बाजारगप्पा-भाग-४

३-

आता बघा सर्वात अगोदर आपली मॅक्स लॉस अमाऊंट जी आहे ती पुर्णपणे आपल्याला अंतिमतः सहन करता येइल अशी आपण घेत आहोत. आणि त्या मॅक्स लॉस पर्यंत पोहोचणंच च आपण फार लांबवत आहोत. कारण की आपण भाग २ मधील तक्ता बघा ज्या न्युट्रल स्टेज ला आपण सुरुवात करतो तिथे आपले एकुण नंबर ऑफ ट्रेडस ३० आहेत. म्हणजे त्याचा रिस्क पर ट्रेड १००० रुपये आहे.आणि रीस्क पर ट्रेड इन % जी आहे ती ०.३३% इतकी आहे. आता याचा मॅक्सीमम इम्पॉसीबल लॉस स्ट्रीक शी संबध लावा ती होती सलग २० ट्रेड्स मध्ये लॉस ( जो येण्याची शक्यता १० लाख ट्रेड मध्ये सुद्धा अगदी रॅन्डम मध्ये ही नाही ) तर तुम्ही तुमच्या मॅक्स लॉस अमाउंट ला इथे तर २० हुन ही अधिक सरळ ३० मध्ये विभागत आहात. तर आता तुमचा रीस्क पर ट्रेड % हा आदर्श अशा २० ट्रेड च्या हिशोबाने तर ०.५०% इतका असायला हवा आणि आपण तर आता या थीम चा वापर करुन दोन नविन गोष्टी करत आहोत.

अ-

आपण तो २० हुन जास्त ३० ट्रेड गृहीत धरुन करत आहोत की ज्याची शक्यता अजुनही अशक्याहुनी अशक्य किंवा दुर्मिळ म्हणा हव तर अशी आहे.

ब-

सर्वात सुक्ष्म बाब बघा ती अशी की आपली सिस्टीम रीजीड नाहीच. तो तक्ता तुम्ही जेव्हा प्रगती जसजशी कराल तसतशी तुमची रीस्क पर ट्रेड वाढवायला मुभा देइल त्या उलट तुम्ही जसजसा लॉस कराल तसतशी ती तुमच्या रीस्क पर ट्रेड ला घटवत जाईल. दर दहा ट्रेड नंतर तुम्ही आढावा घेणार आणि त्याप्रमाणे रीस्क घेणार. हे फार वस्तुनिष्ठतेने करण्यास ही मनी मॅनेजमेंट तुम्हास मदत करेल.

क-

आता मी ही प्रत्यक्ष असेच वापरुन केलेले आहे तेच तुम्हास सांगतो आहे यात अजुन एक गंमत आहे. ती अशी की आपण जो स्टॉप लॉस लावतो तो दोन प्रकारे लावता येत असतो एक फिक्स्ड पर्सेंट वर जसे की मी ठरवले प्रत्येक ट्रेड मध्ये १ पर्सेंट लॉस घेणार तर १०० ला स्टॉक बाय केला की मी समजा ९९ वर लावणार इ. तर हा प्रकार रीजीड असतो मार्केट ला तुमच्या पर्सेंट शी काही देणे घेणे नसते कधीच. दुसरी रीत की ज्यात आपण आपल्या प्राइस अ‍ॅक्शन नुसार की अमुक एका पातळीखाली जर गेला की त्यात काही थांबायचे नाही असे ठरवुन ते फिक्स नसते स्टृटेजी गणिक वेगळे असते तर या प्रकारात आपण आपली क्वान्टॅटी अ‍ॅडजस्ट करत असतो. उदा. आपला १००० लॉस पर ट्रेड ठरलेला आहे तर आणि आपले बाय १०० वर आहे आणि आपल्या मते ७५ वर स्टॉप लॉस लावणे योग्य आहे तर आपला स्टॉप लॉस पॉइन्ट्स झाले २५ तर आपण १००० भागिले २५ करुन ४० च स्टॉक बाय करणार समजा दुसरा एक स्टॉक आहे त्यात स्टॉप लॉस पॉइन्ट्स १०० आले तर आपण १० च स्टॉक बाय करणार असे करुन रीस्क पर ट्रेड आपण १००० च मेन्टॅन करणार . तर आता गंमत अशी आहे की ही लवचिकता तर तुम्हाला मिळालीच पण यामुळे होते काय की काही स्टॉक किंमतीनुसार तुम्हाला २०००० भांडवल लागते काहीत १०००० लागते काहीत ३५०००० लागते. म्हणजे पुर्ण ३ लाख भांडवल गुंतवले तरी पुर्ण ३० ट्रेड एकाच वेळेस मार्केट मध्ये जातच नाहीत फार तर १५ ते १८ पर्यंतच ट्रेड घेऊन तुमचे पुर्ण भांडवल ३ लाख गुंतुन जाईल. याचा फायदा असा होतो की आज सारखे फार निगेटीव्ह मार्केट आले तरी तुमचे जरी पुर्ण भांडवल "आत" असले तरी तुमची फुल रीस्क ३०,००० आत नसते हे खुप उत्तम रीत्या एक संरक्षण देते.

४- आता माईडसेट चे मुद्दे आणि याचा संबध बघा ट्रेडींग मध्ये अनेक प्रकारचे माइंड टृएप आहेत त्यातले तीन बघु
अ-
तुम्ही अगदी प्राथमिक ट्रेड्स घेतली असतील तर तुम्हाला नक्कीच अनुभव आला असेल की तुम्ही नवखे असाल तर हमखास दोन गोष्टी करतात एक जेव्हा तुम्हाला लॉस होतो तेव्हा तुम्ही ट्रेड मधुन वेळीच एक्झीट न मारता त्यात बसुन राहतात समजा १०० रु. लॉस झाला तुमच्या मेथड प्रमाणे आणि तिथुन तुम्ही निघाले पाहीजे पण ते न करता तुम्ही होप गेम्स खेळत बसतात. तुम्ही जर तुमचा स्टॉक लॉस मधे गेलेला असेल तर इंटरनेट वरुन बरोबर तेच व्हिडीयो तेच रीपोर्ट तीच माहीती आणि तोच डेटा निवडुन निवडुन घेणार की जो सांगेल की आता हा स्टॉक वर जाणार आहे. ही एक स्वतःची शुद्द फसवणुक असते कॉग्नीटीव्ह डिसोनन्स असतो बरेच काही असते की ज्याने तुम्ही तो मूळ १०० वर लॉस बुक करुन बाहेर पडायला हवे होते त्या ऐवजी तुम्ही ५०० वर तो लॉस नेऊन ठेवतात. हा ग्रीड चा लोभाचा परीणाम असतो. फीअर नव्हे याला खुप जण फिअर समजतात. तर दुसरा जो असतो त्यात तुम्हाला प्रॉफीट होतो १० रुपये तुम्ही छान स्टॉक निवडलेला असतो अगदी सर्व बरोबर जमलेले असते. आणि तुम्हाला माहीत असतं की यात आपल्याला किमान १०० रुपये प्रॉफीट होणार पण तो १० चा फक्त ९ होतो थोडा खाली येतो आणि तो तुम्ही ९ मध्येच बुक करुन पळुन बाहेर येतात आणि सुटकेचा निश्वास टाकता. इथे फिअर ऑफ लुजींग काम करत असते. तर याने होते काय लॉस नेहमी मोठे मोठाले प्रॉफीट एकदम इटुकले पिटुकले जे आपल्या रीस्क रीवॉर्ड रेशो आठवा १:२ अगदी मिनीमम च्या तत्वाच्या अगदी विरोधी असे वर्तन असते. मग १० ट्रेड ची एक सायकल झाली तर त्यात नेट प्रॉफिट येण अर्थातच कधीच शक्य होत नाही. तर ट्रेड मे ठहराव हा ठहराव बहोत जरुरी होता है बाबु. जेव्हा तुम्ही वरील भरभक्कम मनी मॅनेजमेंट फॉलो करतात तेव्हा तुम्ही अगोदरच मॅक्स लॉस जो तुमच्या सहनशीलतेच्या आत आहे तो ठरवलेला आहे शिवाय तो बिंदु ही फारच लांबवलेला आहे. शिवाय १० लॉस तर तुम्ही अगोदरच व्हिज्युलाइज करुन स्वतःला बजावुन ठेवलेलेच आहेत तर आता तुम्ही लॉस मध्ये थांबणार नाही आणि प्रॉफिट मध्ये थांबणार म्हणजे ही तुम्हास मदत करेल.

ब-

दुसरा एक प्रसिद्ध प्रकार आहे बदला ट्रेडींग ज्यात एकदा लॉस झाला की नवा ट्रेडर संतापाने लालेलाल होतो. आणि पुनः पुनः जाउन मार्केट ला नडु लागतो. जिथे ट्रेड च नाही तिथुन लॉस रीकव्हर करायला पागल होतो. यात अर्थातच संतुलन ढळते एकदा का संतुलन ढळले की तुम्ही वस्तुनिष्ठ निर्णय घेण्याची सर्वात महत्वाची क्षमता गमावुन बसतात. मग तो त्याच्या मेथड ही द्रोह करुन जिथे एन्ट्री च्या कंडीशन्स च पुर्ण नाही झाल्या तिथे जाऊन एन्ट्री घेतो. यात एक सर्व्हे आहे तो असे सांगतो की जे लोक त्यांच्या एरवीच्या लौकीक जीवनात फार जास्त यशस्वी असतात ती मंडळी इथे बहुतांश वेळा ( नेहमीच नाही ) अपयशी होतात. कारण मार्केट चे मुलभुत अनिश्चततेचे व्यक्तिनिरपेक्ष तत्व न समजुन न स्वीकार करता ते मार्केट ला एका माणसा सारखे शत्रु सारखे समजुन ट्रेड करु लागतात. तर असो वरील मनी मॅनेजमेंट उघड आहे तुमच्यात निर्भयता आणि प्रेमभाव उत्पन्न करेल आणि तुम्ही रीव्हेन्ज ट्रेडींग पासुन दुर राहाल. आता च्यामारी प्रेमभाव कसा तर तो असा की जेव्हा तुम्ही मनी मनेज्मेंट लावुन ठेवलेली आहे आणि मांइड्सेट नियंत्रणात आला तर आता उरते ती केवळ आनंदयात्रा. म्हणजे आता तुम्हाला एक रंजक सुंदर खेळ जो की गेसवर्क अधिकाधिक लॉजिकली अधिकाधिक अचुकतेने करणे आणी प्रॉबेबिलीटी वर ट्रेड घेणे प्रॉफिट चा आनंद घेणे लॉस व्यवस्थित बुक करुन स्वतःच्या पाठीवर डीसीप्लीन च्या कौतुकाची थाप मारणे आणि पुढील ट्रेड च्या अनालिसीस करुन बालसुलभ आनंद आणि उत्सुकतेने मार्केट च्या प्रतिसादाची वाट बघणे .....

क-

तिसरा प्रकार असतो एकदा जो पर्यंत आपण ट्रेड मध्ये प्रत्यक्ष घुसत नाही आणि आपला स्वकष्टार्जित पैसा त्यात लावत नाही तोपर्यंतच केवळ आपली वस्तुनिष्ठता अबाधित असते. ज्या क्षणी आपण ट्रेड घेतला " आत " गेलो की आपण एकता कपुर च्या सीरीयल मधले भावुक पात्र होउन जातो. सर्व आणाभाका विसरुन आपण भावनेच्या भावसागरात हिंदोळे घेऊ लागतो. मार्केट ही एक सतत हलणारी चीज आहे तुम्ही जेव्हा अविचल व्हाल तेव्हाच तुम्ही तिला जिंकु शकाल तुम्ही ही अस्थिर झाला की संपलेच सर्व. तर वरील मनी मॉनेजमेंट तुमच्या अस्थिरतेला नियंत्रीत करण्यास मदत करते.

एक महत्वाचा खुलासा वरील मनी मॅनेजमेंट जणु जादुची छडी आहे आणि तुमच्या सर्व विकारंवर ती नियंत्रण मिळवेल असा दावा मी करत नसुन " मदत" नक्की करेल असे मी सुचवत आहे हे कृपया लक्षात घ्यावे.

चांगला ट्रेडर होणे हा चांगला योगी होण्या सारखा प्रवास आहे. तुम्ही विकारांवर अधिकाधिक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत असतात. ते १०० टक्के कधीही साध्य होणार नाहीच गरजही नाही आपले उद्दीष्ट अधिकाधिक साध्य करणे हे आहे आणि ज्या ज्या बाबींनी होइल त्या त्या आपण वापरु.
दोन महाजनांची सुंदर उदाहरणे देतो एक आपण समजा फुटबॉल टीमचे मालक आहोत आणि लिमिटेड बजेट आपल्याकडे आहे तर आपल्याला खेळाडु निवडायचे आहे आणि चांगली टीम बनवायची आहे तर आपण काय करणार? आपण सर्वात महागडा सर्वात उत्तम प्रतीचा गोलकीपर आपल्या टीमसाठी निवडणार तो आपले गोल वाचवेल ही मनी मॅनेजमेंट आपला गोलकीपर आहे. एक्सलन्स तो धीरे धीरे पीछे आ ही जाएगा. दुसरे एक महाजनांचे उदाहरण आहे जे मला खुप आवडते. The Little Book of Market Wizards: Lessons from the Greatest Traders यात लेखक म्हणतो ट्रेड हे चार प्रकारचे असतात असो हे आपण पुढील भागात बघु ज्यात आपण माइड्सेट आणि मेथड बद्दल बोलु. काही मंडळीना मेथड वर न बोलता बाकी सर्व बोलणारा माणुस फ्रॉड वाटतो. तसेच मेथड सत्यम बाकी मिथ्या हे तर बहुसंखय नवख्यांना वाटत असते मला ही असेच्च वाटायचे आता नाही वाटत .तर आपण मेथड वर बोलुन घेऊ एकदा.

field_vote: 
0
No votes yet