.....किचनमधुनि मला उचलुनि आत धन्याने नेले..(प्रौढांसाठी :) )
कामावरुन मधल्या सुट्टीत घरी जेवणासाठी येणार्या चावट रसिकांसाठी..:)
=============================================================
किचनमधुनि मला उचलुनि आत धन्याने नेले..
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले..
दुपार होती घरात नव्हते कुणीही अजिबात.
केला होता दुष्ट सख्याने..भलता चावट बेत..
कशास फसवु..मी ही तेव्हा होते मोहरलेले...
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले..
विसरुन गेलो..दुपार होती अथवा आहे रात..
विसरुन गेलो कधी गुंफले हातामध्ये हात..
इतके स्मरते त्याच्यासंगे मी ही थरथरलेले...
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले..
पुढचे क्षण मग होऊन गेले..मंतरलेले सारे..
उधाण आले, लाटांमध्ये मुक्त बुडाले तारे..
अमृतलहरीत मजेत होते गलबत भरकटलेले...
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले..
इश्श..राहिली गालावरती त्याच्या माझी टिकली.
मीच लाजुनि नंतर हसुनि हळुच पापणी मिटली.
ध्यान गडबडीत तसेच ..अरे देवा.. कामावरती गेले..
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले..
+कानडाऊ योगेशु
प्रतिक्रिया
कायदेशीर प्रौढ लोकांसाठी
असा बदल हवा होता.
तसे तर 16 वर्षी च मानवाची पिल्ल प्रौढ विषयात सर्व ज्ञानी असतात.
"पोळी आणि भात करपला ऊतु दूधही
"पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले.." तीन बर्नर चा गॅस एकाच वेळी चालू असताना धन्याने उचलले? दूध ऊतू गेलेला बर्नर विझून गॅस तसाच चालू नाहीं का राहणार? किचन मधून आत न्यायची गरज काय? डायनिंग टेबल असेलच ना? घरात कुणीच नव्हते ना? मग डायनिंग टेबल वापरायचा की. "विसरुन गेलो..दुपार होती अथवा आहे रात.."
तिसऱ्या ओळीत दुपार होती असे म्हणून मग विसरायला कसे काय झाले? "विसरुन गेलो.." की "विसरुन गेले.."? खेड्यातल्या बायका येतो जातो आलो गेलो अशी पुल्लिंगी विधाने करतात. तशी आहे की कवितेतली नायिका? असावी कारण ती मिस्टराना धनी म्हणते.
"लाटांमध्ये मुक्त बुडाले तारे." दुपारी तारे?
"गलबत भरकटलेले..." मग धन्याने नक्की काय केले? नेम चुकला?
असो. अर्थातुराणां न सुखं न निद्रा,कामातुराणां न भयं न लज्जा ।
विद्यातुराणां न सुखं न निद्रा,क्षुधातुराणां न रुचि न बेला ॥
.
या गृहीतकास आधार देण्याइतकी माहिती प्रस्तुत कवितेत नाही.
१. नायिका नायकास “धन्या” म्हणून संबोधीत असू शकेल. (शॉर्ट फॉर “धनंजय”?)
२. प्रस्तुत “धन्या” हा प्रस्तुत नायिकेचा मिस्टर आहे, असेही खात्रीलायकरीत्या सुचविणारे प्रस्तुत कवितेत काहीही नाही.
बाकी चालू द्या.
नायिका नायकास “धन्या” म्हणून
हा धनी.... धनी मातुर माझा देवा..वाघावाणी असु दे... मधला धनी आहे.
त्याचे आडनाव ही वाघ असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
अगागागा..रेवतीतै कवितेची पिसे
अगागागा..रेवतीतै कवितेची पिसे काढतील तुम्ही!
मलाही कविता लिहिताना टिपिकल मध्यमवर्गी विचार डोकावत होते. अरे ते दूध उतु चाललेय आणि तुम्ही इकडे काय करताय वगैरे वगैरे..
पण..
काव्यातुराणां न भयं न लज्जा.. हे ही तितकेच खरे.
तुम्ही "तै" म्हणालात म्हणून
तुम्ही "तै" म्हणालात म्हणून मी तुम्हाला "भै" म्हणते. भै म्हणजे भाई. नका गैरसमज करुन घेऊ. मी तुम्हाला सिक्स पॅकवाला भाई किंवा "डी" गँगचा सदस्य अशी विशेषणे लावत नाहीये. भाई म्हणजे आपले लाडके पु लं! सध्या मुक्ता बर्वे अभिनित नाटक चालू आहे पुण्यात, " भाई, एक कविता हवी आहे." त्यातल्या एका कवितेच्या ओळी अशा आहेत:
" तापल्या आहेत तारा तो वरी गाऊन घे
स्वप्न आहे लोचनी हे तो वरी पाहून घे "
ह्या ओळी तुमच्या किचन कवितेच्या मध्यवर्ती कल्पनेशी जुळतात का पहा. जुळत असेल तर, भाई, मुक्ता बर्वेना भेटा!
समजले नाही
तारा तापलेल्या असण्याचा नि गाऊन वर घेण्याचा नक्की संबंध काय?
ते "विसरुन गेलो" म्हणजे आम्ही
ते "विसरुन गेलो" म्हणजे आम्ही दोघेही विसरुन गेलो अश्या अर्थाने आहे.
तार्कीक स्पष्टीकरण देण्याची इच्छा नाही.
कवीने भान ठेवावे लागते ना.
कवीने भान ठेवावे लागते ना. इतरांचं जाऊ द्या.
नायिकेने भात करपवला..
नायिकेने भात करपवला..
नायकाने पलंग तोडला..
कवीने कविता लिहिली.
वाचकांनी तिचे श्राध्द घातले...
..एकुण कहाणी सुफळ समाप्त...
काही विचार
दुपारी दूध तापवणारे लोक ममव नसणार.
कोव्हिडकाळात घरून काम करताना मुलांचं काय केलं असेल या लोकांनी?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मुळात ऑलरेडी लंच टाईम झालेला
मुळात ऑलरेडी लंच टाईम झालेला असताना जेवण तयार पाहिजे.
आत्ता पती घरी आल्यावर कुकर लावणे, पोळीही आत्ता लाटणे, दूध आत्ता गरम करणे म्हणजे फारच उशीर झाला असे नाही का वाटत? गृहिणीला कामाचा उरक नाही असे वाटते. आता तो भात कधी शिजणार, त्यापुढे झाकण कधी पडणार, पोळ्या कधी होणार आणि तो नवरा कधी जेवणार? भाजी तरी आगोदर करून ठेवलीय की तीही चौथ्या बर्नरवर करपते आहे कोण जाणे. भात कशासोबत खाणार? वरण त्याच कुकरमध्ये असेल असे गृहीत धरले तर तेही जळले असणार.
मुळात ही कविता वाचून आता कार्यालयात संपूर्ण टीमपैकी कोणीही लंचसाठी घरी जायचे नाही, डबा आणणेच कम्पल्सरी असा नियम करण्याचा विचार बहुतांश म्यानेजर लोकांना आला असेल. कार्यालयीन कार्यक्षमता फारच कमी होईल अन्यथा..
.
नसेनात का.
ईबेवर विकली असतील. तुम्हाला नसत्या चौकश्या!
तसेही, या लोकांना मुले असतील, या गृहीतकास आधार काय? (एकदोन पोरे झाल्यावर इतकी “ड्राइव्ह” शिल्लक राहील काय? काहीतरीच आपले तुमचे!)
शेवटच्या वाक्यामुळे श्रेण्या
शेवटच्या वाक्यामुळे श्रेण्या परत आणाव्या अशी मागणी करण्याची तीव्र इच्छा झाली.
आयॅम सॉरी.
पण त्या मॉड्यूलचा कोड म्हणे मोडका आहे, अशी एरर बॅकेण्डला दिसत राहिल्यामुळे ...
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
गुजरातीत ह्याला ' बपोरींयू '
गुजरातीत ह्याला ' बपोरींयू ' म्हणतात. ह्यांचे खाण्यापिण्याचे, कामाचे शेड्युल वेगळे असते.
તમે જે બપોરિયું કહો છો તે
તમે જે બપોરિયું કહો છો તે ભાગ્યેજ થાય કારણ ઘરના પુરુષો કા તો બિઝનેસ કરતા હોય અથવા ઓફિસે ગયા હોય. સ્ત્રીઓ ઘરના કામ કાજ માં મશગુલ હોય. પૂનામાં જેમ બપોરે ૧૨ થી ૪ વાગ્યા સુધી દુકાનો બંધ રાખે છે તેવું ગુજરાતમાં નથી થતું. એટલે "બપોરિયું" મહારાષ્ટ્રમાં રોજ થઈ શકે પણ ગુજરાતમાં થાય તો બહુ ઓછું.
हारु. चोक्कस वात छे।
हारु. चोक्कस वात छे।
पण वाणियो बपोरे आरामज करता होय । बपोरे गऱ्हाक आवता नथी ने।
तो एमज समझी लेवानु की all is well with the world एवू कोणे एके आंग्ल कवी लखीने अजरामर थयू।
आपने शू मजा माणवी। बिजू काही काम नथी पण।
----------
खरंय.
पण वाणी लोकं दुपारी आरामच करतात. गिऱ्हाईक फार नसतं ना.
तर एकूण असं समजायचं की कुणी एक आंग्ल कवी 'जगात सर्व ठीक चाललं आहे.' असं लिहून अजरामर झाला आहे.
आपल्याला काय थोडी मजा आली म्हणजे झालं.
!
माणसाला समजेल अशा भाषेत संभाषण करायला काय घ्याल आपण दोघेही जण?
अन्वय
धन्याने मला किचनमधुनि उचलुनि प्रौढांसाठी आत नेले…
एका शृंगारिक कवितेस तुम्ही
एका शृंगारिक कवितेस तुम्ही एकदम वासनाकांड किंवा सेक्स रॅकेट पर्दाफाश टाईप करून टाकलेत..
(वाया गेलेले) दूध A1 टाइप की
(वाया गेलेले) दूध A1 टाइप की A2?
.
(वाया गेलेले) दूध A1 टाइप की
ते गवळ्याने रतीबात आणुन दिले होते की पिशवीचे हा देखील प्रश्नच आहे.
आणखी एक प्रश्न विचारावास वाटतो. " ही झोम्याटो ची झैरात आहे का? " टीजर सारखे वाटतेय.
लगे हातो गाईचे का म्हशीचे हे
लगे हातो गाईचे का म्हशीचे हे पण विचारुन टाका विजुभौ!
कविता अगदी समर्पक आहे.
नव विवाहित,तरुण जोडप्यांची (,तरुण म्हणतोय मी म्हणजे ३० च्या आतील)
कवितेत वर्णन केली आहे तशीच भावना पण असते आणि वागणे पण.
वेळ मिळाला की त्या वेळेचा सदुपयोग होतोच.
अडचण ही आहे.
इथे असणारे एक तर नव विवाहित नाहीत.
आणि दुसरे तरुण पण नाहीत.
त्या मुळे त्यांना त्या जोडप्याच्या भावनेशी एकरूप होता येत नाही.
हिरवी खोडं असतील?
हिरवी खोडं असतील?
दूध, भात, पोळी
दूध गरम करत आहे ,भात पण शिजत ठेवला आहे.
पोळी तव्यावर आहे( चपाती ला पोळी नावाने संबोधने फक्त पुण्यात च , पुरण पोळी सर्वांना माहीत आहे)
म्हणजे घटना पुण्यातील आहे.
अजून एक बर्नर गॅस शेगडी ला असता तर एकादी भाजी पण बनली असती.
पोळी आणि भात काय कोरडा खाणार का?
दूध तर पिण्यासाठी च तो घरी आला आहे लाख थापा मारून(ही ओळ फक्त प्रौढ न साठी आहे)
पोळी तव्यावर आहे( चपाती ला
एकदम गलत.
मधली पोळी आहे ती.. आता ही म्हण फक्त पुण्यातल्या लोकांनाच माहीती आहे असे नका म्हणु बुवा.
घरकाम करून वैतागलेली बायको
घरकाम करून वैतागलेली बायको आणि ऑफिसात सायबाची बोलणी खाउन आलेला नवरा ...
आणि हे असं ...? हे भगवान !
ऐसी फार बदलली हं.
कवितेला इतके सारे प्रतिसाद? कस्काय?
*********
उतनाही उपकार समझ कोई जितना साथ निभाए |
जनम मरन का मेल है सपना, ये सपना बिसरा दे |
कोई ना संग मरे ...
काल्पनिक प्रतिक्रिया
मनीषा ताईचं पटलं, फार टिपिकल चित्रं रंगवलंय अस वाटत, म्हणूनच सुचलेल्या काल्पनिक विविध प्रतिक्रिया.
चावट प्रतिक्रिया: कवितेत पुन्हा पुन्हा आलेल्या "पोळी आणि भात करपायला ..." ओळी वाचताना पॉर्नपट पाहताना मधेच जाहिरात लागल्याचा भास होतोय, ह्या ओळी सुरवात आणि शेवटचं ठेवा
व्यावहारिक: या पुढे सगळा स्वयंपाक पावणे-बारालाच उरका किंवा बाहेरून मागवा, आणि तो / ती यायच्या वेळेला नुसतंच स्वयंपाक करत असल्याचं नाटक करा
पुरुषप्रधान: च्यायला, हिला अनेकदा सांगितलंय स्वयंपाक जरा लवकर करत जा, रोज तेच आणि मग कटकट करायची
स्त्रीवादी (सोशिक): नुसतं बोलायला काय जातं ह्यांना, थोडी मदत म्हणून करू नका कधी घरकामात. मावशी पण रजेवर आहेत. बाई, माझं वजन वाढलं तर नसेल, ह्यांना थोडी धाप लागल्याचा भास झाला
स्त्रीवादी (कठोर): नुसतं बोलायला काय जातं ह्याला, थोsडी मदत म्हणून करू नकोस आपणहून. मावशी रजेवर आहेत, संध्याकाळी आलास की दोघे घासू भांडी, आणि जिमला जाय्चय
फेमिनाझी (भारतातील): गिळून पसार! जळकी आणि खरकटी भांडी कोण घासणारेत, ह्याच्या घरचे? चायला, कामवाली पण रजेवर. लइ त्रास दिलाय, एक दिवस नं चारशे अट्ठ्यान...
फेमिनाझी (अमेरिकेतील): (६ महिने, किंवा २ वर्ष, किंवा ६ वर्ष) झाली अजून एच-वन नाही कि इएडी नाही, आणि आता गिळून पसार! जळकी आणि खरकटी भांडी कोण घासणार, ह्याचा बाप? डिश-वॉशर बिघडलाय सांगून चार महिने झाले
दोघे पुरोगामी : पुढचे काही दिवस मी घरून काम व स्वयंपाक करतो, तू मधल्या सुट्टीत येऊन मला चकित कर.. त्यात काय सोपंय, संकोच करू नकोस
(**संपादन :
स्त्रीप्रधानस्त्रीवादी )वाहक.
मुळात पोळी आणि भात खावेच कशाला! किती त्या रिकाम्या कॅलऱ्या! आमच्यांत सेलरी आणि/किंवा चमचा वापरून भाजी आणि उसळ ताटापासून तोंडापर्यंत नेतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
एक गैरसमज झालेला दिसतोय.
एक गैरसमज झालेला दिसतोय.
भात आणि पोळी करपली व दूध उतु गेले ह्याचा अर्थ स्वयंपाक आताच बनतोय असे नाही.
जनरली जेवण वाढण्यापूर्वी गृहकृत्यदक्ष स्त्री गरम करुन वाढते हे पाहिले आहे.
इथेही तोच प्रकार असु शकतो.
म्हणजे असे संवाद बर्याचदा ऐकले आहेत.
भाताला एक वाफ देते..
चपाती परतते...
दूधाला एक उकळी देते वगैरे...
म्हणजे पूर्ण स्वयंपाक आधीच झालेला असु शकतो..!
बाकीचे स्पष्टीकरण हवे असेल तर इच्छुकांनी
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
वाड्यावर यावे..
काळवेळेचा विचार?
असेल बुवा या बाईला खूप वेळ आणि हौस, माझ्या आईलाही नसायचा तेवढा! पण दुपारच्या जेवणाच्या वेळेस दूध गरम करणं?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
गरम दूधातच पोळी/चपाती
गरम दूधातच पोळी/चपाती कुस्करुन खायची असल्यास...?.
काळवेळेचा विचार?
दुपारच्या जेवणात?कवितेचा मूड काय, त्या जोडीला मेन्यू काय!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मेन्यु अगोदरच ठरलेला असू शकतो
मेन्यु अगोदरच ठरलेला असू शकतो. मूड नंतर बनलाय...काळवेळ आणि संधी पाहुन!
करपू ध्या पोळी.
पोळी करपू ध्या.पण नवीन कोणती रेसिपी बाजारात आणू नका.
पोळी परत गरम करता येत नाही.
फ्रीज केलेले पराठे गरम केले जातात.(मलबारी पराठे)
भात कूकर मध्येच ठेवला तर तो थंड होत नाही.
राहिले दूध ते फक्त गरम करता येते.
?
नक्की कोणी सांगितले?
आमच्यात, विकतच्या तयार पोळ्या दोन आठवड्यांचा सप्लाय आणून, फ्रिजमध्ये (फ्रीझरमध्ये नव्हे!) ठेवून, आयत्या वेळेस परत (गॅसवर) गरम करून सर्रास खातात.
एकदा पाहाच करून.
तेच म्हणतो..
तेच म्हणतो..
स्वयंपाक जर कोणी उशीराने खाणार असेल तर त्याच्या नावाच्या चपात्या अर्ध्याकच्च्या तव्यावर शेकुन नंतर प्रत्यक्ष जेवणाच्या वेळी व्यवस्थित परतुन वाढता येतात.
बप्पोरियु नामक शब्दाचा वर
बप्पोरियु नामक शब्दाचा वर उल्लेख वाचला. याबद्दल एक गाणे देखील आहे.
https://youtu.be/ugTkqhpqF8c?si=oZCrIjacVsgxOUbw
(व्हिडो एम्बेड करता येत नाही का आता? एर्रर आली एम्बेड करायला गेलो तेव्हा. )
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !