त्याचे असे झाले (भाग २)
दोन तासांनी मी उठलोच.
हे थोडेसे लाक्षणिक अर्थाने घ्यावे. डोळेमिटल्या अवस्थेत दिवा न लावता आपल्या घरात तीन फुटांच्याहून कमी उंचीच्या कायकाय गोष्टी आहेत त्याचा स्वतःच्या पायाची नडगी वापरून शोध घेणे म्हणजे 'उठणे' म्हणायचे असेल तर हरकत नाही.
शेवटी तीन छोटी स्टुले (त्यातले एक दोनदा), एक खुर्ची (या गोष्टी झोपायच्या खोलीत हव्यातच का?) आणि एक पलंगाखाली ठेवलेला पेला (तो मीच ठेवला होता) इतक्या गोष्टी 'शोधून' झाल्यावर अखेर डोळे उघडले. मग पुढची नैमित्तिक कृत्ये फारसा घोळ न घालता पार पाडली.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about त्याचे असे झाले (भाग २)
- Log in or register to post comments
- 2864 views
फुसके बार - २९ डिसेंबर २०१५ - हुरडा स्पेशल
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
मराठी बोलींचे काही नमुने
मागे एकदा मराठी भाषा शिकण्यासाठी डॉ. दत्तात्रय पुंडे, जोशी , कालेलकर इ.ची पुस्तके घेतली होती. ती वाचत असतांना त्यात दिलेले बोली भाषेचे काही मजेदार नमुने आढळले. ते वाचुन बोली भाषांचे महत्व नव्याने लक्षात आले. या व इतर भाषातज्ञांच्या मते साधारण असे मानण्यात येते की. एकभाषक समाजाच्या एका गटाकडुन किंवा एकभाषक समाजाच्या एखाद्या विशीष्ट प्रदेशातील लोकांकडुन देवाणघेवाणीसाठी, दैनंदिन व्यवहारांसाठी वापरल्या जाणार्या विशिष्ट भाषिक रुपास बोली असे म्हणतात. संपुर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर मराठी समाजाकडुन बोलल्या जातात त्या मराठीच्या विवीध बोली.
- Read more about मराठी बोलींचे काही नमुने
- 10 comments
- Log in or register to post comments
- 20836 views
त्याचे असे झाले (भाग १)
तो दिवसच असा कसा उगवला होता देव जाणे. किंबहुना उगवण्याआधीच त्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती. आदला दिवस कार्यालयात 'प्रकल्प व्यवस्थापक' (Project Manager) या बिरुदाबरोबर येणाऱ्या डोकेदुख्या (अनेकवचन बरोबर नसेल, पण भावना जाणून घ्या) मिटवण्यात गेला होता. आणि हे सगळे कधी नव्हे ते वेळेत पूर्ण करून 'संध्याकाळी घरी लौकर येण्याचा' सनातन वायदा पूर्ण होण्याचा इरादा दिसायला लागताच वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक नावाचा असुर जागृत झाला.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about त्याचे असे झाले (भाग १)
- 6 comments
- Log in or register to post comments
- 5755 views
आपापल्या डीडीएलजेंची गोष्ट
Taxonomy upgrade extras
ऋणनिर्देशः जॅबरवॉक हा सिनेमा आणि पुस्तकविषयक एक इंट्रेष्टिंग ब्लॉग आहे. त्यावर नुकताच एक गंमतीशीर प्रयोग वाचला. या धाग्याची कल्पना तिथून ढापलेली आहे. तसंच इथेच काही दिवसांपूर्वी राही यांनी असं सुचवलं होतं, की आपण आपल्या व्यक्तिगत अनुभव वा आठवणींविषयी बोललो, तर 'ऐसी'च्या चर्चांचा कोरडेपणा थोडा कमी होईल. तेही या धाग्यामागे आहे.
- Read more about आपापल्या डीडीएलजेंची गोष्ट
- 70 comments
- Log in or register to post comments
- 73121 views
ट्रॅफीक
दोन रस्ते एकमेकांना येऊन मिळतात,
तिथेच होतो भारीपैकी ट्रॅफीक
फार वर्दळ नसते सुरुवातीला
गजबजती गर्दी तर सोडाच, टोळभैरवही फिरकत नाहीत नाक्याकडे
उगाच एखादं जीव धरून राहिलेलं पिंपळाचं रोपटं
नि गंभीर होऊन गुलुगुलु बोलणारी एखादी अल्पवयीन फ्रेण्डशिप
फ्रेण्डशिप जीव धरू लागते
तसतसा नाकाही जीवही धरू लागतो
एखादी टपोरी पानाची टपरी
मोबाइल रिचार्ज मारणारा एखादा मल्टिपर्पज वाणी
नि गणपत वाण्याचे वारसदार असलेले काही फुटकळ रिक्षावाले
फ्रेण्डशिप हळूहळू सरकू लागते आतल्या गल्लीच्या लपलेल्या तोंडाकडे
तसतसे रस्ते रंगात येतात, सैलावतात
अंग ऐसपैस पसरून एकमेकांना टाळ्या देतात
- Read more about ट्रॅफीक
- 7 comments
- Log in or register to post comments
- 5552 views
फुसके बार - २८ डिसेंबर २०१५
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
फुसके बार - २७ डिसेंबर २०१५
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
फुसके बार - २६ डिसेंबर २०१५
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
फुसके बार - २५ डिसेंबर २०१५
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.