Skip to main content

मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १६

व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

========

संध्याकाळी नाष्ट्याला वडापाव आणि ब्रेड-बटर-जाम यातलं आरोग्याला कमी अपायकारक काय?

खेळी

काय बोलते आहेस तू मन्थरे! तू जाणतेस, सारे नगरजन जाणतात, इतकेच काय ही गोष्ट सूर्य प्रकाशाइतकी लख्ख आहे जर कौसल्या वयाने ज्येष्ठ असेल तर मी रूपाने श्रेष्ठ आहे. मला पाहील्याशिवाया, माझ्याशी बोलल्याशिवाय महाराजांना एक दिवसाही करमत नाही. माझे चातुर्य, माझा वादविवाद इतकेच काय माझे निर्णय सार्या सार्याचे महाराज कौतुक करतात. तेव्हा तू म्हणतेस तसे होणे शक्यच नाही. एकवेळ सूर्य पश्चिमेस उगवेल, चंद्र आग ओकेल, समुद्र मर्यादा सोडेल-नदी अवखळपणा , पण महाराजांच्या हृदयातील माझे स्थान ढळणार नाही.

हिशोब!!

नमस्कार मंडळी,


खरेतर मी लेख वगैरे लिहिणा-य़ांपैकी नाही. खुप प्रतिक्रिया पण देत बसायला आणि त्यामध्ये स्कोअर सेटल करत बसायला मला आवडत नाही आणि वेळही नसतो. हा...बाकीचे लोक असे सगळे करतात ते वाचायला फार आवडते. ;)


आधी मिपा आणि मग ऐसी असे मिळून मी आता निदान ६ वर्षे मराठी आंजावर आहे पण मी लेख फारतर दोन लिहीले असतील.


धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

अलीकडे काय पाहिलंत - १३

(जुन्या धाग्यात १००च्या जवळपास प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.)

==========

विकिस्रोत:ऑनलाईन मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा




मराठी विकिस्रोताच्या माध्यमातून बहूपयोगी "ऑनलाईन मराठी टायपिंग स्पर्धा" घेतली जात आहे. इंटरनेटवर मराठी भाषेतील टाईपींगला प्रोत्साहन मिळावे हा ह्या मागील प्रमुख उद्देश आहे.


लैंगिकता आणि संबंधित प्रश्न

Taxonomy upgrade extras

भिन्नलैंगिकता सोडून इतर सगळ्या गोष्टी बेकायदेशीर, अनैसर्गिक, अनारोग्यकारक आहेत की नाही, या विषयावर पुरेशी चर्चा / हाणामार्‍या / बाचाबाची होते. पण त्या गदारोळात इतर संबंधित प्रश्नांवर चर्चा होत नाही. त्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हा धागा काढला आहे.

खालचे प्रश्न उपयुक्त ठरावेतः

१. तुमच्या आजूबाजूला कुणी क्लोजेटेड व्यक्ती आहेत का? त्यांना कोणत्या दबावाला सामोरं जावं लागतं? समाजाचं तर चुकतंच. पण ते एक असो, या व्यक्तींच नक्की काय चुकतं?
२. वंशसातत्य - कौटुंबिक आयुष्य - जबाबदार्‍या आणि नातेसंबंध या बाबतीतले प्रश्न अशा व्यक्तींना सतावतात का? त्यावर मात करण्याचे कोणते मार्ग उपलब्ध आहेत?

ही बातमी समजली का? - २८

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही.

माझा दर महिन्याचा खर्च

"महिन्याला साधारण किती खर्च येतो?" असा एक अवांतर प्रश्न माझ्या आधीच्या एका लेखावर विचारला गेला होता. त्यावर निरनिराळी आकडेवारी देणार्‍या उत्तरांचा पाऊस पडला. "या गोष्टीसाठी तुमच्याकडे इतके पैसे पडतात? अबबबबब .. " किंवा "बैबैबैबै आता इतके तरी खर्च करायला नकोत का?", "होहोहो" किंवा "नैनैनै" वगैरे सारखे प्रतिसाद होतेच, शिवाय ठाण्यात किंवा पुण्यात, त्यातसुद्धा नौपाड्यात की कासारवडवलीला, नारायण पेठेत की पिंपळे सौदागरला असे भेदसुद्धा होते. दिल्लीचं तर सगळच अचाट असे इकडच्या लोकांना वाटले.

भारतात किती टक्के लोकांना हिंदी येते?

Taxonomy upgrade extras

भारतात किती टक्के लोकांना हिंदी येते? मला किती टक्के लोकांची प्रथमभाषा हिंदी आहे हे नको आहे (हे साधारण ४० टक्क्यांच्या आसपास असल्याचे वाचले आहे - सर्वसाधारणपणे ज्याला हिंदी पट्टा म्हटले जाते तो). असा भाग सोडूनही हिंदी येणारेही बरेच जण असावेत असे वाटते, उदा. महाराष्ट्रातले बहुतांश लोक, गुजरात, प. बंगालमधील काही लोक, दाक्षिणात्य राज्यांतीलही काही लोक वगैरे. हे सगळे पकडून हिंदी येणारे किती जण असतील? अनेकदा हिंदीविरोधी मतांमध्ये 'हिंदी फक्त ४०% लोकांना येते, बाकी ६०% लोकांना हिंदी येत नाही' छाप विधाने असतात, पण हिंदी येणारे बरेच जास्त असतील असे वाटते.

झोपडपट्ट्यांचे गणित

Taxonomy upgrade extras

झोपड्यांबाबतचं गणित असं आहे.......

शहरातले उद्योजक कंपिटिटिव्ह असतात कारण त्यांना स्वस्तात काम करणारे लोक मिळतात.
स्वस्तात काम करणारे लोक मिळतात कारण झोपडीत स्वस्तात राहणे शक्य असते.