२०२४ लोकसभा निवडणुकींत NDAला किती जागा मिळतील?
२०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपप्रणित NDA 'अब की बार ४०० पार' म्हणत उतरला आहे. गेल्या निवडणुकीत (२०१९) एकट्या भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या आणि NDAला ३५३ जागा होत्या. या वेळच्या निवडणुकांसाठी वेगवेगळे अंदाज प्रकाशित होत आहेत. ४ जूनला निकाल प्रकाशित होतील. तोवर सांगा : तुमचा कौल काय आहे? (काही तांत्रिक अडचणीमुळे कौलात मत देता येत नाही, पण) खाली धाग्यावर सांगा, आपल्या अंदाजामागची प्रक्रिया उलगडा आणि दिलखुलास चर्चाही करा!
प्रतिक्रिया
२०१९पेक्षा जास्त पण ४००पेक्षा कमी
२०१९पेक्षा जास्त पण ४००पेक्षा कमी
मत कसे नोंदवायचे?
तांत्रिक अडचणी
काही तांत्रिक अडचणीमुळे कौलात मत देता येत नाही आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
२०१९ पेक्षा कमी.
२०१९ पेक्षा कमी.
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना
हे मत
कोण किती जागा जिंकेल हे सांगता येत नाही.
पण ह्या निकालात एक गोष्ट माहीत पडेल .
देशातील आर्थिक,सामाजिक बाबतीत प्रगत राज्यातील मतदार कोणत्या पॉइंट वर मतदान करतात आणि देशातील आर्थिक ,सामाजिक बाबतीत मागास राज्यातील मतदार कोणत्या गोष्टींना महत्व देवून मतदान करतात.
माझ्या अंदाज नुसार आर्थिक ,सामाजिक प्रगत राज्यातील मतदार bjp ल नाकरतील.
आणि आर्थिक,सामाजिक बाबतीत मागास राज्य bjp ल पसंती दाखवतील.
वारं फिरलेलं आहे !
२०१९पेक्षा कमी (<३५३)
+१
सहमत आहे.
सर्वात गंमत म्हणजे…
…अयोध्येत भाजप पडला.
मजा आली!
.
२०१९ पेक्षा जास्त पण ४०० पेक्षा कमी असा कुठला आकडा असेल कोण जाणे. उणे एकचं वर्गमूळ असलं तर आहे. नीट मोजून बघायला पाहिजे.
----
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
मार्मिक, परंतु...
...काँप्लेक्स संख्यांत कमीजास्त कसे करतात? (किंबहुना, रियल अक्षावरील एक बिंदू आणि इमॅजिनरी अक्षावरील दुसरा बिंदू यांच्यात मागेपुढे कसे ठरवायचे?)
.
खरं तर करत नाहीत. बीजगणिताचे सर्वसाधारण नियम शाबूत ठेवायचे असतील तर संयुक्त संख्यांमध्ये कमीजास्त करण्याचा काहीही मार्ग नाही असं सिद्ध करता येतं. पण घटनादुरुस्ती करून अशा अडचणींना बगल देण्याची भारतात सोय असते.
----
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
लोल
हे २एबी पंतप्रधनांना जरूर जमेल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
..
काँप्लेक्स संख्यांमध्ये हे (अगोदर म्हटल्याप्रमाणे) अर्थातच शक्य नाही. परंतु…
मॉड्युलो (२०२० किंवा त्याहून अधिक) अशा एखाद्या चक्रीय संख्यापद्धतीत हे शक्य व्हावे, नाही काय?
उदाहरणादाखल, मॉड्युलो २०२० संख्यापद्धतीत ० ते ३९९ हे झाडून सर्व आकडे २०१९ < क्ष < ४०० या कॅटेगरीत मोडावेत, नाही काय? (किंवा, मॉड्युलो २०२१ संख्यापद्धतीत २०२० आणि ० ते ३९९?)
(काही चुकल्यामाकल्यास क्षमा करा, हं.)
२०१९पेक्षा कमी (<३५३)
२०१९पेक्षा कमी (<३५३)
ठाम मत
४०० च्या बरेच जवळ जातील पण
४०० च्या बरेच जवळ जातील पण ४०० अवघड दिसतेय.
2024 ची निवडणूक
हिंदू मुस्लिम,भारत पाकिस्तान,राष्ट्रवाद ह्या वर बजप ni लढवण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी झाले आता ची निवडणूक महागाई,बेरोजगारी, स्थानिक प्रश्न ह्या वर च आली ,मतदान पण त्याच पॉइंट वर झाले त्या मुळे .
Bjp 150 पण पार करत नाही.
300,400 ही खूप दूर ची गोष्ट आहे
भाजप ने कधीही हिंदू मुस्लिम
भाजप ने कधीही हिंदू मुस्लिम केलेले नाही. जनधन खाते असो टॉयलेट आणि घर मुस्लिम आबादीला दुप्पट पेक्षा जास्त फायदा झाला आहे. बाकी धर्माच्या नावावर वेगवेगळे कायदे काँग्रेसने बनवले. आता तर फक्त विशिष्ट धर्मासाठी मेडिकल कॉलेज इत्यादी धर्मनिरपेक्ष राज्यांत उघडतात आहे.
गेल्या दहा वर्षात सहा कोटी ईपीएफ कार्ड बनले. भारताचा निर्यात 331 बिलियन डॉलर करून ७७१ बिलियन डॉलर वर केला. मोबाईल फोन 18500 रू कोटींवरून चार लक्ष कोटींच्या रू च्यावर. अशीच प्रगती सर्व क्षेत्रांत आहे. यूपीए कलापेक्षा पाचपट जास्त रोजगार गेल्या दहा वर्षांत निश्चित निर्मित झाला आहे. गेल्या दहा वर्षांत महागाई वाढण्याची दर पूर्वीच्या दशकांपेक्षा अर्धी आहे. गुगल वर प्रत्येक क्षेत्रांतील आकडे तपासू शकतात.
अंदाज
एनडीएने कितीही आटापिटा केला तरी ४०० पार काही जाणार नाहीत ३०० पार सहजपणे जातील.
समजा बहुमताचा आकडाही भाजपाला गाठता आला नाही तर इतर छोटे छोटे पक्ष एनडीए मध्ये सहभागी होणार हे नक्कीच.
त्यामुळे मोदी पंतप्रधान म्हणून काही वर्षे राहतील नंतर राष्ट्रपती होतील किंवा राजकारणात मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावतील भाजपाच्या थिंक टॅन्कमध्ये.
माझा अंदाज:
भाजपा २६० ते ३१५
एनडीए ३१० ते ३५०
कॉंग्रेसचे ५० पेक्षा कमी येतील.
इंडिया आघाडी ९० ते १४०
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
17c
17 c वर कोर्टात केस चालू आहे,निवडणूक आयोगावर च विरोधी पक्षांचा विश्वास नहीं.निवडणूक झाल्यावर निकाल आहे.
फार्म १७ c मतदान पूर्ण
फार्म १७ c मतदान पूर्ण झाल्यावर भरले जाते यात किती मतदान झाले त्याचा आकडा असतो. या फॉर्मवर सर्व पक्षांच्या पोलिंग एजंटची सुद्धा सही असते. जेव्हा ईव्हीएम मशीन मतमोजणी साठी उघडली जाते. तेव्हा फॉर्म १७ सी आणि ईव्हीएम मते दोन्हींची संख्या बरोबर असली पाहिजे. अर्थात निवडणूक पूर्ण झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची हेराफेरी केली जाऊ शकत नाही. आज पर्यंत यात कधीच गलफत आढळलेली नाही. आहे. बाकी ११ ते १२ लक्ष फॉर्म १७ सी सार्वजनिक करणे योग्य नाही. .लाखो लोकांनी कोणत्या पक्षासाठी पोलिंग एजंट म्हणून काम केले हे सार्वजनिक होईल. याच्या पोलिंग एजंटच्या आर्थिक भविष्यावर प्रभाव पडू शकतो. राजकीय द्वेष भावनेने बदला घेतला जाऊ शकतो.. निवडणुकीनंतर ही याचिका बहुतेक कचऱ्याच्या पेटीत फेकली जाईल.
बाकी ११ ते १२ लक्ष फॉर्म १७
बाकी ११ ते १२ लक्ष फॉर्म १७ सी सार्वजनिक करणे योग्य नाही. .लाखो लोकांनी कोणत्या पक्षासाठी पोलिंग एजंट म्हणून काम केले हे सार्वजनिक होईल.>>>
हेच आर्ग्युमेंट इलेक्टोरल बॉण्डबाबतही सरकारने केले होते. सुकोने पार्श्वभागावर लाथ मारली.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
काहीं पण
आज पर्यंत कधीच हे आकडे जुळले नाहीत असे स्वतः इलेक्शन कमिशन सांगत आहे.
पोलिंग एजंट ची ओळख जग जाहीर असते .
कोणी इतका नीच विचार करत नाही अर्थात bjp सोडून की हा आपल्या पक्षाचा नाही म्हणून त्याचा छळ करा.
हा असला बकवास विचार फक्त bjp च करू शकते.
माझ्या खास दहा पंधरा खास मित्र न मध्ये विविध पक्षाचे समर्थक आहेत म्हणून आमची काही मैत्री तुटत नाही.
व्यक्तीच्या मता च आदर केलाच पाहिजे द्वेष का करायचा ह्याचे विचार आपल्या पेक्षा वेगळे आहेत म्हणून.
आणि कृती नी तो व्यक्ती आपल्याला काही त्रास पण देत नसेल तर.
Maturity विचाराची म्हणजे काय ही व्याख्या 100 वेळा कागदावर लिहून पाठ करा.. निबंध च लिहा त्या विषयावर
म्हणजे योग्य विचार करायला शिकला तर शिकाल
आकडे जुळत नाही याहून
आकडे जुळत नाही याहून हास्यास्पद प्रतिसाद देण्याआधी एखाद्या मतमोजणीत भाग घेणर्या बाबुला तरी विचारायचे. बाकी तुमचे म्हणणे प्रमाण मानून BJP. नीच विचार करते आणि ती सत्तेत आहे. त्यामूळे पोलिंग अजेंट सुरक्षा अधिक महत्वपूर्ण होते. बहुतेक प.बंगाल मध्ये भाजप राज्य आहे असे तुम्हाला म्हणायचे असेल.
बाकी चुनावी ड्युटी मी केल्या आहेत.
असा अंदाज वाटतो
गुजरात,महारष्ट्र ,उत्तर प्रदेश मध्ये bjp च्या कमी होतील.
उत्तर प्रदेश मध्ये bjp ल 40 पण जागा मिळणार नाहीत.
महाराष्ट्र मध्ये 35 जागा उद्धव ठाकरे आणि त्यांचे मित्र पक्ष जिंकतील.
गुजरात मध्ये पण bjp विरुद्ध असंतोष आहे.
गुजरती न्यूज चॅनेल काही दिवसा पासून बघत आहे त्या वरून वाटत आहे
एक्झिट पोल अनुसार फसिस्ट.
एक्झिट पोल अनुसार फसिस्ट. मनोवृत्तीचे तानाशाह शेठजी दिल्लीच्या राजसिंहासनावर पुन्हा विराजमान होतील. पहिलेपेक्षा जास्त जागा जिंकून.
हा भारत आहे
भारतीय मीडिया ही नेहमीच सत्ताधारी लोकांची गुलाम राहिलेली आहे त्यांचे स्वतंत्र असे कोणतेच अस्तित्व नाही.
कारण.
जिवो aur जिने दो.
दोघांचा फायदा .
.एक्झीट पोल वाले सत्ताधारी पक्षाच्या दबावात असतात.
कारण तेच .
त्या मुळे भारतीय मीडिया नी काढलेले एक्झीट पोल विश्र्वास ठेवण्याच्या लायकीचे बिलकुल नाहीत.
Bjp ऑफिस मधून त्यांना जे सांगितले ते भारतीय मीडिया सांगत आहेत.
पूर्वीच्या निवडणुकीत पण हे पोल वाले लाचार खूप नागडे झालेले आहेत.
निक्काल
निकाल बघत असाल असे गृहीत धरतो.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पूर्व अंदाज करणारी कोणती मीडिया घराणी आहेत
जी गेली दहा वर्ष फक्त bjp आणि मोदी ह्यांचा फक्त उदो उदो करत होती .
त्यांच्या अंदाज वर किती विश्वास ठेवणार.
4 तारखेला काय ते स्पष्ट होईल च
एक्झीट पोल
एक्झीट पोल वाले जोरात तोंडावर आपटनार है मात्र नक्की आहे.
आणि काही लोक जे लोक स्वतःला राजकीय तज्ञ समजुन फेकत होते ते पण तोंडावर पडणार आहे
खरं ठरलं राजेश भाऊ तुमचं
खरं ठरलं राजेश भाऊ तुमचं
हॅहॅहॅ
हॅहॅहॅ
मजा आली आज. छान गेला दिवस.
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना
प्रशांत किशोर ३०३ सांगत होते.
प्रशांत किशोर मतदानापूर्वी भाजप ३५०सांगत होते पण पहिल्या फेरीनंतर ३०३ केलं. "माझा अंदाज चुकला तर शेणात तोंड घालेन" म्हणाले. मी ३०३च धरलं. मोदीभक्तांइतकेच विरोधक खूप आहेत.
कसं? मतांची टक्केवारी ४४% आणि ४१%. यावरून धडा घ्या.
Bjp एजंट
Bjp नी कॉन्ट्रॅक्ट वर नेमलेला pk कुठे गायब झाला आहे.
त्याचे सर्व अंदाज साफ चुकले आहेत .
तो अंदाज चुकले तर शेन खाणार होता.
मीडिया नी त्याला जनते समोर आणले पाहिजे
कर्तव्य विसरले
एक्झीट पोल वाले स्वतःचे कर्तव्य विसरले, प्रोफेशनल पना विसरून स्वतःचा दर्जा,विश्वास स्वतच्या चुकीच्या कामामुळे गमावून बसले आहेत.
जो पक्ष जास्त पैसे देईल त्याच पक्षाला हे जास्त जागा मिळतील असे अंदाज देवू लागले आहेत.
ह्याची खात्री ह्या वर्षी च्या सर्व एक्झीट पोल मुळे झाली .
भारतात दही पण खात्री नी शुद्ध मिळत नाही हे सत्य आहे.
प्रामाणिक पने व्यवसाय करणे लोकांनी सोडून दिले आहे.
त्या मुळे लोक विदेशी वस्तू न वर,बातम्यांवर जास्त विश्वास ठेवतात.