Skip to main content

आपण इंटरनेट हिंदू आहात का?

Taxonomy upgrade extras

रामचंद्र गुहा हे विख्यात विचारवंत आणि इतिहासकार म्हणून बहुतेकाना माहीत आहेत. त्यांच एक इंट्रेस्टिंग आर्टिकल काही दिवसापूर्वी वाचनात आल. ढोबळ मानाने विषय आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे. इंटरनेट. गुहानी या आर्टिकल मधून त्या विषयाला तोंड फोडल आहे जो आपल्या सगळ्यांना जाणवत तर होता पण त्याला शब्द रूप देता येत नवत. गुहानी या आर्टिकल मध्ये इंटरनेट हिंदू ही संकल्पना मांडली आहे. गुहांच्या शब्दात ," However, it is always articles that touch on the philosophy and practice of Hindutva that attract the most attention (and anger).

ढासळती कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्था

Taxonomy upgrade extras

अमेरिकेत शाळेत गोळीबार, दिल्लीत अधम बलात्कार कृत्य, दोन्ही देशाची संस्कृती जरी वेगळी असली तरी कुठेतरी कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्था अयशस्वी झाल्याचे लक्षण मानावे का? दिल्लीतल्या कृत्याने तर झोप उडविली. अशा घटना अचानक घडतात असे वाटत नाही, एकूणच मानसिक जडणघडण होत असताना आणि कौटुंबिक दुर्लक्ष (दुर्लक्ष म्हणावे का? का अति काळजी, जपणूक अशा मानसिकतेला काही प्रमाणात कारणीभूत ठरते?) अशा घटनांचे प्रमाण वाढवतात का?

रीटा वेलिणकर

आधी सध्या काय वाचताय? ला प्रतिसाद म्हणून लिहिणार होतो पण लांबत गेल्याने वेगळा धागा काढतोय
समोरच त्या तिघी दिसतात. एक डावीकडे काहिशी सुटलेली, मध्यमवयीन, लांब केसाचा थेपटा सोडलेली स्त्री; आपल्या शेजारी उभ्या असलेल्या दुसर्‍या तुलनेने तरूण, आधुनिक पेहरावाच्या स्त्रीच्या गालांवर हात ठेऊन तिचे कौतूक तरी करत आहे किंबा तिचे सांत्वन तरी करत आहे. या दोघींच्या शेजारी उजवीकडे एक तिसरी स्त्री, सपाट, एकाच रंगात कोणत्याही आकारांशिवाय, या दोघींकडे बघतेय.. पुसटशा आनंदाने, काहिशा करूणेने आणि बर्‍याच प्रमाणात भावशुन्यतेने!

नरेंद्र मोदी यांचा गुजरात निवडणुकांमधला विजय

Taxonomy upgrade extras

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमधे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला तिसर्‍यांदा विजय मिळाल्याचं वृत्त हाती आलेलं आहे.

मोदींचं वर्णन करताना "The curious case of Narendra Modi" असं म्हणावंसं वाटतं. गोध्रामधे जे झालं ते घडवणार्‍यांशी निकटचे संबंध असणारेही मोदी आणि गुजरात राज्याला प्रगतीपथावर नेऊन ठेवणारेही मोदीच. माझ्यामते गोध्राकांडानंतरचा धडा मोदी शिकलेले आहेत आणि इतक्या खुल्लेपणे राजरोस हिंसाचारावर शासकीय वरदहस्त ठेवणे परवडणार नाही हे त्यांना उमजलेलं आहे.

पाव्हणा

पोलीसात असणारा एक लांबचा पाव्हणा , दोनेक वर्षापूर्वी रिटायर्ड झाला. श्रीरंग सुभाणा साळवे. मा.पो.उपनिरीक्षक अशी पाटी त्याच्या घरावर झोकात झळतेय. रिटायर्ड व्हायच्या काही दिवस आधी हा बढतीने पोलीस उपनिरीक्षक झाला. हा वस्तीत राह्यला कधीच नव्हता. पण पाहुण्या रावळ्यांना अधेमधे भेटायला यायचा. हा आमचा लांबचा पाव्हणा जेव्हा जेव्हा वस्तीत यायचा, तेव्हा हा खरेच लांबचा वाटायचा. कायम आदबशीर शिस्तबद्ध अंतर . शेणानं सारवलेल्या भुईवर बुट न काढता , अंथरलेल्या चटई, चादरी, किँवा पोत्याचं चवाळं याकडे नाईलाज को क्या ईलाज या धारणेतून बघत बुटासहीत मांडी घालून बसणारा हा बहाद्दर !

"स्वमग्नता" : काही विचार

Taxonomy upgrade extras

गेल्या आठवड्यातली अमेरिकेतल्या कनेटिकट राज्यातील एका प्राथमिक शाळेत घडलेली दुर्घटना आपल्यापैकी बहुतेकांना माहिती असेलच. एका २० वर्षीय मुलाने न्यूटाऊन भागातील, सँडी हूक शाळेत घुसून, शाळेतील २६ मुलांची बंदुकीने निर्घृण हत्या केली. त्या आधी त्याने आपल्या आईची (जी या शाळेत शिक्षिका होती) राहत्या घरी हत्या केली. शाळेतील हत्याकांड संपल्यावर, त्याने स्वतःवरही गोळी झाडून घेतली. तो वाचला नाही. या घटनेचे पडसाद अमेरिकाभर उमटले.

'प्रिय जीए' महोत्सव २०१२

मराठीतले श्रेष्ठ कथाकार जी.ए.कुलकर्णी यांचा ११ डिसेंबर २०१२ हा पंचवीसावा स्मृतीदिन. जीए कुटुंबियांतर्फे २००३ सालापासून या दिवशी 'प्रिय जीए' महोत्सव साजरा केला जातो. २००८ पासून या महोत्सवाअंतर्गत 'प्रिय जीए सन्मान' दिला जातो. तो अनुक्रमे सुनीता देशपांडे, डॉ. श्रीराम लागू, ग्रेस, रा. चिं. ढेरे आणि आता या वर्षी महेश एलकुंचवार यांना देण्यात आला.