ब्रिटीश खगोलाभ्यासक पॅट्रीक मूर यांचे निधन
जगभरातल्या खगोलप्रेमींना आपल्या पुस्तकांमुळे माहित असणारा पॅट्रिक मूर याचे काल निधन झाले. पॅट्रिकने सौरमाला, आकाशनिरीक्षण आणि दुर्बिणींवर अनेक पुस्तकं लिहीली आहेत. या पुस्तकांमधून मला त्याची ओळख समजली तरी पॅट्रिकची ख्याती बीबीसीवरच्या 'The Sky at Night’ या कार्यक्रमामुळे होती. पन्नास वर्षांहून अधिक काळ हा कार्यक्रम टीव्हीवर सुरू आहे आणि याचा एक भाग वगळता बाकी सर्व भागांचं सूत्रसंचलन पॅट्रिकने केलं होतं.
- Read more about ब्रिटीश खगोलाभ्यासक पॅट्रीक मूर यांचे निधन
- 6 comments
- Log in or register to post comments
- 4273 views
आवरणच्या निमित्ताने
Taxonomy upgrade extras
भैरप्पायण सुरू आहे सध्या :) वंशवृक्ष आणि आवरण वाचल्या नुकत्याच. वंशवृक्ष ची स्टोरी वेगळी आहे तर आवरणचा मेसेज वेगळा आहे. भैरप्पांची संयत शैलीत उदात्तापासून विदारक अनुभव सांगण्याची शैली विशेष आवडली. इतिहास आणि इतिहासलेखनात ज्यांना रस आहे अशा सर्वांनी आवरण जरूर वाचावी अशी शिफारस करेन. आवरणमध्ये सिलेक्टिव्ह रीडिंग करणार्या आणि तेच इन्फरन्सेस ऐक्याच्या नावाखाली लोकांच्या तोंडावर मारणार्या इतिहासलेखकांची पार वाट (कादंब्रीपुर्ती तरी का होईना ;) ) लावण्यात भैरप्पा पुरते यशस्वी झालेले आहेत. या कादंबरीच्या लोकप्रियतेचे एक उदाहरण म्हंजे कन्नडमध्ये तिच्या २ वर्षांत २० आवृत्त्या निघाल्या!!
- Read more about आवरणच्या निमित्ताने
- 28 comments
- Log in or register to post comments
- 26778 views
अतर्क्य की तर्कसंगत?
Taxonomy upgrade extras
नैनं छिंदन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः
हिंदू धर्मशास्त्रानुसार आत्मा अमर असतो. तो कधीही नष्ट पावत नाही. मृत्यूनंतर आत्मा निघून गेलेले शरीर हे अचेतन असते. अर्थात, ते जाळून नष्ट केले तरी निघून गेलेला आत्मा पुन्हः दुसर्या शरीरात प्रवेश करून पुनर्जन्म होणारच असतो. अशी हिंदूंची धारणा असते. किती हिंदू हे मानतात किंवा कसे, हा प्रश्न तूर्तास बाजूला ठेवू! पण ही हिंदू धर्माची धारणा आहे, हे मात्र खरे.
म्हणूनच, अस्थी गोळा केल्या की प्रत्यक्ष दहनभूमीचे माहात्म्य संपते. दफनभूमीचे माहात्म्य असते ते ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मियांत.
- Read more about अतर्क्य की तर्कसंगत?
- 14 comments
- Log in or register to post comments
- 12774 views
तक्षकयाग : एक सुरेख नाटक.
संघर्ष हा नाटकाचा आत्मा असतो असे म्हणतात ! अनेक संघर्ष एकवटून “तक्षकयाग” हे प्रा.ल. मयेकर यांच्या कसदार लेखणीतून साकारलेले सुरेख नाटक काल पहिले.
सहकुटुंब “ मुद्दाम पहावे” अश्या शिफारासीने ही हया नाटकाची ओळख !
महांकाळ व हब्बाल हे दोन समाज एका देशात राहत आहेत राहत आहेत. ओमर (?) नी धर्माच्या आधारावर देशाची फाळणी रचली आहे हीच नाटकाची सुरवात ! फाळणी पासून सुरु होणारे नाटक लेखकांच्या मनाचा ठाव घेत घेत पहिल्या अंकात सापते तेंव्हा सेश स्वतंत्र झालेला असतो. दुसऱ्या संकट स्वतंत्र देशाचे नवे राजकारण सुरु होते आणि दहशतदाशी येवून थांबते.
- Read more about तक्षकयाग : एक सुरेख नाटक.
- 9 comments
- Log in or register to post comments
- 10322 views
मागचा कागद.....
आकाशावर लिहिलेल्या सुखांतिका,
रुततात कशा हृदयावर?
तोंडी हिशोबांची न लिहिलेली उत्तरं;
कशी काय दिसतात मागच्या कागदावर?
मागच्या कागदावर उमटलेले
कोरीव अन खोल ठसे,
काही कवितांचे, चित्रांचे, ऋणांचे,
आणि न जुळलेल्या ताळेबंदांचे
पुढे पाठ असलेली स्वप्ने
मागे थोडीशी सपाटच उमटतात
पांढुरक्या रंगहीन मागच्या कागदावर
आजकाल ठसेही अवचितच दचकतात
- Read more about मागचा कागद.....
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3659 views
सायन्स - इट्स अ गर्ल थिंग
आमच्या रोजमर्राच्या जिंदगीत काही फारशा गोष्टी घडत नाहीत. च्यायला सकाळी उठून घाईघाईत कामाला जायचं, मरेस्तोवर काम करायचं, मरेस्तोवर ऐसी वर पडीक रहायचं आणि मरेस्तोवर फेसबुक वाचन करायचं. मग संध्याकाळी परत यायचं, पोराचं आणि बायकोचं रडगाणं ऐकत जेवणापर्यंत वेळ काढायचा आणि मग थोडा टीव्ही वगैरे बघून झोपून जायचं असल्या दिनक्रमात काय विशेष घडणार? त्यामुळे आमची ध्येयं तशी छोटीशीच असतात. म्हणजे संध्याकाळी सहा वाजताच्या मीटिंगला प्रत्यक्षात हजर न रहावं लागता, फोनवरून ती घरूनच घ्यायची. आणि फोन म्यूट करून समोर टीव्ही बघत निवांत बसायचं. करू देत हवी ती बडबड.
- Read more about सायन्स - इट्स अ गर्ल थिंग
- 9 comments
- Log in or register to post comments
- 13716 views
भाषाशास्त्राची ऑलिंपियाड स्पर्धा
नमस्कार मंडळी,
गणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र या विषयांप्रमाणेच भाषाशास्त्र या विषयातही ऑलिंपियाडची स्पर्धा घेतली जाते. २००९ सालापासून भारताने या स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली आहे आणि काही पदकेही मिळवली आहेत. यावर्षीपासून या स्पर्धेसाठीचे भारतीय प्रतिनिधी ठरवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर निवड चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी २ फेब्रुवारी २०१३ रोजी होईल. त्यातून मुख्य स्पर्धेसाठी ४ विद्यार्थ्यांची निवड केली जाईल .
त्याआधी एक कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेचे तपशील पुढीलप्रमाणे-
कालावधी: ६ दिवस (२४ ते २९ डिसेंबर, २०१२)
वेळः सकाळी १० ते दुपारी ४
- Read more about भाषाशास्त्राची ऑलिंपियाड स्पर्धा
- 10 comments
- Log in or register to post comments
- 4727 views
श्रद्धांजली
कळविण्यास अत्यंत दु:ख होते की, "ऐसी अक्षरे"च्या सदस्या अदिति यांचे दीर्घकालीन आजारानंतर निधन झाले.
"ऐसी अक्षरे"चा आजवर जो छोटासा प्रवास झाला आहे त्यात त्यांनी मनापासून सहभाग घेतला. आपल्या उत्तम शैलीमधे वेळोवेळी जिव्हाळ्याच्या विषयांवर लिखाण केले. या लिखाणातून (आणि त्यांच्या प्रतिक्रियांमधून) त्यांच्या बुद्धीमत्तेची, रसिकतेची साक्ष पटल्यावाचून राहात नाही. येथील अनेक सदस्यांशी त्यांचे निखळ मैत्रीचे संबंध तयार झालेले होते.
- Read more about श्रद्धांजली
- 28 comments
- Log in or register to post comments
- 14760 views
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची भारतावर बंदी
काल वाचलेल्या बातमीनुसार आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (IOC) भारतावर बंदी आणण्याची घोषणा केलेली आहे.
भारतीय समितीच्या निवडणुका आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या नियमानुसार घेण्याबद्दल IOC ने अनेक वेळा पूर्वसूचना देऊनही, त्या सूचनांना धुडकावून लावत भारतीय समितीने सरकारी नियमांनुसार निवडणुका घेतल्या. या निवडणुका अवैध असून पर्यायाने सद्यस्थितीतील भारतीय संघटनाच अवैध ठरते असा निर्णय IOC ने घेतलेला आहे.
- Read more about आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची भारतावर बंदी
- 30 comments
- Log in or register to post comments
- 10313 views
'गावगाडा' - शतकानंतरचा
त्रिंबक नारायण आत्रे यांचं 'गावगाडा' हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राविषयी रुची असणाऱ्या प्रत्येकानं वाचायलाच हवं असं पुस्तक आहे. कालमानानुसार महाराष्ट्रातलं गाव बदललं तसा गावगाडादेखील पूर्वीसारखा राहिला नाही. आजच्या महाराष्ट्रातल्या गावाचं चित्र कसं आहे, ते सांगणारं 'गावगाडा - शतकानंतर' हे नवीन पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. अनिल पाटील (सुर्डीकर) हे त्याचे लेखक आहेत. मनोविकास प्रकाशनानं ते प्रकाशित केलं आहे. सदानंद मोरे यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी या पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्याविषयीचा 'सकाळ'मधला हा वृत्तांत :
- Read more about 'गावगाडा' - शतकानंतरचा
- 18 comments
- Log in or register to post comments
- 28066 views