ब्राह्मण समाजाने आता आरक्षणाची मागणी करावी!!!!
Taxonomy upgrade extras
सध्या भारतात नवीनच ट्रेंड आला आहे,ज्या जाती ,जातसमूह उच्च समजले जात होते त्यांनी आता आरक्षण मागायला सुरवात केली आहे.एकतर आरक्षण काढा नाहीतर आम्हालाही आरक्षण द्या अशी मागणी जोर धरु लागली आहे.सुदैवाने किंवा दुर्दैवाने आरक्षणाची कमाल मर्यादा ५०℅ आहे.त्यामुळे नवीन जातसमुहांना आरक्षण देणे अशक्य झाले आहे.
- Read more about ब्राह्मण समाजाने आता आरक्षणाची मागणी करावी!!!!
- 22 comments
- Log in or register to post comments
- 17090 views
सुटलेल्या पोटाची कहाणी (भाग २)
- Read more about सुटलेल्या पोटाची कहाणी (भाग २)
- 21 comments
- Log in or register to post comments
- 17230 views
मवाळ मुसल्मानांवरील नैतिक जबाबदारी: एक गद्य कविता
माझे दोन मुसल्मान मित्र आहेत एक बिन-दाढीवाला तुर्क पेट्रोल भरतो दुसरा दाढीवाला अरब मुन्सिपाल्टीत कारकून आहे त्याला दाढी असली तरी तो कविता वगैरे लिहितो म्हणजे तो मवाळच तर मी त्या दोघांस सज्जड दम भरला की आयसीस ने शिरच्छेद केलेल्या जाळलेल्या बोको हरामने गोळ्या घातलेल्या अल शबाब ने ठार केलेल्या सर्व विशेषतः गैर-मुसलमानांच्या हत्त्यांचा सतत निषेध करण्याची नैतिक जबाबदारी तुमची आहे यावर ते वाकून म्हणाले होय साहेब व न्यूयॉर्क मधल्या मोठ्या मशिदीसमोर उभे राहून हे चूक आहे हे चूक आहे असे म्हणू लागले त्यामुळे मुसलमान समाजाची धर्माची गरज नष्ट झाली तसेच मुसल्मान्नांमधील गरिबी , उपासमारी, बेकारी
- Read more about मवाळ मुसल्मानांवरील नैतिक जबाबदारी: एक गद्य कविता
- 90 comments
- Log in or register to post comments
- 50687 views
बोका : एक धुणे!
पूर्वपक्ष:
बोका चांगला चांगला, खोटा कधी म्हणू नाही,
बायलीच्या मांजराले , सोटा कधी हाणू नाही!
उत्तरपक्ष:
दारी चपला नी बूट, जाला चिखल नी माती,
बोका तयामाझी लोळे , त्याला कशाची ना क्षिती !
बोका मळला मळला , बायलीले मान्य नसे
रंग पांढरा पांढरा, पोट कसे काळे दिसे ?
बोका धुतला धुतला, जेंव्हा हाती सापडला
असा क्रूर अत्याचार, त्याले नाही रे भावला
बोका ओरडे धडपडे, बोका टबासी आदळे
बोका हाता ओचकारी, रक्त त्यामाजी सादळे !
अरे संसार संसार , जसा बोका मांडीवर
नाकी साबणाचे फुगे, तेंव्हा चमके मांजर
- Read more about बोका : एक धुणे!
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1826 views
..कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले..
..कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले..
हातात हात आले,ह्रदयात नाम झाले
ती सोबतीस आली,कामात काम झाले
शिकवण समान होती,त्यांची जरी तरी ती..
कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले..
ऐटीत कार गेली,मंत्रीमहोदयांची..
शिस्तीत चालणारे,ट्राफिक जाम झाले..
सारेच चोर होते,पण एकला पळाला
त्याच्या फरार नावे,नंतर इनाम झाले
रावण नको म्हणुनि,ज्यांना पसंत केले
ते ही पुढे परंतु,पुरते हराम झाले
त्यांचीच सर्व दु:खे,त्यांनाच छान विकली
पाहुनि खूश तेव्हा,पब्लिक तमाम झाले
शेजारुनि निघाली,अवखळ बदाम राणी
खिडकित त्वरित गोळा,सारे गुलाम झाले
रस्ते अरूंद झाले,शेतात फ्लॅट आले,
- Read more about ..कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले..
- 9 comments
- Log in or register to post comments
- 5999 views
सारा अमृता साहिर
सारा शगुफ्ता आणि अमृताची मैत्री खास होती. पत्रातून दोघी एकमेकींजवळ येत असत. सारा पाकिस्तानी लेखिका/कवी होती. त्या काळात एका मुस्लिम बाईनी लिहीणं समाजमान्य नव्हतंच. साराची समाजात चाललेल्या घडामोडी, स्रीयांवर होणारे अन्याय आणि तिच्या वयक्तिक आयुष्यातिल प्राॅब्लेम्स यामुळं होणारी घुसमट ती अमृताशी बोलून म्हणजे पत्रातूनच बोलून व्यक्त करत असे. असंच एक पत्र साराने अमृताला पाठवलं होतं उर्दूतूनच ...खूप उदास ...इमरोज वाचत होता आणि अमृता रडत होती...
स्पर्धा का इतर?
- Read more about सारा अमृता साहिर
- 31 comments
- Log in or register to post comments
- 17872 views
सुटलेल्या पोटाची कहाणी (भाग १)
- Read more about सुटलेल्या पोटाची कहाणी (भाग १)
- 55 comments
- Log in or register to post comments
- 39611 views
"झिझेक-ग्रस्त बदकाची कैफियत"
जो हा स्लावोजू झिझकू/ काय सांगे काय ऐकू
कसा पामरे विवेकु / ठेवावा तो?
क्रांती फेल गेली म्हणे /कशामुळे नच जाणे
किंवा त्याच्या विश्लेषणे / मेंदूस फोडी
साम्यवादा शिव्या देई/ पून्जीवादही मान्य नाही
अधले-मधले त्यांच्या काही/ असे म्हणे अपूर्णच
म्हणे मधले हे युग/ बघायचे आपले भाग
साक्षीदार म्हणुनी जाग / केवळ आता सुमित्रा!
पुंजीवाद समर्थक/ प्रचार त्यांचा भ्रामक
"करतील जर शासक / पुनर्वाटप संपत्तीचे
हुकुमशाही त्याने येई/ न्याय सुद्धा होत नाही
गरिबाचे भाग्य काही / बदलत नाही त्यामुळे"
म्हणे याचा प्रतिवाद / कसा करशील तेच सांग
सिद्धान्ताचेही अंग / नीट मांडी त्यामधे
- Read more about "झिझेक-ग्रस्त बदकाची कैफियत"
- 5 comments
- Log in or register to post comments
- 5804 views
मानव्योत्तरतेचा (Transhumanism) जाहीरनामा
Taxonomy upgrade extras
१.मानवी भविष्यावर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचंड आणि खोलवर परिणाम होऊ घातला आहे. मानवी मर्यादांचे पुढील प्रकारांनी उल्लंघन होणे स्वीकारार्ह आणि स्वागतार्ह आहे : वार्धक्याचा पराभव ,ज्ञानग्रहणक्षमतेची वाढ,,दु:ख –वेदना यांच्यावर मात आणि पृथ्वीपलिकडे मानवी वस्तीचा प्रसार.
सध्याच्या मानवी अवस्थेच्या आम्ही पलिकडे जाऊ इच्छितो.
२. यापूर्वीच्या सर्व ‘’वादां’’पेक्षा मानव्योत्तरता-वादाचे वेगळे लक्षण म्हणजे मानव्यापलिकडे जाण्यासाठी करण्याचा
तंत्रज्ञानाचा वापर.
- Read more about मानव्योत्तरतेचा (Transhumanism) जाहीरनामा
- 15 comments
- Log in or register to post comments
- 6056 views
"विजय असो , विजय असो !"
भुरुभुरु बर्फ पडत असताना
परग्रहावरून आलेल्या विजीगिषु जमातीसारखे
भारीतले पायघोळ काळे लोकर-कोट घालून
भारतीय संगणक अभियंते झपझप सर्वत्र फिरतात .
फ़ाइव्ह स्टार ऑफिस बिल्डींग च्या दारात
"ही बिल्डिंग विकत घ्यायला मी आलोय" असा
त्यांचा आवेश, त्यांचा आवेग असतो . भारतातूनच ते
उत्तम अमेरिकन उच्चार शिकून आलेले असतात . गोऱ्या
रिसेप्शनिस्ट बायकांना ते कॉफी आणायला सांगतात
(त्या चिडतात !) . आपल्या गोऱ्या सहकाऱ्यांना ते भारतीय
जेवायला नेतात, शुद्ध शाकाहारी ऑर्डर देतात व
भारतीय पाककलेवर बौद्धिक घेतात , अर्थव्यवस्थेवरही.
"असेच चालू राहिले " तर
- Read more about "विजय असो , विजय असो !"
- 5 comments
- Log in or register to post comments
- 2938 views