Skip to main content

ज्याची योग्य तक्रार त्यालाच परतावा....

अनुभव 1 - कोथरुड, पुणे येथे जाण्यासाठी एसटीच्या सात बंगला - जेजुरी गाडीचं तिकिट मी काढलं. बसच्या ठिकाण म्हणून माझ्या घराजवळच्या थांब्याचं नांव दिलं. तिकिट एसटीच्या अधिकृत आरक्षण केंद्रावर काढलेलं असल्यामुळे मला रीतसर संगणकीकृत तिकिट मिळालं.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

चेहऱ्यामागचं रूदन

तुझ्या हसण्यातसुद्धा एक प्रकारचं
रूदन दडलेलं असतं...
तुझ्या हसण्यापासून ते जर विलग केलं
तर ते एखाद्या विशुद्ध रडण्याच्या अगदी
जवळपासंच पोहोचलेलं असेल...

वर्षानुवर्ष पुरूषत्वाच्या अंगरख्यात लपेटूनच
ठेवत आलास तू तुझ्या अश्रूंना,
डोळ्यांच्या आड दडवून ठेवला आहेस
अश्रूंचा घडा आणि त्याची राखण करतो आहे
पुरूषी अहंकाराचा नाग...

आता आज झटकून टाक तो अंगरखा,
आणि फुटून जाऊदे तो घडा,
कळूदे आता दुनियेला
तुझ्या दबलेल्या आवाजाचं रहस्य...

पण तरीही आड येतं आहे तुझं पुरूष असणं...
मनावरचं ओझं वाढतंच जातं मग हळूहळू...
वाढत जातं आणि एक दिवस असह्यच होतं

"अमेरिकन पार्टी मध्ये भारतीय बाला"

अमेरिकन पार्टी मध्ये भारतीय बाला
वाइन थोडी चढली , चंद्र धुंद झाला
पलीकडच्या कोपऱ्यामधला रुंद छातीवाला
सूट बूट दाढीदिक्षित गोरा नजरी आला!

"कोण ग तो?" विचारे ती प्रिय मैत्रिणीला ,
"मार्केटिंग चा नवा व्हीपी , कालच रुजू झाला,
"येल" मधला एमबीए, गोल्ड मेडल वाला
"मार्क" असे नाव त्याचे , बॉस्टनवरून आला.

लाल लाल असे त्याची नवी लोम्बार्घिनी,
हातामधले घड्याळ जणू आय-पॅड मिनी ,
भले थोरले "डील" दिले, पर्क्स आणि मनी ,
आणि नसे गर्लफ्रेंड , गोरी किंवा चिनी"

अमेरिकन पार्टी मध्ये भारतीय बाला
बायोडेटा ऐकून चंद्र महा धुंद झाला,

मांजर-कुत्र्यांच्या/गप्पा शिळोप्याच्या

शेकोटी भोवती / गप्पा शिळोप्याच्या
पाळीव कुत्र्यांच्या / चालू होत्या
बघा आपल्याला / घरातही घेती
खायला घालती / उत्तमसे
आजारपणात / डॉक्टरकडे नेती
औषधही देती/ प्रेमपणे
केव्हढे हे थोर / असती मानव
नक्कीच ते देव/ असणार!

शेकोटी भोवती / गप्पा शिळोप्याच्या
काही मांजरांच्या / चालू होत्या
बघा आपल्याला / घरातही घेती
खायला घालती / उत्तमसे
आजारपणात / डॉक्टरकडे नेती
औषधही देती/ प्रेमपणे
बघा किती थोर / आपण मांजरे
देवच साजरे / असू नक्की!
---

'शोले'तल्या ध्येयपरास्त 'सांभा'च्या जिद्दी मुलीची यशोगाथा ......

१९४६- ४७ चा काळ असेल. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात स्वातंत्र्य मिळायला अवघे काही महिने बाकी होते, मात्र दोन्ही देशात प्रचंड राजकीय - सामाजिक अस्थैर्य माजले होते, अशातच पाकिस्तानातील कराची शहरातला एक किशोरवयीन सिंधी मुलगा त्याच्या आईवडिलांना भारतात जाण्याविषयी विनवत होता.शेवटी कुटुंब विभक्त झाले, काही जण भारतात आले तर काहीजण तिथेच कराचीत राहिले. भारतात आलेल्या या सिंन्धी कुटुंबाने पंजाबात आश्रय घेतला. एक मुलगा एक मुलगी अन आई वडील असे ते चौकोनी कुटुंब होते.

राजीव साने यांची प्रकट मुलाखत

अनेक इझम कोसळत वा भरकटत असताना नव्याने विचारव्यूह बांधण्याचा ध्यास घेणारे आणि कोणत्याही विषयात खोलवर शिरकाव करणारे राजीव साने एक व्यक्तिमत्व. ऐसीकर राजीव साने यांच्या गल्लत गफलत गहजब या पुस्तकाला नुकताच महारष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. त्या निमित्त
अजय ब्रहमनाळकार
प्रा. संतोष शेलार
पत्रकार निरंजन आगाशे
हे राजीव साने यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहेत. ही एक वैचारिक मेजवानीच आहे असे समजायला हरकत नाही.
दिनांक ४ जून २०१६
स्थळ- निवारा सभागृह एसेम जोशी फाउंडेशन समोर नवी पेठ पुणे
वेळ - सायं ५.३०

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

जेव्हा माझ्या कर्जांना (एका बँकरचे गार्‍हाणे) - विडंबन

जेव्हा माझ्या कर्जांना उधळी मुजोर माल्ल्या
माझा न राहतो मी हरवून हा 'सहारा'

काँग्रेस भाळ होते, होती प्रफुल्ल दक्षी
ओढून कर्ज घेते, हे राष्ट्रवादी पक्षी
शरदास सिंचनाच्या नाही मुळी फवारा | जेव्हा माझ्या कर्जांना...

डोळे मिटून घेतो, पण व्याजही फिटेना
हे कर्ज कोट्यावधींचे, लाखांतही चुकेना
देऊन थकलो मी सारखा तुला इशारा | जेव्हा माझ्या कर्जांना...

नोटांस हा बिअरचा, का सांग वास येतो
जिवंत कॅलेंडराचा, नुसताच भास होतो
केव्हा किंगफिशरचा उगवेल सांग तारा | जेव्हा माझ्या कर्जांना...

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार-भाग ६५

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

मी सुद्धा तसा संतप्तच!

गरीब काळ्या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत पोलिसाला
सोडून दिल्यामुळे आज अमेरिकेतले बाल्टिमोर शहर संतप्त आहे .
मी सुद्धा तसा संतप्तच .
जर न्यू यॉर्क मधली निदर्शने
वीक-एंड ला
दुपारी तीन ते सहाच्या दरम्यान
फार उन्ह किंवा पाउस नसताना
लोकल गाडीच्या स्टेशन जवळ
आणि गुन्हेगार , धोकादायक काळ्या वस्त्यांपासून दूर
झालीच ,
तर सामील होईन म्हणतो !
---