बाजारगप्पा-भाग-३

मागील दोन्ही भाग वाचला नसेल तर विनंती आहे की पहील्या भागापासुन वाचुन घ्या नाहीतर काहीच कळणार नाही. तर मागील भागात आपण एक मनी मॅनेजमेंट कशी करावी ते बघितले त्यालाच आता पुढे नेऊन जाऊ. तर मागे म्हणालो तसे मनी मॅनेजमेंट आणि माइंडसेट हे क्लोजली इन्टरकनेक्टेड आहेत. जसे शरीर आणि मन. पण शरीर समजा मनी मॅनेजमेंट आहे आणि माइंडसेट मन च आहे की. तर तुम्ही बघा सुरुवात शरीराकडुन करणे सोपे आहे तुम्ही आंघोळ केली तुमच्या मनाला फ्रेश वाटेल तुम्ही संभोग केला तुमच्या मनाला आनंद होइल. तर शरीराकडुन सुरुवात करत मनाला नियंत्रित करणे तुलनेने सोपे आहे. आणि दोन्ही एकच आहेत. शरीर हा मनाचा बाहेर व्यक्त झालेला स्थुल अविष्कार आहे मन हा शरीराचा आतला सुक्ष्म अविष्कार आहे. एक प्रयोग आहे तुम्ही तुमचे जेस्चर जर रागाचे केले म्हणजे मुठी आवळल्या रागाचा अभिनय केला तर आतील मन त्याला प्रतिसाद देऊ लागते तुम्ही खोटा शांततेचा अभिनय हळुवार हालचाली करु लागला श्वासाची गती हळुवार बोलणे हळुवार केले की मन ही शांत होत जाते.

१-स्थितप्रज्ञता हा ट्रेडींग च्या यशासाठी मुलभुत आवश्यक घटक आहे. ही साध्य करण्यासाठी तुम्हाला मनी मॅनेजमेंट मदत करते.

आता मागील भागात आपण बघितले की तुम्ही एक तुमच्या भांडवलाच्या १०% रक्कम मॅक्स लॉस म्हणुन अगोदरच मान्य केलेली आहे ( एक रक्कम पुर्ण पाण्यात गेली हे तर मान्य करुनच पुढे जावे लागेल तुम्ही शुन्य रीस्क म्हणाल तर ते अशक्य आहे.) आता आपल्या नियंत्रणात किती तरी गोष्टी आल्यात बघा.

अ-

तुम्ही अगोदर एक रक्कम ठरवा जी तुम्हाला पुर्णपणे संपली तरी तुमच्या मनावर एक ओरखडा ही उमटणार नाही तुम्ही अजिबात विचलीत होणार नाही. किंबुहना तुम्ही ठरवलेलेच आहे की इतकी रक्कम मी स्वाहा करणारच आहे. हे विचित्र वाटेल मला मान्य आहे तुम्ही म्हणाल अरे बाबा आम्ही तर दोन पैसे कमवण्यासाठी आलोय आणि हे काय ? थोडा धीर धरुन एकदा समजुन घ्या हा खुप विलक्षण असा खेळ आहे. तर तुम्ही अगोदर मॅक्स लॉस ची रक्कम निश्चीत करा उदा. मागील भागात आपण ३०,००० ही रक्कम निश्चित केली. त्यावरुन आपले भांडवल ३ लाख ठरले . आता तुम्ही समजा ३०,००० मध्ये तयार नाहीत १०,०००/- च तुम्ही पाण्यात टाकु शकतात तर मग तुमचे भांडवल १ लाख ठरेल. तर मुळ मॅक्स लॉस तुम्ही ठरला आपले उदाहरण ३०,००० धरुन चालत आहे हे लक्षात ठेवा.

ब-

दोन डेटा सर्वत्र उपलब्ध आहेत एक १० पैकी ९ फ्युचर ऑपश्न ट्रेडर लॉस करतात त्यातही खर्च वगैरे चा हिशोब लावला तर जवळ जवळ ९५% लॉस करतात केवळ ५% विजेता आहेत. दुसरा डेटा सांगतो की हा महत्वाचा आहे. ९०% ट्रेडर्स पहील्या ९० दिवसात आपले ९०% भांडवल गमावतात हे स्टॅडर्ड आहे. तर इथे सर्व्हायव्हल हे खुप म्हणजे खुपच मुलभुत आहे. तर आता तुम्ही नविन ट्रेडर आहात तर हे माहीत असणे याची जाणीव तुम्हास असणे हे फारच महत्वाचे आहे. आता अजुन एक डेटा आहे जो म्हणतो की तुम्ही जर आजपासुन सुरुवात केली आणि तुमचे भांडवल न गमावता पुढील १ वर्ष नुसते टिकुन राहीलात असे समजा ना नफा ना तोटा तत्वावर तर तुम्ही आता ५% च्या महाजनांच्या क्लब चे सदस्य झालेले आहात. आणि तुम्ही पुढे भविष्यात एक उज्वल यश मिळवण्याची शक्यता कैक पटीने वाढलेली आहे. याचे कारण तुम्ही पहीला सर्व्हायव्हल चा सर्वात अवघड असा टप्पा फेज पार केलेला आहे पुढील बेस बिल्डींग आणि डेव्हलपमेंट तर आनंद यात्रा आहे. हे अशासाठी की एक सलग वर्षे तुम्ही जेव्हा मल्टीपल ट्रेड्स घेऊनही स्वतःचा लॉस नियंत्रणात ठेवलेला आहे तर दोन गोष्टी घडलेल्या आहेत

१-

तुम्ही तुमचा ट्रेडींगच्या यशासाठी आवश्यक असा जो माइंडसेट आणि मनी मॅनेजमेंट सिद्ध करुन दाखवलेला आहे. इथे जितके जास्त ट्रेड्स घेतलेले असतील तितके साध्य झाले असे मानले जाईल. (म्हणजे वर्षभरात एकच ट्रेड घेतला असे नाही भावांनो तर जास्तीत जास्त ) तुम्ही अनेक वेळा शेरके मुह मे हात डालके वापस बाहर आये हो. किंवा नवाज म्हणतो तसा मौत को टच करके आया.

२-
सर्वात महत्वाचे तुमची मेथड सिद्ध झालेली आहे तिला आवश्यक तो सराव मिळुन झालेला आहे , त्यात आवश्यक त्या सर्व प्रकारच्या वेड्या वाकड्या चुका करुन झालेल्या आहेत, त्या सुधारण्यात आलेल्या आहेत, तुम्ही एक मार्केट चा दिर्घ असा प्रत्यक्ष अनुभव वेगवेगळ्या फेजेसचा बर्यापैकी घेऊन झालेला आहे. तुम्ही बाह्य अवलंबित्व कमी केलेले आहे. तुम्ही माहीतीच्या चक्रिवादळात स्वतःला सावरुन दाखवलेले आहे, जे तुम्हाला आज फाऱ शुद्र वाटु शकते पण जी खुप महत्वाची अशी अ‍ॅचीव्हमेंट आहे. म्हणजे तुम्ही नुसते जगला आहात तग धरुन आहात हेच फार मोठे यश आहे. हाच पाया तुम्हाला पुढे नेइल. विश्वास ठेवा हे दुर्मिळ यश आहे.

२-या दिलेल्या मनी मॅनेजमेंटची वैशिष्ट्ये व ही कसे काम करेल या संदर्भात खाली मुद्दे मांडतो.

१-

सर्वप्रथम एक महाजनांनी केलेला मुलभुत प्रयोग आहे. ज्यात १ मिलीयन म्हणजे १० लाख रॅन्डम नंबर्स जनरेट करण्यात आली. ही केवळ १ आणि २ हे दोनच आकडे होते. आता इथे एक स्ट्रीक नावाची संकल्पना समजुन घ्या जेव्हा तुम्ही ट्रेड्स घेतात सायकल बाय सायकल ( १० ट्रेड ची १ सायकल ) तेव्हा दोनच परीणाम संभवतात एक प्रॉफीट एक लॉस तर तुम्ही तुमचा १०० ट्रेड घेऊन तो डेटा तपासला तर तुम्हाला त्यात कधी कधी सलग लॉसेस ची एक साखळी दिसेल म्हणजे काही वेळा सलग ७ वेळा लॉस झाला मग पुन्हा प्रॉफीट झाला मग काही काळाने सलग ४ लॉस झाले असेच सेम प्रॉफीट च्या बाबतीत सुद्धा होत असते. तर ही सलग प्रॉफीट लॉस ची साखळी आहे तिला विनींग स्ट्रीक किंवा लुजींग स्ट्रीक असे म्हणतात. हा घटक खुप महत्वाचा आहे. तर वरील प्रयोगात रॅन्डम १० लाख नंबर्स जनरेट करण्यात आले.त्यात असे आढळले की समजा १ आकडा सलग किती वेळा आला किंवा २ आकडा सलग किती वेळा आला म्हणजे स्ट्रीक्स किती होत्या तर खालील आकडे आलेत.लक्षात घ्या १० लाख डेटा आहे त्यातही

अ- सलग ७ ही स्ट्रीक अनेक वेळा आली याला खात्रीशीर येणारच असे म्हणु
ब- सलग १० ही स्ट्रीक संभाव्य highly likely to be experienced
क-सलग १३ ही स्ट्रीक दुर्मिळ क्वचितच वेळा
ड- सलग २० ही अशक्य

आता हा परीणाम अगदी टॉस उडवुन १० लाख केल्यानंतरचा होता असे समजा. आता हा मुळ बेस धरुन आपण आपल्या स्ट्रॅटेजीसाठी वरील मनी मॅनेजमंट वापरतोय.

२-

आता वरील प्रमाणॅ ( इथे माइंडसेट किती भक्कम बनतोय बघा ) आपण सुरुवातीला रोज सकाळी स्वतःला बजावणार आणि अगोदरच मान्य करणार आणि स्वतःला सेल्फ अ‍ॅफरमेशनवाली पॉजिटीव्ह मंड्ळी किंवा स्व सुचना वाले जशी कॅसेट वाजवत असतात तशी आपण वाजवणार की मला ७ लॉस सलग ७ लॉस तर होणारच आहेत आणि मग आपण ट्रेडींगला बसणार. तर याचा बंदोबस्त तर आपण केलेलाच आहे हे करुन ही आपण गेम च्या बाहेर जाणार नाहीच. थोडे गणित लावा थोडा ताण द्या
पुढच्या भागात अजुन एक्स्प्लेन करतो एक कायम लक्षात ठेवा आपला रीक्स रीवॉड रेशो १:२ आहे. हा begin with the end in mind अ‍ॅप्रोच आहे.

field_vote: 
0
No votes yet