Skip to main content

तो क्षण

केतकीत नागिण सळसळते
क्षितिजरेष विखुरते वितळते
रेखांशी अक्षांश गुंतते
स्थलकालाचे वितान विरते
झळाळते नक्षत्र फिकटते
त्रिमितिशरण भवताल क्षणार्धच
आदिबंधनातून निसटुनी
ओतप्रोत माझ्यात डहुळते
तो क्षण आला
तेव्हा कळते