एका भाषेचा अंत.

एका भाषेचा अंत:

मेरी जोन्स स्मिथ आपल्या आईकडून अलास्का नेटिव्ह्सची भाषा "इयाक" शिकली. तिने आपल्या मुलांना ही भाषा शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा अमेरिकन पती आणि मुले यांनी त्या भाषेची टर उडवली आणि इंग्रजीला महत्त्व दिले. मेरीची मातृभाषा घरापुरतीच मर्यादित राहिली. मेरीची मोठी बहीण जेंव्हा घरी यायची तेंव्हा दोघींना किती बोलू आणि किती नको असे व्हायचे. नवऱ्याच्या आणि मुलांच्या कानावर इयाक भाषेचे शब्द पडत ते तेंव्हाच. १९८३ पर्यंत, जगात केवळ ३८ लोक अलास्का प्रांतातील ही मूळ भाषा इयाक बोलू शकत होते. १९९० मध्ये, मेरीची एकुलती एक मोठी बहीण निधन पावली आणि मग मेरी स्मिथ जगातील एकमेव जिवंत व्यक्ती राहिली जी मूळ इयाक भाषा बोलू शकत होती.

मेरीचे कुटुंब मूळचे आइसलँडचे मच्छीमार. हजारो वर्षांपूर्वी त्यांचे पूर्वज बेरिंग खाडीतून बोटीने प्रवास करून अलास्काला पोहोचले. मेरीचे बालपण आणि पौगंडावस्थेतील काळ आई वडिलांकडून पारंपारिक एस्किमो कथाकथन ऐकण्यात गेले. शाळेतील शिक्षणाचे माध्यम मात्र इंग्रजी होते आणि मुलांना 'इयाक' बोलण्यास कडक बंदी होती. कालांतराने, बर्‍याच मध्यमवर्गीय शहरी भारतीय मुलांप्रमाणे, मेरीचा तिच्या मातृभाषेबद्दल भ्रमनिरास झाला. तिने ओरेगॉनमधील एका अमेरिकन व्यक्तीबरोबर लग्न केल्यानंतर त्याने किंवा तिच्या मुलांनी 'इयाक' शिकण्यात फारसा रस दाखवला नाही, आणि तिनेही नंतर त्यांना जबरदस्तीने ती भाषा शिकवण्याचा प्रयत्न केला नाही.

बर्फाने गोठलेल्या प्रदेशात बोटींमध्ये विशिष्ट प्रकारचे जाळे टाकून मासेमारी करणारे हे लोक जी भाषा बोलत होते त्यामध्ये, नदीच्या प्रवाहातून बोट हाकताना दिशा दर्शविणारे विशिष्ट शब्द, स्थानिक 'स्प्रूस' झाडाच्या शेंड्यापासून बुडख्यापर्यंत आणि जमिनीत खोलवर गेलेल्या मुळापर्यंतच्या भागांसाठी शेकडो वेगवेगळे शब्द, मासेमारीतून मिळालेले मासे आणि त्यावर प्रक्रिया केल्यानंतर तयार झालेला पक्का माल यासाठी असणारी विशिष्ट शब्द योजना, ताज्या बर्फासाठी विशिष्ट संज्ञा असलेली भाषा, गोठवलेल्या बर्फाचे विविध प्रकार सांगणारी वाक्ये आणि बर्फ वितळल्यावर बुटांना चिकटणारी माती आणि किडे यासाठी असणारे असंख्य शब्द काळाच्या ओघात विस्मृतीत जाऊ लागले.

मेरीची बहीण निधन पावली आणि मेरीची, आपण जगात एकटेच पडलो आहोत ही भावना तीव्र होऊ लागली. तिच्या सोबत आता तिची भाषा बोलणारे, संवाद साधणारे, आपली भाषा बोलल्यानंतर जो आपलेपणा वाटतो तशी भावना निर्माण करणारे आप्त, स्वकीय, आणि जवळची माणसे कुणीही राहिले नाही. या गोष्टींनी ती खचली. त्याच वेळी जेंव्हा जगातील अनेक भाषेवर संशोधन करणाऱ्या लोकांना लुप्त झालेली इयाक भाषा बोलणारी एकमेव व्यक्ती ओरेगॉन प्रांतात राहते याचा सुगावा लागला तेंव्हा हे संशोधक तिच्या घरी आले परंतु तिने त्यांना या भाषेबद्दल बोलण्यास साफ नकार दिला.

शेवटी २००८ साली मेरी स्मिथ मृत्यू पावली आणि इयाक भाषा बोलणारी एकमेव व्यक्ती इतिहासात जमा झाली. लहानपणी, वाढणाऱ्या वयात कानावर पडणारी आणि त्यातून संवाद साधता येणारी भाषा आणि परंपरा हा प्रत्येक माणसाच्या आत्म्याचा अविभाज्य भाग बनतो आणि मग तारुण्याच्या बहरात पोटपूजेसाठी इतर भाषेचा आधार घेताना या अविभाज्य भागाला मिळणार दुजाभाव आणि विसरलेल्या पूर्वजांच्या आठवणी उतारवयात मात्र प्रत्येक व्यक्तीच्या स्मृती पटलावर पुन्हा उमटू पाहतात आणि हरवले ते गवसले का अशी भावना निर्माण होते . मेरीही त्याला अपवाद नव्हती. जी माणसे लुप्त झालेल्या भाषेबद्दल आत्मीयता दाखवण्यासाठी तिच्या दारापर्यंत आलेले होते त्यांना परत पाठवल्याची खंत तिच्या मनाला लागून राहिली. भाषेचा हा वारसा जपून ठेवायला हवा ही भावना प्रबळ झाली आणि मग मेरीने मृत्यू होण्याच्या काहीच वर्षे अगोदर अलास्का विद्यापीठाचे भाषाशास्त्रज्ञ मायकेल क्रॉस, आणि द न्यूयॉर्कर ची पत्रकार एलिझाबेथ कोल्बर्ट यांना तिच्या भाषा, त्यांच्या जातीतल्या दंतकथा आणि परंपरांशी संबंधित अमूल्य माहितीचा खजिना पुस्तक रूपाने सुपूर्द केला. मेरीला नक्कीच खात्री वाटत असावी की कदाचित तिची भाषा येत्या काही वर्षात पुन्हा मूळ धरू लागेल.

मेरी स्मिथने लिहिलेली पुस्तके:
The Eyak Language: An Overview (1984), The Eyak Language: A History of Decline" (1990), The Eyak Language: A Grammatical Sketch (1993), The Eyak Language: A Case Study in Language Death" (1994), The Eyak Language: A New Approach to Language Revitalization" (2005).
आपल्या भारतातल्या अशा किती भाषा मृत्यपंथाला लागलेल्या आहेत कुणास ठाऊक?
………………………..

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

रोचक आणि दुःखद दोन्ही !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed

परिस्थिती भीषण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- अहिरावण

काय सांगता? असेल असेल!! तुम्ही म्हणता म्हणून तुम्ही नक्कीच पुरोगामी, उदारमतवादी वगैरे जे म्हणाल ते असाल. मग प्रत्यक्षात तुम्ही कितीका कुपमंडूक असा... तुम्ही महानच आहात. केवळ तुम्ही म्हणता म्हणून...

अहिराणी भाषा धुऴे व जऴगाव या दोन जिल्ह्यापुऱती बोलली जाते, पण तीही काही ठराविक खेड्या॑वरच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0