Skip to main content

अ‍ॅलेक्स ग्रे

"जे न देखे रवि" ही उक्ती केवळ कवींनाच लागू होत नसून अन्य कलाकार हे देखील स्वतःच्या अंतर्चक्षूंनी तसेच अंगभूत प्रतिभेने, या भासमय जगाच्या पलीकडील विश्वाचे विराट दर्शन आपल्याला सदैव घडवित असतात. कलाकारांची पराकोटीची संवेदनशीलता, तीक्ष्ण नीर्मीतीक्षमता, अतिंद्रिय घटना जाणून घेण्याची ताकद हे काही मुद्दे लक्षात घेता, अधिभौतिक , पारलौकीक जीवनाशी संपर्क साधणार्‍या पराकोटीच्या संवेदनशील चित्रकारांमध्ये "अ‍ॅलेक्स ग्रे" यांचे नाव गणले जावे.

जुगलबंदी

भारतीय संगीत/नृत्यामधे जुगलबंदी एक अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे. जुगलबंदी ही दोन वेगळ्या संगीत/नृत्यप्रकारांत किंवा एकाच प्रकारच्या संगीत/नृत्यप्रकारात होऊ शकते. अनेकदा वाद्यांची जुगलबंदी किंवा वाद्य आणि नृत्य यांची जुगलबंदीही आपण पाहिली आहे. हिंदी चित्रपटांमधे अशा अनेक प्रकारच्या जुगलबंद्या आपण पाहिलेल्या आहेत. चित्रपटांमधे कव्वाली किंवा उत्तर/दक्षिण शास्त्रीय भारतीय नृत्यप्रकारांची जुगलबंदी जास्त प्रमाणात दिसते. कमी प्रचलित असलेली एक जुगलबंदी म्हणजे, शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य यांची. त्याचाच एक नमुना खाली देत आहे.

सौदा - भाग २

सौदा - भाग १

दुपारी दोन घास खाल्ल्यावर अनघा बेडरूममध्ये पडल्या पडल्या पुस्तक वाचत होती. वाचता वाचता कधीतरी तिचा डोळा लागला. दुपारचे साडेतीन वाजत आले असावे. कशानेतरी अनघाची झोप मोडली. तिने डोळे किलकिले केले, हात ताणून आळस दिला आणि स्वत:ला सावरत ती उठू लागली. अचानक पलंगाच्या पायाशी कोणीतरी उभं असल्याचं तिला जाणवलं म्हणून तिने नजर वळवली.

पलंगाच्या पायथ्याशी ती कालची बाई हात पसरून उभी होती... "दे ना, देशील ना?"

आता पुढे....


ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण...

हें अपार कैसेनि कवळावें। महातेज कवणें धवळावें। गगन मुठीं सुवावें। मशकें केवीं ? ॥७४॥
परी एथ असे एकु आधारु। तेणेंचि बोले मी सधरु। जे सानुकूळ श्रीगुरु। ज्ञानदेवो म्हणे ॥७५॥

ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात गुरुची महती सांगताना ज्ञानदेव म्हणतात की, हे गीतेचे अपार तत्वज्ञान म्हणजे सूर्याला उजाळा देण्यासारखे किंवा चिलटाने आकाशा मुठीत धरण्यासारखे आहे. तरी पण मला आधार आहे तो अनुकूल असलेल्या श्री गुरु निवृत्तीनाथांचा, म्हणूनच मी गीतेवर प्राकृत भाषेत टीका लिहिण्याचे अतिशय कठीण असे काम करु शकेन.

मार खाल्ला आहे का?

आपण आयुष्यात दणकून मार खाल्ला आहे का?

आईबाबांकडून.. जास्त शक्यता..

अन्य कुठे बाहेर?

कॉलेजात. पोरीच्या लफड्यात?

दंगलीत.. उगाच बाजूला उभे असताना..

गुंडांकडून.. कोणाच्या मधे पडल्यावर.

त्यासोबतच उलटही... म्हणजे आपण कोणाला कधी मनसोक्त हग्यामार दिला आहे का?

नंतर वाईट वाटलं का?

वेळ न येवो अशी शुभेच्छा..

यापूर्वी आली असल्यास साग्रसंगीत सांगावे.. विनंती..

दिवाळीनिमित्त शुभेच्छा...!!

सौदा - भाग १

लेखनप्रकारः गूढकथा

* एका सुप्रसिद्ध इंग्रजी कथेवरून ही कथा बेतलेली आहे. हे भाषांतर नव्हे. लिहिता लिहिता गोष्ट त्या कथेकडे झुकू लागली म्हणून त्या कथेच्या दिशेनेच लिहिली. ज्यांच्या डोक्यात मूळ कथा येईल त्यांनी थोडा धीर धरावा. या कथेच्या शेवटी मूळ कथेला श्रेय देण्यात येईलच.
.
.
.


"झालीस का गं तयार?" निलिमाताईंनी अनघाला हाक दिली.

श्री गणेशा - मराठी मेनू

नमस्कार मंडळी,
एक 'चमत्कृती' घेऊन दाखल होत आहे 'ऐसी अक्षरे' च्या टीम मध्ये. सुरवात गोडानेच करावी हा प्रघात मोडून जरा झणझणीत मेनू घेऊन आले आहे.
असो, तर आज ख़ास मराठमोळा मेनू घेउन प्रत्यक्ष सहभागी व्हायचं ठरवलं.

सुरवात वांग्याच्या भाजी ने करू.

वांग्याची भाजी : साहित्य -
५-६ हिरवी वांगी,
लसुण ५-६ पाकळ्या (अगदी मोठ्या असतील तर ३-४) ,
कोथिम्बिर १/२ वाटी बारीक़ चिरून,
दाण्याच कूट १ वाटी
चवीनुसार जिरे पूड, धणे पूड, तिखट, मिठ, फोडणीसाठी तेल, जीरे, मोहरी, हिंग, हळद, कडीपत्ता

आणखी एक संकट

अवकाशात निकामी उपग्रहांचा कचरा साठत असताना आता हा कचरा पृथ्वीवर आदळू लागल्याने पृथ्वीवासियांच्या डोक्यावर आणखी एका संकटाची तलवार टांगली गेल्याने चिंता वाढली आहे.
गेल्याच महिन्यात नासाचा अपर एटमोस्फेअर रिसर्च सॅटेलाइट पॅसिफिक महासागरात कोसळला होता. आता जर्मनीच्या अंतराळ संशोधकांनी निकामी झालेला आणखी एक उपग्रह या आठवड्यात पृथ्वीवर आदळणार असल्याचे सांगितले आहे. परंतु तो नेमका केव्हा आणि कधी पडणार हे स्पष्ट केले नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे.

पाथ्स ऑफ ग्लॉरी

काही चित्रपट पाहुन झपाटल्यासारखे होते. मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटते. आपण नि:शब्द होतो. स्टेनली कुब्रिक दिग्दर्शित पाथ्स ऑफ ग्लोरी हा असाच एक चित्रपट. लोलिता, आइज वाइड शट, क्लोकवर्क ऑरेंज असे एकापेक्षा एक वादग्रस्त आणि भडक चित्रपट बनवणार्‍या कुब्रिकने पाथ्स ऑफ ग्लोरी सारखी दर्जेदार कलाकृती देखील सादर केली आहे.

पाथ्स ऑफ ग्लोरी याच नावाच्या Humphrey Cobb लिखीत कादंबरी वर आधारीत आहे. चित्रपटाला पहिल्या महायुद्धातील जर्मनी आणि फ्रान्स यांच्यामधल्या एका लढाईची पार्श्वभूमी आहे. पण हा युद्धपट मात्र नाही. लढाईमागचे राजकारण हाच या चित्रपटाचा विषय आहे.