Skip to main content

निरोप

दाराला तोरण आंब्याचे,रंगित रांगोळीने अंगण सजले=*=*=
पाहुण्यांची रेलचेल, छोट्यांची गडबड वाढते
आज दिन सोनियाचा माझी लेक सासरला ग जाते...
आईच्या डोळ्यात भरले ग पाणी:(
पापणी लवता मोती येतिल ग खाली.....
ऊरातिल धडधड वाढतच जाते
लेक माझी आज सासरला ग जाते
बघता बघता डोक्यावर अक्षत पडते
सुर गुंजती सनईचे चऊघडा ग वाजे
लेक आईची कशी सप्तपदी चालते*******
लेक माझी आज सासरला ग जाते
लहान असताना धरे आई- वडिलांचा हात
सप्तपदी चालताना तिला होते का आठवण,
टोपली दिव्यांची ठेवली डोक्यावरती
झाल देताना लेकीची पाणवले डोळे बोलती
मुली तेवत रहा अशी सदा सासरी
झाले सर्व विधि नवरी अंबा ग शिंपते

मलंगगड

मागच्या पावसाळ्यापासून कुठेही भटकंती झाली नव्हती, मागचे ४/५ रविवार तर अक्षरश झोपून आणि चित्रपट बघून काढले होते त्यामुळे पाच दिवसांपूर्वी उमेशने विचारले ‘ मलंगगडला येशील का ‘ तर ताबडतोब हो म्हणून टाकले, म्हटले टाकू शनिवारची पण सुट्टी पण नशिबाने जाण्याचा बेत रविवारचा ठरला...मग झालं तर फुकट काम...!!

मदतीची चौकशी

Taxonomy upgrade extras

नमस्कार,

मी ऐसी अक्षरे वर प्रथमच लिखाण करीत आहे, कोणी मला लिखाण करताना मध्ये काही फोटो कसे टाकावे आणि तत्याच्या खाली संदर्भ कसा लिहावा या संबधी मार्गदर्शन करू शकेल काय..? मी ऐसी अक्षरे ची ‘ insert image ‘ म्हणून बटन वापरून पाहिली पण तिथे मला फोटोच्या लिंक विचारली गेली आणि लिंक टाकल्यावरही ‘प्रीव्यू’ मधे फोटो दिसले नाहीत..

उदाहरणार्थ
- लेखन
- मग काही फोटो
- परत लेखन

धन्यवाद.

Consequences or randomness?

प्रस्तुत विषय श्रद्धा/विद्यान/अधात्म्य/मानासश्स्त्र यापैकी कोणत्या विषयाच्या कक्षेत येतो हे माहिती नाही.

माणूस जगात घडणार्या घटनांमध्ये कायम संगती शोधण्याचा प्रयत्न करतो. काहीवेळेस तो यशस्वी ठरतो काहीवेळेस कशाचा कशाला मेळ लागत नाही. नक्की अस का होत? मी ‘मी’ का आहे तू ‘तू’ का आहेस? अश्या अतिशय गहन प्रश्नाची उकल करता करता माणूस थकून जातो. माणसाच्या मेंदूची उत्तर शोधण्याची क्षमता अफाट आहे असे मानले तरी देखील माणूस जेव्हा स्वताचा मेंदू अश्या गोष्टींची उकल करण्यासाठी वापरु लागतो तेव्हा तो गोंधळून जातो.
जगात घटना दोन प्रकारे होऊ शकतात एक consequences किंवा दुसरी गोष्ट म्हणजे randomness.

गंधर्व गप्पा

स्थळः बालगंधर्व रंगमंदीराबाहेरचा चौथरा
वेळः रात्रौ ९:००च्या आसपास

मी बसलो होतो तिथुन जवळच चार जेष्ठ नागरीक (पैकी ३ पुरूष व १ स्त्री) गप्पा हाणत होते. माझे मित्र पोचायचे असल्याने मी तिथे ई-पुस्तक वाचत बसलो होतो. मात्र या मंडळींचा आवाज चांगलाच लागला होता, त्यामुळे सगळे लक्ष त्यांच्या बोलण्याकडेच जात होते. त्यातील काही क्षणचित्रे

================

पु१: हे आता नाटक सुटलं ना त्यात २७ पात्र होती म्हणे (नुकतंच घाशीराम कोतवाल नाटकाचा प्रयोग संपून माणसे बाहेर पडत होती)
स्त्री: २७ म्हणजे फारच झाले नाही, १० ठिक होती फार तर!

सरसकटीकरण

Taxonomy upgrade extras

या धाग्यावर ऋषिकेषचा हा प्रतिसाद आहे. ज्यांना ह्या धाग्याच्या विषयाचे स्वरुप पाहता आवश्यक वाटते त्यांनी जरुर तो धागा वाचावा नि मग हा वाचावा.

आता खालिल उतारा (पून्हा?) वाचा -

माझी बायको जपानमध्ये होती तेव्हा तिने केलेले निरिक्षण मांडतो आहे. ते प्रातिनिधिक आहे किंवा कसे याची कल्पना नाही, परंतु धक्कादायक जरूर आहे:

जुनी ओळख

बारच्या एका कोनाड्याकडे
अर्धवट दिव्याच्या झोताबाहेर
खांदे पाडून, अवघडून
गळ्यापर्यंत खेचून कोटाचा झिपर
दोन्ही हातात धरलेली बियर
चाखतचाखत, नसलेल्या चष्म्यातून
गढूळ नजरेने इकडेतिकडे
मधूनच बघत, पण बहुतेक करून
ग्लास धरणारी बोटे निरखत
चापलेचेपले केस नीट करून उगाच
कोणीतरी आपल्याशी बोलेल
अन् आपली ओळख काढेल
अशा आशेने
एकटाच
तो मला बसलेला दिसला.
पण मी माझ्या मित्रांबरोबर होतो.
आणि नाहीतरी मी मुद्दामून गेलो असतो
म्हणा, आणि काहीतरी बोललो असतो,
तर तो गुदमरला असता,
घुमाच राहिला असता.
ही माहिती होती मला त्याची.

.

प्रश्नचिन्हाच्या माळा लावोनी
दाखवे नवी बाजू
देइ दणका प्रतिक्रियेचा
ट्रोल लागले माजू
पुण्य जाहले कमी
असे का रे राजू
वाटे श्रेण्यांची खैरात
संपादक लागले कुजू
वैतागता विद्वान ऐसीवरचे
खरडावयास नको लाजू
काहूनी उचके खोपडी
खा तू सुशेगादचे ज्ञानकाजू
पुसती का परत आलो
नाहीतर कुठे मी खाजू?

प्रेरणास्रोत-नवी बाजूंनी विचारलेला गहन प्रश्न.
परत का आलात?

फडताळात एकमेकांना लावलेल्या पुस्तकांचे लेखक (टॉय स्टोरी) सारखे जागे होतात.

राजेश जी॑ची कार्य शाळा सुरु होण्या आधिच केलेला हा छोटासा प्रायोग....

गेले काही दिवस सततच्या कामाने खुप क्॑टाळा आल होता. कालच पति महाशय काही दिवसा॑साठी बाहेर गावी गेले.
त्या मुळे आज जरा निवा॑त वेळ मिळाला. घरातिल सगळी आवरा-आवर झाली. छोटी सोनुली शाळेत गेली होती. ती येण्या आधी सगळी काम स॑पवायची होती ( कारण शाळेतुन घरी आल्या आल्या आईईईई.. भुक लागली खायल दे अस॑ सुरु होत). मी एक एक काम उरकु लगले ,मशीन चे कपडे दोरिवर चढवले, सोनुलीचा खेळ भरुन झाला, बघता बघता सगळा पसारा आवरुन झाला.

ऐसी अक्षरे लेखन कार्यशाळा - व्यक्तिचित्रण - १ व्यक्तीचं दिसणं/जाणवणं

सुरूवात करण्याची आदर्श जागा मला माहीत नाही. पण कुठच्याही प्रकारचं गद्य ललित लिखाण करायचं झालं तरी त्यात व्यक्तिचित्रण हे येतंच. म्हणून तिथून सुरूवात करूया. व्यक्तिचित्रणातही अनेक भाग असतात. तिने भोगलेले प्रसंग, तिच्यावर येणारी संकटं, तिचे प्रश्न, तिच्यावर झालेले संस्कार, तिची नातीगोती - हे त्या व्यक्तीचं बाह्य वातावरण. तिचं रूप, तिचे गुण, स्वभाव, बोलण्याची पद्धत, धडाडी, तिचा आनंद, दुःख या सगळ्या गोष्टी तिचं आंतरिक वातावरण दाखवतात. या आंतरिक आणि बाह्य वातावरणांनी घडलेला आकार म्हणजे तिचं व्यक्तिमत्व. हे आंतरिक आणि बाह्य घटक स्वतंत्र नसतात. ते एकमेकांत गुंतलेले असतात.