भावना दुखावणे: एक दुखणं
Taxonomy upgrade extras
भावना दुखावणे हा एक प्रकार आपल्या भारतीय समाजात रुढ झाला आहे. ह्यात लेटेस्ट म्हणजे कमल हासनच्या विश्वरुपम ने मुस्लिम समाजाच्या दुखावल्या आणि त्या चित्रपटावर तामिळनाडु सरकारने बंदी आणली.
- Read more about भावना दुखावणे: एक दुखणं
- 13 comments
- Log in or register to post comments
- 6239 views
आता उरली फक्त आठवण ..
बहरलेला वृक्ष होतो ,
एकदा मी छानसा -
गळुन गेली फूल पाने..
एकटा मी हा असा !
नाचती पक्षी कसे
बघुनिया खांद्यावरी..
खेळताना होइ मजला
हर्ष माझ्या अंतरी -
फूल फळ हुंगावया
जमति जेव्हां पाखरे -
हृदय माझे भरुनिया
जातसे तेव्हां खरे !
सावली शोधावया
पांथस्थ ते येती कुणी -
बाहु पसरुन स्वागताला
धन्यता वाटे मनीं !
आज काही नाही उरले
भोवती माझे इथे -
एकटा मी दु:ख माझे
सांगतो मजला इथे !
.
- Read more about आता उरली फक्त आठवण ..
- Log in or register to post comments
- 2012 views
मिठी दिठीची गाथा.
मिठीची वीण
दिठीची सय घट्ट घट्ट
आणि पाखरांनी घात केला
पहाट उमलून सारे लख्ख लख्ख.
- Read more about मिठी दिठीची गाथा.
- 7 comments
- Log in or register to post comments
- 5798 views
मनू ......माझा लेक .
"तुम्ही घर सोडून गेल्यानंतर सुद्धा बरेच दिवस तो तुमच्या दारासमोर येउन बसे आणि बंद दाराच्या कुलूपाकडे एकटक बघत बसे. थोड्यावेळाने मान खाली घालून निघून जाई . मला दिसला तर मी पोळी घालत असे " शैला फोनवर सांगत होती . मी सुन्न ऐकत होते.
"दिसला तर पोळी घालते !" ऐकून जीवाचं पाणी झालं .आमच्याकडे त्याच्यासाठी म्हणून पहिली ऊन ऊन पोळी असे. आणि त्याही आधी त्याची वाट बघणे , तो आल्याची चाहूल लागता प्रेमाने दार उघडून , त्याचाशी बोलत बोलत त्याला आत घेणे असे .
- Read more about मनू ......माझा लेक .
- 16 comments
- Log in or register to post comments
- 10861 views
सिद्धोबा
मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो.
थोडं आत वळल्यावर -
भर दुपारी अचानक
एक हिरवाकंच पाचू सामोरा येतो.
मूळ खोड नसणाऱ्या
पारंब्यांच्या वडाखाली
मोरांचा एक थवा
केकारवत फिरतो इकडेतिकडे.
तहानलेल्या डोंगराच्या पायथ्याशी
एक नितळ झरा आहे, थंडगार!
वेळू आणि आमराई
वगैरेही-
निळंशार आकाश, स्वच्छ मन,
निवलेले डोळे, अक्षय शांती-
तोच सिद्धोबा!
पण थोडं आत वळावं लागतं -
स्वतःच्या.
कारण मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो -
तिथे रहदारी असते फक्त.
.
- Read more about सिद्धोबा
- 14 comments
- Log in or register to post comments
- 10666 views
मोल्सवर्थ कोश, मोल्सवर्थ आणि कँडी - भाग ४ (अखेरचा).
संपादकः या आधीचे भागः भाग १, भाग २ भाग ३
१८५५ च्या अखेरीस कॅंडी साडेतीन दशकांच्या हिंदुस्तानातील वास्तव्यानंतर प्रकृतीच्या कारणासाठी १५ महिन्यांच्या furlough वर इंग्लंडला जायची तयारी करू लागले. (ह्या आधी ते इंग्लंडला गेल्याचा उल्लेख मला सापडलेला नाही.) पूना कॉलेजची वार्षिक तपासणी आणि विद्यार्थांची परीक्षा बाहेरील त्रयस्थ परीक्षक आणवून घेण्याची जुनीच प्रथा होती आणि कॅंडींचे जे पूर्वीचे अहवाल उपलब्ध आहेत त्यांवरून अशी तपासणी बिनबोभाट पार पडत असे. १८५५-५६ मध्ये तपासणीसाठी कॅ.काउपर (तेव्हा चालू असलेल्या इनाम कमिशनच्या उत्तर विभागाचे कमिशनर, रे.पी ऍंडरसन आणि कॅ.हिल असे तीन परीक्षक आले आणि त्यांचा आणि विशेषत: काउपर ह्यांचा अहवाल कॉलेजच्या शिक्षणाचा दर्जा, विद्यार्थ्यांची तयारी आणि कॉलेजातील नैतिक वातावरण ह्यांच्यावर सडकून टीका करणारा होता. उपलब्ध पत्रव्यवहार पाहता असे जाणवते की कॅंडी ह्यांची सुरुवातीची प्रतिक्रिया अहवालाकडे उपेक्षेने पाहण्याची होती आणि आपले काम उत्तम चालू आहे अशी त्यांची धारणा होती. विक्टोरियन सरकारी कामाच्या भाषेच्या मर्यादेत राहून कॅंडी आणि काउपर ह्यांनी एकमेकावर यथेच्छ वाक्प्रहार केले पण अशा ’तू असे म्हणालास - मी असे म्हणालो’ अशा वादातून दोघांनाहि वार लागतातच. त्यातून कॉलेजातील विद्यार्थी, इतकेच नव्हे तर शिक्षकहि, नैतिकदृष्टया ढिल्या वर्तणुकीचे आहेत असाहि एक आरोप होता आणि काउपर तो आरोप सिद्ध करण्यात यशस्वी झाले. खुद्द कृष्णशास्त्री चिपळूणकर, असिस्टंट प्रोफेसर, हे चोळखण आळीतील राममंदिराच्या शेजारच्या घरातील वेश्येकडे जातात असा आरोप पुण्यातीलच दोन पंडितांनी केला आणि समोरासमोरच्या चौकशीत तो खरा निघाला. परिणामत: कृष्णशास्त्रींना ६ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले. बाळ विष्णुशास्त्री आडकर नावाच्या कारकुनाने बांधकामाच्या हिशेबात रु. ७५ ची अफरातफर केली होती आणि १८५२ साली त्या आरोपावरून कॅंडींनी त्याला नोकरीवरून काढून टाकले होते. मात्र त्याजबरोबर त्याला एक सर्टिफिकेटहि दिले होते. ही कार्यवाही त्याच्या अन्य नोकरी मिळविण्यामध्ये अडसर होऊ नये अशी ती शिफारस होती. बाळ विष्णुशास्त्री आडकर ह्यांनी जेजुरीच्या मराठी शाळेत शिक्षकाची नोकरी मिळावी असा अर्ज केला आणि कॅंडींच्या शिफारशीवर अवलंबून डेप्युटी इन्स्पेक्टर महादेवशास्त्री कोल्हटकर ह्यांनी त्याची तेथे नेमणूक केली. परिणामी गवर्नरने कॅंडी आणि महादेवशास्त्री ह्या दोघांच्याहि बाबतीत नापसंतीदर्शक टिप्पणी केली. विद्यार्थ्यांच्या अनैतिक वर्तनाबाबतहि कॅंडींना दोष लावण्यात आला:
- Read more about मोल्सवर्थ कोश, मोल्सवर्थ आणि कँडी - भाग ४ (अखेरचा).
- 7 comments
- Log in or register to post comments
- 8475 views
संवत्सर
क्षमस्व!
- Read more about संवत्सर
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2253 views
खजिना (२/८)
- Read more about खजिना (२/८)
- 8 comments
- Log in or register to post comments
- 9625 views
एक आहे भुत्याबाबा
एक आहे
भुत्याबाबा
अंधारावर
त्याचा ताबा
अंगावरती
काळे घोंगडे
घासात खातो
दहा कोंबडे
विहिर भरून
पाणी पितो
ढगाएवढा
ढेकर देतो
सूर्य जेव्हा
गाढ झोपतो
भुत्याबाबा
जागा होतो
- ग्लोरी
- Read more about एक आहे भुत्याबाबा
- 10 comments
- Log in or register to post comments
- 4430 views
'पुणे ५२' - अस्वस्थ वर्तमानावरचं टोकदार भाष्य
डिटेक्टिव्हकथा ही साहित्यविधा म्हणून मराठीत नवी नाही. बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक, सुहास शिरवळकर अशा अनेक लेखकांनी मराठीत हा प्रकार लोकप्रिय केला. त्यांच्या लिखाणामागची परदेशी मुळं ही स्पष्ट होती. मात्र परदेशी डिटेक्टिव्हकथांशी तुलना केली, तर त्यांचे मराठी अवतार खुजे वाटत राहतात. अमेरिकेत डॅशिएल हॅमेटनं मंदीच्या काळातल्या आपल्या लिखाणात चांगल्या-वाइटाच्या रुढ कल्पनांना धक्के दिले. रेमंड चॅन्डलरनं आपल्या कथांत सामाजिक वास्तवाचं चित्रण केलं.
- Read more about 'पुणे ५२' - अस्वस्थ वर्तमानावरचं टोकदार भाष्य
- 129 comments
- Log in or register to post comments
- 93097 views