जाणीव भान भाग -8
आपला अबोल सांगातीः अनकॉन्शियस माइंड
आपण – मानव प्राणी म्हणून – आपल्यातील जाणिवाच्या वैशिष्ट्याबद्दल नेहमीच गर्व बाळगत असतो. आणि त्यात काही गैरही नाही. परंतु या जाणीव क्षमतेचा विचार करताना आपण नेहमीच आपल्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम करत असलेल्या अनकॉन्शियस माइंडच्या क्षमतेला विसरतो. अनकॉन्शियस माइंड लक्षणीय प्रमाणात आपल्या जाणीव क्षमतेत भर घालत असते.

माहितीमधल्या टर्म्स
- Read more about जाणीव भान भाग -8
- Log in or register to post comments
- 1113 views
कीचक
"...तो बघा किचक. जुलमी आहे."
"अरे! पण लोक त्याच्या पाठीशी आहेत. तो करतोय ते बरोबरच आहे."
"किचक असता तर भीमानं मारला असता"
"बरोब्बर. मेला नाही, त्या अर्थी हा किचक नाहीच. सद्गुणांचा पुतळा आहे. सत्याचा विजय होतो हे खरं असेल तर ज्याचा विजय झालाय ते सत्यच असलं पायजे"
"तो सत्य आहे, म्हणजे रडणाऱ्या दासी, सेविका ह्या खोटरड्या स्वार्थी हलकट नीच आहेत. त्या मेलेल्या बऱ्या. त्यांना टांगता आलं नाही तरी निदान त्यांनी बूट टांगले हे उत्तमच केलं."
खदाखदा हसण्याचा आवाज.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कीचक
- 4 comments
- Log in or register to post comments
- 2429 views
ख्रिसमस केक
माझ्या मामीनं शिकवलेल्या अनेक पाककृतींमधली ही माझी सगळ्यात आवडती आहे कारण या केकमध्ये रम वापरून, लवंग, दालचिनी, संत्र्याच्या साली अशा विविध जिन्नसांचे तिखट-गोड-आंबट स्वाद आणि त्यांचे गंध केकमध्ये मुरवले जातात. केक ख्रिसमसच्या थोडा आधी बेक करून एखादा आठवडा त्याला रोज थोडी थोडी रम 'भरवायची' असते. मी कधीच ख्रिसमससाठी म्हणून हा केक केला नाही. पण थंडी पडू लागली की या पाककृतीची आठवण येते.
- Read more about ख्रिसमस केक
- 42 comments
- Log in or register to post comments
- 9278 views
राधेभय्या आणि कंपासबॉक्स मधली भूमिका चावला
आठवीत आमच्या क्लासमध्ये "राधेभय्या" होता. म्हणजे त्याचं खरं नाव काहीतरी कृनाल की कुणाल होतं पण त्याला सगळेच राधेभय्याच म्हणायचे. तो दिसायला अप्सरा पेन्सिल सारखा सरळसोट. हडकुळा. अंगावर कुठेही उंचसखलता नाही. बेंबीच्या खालपर्यंत पॅन्ट घालायचा. पोटाच्याखाली दोन बाहेर आलेल्या टोकदार हाडांवर ती पॅन्ट लोंबकळायची. व्यवस्थित धुतलेल्या आणि इस्त्री केलेल्या त्याच्या शर्टचा एक भाग बाहेर आणि एक आत राहायचा. चालताना पाठीला किंचित बाक आणून चालायचा. दर महिन्याला नवीन कुठल्यातरी हटके रंगाचा गॉगल घेऊन यायचा. कधी टायच्या नॉट मध्ये तर कधी बेल्टला गॉगल अडकवायचा.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about राधेभय्या आणि कंपासबॉक्स मधली भूमिका चावला
- 4 comments
- Log in or register to post comments
- 2097 views
मनमोहिनी
पावलांचे सोनेरी ठसे तुझ्या
उमटले ह्रदयी माझ्या
हळूच वाजली पैंजण तुझी आणि
रेशीमगाठी बांधल्या जन्मांतरीच्या
- Read more about मनमोहिनी
- Log in or register to post comments
- 958 views
पुरंदरचा धूर्त तह
पुरंदरचा धूर्त तह
पुरंदरचा धूर्त तह
नमस्कार इतिहास प्रेमी वाचकांसाठी सादर केले आहे.
शिवाजी महाराजांच्या जीवनात एका आणीबाणीच्या परिस्थितीत मुगल सैन्याच्या नाकेबंदी नंतर शामियान्यातील राजकारणात धूर्तपणे वाटाघाटीकरून आलेल्या संकटाला विजापुरकरांवर ढकलून आपले किल्ले वाचवण्यासाठी केलेल्या खेळ्यातून दूरदर्शी धोरणी आणि हिम्मतीचे राजकारणी कसे होते त्याचे दर्शन होते.


धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about पुरंदरचा धूर्त तह
- Log in or register to post comments
- 1087 views
आय लाईक द वे यू मूव्ह
"अरे काल संध्याकाळी कट्ट्यावर दिसला नाहीस?"
"पुतण्याचं लग्न आहे उद्या - त्याच्याच फंक्शनला गेलो होतो."
"पुतण्याचं नाव काय म्हणालास?"
"रमेश. जीएम रमेश."
"जीएम? तुझा पुतण्या जेनेटिकली माॅडिफाईड आहे?!?"
"गप रे! जीएम म्हणजे ग्रँडमास्टर. 2525 चं इलो रेटिंग आहे त्याचं!"
"अरे वा! कधी बोलला नव्हतास? पण ते असो. कालचं मेहंदी-संगीत वगैरे कसं झालं? मजा आली?"
"संगीत नव्हतं. आगळावेगळा कार्यक्रम होता."
"म्हणजे?"
- Read more about आय लाईक द वे यू मूव्ह
- 10 comments
- Log in or register to post comments
- 3089 views
बेंच
पंच्याऐंशी साली रघुनाथकाका गेले, तेव्हा त्यांच्या मुलांनी सोसायटी कंपाऊंडच्या कोपऱ्यात काकांच्या स्मरणार्थ दोन बेंच बांधून घेतले. छान ग्रॅनाईटचे बेंच. काटकोनात बांधलेले. एका बेंचवर तीनजण बसू शकतील असे. काकांच्या स्मरणार्थ अशी पाटी कोरलेले. खरेदी करून किंवा देवळातून आल्यावर जिने चढायच्या आधी वयस्कर लोक जरा बेंचवर बसून दम खात. क्रिकेट खेळून अगदीच घाम आल्यावर, किंवा बाॅल शेजारच्या वाडीत गेला तर तो परत आणेपर्यंत, मुलं बेंचवर बसून गप्पा मारत.
- Read more about बेंच
- 6 comments
- Log in or register to post comments
- 2279 views
जाणीव भान भाग -7
मेथांबा
"डाॅन एल पावो रेआलसाठी काम करणार का?"
"मी? काहीतरी काय? मी साधा माणूस आहे हो. डाॅन लोकांशी माझा काय संबंध?"
"मी काय एल पासोवरून आलेला वाटलो काय? तुमच्या बॅगेतली बरणी बघितलीय मी!"
"मग? घरून येताना खाऊ आणलाय फक्त!"
"ती हिरव्या झाकणाची बरणी पाहिली मी. आणि मेथांबा असा स्टिकरसुद्धा!"
"अहो मेथीचे दाणे आणि कैरी यांचं लोणचं असतं ते. त्यात डाॅन एल पावो रेआलला काय स्वारस्य असणार?"
"खामोष! माझे आजोबा नूमवित होते. संधी-समास मीसुद्धा कोळून प्यायलोय."
"अहो काय बोलताय तुम्ही?"
"मेथी अधिक आंबा यांचा संधी मेथ्यांबा होईल."
"क्काय?"
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about मेथांबा
- 8 comments
- Log in or register to post comments
- 2491 views