बाजारगप्पा-भाग-१
खुलासा
सर्वप्रथम मी सेबी अधिकृत सल्लागार नाही. दुसरे म्हणजे या लेखात व्यक्त झालेली ही सर्व माझी व्यक्तिगत मते व अनुभव आहेत. यावर आधारीत जर काही केले तर ते आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर आणि ट्रेडींग मध्ये असलेल्या धोक्याची जाणीव ठेउन करावेत. तुमच्या निर्णयांची जबाबदारी सर्वस्वी तुमचीच राहील. तर आता हात झटकुन झाल्यानंतर मी हातवारे करत तुम्हांस माझे अनुभव शेअर करतो कदाचित कोणांस उपयोग झाला तर होइल.
काही सार्वकालिक मुलभुत बाजारु सत्ये
सुरुवात मी गेली काही वर्षे सातत्याने केलेल्या ट्रेडींग मधुन आलेले स्वतःचे बरे वाईट अनुभव व काही निरीक्षण,वाचन, चिंतन व महाजनां बरोबर झालेल्या सत्संगातुन गवसलेली अशी काही बाजारा व ट्रेडींग संदर्भातील सत्ये इथे मांडतो. (महाजन हा शब्द एक सोय म्हणुन पुढे ही वापरेल याचा अर्थ बाजारातींल यशस्वी मंडळी आडनाव नव्हे)
१- बाजार १००% आकलनीय/अंदाज करण्यालायक नाही तसेच बाजार १००% अनाकलनीय/ अंदाजालायकच नाही असेही नाही.
नवा भिडु जेव्हा ट्रेडींग च्या खेळात पहिल्यंदा येतो तेव्हा त्याचे दोन मोठे भ्रम असतात. पहीला भ्रम म्हणजे बाजार हा १००% आकलनीय आहे. म्हणजे नभि समजतो की एक गुप्त आपल्यापासुन लपवण्यात आलेली strategy नक्कीच काही मोठ्या लोकांकडे आहे जी आपल्याला शोधुन काढायची आहे इतकेच आपले काम ती एकदा मिळाली की आपण राजीनामा देणारच्/गंगेत घोडे न्हालेच/ वगैरे. त्या strategy ने आपण प्रत्येक स्टॉक वर जाईल की खाली आणि नेमका किती वर/खाली याचा १००% छडा लावु और बस फिर क्या ?. यासाठी नभि मग एकामागोमाग युट्युब व्हिडीयोज, कोर्सेस, गुरु,पुस्तके सर्व काही शोधतो त्यात त्याला सापडलीच यावेळी-काही काळ वापरुन-पैसे गमावुन- चालत नाही- नविन शोधु या ती ही नव्हेच-मग पुन्हा दुसरी-काही काळ वापरुन..... अशा दुष्टचक्रात अडकतो. चक्राचे प्रत्येक नविन आवर्तन त्याचा बहुमुल्य वेळ, चिक्कार मानसिक/शारीरीक श्रम व पैसा बरबाद करत जाते. व आवर्तनागणिक नभि कोलमडत उध्वस्त होत जातो. ( यात एक मटका फॅक्टर कधी कधी थोडा काळ साथ देते पण कायम नाही त्याने थोडा दिलासा वा फसवे यश दिसु शकते पण ते टिकाऊ नसते ) तर हे वरील वाक्यातील पहीला भागाच्या अज्ञानातुन होते. म्हणजे नभि समजत असतो की बाजार १००% आकलनीय आहे त्याचा १००% अंदाज बांधता येतो स्टॉक १००% सांगता येतो की वर जाईल की खाली. पण ते सत्य नाहीच. मग आता आपला नभि हा निराश होतो. आणि तो दुसर्या भ्रमाच्या तावडीत सापडतो. ते असे की मार्केट १००% अनाकलनीय आहे. तो सर्वांना सांगतो " अरे काही नाही रे सट्टा आहे सट्टा यात काहीच म्हणजे काहीच खरं नाही. हा वरील भ्रमाच्या बरोब्बर विरोधी भुमिका आहे.
आता बाजारा चा ज्याने काही काळ अनुभव घेतलाय त्याला अर्थातच दोन्ही भ्रमांचा सहजच साक्षात्कार होतो. पण तरी एक पुरावा म्हणुन एक मांडणी बघा. जर बाजाराचे एकच एक असे सत्य असते एकच एक strategy असती तर यशस्वी होणारे सर्व ती एकच strategy वापरत असते. पण बाजारात प्रत्यक्षात तसे आढळुन येत नाही.
इथे ज्यांनी मोठे यश संपादन केलेले आहे अशामध्ये इतके वैविध्य आढळते की काही १ मिनिट टाइमफ्रेम वर काही अगदी काही मिनिंटांसाठी ट्रेड घेतात. काही फक्त १ दिवसाच्या आत काम करणारे intraday traders करतात. काही swing tradres असतात काही आज विकत घेतला तर काही वर्षे स्टॉक सांभाळतात. सर्व प्रकारात यशस्वी मंडळी आढळतात.
बरे हे तर time frame चा फरक वेगवेगळ्या असंख्य नाना प्रकारांनी Trading Thought Schools आणि strategies आहेत. वेगवेगळे वादी आहेत. काही indicators वादी असतात. त्यांच्या ठराविक indicators नेच ते ट्रेड करतात. काही मंडळी price action वादी असतात त्यांच्या मते indicators सब झुट आहे. काही कमालीच्या किचकट अशा Gaan Square किंवा इलियट वेव्ह च्या आधारानेच ट्रेडींग करतात. काही institutional smart money चा आधार घेऊन काही algos वापरुन व्यक्ति तितक्या प्रवृत्ती च्या चालीवर व्यक्ति तितक्या strategies आहेत. व सर्वच वापरणारे यशस्वी होतात. म्हणजे एकच एक अशी कुठलीच Holy Grail कधीच नसते. असे असते तर ती फक्त शोधणे इतकेच काम बाकी होते पण असे नाहीये.
दुसरे म्हणजे जर काहीच अंदाजालायक नसते वर सगळेच पुर्णतः अनाकलनीय असते तर सातत्याने इतकी वर्षे कोणीच यशस्वी होऊ शकले नसते वा सर्वांनी एक दिवस ट्रेडींगच बंद केली असती. पण सातत्याने यशस्वी होणारे व दिर्घकाळ काम करणारे महाजन आहेत याचाच अर्थ ते एका मर्यादेपर्यंत नक्कीच आकलनीय आहे. अर्थात तुम्ही स्वतः याचा अनुभव घेऊ शकता. आणि जे काय यशस्वी होण्यासाठी लागते ते केवळ strategy नसुन त्याच्या व्यतिरीक्त ही काहीतरी आहे ज्यावर काम करणे आवश्यक आहे.
तर वरील विवेचनावरुन आपण दोन निष्कर्ष काढु शकतो ते असे की
अ-आपण एका सत्याचा स्वीकार करावा की १००% काम करणारी अचुक परीपुर्ण अशी कोणतीच गोष्ट्च अस्तित्वात नाही या मर्यादेचा सहर्ष स्वीकार करावा.
ब -दुसरे म्हणजे एका मर्यादेत जितके शक्यआहे आकलनीय आहे त्यावर आपल्याला काम करायचे आहे. म्हणजे इतर आपल्या कुवतीतील घटकांवर काम करायचेय.
तुम्ही कल्पना करु शकत नाही की हे इतके जरी केले तरी बरेच श्रम वेळ पैसा नक्कीच वाचतील.
२- एक शांती और एक ट्रेडर कभी दोस्त नही बन सकते ( मुळ प्रेरणा जुने बॉलिवुड एक लडकी और एक लडका कभी........)
कल्पना करा की एक रम्य शांत तळे आहे. मग्न तळ्याकाठी तुम्ही शांती बरोबर बसलेला आहात. आणि तुम्ही नुस्ताच काय बसु या नेहमीच्या सवयीने तळ्यात एक खडा टाकला तर काय होणार ? तळ्यात तरंग उठतील एकामागोमाग. तसेच तुम्ही जेव्हा एक ट्रेडखडा टाकला की काय होते ? म्हणजे तुमच्या मानससरोवरात फक्त तीनच शक्यता आणि तीन च संभाव्य परीणाम होतात.
१- तुम्ही विकत घेतलेला stock वर गेला की उठणार तरंग....तरंग... अजुन वर गेला की अजुन तरंग...आनंदाचे डोही आनंद तरंग ....
२- तुम्ही विकत घेतलेला stock खाली आला की उठणार तरंग.....तरंग..... राग-तरंग नैराश्य तरंग
३- तुम्ही विकत घेतलेला stock ना खाली ना वर गेला जागच्या जागी रेंगाळत राहीला की उठणार अस्वस्थतेचा तरंग....
पण तेच ते तेच ते तुम्ही बाजुला बघितले तर तुमच्या लक्षात येइल की शांती कधीचीच निघुन गेलेली आहे आणि तुम्ही तरंगाच्या मधोमध .......तर अशा तर्हेने तुमचे मानससरोवर सतत अस्थिर राहते. त्यात तुम्ही सत्य बघु शकत नाही शांती लाभत नाही. आणि ट्रेडींग मध्ये यशस्वी होण्यासाठी शांतीची साथ मिळणे आवश्यक पुर्वअट आहे. कारण यश हे पुर्णपणे तुमच्या मानस वर अवलंबुन आहे. कारण बघा जर तुम्ही अस्थिर आणि कंपित होत असाल तर तुम्ही लक्ष्याचा अचुक वेध म्हणजे योग्य ट्रेडींग निर्णय घेऊच शकत नाही. तुम्ही अनेक वेळा वाचले असेल की भय आणि लोभ हे दोनच घटक सर्वात महत्वाचे आहेत. तर पुर्ण शांती लाभणे ट्रेडरला तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो ट्रेडींग पुर्णपणे बंद करतो त्याग करतो. किंवा जर कोणी योगी ( अध्यात्म फेम ) असेल तर च ते शक्य आहे. आपण फक्त सामान्य जन फक्त as much as possible हे धोरण ठेउन स्वतःच्या विकारांना नियंत्रित करु शकतो. इथे ही १०० % नियंत्रण करु हे फक्त आदर्श आहे.
यावरुन पुन्हा दोन निष्कर्ष निघतात
अ- शांती साध्य करण्यासाठी as much as possible हे धोरण ठेउन आपण आपले भय लोभ नियंत्रणात ठेवणे इतकेच आपल्या हातात आहे.
ब- वरील अ हा हेतु साध्य करण्यासाठी ची जी साधने आहेत त्यावर आपल्याला काम करायचे आहे.
आता पुढील भागात आपण नेमका काय उपाय करु शकतो याचे विवेचन करु नंतर पुन्हा इतर सत्यांकडे वळु असे करत करत जमेल तसे पुढे सरकत राहु या.
प्रतिक्रिया
ट्रेडींग इन द झोन
माझा ट्रेडींगचा अनुभव फार नाही. पण गेली चार-एक वर्षे मी ऑपशन्स मध्ये ट्रेडींग करतोय. बर्याचवेळा लाँग टर्म बेट्स हेज करण्याच्या हेतूने आणि काहीवेळा अगदी नेकेड ऑपशन्ससुद्धा. ३ एक वर्षापूर्वी एका प्रोफेशनल फंड मॅनेजरने एका वेबेनार मध्ये ट्रेडींग इन द झोन हे पुस्तक सुचविले होते. हे पुस्तक मला आवडले. फक्त ट्रेडर म्हणूनच नाही तर इन्व्हेस्टर म्हणून पण ते पुस्तक मला उपयोगी वाटले. "एक शांती और एक ट्रेडर भी दोस्त बन सकते है" यावर हे पुस्तकही बोलते. अर्थात तुमचे अनुभव, विस्डम वाचायला आवडेलच.
हे पुस्तक कुठलीही ट्रेडींग स्ट्रॅटेजी नाही शिकवत (फंडामेंटल वा टेक्निकल) पण ट्रेडर म्हणून एक मानसिकता कशी असायला हवी यावर हे पुस्तक चांगले मार्गदर्शन करते. पुस्तकाचा सारांश असा, छोटे छोटे ट्रेड घेऊन नफा होत रहातो, पण जेव्हा मोठी बेट्स घ्यायला जातो तेव्हा बर्याचवेळा ट्रेडर्स (आणि इन्व्हेस्टर्स सुद्धा) आपल्या स्ट्रेटेजीवर (इन्व्हेस्टर असाल तर व्हॅल्यूएशन मॉडेलवर) इतके कॉन्फिडन्ट असतात की, त्यांना सिद्ध करायचे असते (बर्याच वेळेला स्वतःचे स्वतःलाच) की "आय एम राईट" (उदा. फंडामेंटली याच्या खाली वा याच्या वर स्टॉक प्राईज जाउच शकणार नाही. पण बाजार हा बाजार असतो, तुम्ही गृहीत धरलेले पॅरामिटर्स - मार्जिन, रेव्ह्यून ग्रोथ, रिटर्न्स ऑन कॅपिटल आणि समुहाने "कळत नकळत डिस्कव्हर केलेले" पॅरामिटर्स यात तफावत असते) आणि नेमकी त्याच वेळी मोठी बेट माती खाते आणि आतापर्यंतचा छोट्या छोट्या ट्रेड्सने झालेला सगळा नफा एक मोठ्या बेट्सच्या नुकसानीने मोठ्या फरकाने कमी होतो. त्यामुळे या लेखकाचा "बाजारात अक्षरशः काहीही होऊ शकते, स्वत:ला बरोबर सिद्ध करण्यासाठी ट्रेडींग नका करू, तर बाजाराच्या पर्यायाने समुहाच्या मानसिकतेबरोबर एकरूप व्हायला शिका" हा मूलमंत्र लक्षात घेतला तर खास करून ओव्हर कॉन्फीडन्स बायस थोड्याफार प्रमाणात कमी होऊ शकतो.
मला स्वतःला असे वाटते की, अॅनालिस्ट म्हणून तुमची मानसिकता नेमकी याच्या उलट असायला हवी. कारण समूह कुठे चुकला आहे (कन्सेन्सस एस्टीमेट्स) आणि ओव्हर द पिरिअड ते कसे अॅडजस्ट होतील हे अगोदरच ओळखता यायला हवे (समुहाने गृहीत धरलेल्या मार्जिन/ग्रोथ/आरओसीई पेक्षा माझे एस्टीमेट कमी वा जास्त आहेत इ.). आणि जरी तुम्ही बरोबर असलात तरी समुहाला थोडा वेळ द्यावा लागतो. तुम्हाला ट्रेडर + अॅनालिस्ट या दोनही परस्पर विरोधी मानसिकता घडवाव्या लागतात.
पुढील भागांची उस्तुकता.
सुधीर जी धन्यवाद
सुधीर जी ट्रेडिंग इन द झोन हे पुस्तक वाचलेले आहे. हे सुंदर पुस्तक आहे पण फार जास्त तात्विक आहे. तुम्ही वाचले नसल्यास मार्केट विझार्ड्स ची सिरीज
अप्रतिम आहे एकदा जरूर वाचावी. आणि पूर्ण सिरीज वाचण्याचा कंटाळा असेल तर त्याचे एक त्याचे एक सुंदर समरी पुस्तक सुद्धा आहे. ते पण फारच सुंदर आहे.The Little Book of Market Wizards: Lessons from the Greatest Traders
.
कुतूहल म्हणून प्रश्न: हे सगळं करून ‘अतिरिक्त’ फायदा किती होतो? म्हणजे ‘राष्ट्रीयीकृत बँकेत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जितके टक्के मिळतात तितके’ हा निष्क्रिय माणसाचा बेंचमार्क धरला तर समजा दहापंधरा वर्षं सातत्याने ट्रेडिंग करत राहून, चुकांतून शिकून, ट्रेडिंग फीज, ट्रेनिंग कोर्सेस आणि पुस्तकांवरचा खर्च हे सगळं हिशेबात धरून बेंचमार्कपेक्षा सरासरी किती जास्त मिळतात? वेळेची किंमत हिशेबात धरा असं म्हणत नाही, कारण ती मोजणं अवघड आहे.
---
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
मिनिमम सांगू शकतो मॅक्सिमम ला मर्यादा नाही.
जयदीप जी या प्रश्नाचे अचूक उत्तर देणे फारच अवघड आहे. कारण हे व्यक्ती सापेक्ष आहे. आणि अनेक घटक जसे उमेदवाराचे सातत्य, बाजार स्तर इत्यादी. तरी एक कल्पना यावी म्हणून सांगतो. एसबीआयच्या फिक्स डिपॉझिट चा व्याजदर साधारण सात टक्के वार्षिक इतका आहे. जर नव्या ट्रेडरने राज मार्गाने चालत काम केले तर. समजा आज पासून सुरुवात केली तर पहिल्या दोन वर्षात त्याने किमान पस्तीस टक्के परतावा मिळवण्यास काहीच अडचण नाही. हा एव्हरेस्ट बेस कॅम्प आहे. हा जर तो करू शकत नसेल तर त्याच्या मुद्दलातच गडबड आहे म्हणजे मेथड मनी मॅनेजमेंट आणि माइंड सेट या तीन पैकी एक किंवा अधिक घटकावर त्याने परिश्रम वाढवणे गरजेचे आहे. आता ट्रेडर एकदा मार्गी लागल्यानंतर वरती चढण्यासाठी कशाचीच मर्यादा नाही हे अक्षरशः खर आहे. वर किती जाणार याला मर्यादा नाही आणि ते सांगणे अशक्य आहे. आणि माझे प्रामाणिक मत आहे इतके मिनिमम जर साध्य होत नसेल तर बाजाराचा नाद सोडून द्यावा तो तुमच्यासाठी नाही. तुम्ही दहा-पंधरा वर्षे म्हणतात. समजा फुल टाइम ट्रेडर् आहात गृहीत धरले तर तुम्ही मोठी संपत्ती नक्कीच निर्माण करू शकतात.
बेंचमार्क
बेंचमार्क म्हणून बँकेतील एफडी न पकडता लार्ज कॅप इक्विटी मार्केटमधली दहा वर्षाची पॅसीव्ह इन्वेस्टमेंट धरायला हरकत नाही (निफ्टी इटीएफ १० वर्षासाठी खरेदी केले असे समजू). निफ्टीचे १० वर्षाचे (२०००- ते आता पर्यंत) मिन आणि मिडिअन रिटर्न्स माझ्या आकडेमोडीनुसार साधारण १२.६% च्या आसपास आहे.
दहा वर्षे हा तसा दीर्घ कालावधी आहे पण रिस्क एक किंवा पाच वर्षापेक्षा गुंतवणूकीच्या कालावधीपेक्षा कमी आहे. (स्टॅन्डर्ड डिव्हिएशन दहा वर्षासाठी ३.७% इतके कमी आहे तर ५ वर्षासाठी ८.७% आणि एक वर्षासाठी ते २५.४% इतके जास्त आहे)
३५% खूपच अॅट्रॅक्टीव्ह रिटर्न्स झाले. म्हणजे पोर्टफोलिओ जवळजवळ २.५ वर्षात दामदुप्पट होत राहील. म्हणजे १० वर्षात जवळ जवळ २० पट (१ लाखाचे २० लाख होतील) होतील. पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंटचे ९-मे-२००३ ते ९-मे-२०१३ या कालावधितले रिटर्न्स सगळ्यात जास्त म्हणजे दसादशे २०.५% आहेत म्हणजे जवळजवळ १० वर्षात ९ पट झाले होते. पण तो एक बेस्ट केस सिनारिओ आहे आणि वर्स्ट केस ३.८% (२३-मार्च-२०१० ते २३-मार्च-२०२०) आहेत. पण आपण मिन आणि मिडिअन ( १२.६%) धरू. (यूस मध्ये राहत असाल तर हीच आकडेमोड एस&पी५०० आणि डावजोन्स वर करता येईल).
मी ट्रेडींगकडे केवळ अल्फा जनरेट करण्याच्या उद्देशाने बघतोय. मेन ॲक्टीव्ह पोर्टफोलिओला बुस्ट म्हणून. म्हणजे पॅसिव्ह इन्वेस्टमें पेक्षा काही जास्त टक्के परतावा.
पुस्तकाबद्धल धन्यवाद. आताच ती दोनही (नोट्स + मूळ पुस्तक ) पुस्तक ऑडीबल वर घेतली आहेत. ऐकून झाल्यावर किंडलवर पण घेईन.
खालची इमेज न दिसल्य्यास ही लिंक पहा- https://photos.app.goo.gl/tgMMBNiJoQL93PnN9
.
The Little Book of Market Wizards: Lessons from the Greatest Traders
ऑडीओ बुक संपवले. आवडले. बरेचसे अनुभवाचे बोल आहेत. या पुस्तकाची किंडल व्हर्जनही घेतले आहे. मूळ पुस्तकाचे ऑडीओ बुक्स ऐकताना Little Book चे किंडल उपयोगी पडेल.
गुंतवणूकदार म्हणून तुमची स्ट्रेटेजी खूप वेगळी असते. एनीवे गुंतवणूकदार म्हणून हेजिंग करताना या पुस्तकाचा उपयोग होईल अशी आशा आहे.
पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंटचे ९-मे-२००३ ते ९-मे-२०१३ या कालावधितले रिटर्न्स सगळ्यात जास्त म्हणजे दसादशे २०.५% आहेत म्हणजे जवळजवळ १० वर्षात +५ पट झाले होते.
पस्तीस टक्के आकर्षकच आहे
तुमची कैलक्युलेशन्स अगदी बरोबर आहेत. आणि माझ्या मते मी ट्रेडिंग कडे इतक्या किमान परताव्याच्या अपेक्षेने बघतो. म्हणजे माझे ठाम मत आहे की जर आपण इतका मिनिमम परतावा नाही काढू शकलो तर काय अर्थ आहे म्हणजे मग इतका खटाटोप तरी का करावा बाबा ? तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करता तुम्ही स्टॉक माक मध्ये बॅक टेस्टिंग करून बघितलेच असेल साध्या इंट्राडे ऑप्शन सेलच्या iron Condor चा बॅग टेस्टेड रिपोर्ट सहा सात वर्षाचा सहज 35 च्या वर रिटर्न देतोस की. अर्थात गेल्या दोन वर्षात ऑप्शन सेलिंग चे डायनामिक्स फार मूलभूत बदललेले आहेत त्यामुळे त्या जुन्या स्ट्रॅटेजीज तो परतावा आता व्हॅलेटीलिटी वाढल्यामुळे देत नाही. तरी अर्थातच त्यात मोठा वाव आहे अजुनही. तुम्ही स्वतः stokmock वर बॅकटेस्ट काढू शकतता. आता तर ऑप्शन बाईंग च्य सुद्धा सिस्टम स्ट्रॅटजी चांगल्या डेव्हलप केलेले आहेत. ज्यात गुंतवणूक कमी सुरक्षा जास्त आणि भक्कम परतावा. मात्र त्यांचा रेस्क्रीवाड मोठा असतो आणि ॲक्युरसी रेट कमी त्यामुळे खेळाडू चा माईंड सेट भक्कम लागतो नसतं तो लॉजिकल कन्क्लूजन पर्यंत त्या नेऊ शकत नाही आणि जर आपण इतकी मेहनत घेतो आहे तर जास्तच हवा ना. नाहीतर स्मॉल केस किंवा आपल्या गोविंद झवर किंवा kirubakaran सारख्यांच्या पॅसिव्ह स्ट्रॅटेजीज आहेतच की पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतः निर्मिती करण्यात तो आनंद आहे तो वेगळाच नाही का ? तसं तर आपण एक एकट्या ट्रेडर बद्दल बोलतोय पण काही दिवसांपूर्वीची जीन्स ट्रीट कॅपिटल ची न्यूज तुम्ही बघितली का ? ज्यांनी भारतीय मार्केटमध्ये खेळून अर्थात बँक निफ्टी च्या स्ट्रॅटेजीतून वन बिलियन चा कार्यक्रम एका वर्षात केला. अर्थात 90% रिटेल ट्रेडर लॉस मध्ये आहेत हा भाग एक वेगळा विषय म्हणजे आपण सर्व रीटेल ट्रेडर विषयी बोलत आहोत आणि ते फ्युचर ऑप्शन सेगमेंट मध्ये 90% लॉस मध्ये आहेत हा एक वेगळा विषय आहेhttps://www.angelone.in/blog/jane-street-and-millenniums-legal-fight-ove...
.
लिटिल बुक ऑन मार्केट विझार्ड नंतर मी मूळ पुस्तक मार्केट विझार्ड ऐकायला घेतले. तेही मला चांगले वाटते आहे. यात ट्रेडर्सच्या फक्त मुलाखती आहेत. खास करून १९७० च्या दशकात जेव्हा पर्सनल कॉम्पुटर्स वापरात नव्हते, करन्सी फ्युचर्स नुकतेच चालू झाले होते, तेव्हाच्या या फ्लोअर ट्रेडर्स च्या मुलाखती ऐकण्यासारख्या आहेत.
या लेखकाने अर्थात हे स्पष्ट केले आहे की आपल्या स्वाभाविक प्रकृतीला जे योग्य वाटेल ती स्ट्रेटेजी निवडावी. उदा. फंडामेंटल वा टेक्निकल वा दोघांचे कॉम्बिनेशन्स. इव्हेस्टमेंट वा ट्रेडींग टाईम हॉरिजॉन बद्धलही लेखकाला वावडे नाही. त्यामुळे यात एक मुलाखत वॉरेन बफेट वा चार्ली मंगरची पण असायला हवी होती असे वाटून गेले. कारण या दोघांनी बर्कशायर च्या पोर्टफोलिओमध्ये कुठले स्टॉक्स घेतले होते. दरवर्षी त्याचे रिटर्न्स किती होते ते आजही वाचक अॅन्युअल रिपोर्टस मधून पाहू शकतात. या दोघांची स्ट्रॅटेजी त्या मानाने समजायला फारच सोपी आहे. (अर्थात फक्त समजायला. योग्य स्टॉकची निवड अर्थात हि त्यांची खासियत होती). कदाचित ते इन्वेस्टर्स आहेत, ट्रेडर्स नाहीत म्हणून त्यांच्या मुलाखती या पुस्तकात नसाव्यात.
या पुस्तकाच्या प्रोलॉग मध्येच लेखकाने एक प्रश्न विचारला आहे की, मार्केट बिट करणे खरेच शक्य आहे का? कारण हा प्रश्न प्रॅक्टिश्नर्स आणि अॅकॅडमिशिअन्स नेहमीच विचारत आले आहेत. एफिशिअंट मार्केट हायपोथेसीस नुसार विक फॉर्म मध्ये टेक्निकल अॅनालिसिस फारसे उपयोगी पडत नाही. सेमी स्ट्राँग मध्ये फंडामेंटल उपयोगी पडत नाही. आणि हायली एफिशिअंट मार्केट मध्ये खाजगी माहिती पण उपयोगी पडत नाही. पण ही सगळी "थिअरी" झाली (आणि ती आपल्या परीने बरोबर आहे). पण बफेट, मंगर सारखे विझार्ड वा या लेखकाने मुलाखती घेतलेले महानुभाव त्याला नक्कीच अपवाद आहेत. अजून एक मुद्दा मला या लेखकाचा आवडला तो म्हणजे लेखकाने या सर्वांची तुलना मॅरेथॉन मध्ये धावणार्या प्रोफेशनल अॅथलिट्स बरोबर केलेली आहे. पहिले म्हणजे मॅरेथॉन मध्ये धावण्याइतपत तयारी असणे हे एक झाले आणि त्यानंतर तो अॅथलेटसारखा प्रोफेशनलिझम येणे ही दुसरी पायरी आहे. कारण प्रोफेशनल अॅथलेट्सचे प्रमाण खूप कमी असते. आणि त्यासाठी या मुलाखती आहेत.
आजकाल अल्गोट्रेड वा मशिन लर्निंग पण या क्षेत्रात हातपाय रोवते आहे. अजूनतरी हा प्रांत काही मोजक्या फंड मॅनेजर पुरता मर्यादित आहे. काही महिन्यांपूर्वी मी "Advances in Financial Machine Learning" हे पुस्तक ऐकले होते. यात बराचसा भाग गणित आणि पायथन प्रोग्रामिंगशी निगडीत होता. मला फारकाही कळले नाही. कळले ते इतकेच की, मशिन लर्निंगसाठी १) थोडफार स्टॅटीस्टीक्स आणि गणित याची जुजबी ओळख हवी २) पायथन प्रोग्रामिंग यायला हवे. ३) आणि हे पहिले दोन जरी आले तरी सध्यातरी मोडेल टेस्ट करण्यासाठी, ट्रेन करण्यासाठी तुम्हाला महागडी कंम्पुटींग पावर (क्लाउडवर वा स्वत:ची) पाहिजे. जे कदाचित मल्टीमिलिअन डॉलर्स चा पोर्टफोलिओ सांभाळणार्याला शक्य आहे.
पायथन शिकायला काहीच हरकत नाही म्हणून गेल्या महिन्यात पायथन शिकलो. सीएफए इन्स्टिट्यूटचा एक कोर्स फुकट होता. इन्स्ट्रक्टरने प्रॅक्टीकल ओरिएटेंड खूप चांगले शिकविले. खास करून माँटे कार्लो सिम्युलेशन कसे करता येईल याचा बेसिक कोड करवून घेतला. उदा तुमच्या कडे गुंतवण्याजोगे शॉर्ट लिस्टेड १० स्टॉक्स (सेक्युरिटीज वा ॲसेटक्लासेस) आहेत. तर कुठल्या स्टॉक्स मध्ये किती पैसे गुंतवले (ऑप्टीमल वेट फॉर इच स्टॉक) तर दिलेल्या रिस्क मध्ये जास्तीत जास्त रिटर्न्स येतील? थोडक्यात हायेस्ट शार्प रेशो वाला पोर्टफोलिओ कसा शोधायचा याचा हा कोड आहे. अर्थात बेसिक म्हणजे पास्ट परफॉर्मन्स वरून हे केले आहे. हा कोड इथे पाहता येईल. (डाउनलोड करून ब्राउझर मध्ये ओपन करावा लागेल.)
मी अजून एक कोड बनवून घेतला, अर्थात चॅट जीपीटी कडून. निफ्टीचे गेल्या १० वर्षाचे रिटर्न्स कसे आहेत ते मोजण्यासाठी. कारण शेवटी त्यालाच बीट करायचे आहे. निफ्टी एवजी एस अॅण्ड पी ५०० वा डावजोन्सचे आकडे टाकून खूप चांगली माहिती मिळेल खास करून १९२० मध्ये ग्रेट डिप्रेशन्स मध्ये रिटर्न्स कसे होते याचे ग्राफीकल रिप्रेझेंटेशन्स कळेल. हा कोड इथे. (डाउनलोड करून ब्राउझर मध्ये ओपन करावा लागेल.)
या कोडने दिलेले ग्राफ्स निफ्टीचे २००० पासूनचे रिटर्न्स. (जमले एकदाचे फोटो चढविणे)
कोड (ज्युपिटर नोटबुक) आणि सीएसव्ही फाईल्स इथे.