर्लभः।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एग्झ्याक्टली!!

बऱ्याच कशाकशाच्या चालीवर बरेच काहीकाही म्हणून पाहता येते

अरे पण मी साला वर बोलला के ते "श्रवणेबल" पायजे तेचा काय? तू असा काय पण कुठल्या पण साँगच्या चालीवर बोलेल तर साला तुजी बायडी तरी ऐकेल काय तुला? अरे तेला डिव्हाईन पॉवर लागते डीव्हाईन पॉवर.

टीप : दुसऱ्या कोणाला मी " हो रे, आयला हे मला माहीतीच नव्हतं" असं उत्तर दिलं असतं Biggrin Biggrin . पण not to you हां नबा - तुम्हाला असलं उत्तर द्यायची गुस्ताखी? तोबा तोबा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

अरे पण मी साला वर बोलला के ते "श्रवणेबल" पायजे तेचा काय?

श्रवणॅबिलिटी इज़ इन द इयर ऑफ द लिसनर, असे तुका म्हणून गेलेलाच आहे.

तू असा काय पण कुठल्या पण साँगच्या चालीवर बोलेल तर साला तुजी बायडी तरी ऐकेल काय तुला?

माझी बायडी आत्ता तरी ऐकते, असे नक्की का बरे वाटते तुम्हाला?

अरे, पण म्हणून मी तिला ऐकवायचा थांबत नाही, तेचा काय?

अरे तेला डिव्हाईन पॉवर लागते डीव्हाईन पॉवर.

अर्थात! साला चोवीस वर्षे झाली माझ्या लग्नाला; इतकी वर्षे तिला वेडीवाकडी गाणी वेड्यावाकड्या चालींवर ऐकवत आलोय, तरीपण माझी बायडी अजूनपर्यंत टिकून आहे, ती काय तिला डिव्हाईन पॉवर असल्याशिवाय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गजानना श्री गणराया , आधी वंदू तूज मोरया ... हे गाणे "मै पिया तेरी तू माने या ना माने " या चालीवर रचलेले आहे
कजरारे कजरारे .... आणि श्रीपाद वल्लभ दिगंबरा काही ओळींत खूप साम्य आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कजरारे कजरारे हे विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला या चालीवर आहे असे ऐकले होते. दिगंबरा दिगंबराही बसतंय अगदी फिट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक त्यातल्या त्यात समग्र चालचौर्यकोष - https://www.itwofs.com/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

एक पर्यायी करियर म्हणून मी प्रसिद्ध चालींवर दत्ताची गाणी लिहिणार आहे.

लेटेष्ट प्रस्तुती :
"तू दत्ताचा छावा, कर दत्ताचा धावा"
(चाल : उ अंटावा मावा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तुमच्या प्रस्तावित रचनेला
हा नंदाचा कान्हा | घालितो कसा धिंगाणा
ची चाल फिट्ट बसते आहे बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नुकतेच मी
'ऐ दिल है मुश्कील जीना यहॉ.." सारखी चाल असलेले एक गाणे ऐकले (बहुतेक इंग्लीश) अगदी सेम टू सेम ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

O my darling Clementine

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0