Skip to main content

कथा: विश्वरचनेचे "अज्ञात" भविष्य!

दिनांक- 27/02/2050
वार- रविवार!
वेळ- सकाळी चार!

मुंबईत अंधेरी येथे "के. के." हॉस्पीटलकडे जाणारा रस्ता सुना होता. वाहनांची वर्दळ नव्हती. पाऊस पडत होता!
"सी.एम. डब्ल्यू" कार ताशी 80 च्या वेगाने भन्नाट धावत होती. त्यात एकच व्यक्ती बसलेली होती. ड्रायव्हर सीटवर. गाडी चालवत! सृष्टीचे चक्र बिघडल्याने आता सरासरी रोज पाऊस पडायचाच!!

त्या व्यक्तीचा मोबाईल हॅण्डसेट एका केबलद्वारे त्या कारमधल्या एका फ्रंट डिस्प्ले पॅनेल ला जोडलेला होता. त्यातून डॅनियल नावचा व्यक्ती त्या कारमधल्या व्यक्तीशी इंग्लीशमधून बोलत होता, "विक्रम, कुठे आहेस? पोहोचला नाहीस का अजून?"

ललित लेखनाचा प्रकार

पठाणकोटचे शहीद व आपण

पठाणकोटचे शहीद व आपण
.

पठाणकोटमधील घटनांमुळे संरक्षणमंत्र्यांना पत्रकारपरिषद घ्यावी लागावी यावरूनच सारे आलबेल नाही हे कळावे. अशा स्वरूपाचे दहशतवादी हल्ले थांबवणे हे लष्कराच्या आवाक्याबाहेरचे आहे. कारण कितीही नाही म्हटले तरी या दहशतवाद्यांना स्थानिक मदत मिळतेच. आताही पंजाबच्या एका उच्चपदस्थ पोलिस अधिका-याने दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले असे सांगितले. अतिरेकी अशा उच्चपदस्थ अधिका-याला जिवंत सोडतील यावर कोणाचा विश्वास बसावा?

ललित लेखनाचा प्रकार

सौंदर्य प्रसाधनापासून होणारे अपाय

Taxonomy upgrade extras

सौंदर्य उजळविण्यासाठी बाजारातील महागडी सौंदर्य प्रसाधने वापरण्याएेवजी सहज उपलब्ध होणारी मेंदी, खोबरेल तेल, डाळीचे पीठ, रिठा, काळी माती, ताक, हळद, फळांचा रस, मुलतानी माती यांचा उपयोग केल्यास पैशाची बचत हाईल. तसेच बाजारातील स्वस्तात मिळणारी सौंदर्य प्रसाधने वापरल्यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याचीच शक्यता असते.
खालील प्रसाधने नेहमी वापरली जातात आणि त्यांच्यापासून अपायही होण्याची शक्यता असते.

1. हेअर डाईज :

कुराण आणि प्रेषित सोडून

Taxonomy upgrade extras

इसवी सन सातव्या शतकाच्या सुमारास प्रेषित मोहंमद यांनी अरबस्तानात केलेले कार्य महत्वपूर्ण आहे यात शंकाच नाही. विखुरलेल्या आणि सतत एकमेकांशी भांडत आणि युद्धे करत असलेल्या अरबी टोळ्यांना इस्लामच्या झेंड्याखाली संघटित करण्याचे काम त्यांनी केले आणि संपूर्ण सामाजिक व धार्मिक क्रांती घडवून आणली. त्यावेळचा अरब समाज मूर्तीपूजा, कर्मकांड ,अनिष्ट प्रथा यात गुंतलेला होता. तत्कालीन सामाजिक स्थितीमुळे अस्वस्थ झालेल्या मुहम्मदांनी सुधारणा घडविण्यासाठी ज्यू आणि ख्रिश्चन धर्मग्रंथांचा आधार घेऊन आणि त्यात बदल करून आणि भर घालून एका नवीन क्रांतिकारी धर्माची स्थापना केली.

शिवशक्तिसंगम – काय गवसले, काय राहिले?

Taxonomy upgrade extras

शिवशक्तिसंगम – काय गवसले, काय राहिले?
.
मारूंजीच्याजवळ परवा संघाचा पश्चिम महाराष्ट्र पातळीवरचा खूप मोठा मेळावा झाला.

एका दिवसाच्या काय, चार तासांच्या मेळाव्यातील कार्यक्रमाकरता उभा केलेला भव्यपणा हा मुख्यमंत्र्यांच्या स्टेडियममध्ये केलेल्या शपथविधीच्या पंधरा मिनिटाच्या झगमगीत कार्यक्रमासारखा वाटला. प्रचंड अनाठायी खर्च. भव्यतेवरचा हा खर्च दुष्काळनिधीकरता देता आला असता का? व्यासपीठ सर्वांपासून इतके दूर होते की नितीन देसाईंनी केलेली कलाकुसर जणु काही फक्त व्यासपीठावरील मोठ्या नेत्यांसाठीच होती.

नेहमीप्रमाणेच सगळीकडे शिस्त.

गन कंट्रोल अर्थात बंदूक नियंत्रण लॉबी आता भारतातही

Taxonomy upgrade extras

दुसर्‍या एका धाग्यावर बंदुकीच्या परवाना धारकांची कैफियत आपण वाचली. भारतात बंदुक वापरणं खूप अवघड आहे हे आपल्याला माहिती आहेच. त्यात हे असले परवाने घ्यायला लागल्यामुळे वापर अजुनच अवघड होतो. टीव्ही किंवा अगदी प्रार्थमिक बातम्या, सिनेमे पाहिले तरी आपल्याला हे समजेल की अमेरिकेत बंदुकीचा वापर सढळ होतो. बंदुकीच्या वापरावर नियंत्रण आणू नये असं तिथे साक्षात संविधान सांगतं. आपल्या कॉन्स्टिट्युअंट असेंब्लीला हे का नाही सुचलं असा प्रश्न साहाजिक आहे. आता ओबामासारखे बंदुक नियंत्रक बंदुकीच्या वापरावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यांचे दिवस आता भरत आले आहेत.

मुलांची मने मारण्याची काही शिक्षकांची कला.

मुलांची मने मारण्याची काही शिक्षकांची कला.

+++

अमित शिंदे यांची "काही येत नाही" या शीर्षकाची खालील लघुकथा फार छान आहे.

ललित लेखनाचा प्रकार

कारगिलजवळची हरका बहादूर बॉर्डर पोस्ट

कारगिलजवळची हरका बहादूर बॉर्डर पोस्ट
.

कारगिलमध्ये रात्र काढल्यानंतर सकाळी लेहला जाण्यास निघालो, तर एकाने सुचवले की तेथून जवळच द्रासच्या दिशेने एक बॉर्डर पोस्ट आहे. ती तुम्हाला वाघा बॉर्डरपेक्षाही पहायला आवडेल. ती जरूर पहा.

तर श्रीनगरकडून कारगिलकडे जाताना कारगिलच्या थोडेच आधी डाव्या बाजुला नदीवर एक पूल आहे. हरका बहादूर ब्रिज असे त्याचे नाव आहे.

ललित लेखनाचा प्रकार

दुबळा

एका रात्रि असाच बसलो होतो सवयीने अंधारात

मोजत होतो,विचार करत होतो की आपल्याकडे काय आहे आणि काय नाही

तसा हरलोच मी आयुष्यात….. मनाशीच म्हटलं

तेवढ्यात कोणीतरी आल्यासारखं वाटलं

प्रकाश पसरला, निळा आणि काळा किंवा असाच कुठल्यातरी रंगाचा,

बहुतेक 'तोच' आला असावा

चेहरा नव्हता दिसत, पण सर्वशक्तिमान अशा अस्तित्वाची जाणीव झाली त्याच्या ……कोणीतरी कानात कुजबुजावं तसा आवाज आला

"तस सगळच् आहे की रे!! कुठे काय कमी आहे?

अरे सगळ्यांना समान नाही बनवत मी ……..प्रत्येकाचा साचा निराळा प्रत्येकाचा पिंड वेगळा

तुला राजबिंडे रूप नसेल दिले पण चेहरा विद्रूप तर नाही ना बनवला?